photo

Wednesday, July 30, 2008

कॉललेटरचा इनबॉक्स

व्हायरसच्या भीतीने काही कंपन्या अँटॅचमेण्ट स्वीकारत नाहीत. अशा वेळी जॉबच्या अँप्लिकेशनमध्ये तपशील कसा द्याल?... इन पर्सन अँप्लिकेशन हा काय प्रकार असतो? असा अर्ज कंपनीत जाऊन करताना कोणती काळजी घ्यावी?... इमेलद्वारे किंवा कम्प्युटरचा उपयोग करून जॉब अँप्लिकेशन करताना उपयोगात आलेल्या नव्या पद्धती आणि त्यासाठी करायची तयारी, यासाठीच या खास टिप्स...

............

नोकरीसाठी पाकिटातून अर्ज पाठवून देण्याची पद्धत आता इतिहासजमा झाली. आता आहे तो कम्प्युटरचा जमाना. त्यावरूनच रेझ्युमे किंवा पूर्ण अर्ज पाठवावा लागतो. यातही वेगवेगळ्या पद्धती रुढ आहेत. त्याची एक झलक 'प्रगती फास्ट' मॅगझिनच्या यापूर्वीच्या अंकात पाहिली. आपण रेझ्युमे कसा तयार करावा आणि तो ऑनलाइन कसा पाठवावा हे पाहिलं. नोकरीसाठी अर्ज देण्याचे आणखी काही प्रकार आहेत. नोकरीसाठी अप्लाय करताना कंपन्यांनी स्वत:च्या वेबसाइटवर सोय केलेली असते. तो फॉर्म भरून पाठवला की झालं. पण त्या शिवाय आणखीही काही मार्ग आहेत.

हा अर्ज तुम्ही संबंधित अधिका-यास (हा नेमका कोण ते आधी माहीत करून घ्या) इमेलने पाठवू शकता. इथे जो मजकूर पाठवायचाय त्याचा निश्चित फॉर्म नसल्याने इमेल तुम्हाला स्वत:लाच तयार करावा लागेल. म्हणून सुरुवातीलाच एक कव्हरिंग लेटर लिहा. हे पत्र लिहिण्याच्याही विशिष्ट पद्धती आहेत. त्या जाणून घ्या. विविध पुस्तकांत अथवा नेटवर याची माहिती मिळू शकेल.

हा इमेल स्वत: पुन:पुन्हा तपासून पाहा. त्यात स्पेलिंगच्या अथवा व्याकरणाच्या कोणत्याही चुका होऊ देऊ नका. कारण तुमचं हे 'फर्स्ट इम्प्रेशन' असतं. हा मजकूरच अतिशय बिनधास्तपणे लिहिलात तर नोकरी विसरून जा. कम्प्युटरमधल्या 'स्पेल चेक'वर विश्वास ठेवू नका. स्वत: सारा मजकूर चेक करा.

मजकूर मुद्देसूद हवा. फार तर तीन लहान परिच्छेद. स्वत:चं वर्णन मोजक्या शब्दांत करायला शिका.

पत्रात स्वत:चं नाव, पत्ता, फोन नंबर आणि इमेल न विसरता द्या. अन्यथा अर्ज चांगला, पण कोणी पाठविला हे कळणारच नाही, असं नको.

इमेलला तुमची सर्टिफिकेट्स अटॅच करा. त्यासाठी आधी त्यांचं स्कॅनिंग करावं लागेल. बहुतेकांच्या घरी ती सुविधा नसते. म्हणून बाहेरून एकदा ही सर्टिफिकेट्स स्कॅन करून घ्या आणि तीनचार ठिकाणी सेव्ह करून ठेवा.

काही कंपन्या अँटॅचमेंटमध्ये व्हायरस असेल म्हणून घाबरतात. अँटॅचमेंट नको असं निश्चित सांगितलं असेल तर इमेलवरच्या तुमच्या पत्त्याच्या खालीच तुमच्या सर्टिफिकेटचा तपशील नीट चार्टच्या स्वरूपात टाइप करा. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्येच हे चार्ट तयार करता येतात. नुसता एका ओळीत टॅब न देता वगैरे मजकूर देऊ नका.

सा-या मजकुरासाठी साधा फाँट वापरा. उगाच फॅशनेबल वा वेगवेगळे फाँट वापरून इमेल बटबटीत करू नका.

शक्य असेल तर या सा-या मजकुराचा प्रिंटआऊट काढा. तो कसा दिसतोय, शब्द कुठे वरखाली झालेत का, शब्द कुठे विनाकारण तुटतोय का वगैरे गोष्टी परत नजरेत येतील. त्या दुरुस्त करा.

हे सारं झालं, की हा मेल प्रथम स्वत:ला पाठवा. तो ओपन करून पाहा. फाँट व्यवस्थित आहे ना, मेल पाठवताना काही अनावश्यक कन्व्हर्जन झालं नाही ना, एखादं हेडिंग अनावश्यकपणे मोठं दिसतंय का, अथवा मजकुराचा फाँट साइझ बरोबर आहे ना, याची खात्री करून घ्या. मेल सर्वार्थाने ओके असेल तरच संबंधित कंपनीला पाठवा.

अर्जाचा आणखी एक प्रकार म्हणजे 'इन पर्सन' अँप्लिकेशन. स्वत: कंपनीतील संबंधित माणसाला प्रत्यक्ष जाऊन दिलेला अर्ज. तुम्ही कंपनीत जायचं, एचआरच्या अधिका-याला भेटायचं, तुमच्या पात्रतेचा जॉब आहे का ते विचारायचं. असल्यास तेथीलच एखाद्या कम्प्युटरवर मजकूर टाइप करून द्यायचा, असं सर्वसाधारण स्वरूप या 'इन पर्सन' अँप्लिकेशनचं असतं.

तुम्ही प्रत्यक्ष जात असल्याने तुमचे कपडे आकर्षक आणि योग्य ते हवेत हे ओघानं आलंच.. तुमचं प्रथमदर्शी रूप मोहवणारे नसेल तर तुम्हाला काम कधीच मिळणार नाही असं समजा.

अर्ज आयत्या वेळी टाइप करायचा असल्याने (बहुतांश कंपन्या रेडिमेड अर्जच स्वीकारत असल्या तरी) वर इमेल अँप्लिकेशनमध्ये घ्यायची काळजी इथेही घ्या.

हल्ली ब-याच कंपन्यांनी 'ऑन द स्पॉट' मुलाखती सुरू केल्या आहेत. तुम्ही अर्ज घेऊन जायचं, लगेचच तुमची मुलाखतही घेतली जाते. इथे डबल काळजी हवी. अर्ज नीटनेटका तर हवाच, पण मुलाखतीचं तंत्रही नीट जमायला हवं. ही मुलाखत कशी द्यावी हे संबंधित क्षेत्रातल्या लोकांकडून समजून घ्या.

अर्जाचा तिसरा प्रकार म्हणजे 'पार्ट टाइम जॉब'साठी अर्ज. कंपन्यांची उलाढाल कोट्यवधी रुपयांची असते. तिथे असंख्य वेगवेगळे विभाग असतात. त्यात काम करणा-यांची पात्रताही विभागानुसार बदलती असते. या विभागांच्या कामाच्या वेळाही वेगवेगळ्या असू शकतात. अलीकडे काही कंपन्यांमध्ये 'कर्मचा-यांच्या सोयीनुसार कामाच्या वेळा' अशी पद्धत आली आहे. म्हणजे असं की, समजा ड्युटी आठ ते चार अशी असेल पण कर्मचा-याला काही घरगुती कारणांमुळे अकरा वाजण्याच्या आत ऑफिसला येणं शक्य नसेल तर त्याने अकरा ते सात अशी ड्युटी करावी, अशी मुभा दिली जाते. अशा प्रकारच्या किती नोक-या आहेत, त्यात आपण फिट बसतो का, आपल्या वेळेनुसार काम करायला कंपनी राजी होईल का वगैरे बाबींचा तपास आधी लावा. मगच नेमक्या माहितीनिशी अर्ज करा.

आधीच्या सर्व अर्जप्रकारातील सर्व अटी इथेही पाळल्या गेल्या पाहिजेत. शिवाय आपण कोणत्या वेळेला नेमके काय काम करू शकतो याचाही तपशील पाहिजे.

ऑल द बेस्ट.

विकास मनुष्यबळाचा

ह्युमन रिसोसेर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे आधुनिक कंपन्यांमधलं सर्वांत महत्त्वाचं खातं बनलं आहे. कर्मचारी आणि कंपनीचं व्यवस्थापन यांच्यातला सर्वांत बळकट दुवा असतं ते एचआर डिपार्टमेंट. कंपनीनं ठरवलेली सारी लक्ष्यं पुरी करण्याची सर्वाधिक जबाबदारी असते ती याच 'एचआर'वर.

' ग्लोबल व्हिलेज' बनत असल्याच्या पार्श्वभूमीवर कॉपोरेर्ट जगात किती स्पर्धा असेल याची आपल्याला कल्पना आहेच. या स्पधेर्त टिकण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा (ह्युमन रिसोर्स) विकास साधणं कॉपोर्रेट्ससाठी अत्यंत आवश्यक असतं. हे साध्य करण्यासाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्ट/डेव्हलपमेण्ट हा विभाग अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. किंबहुना कंपनीला 'शॉक प्रूफ' बनवण्याचं काम हा विभाग करत असतो.

कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमधला दुवा म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्ट हा विभाग. ही दोन टोकं एकत्र आल्यानेच त्या कंपनीला आखलेली सर्व ध्येयं साधणं शक्य होतं. या घडीला भारतातल्या कॉपोर्रेट क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येत आहेत. इथल्या यंत्रणेमध्ये बदल होताहेत, मॅनेजमेण्ट संस्कृती बदलत आहे आणि जागतिकीकरणामुळे कॉपोर्रेट फिलॉसॉफीही बदलत आहे. या सगळ्यात एचआर मॅनेजरची भूमिका बदलणंही स्वाभाविकच आहे.

स्पर्धा वाढत असल्याने कुशल आणि 'सजग' कर्मचाऱ्यांना वाढती मागणी आहे. तर अकुशल कर्मचाऱ्यांंना जवळपास मागणीच नाहीए. अशा कुशल कर्मचाऱ्यांंना हेरणं, कंपनीच्या वाढीसाठी त्यांचं कौशल्य वापरणं ही महत्त्वाची कामं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्ट या विभागाला करावी लागत असल्याने सध्या हा विभाग सर्वात महत्त्वाचा बनला आहे.

कंपनीची प्रगती साधण्यासाठी कुशल कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीकडे आकषिर्त करण्याचं काम एचआरएमला करावं लागतं. त्यामुळे या विभागात काम करणारी मंडळी पूर्वग्रहदूषित असून चालत नाही. म्हणूनच कंपनीच्या प्रगतीमध्ये हा विभाग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो, असंच म्हणावं लागेल. त्यासाठी एचआर प्रमुखांमध्येही काही कौशल्यं असावी लागतात.

* एचआरप्रमुखाला आपल्या कंपनीची सर्व रचना माहिती असावी लागते. बाजारातल्या घडामोडींची माहिती त्याला असावी लागते. आपल्या कंपनीचा व्यवहार भविष्यात कसा असेल, याचा विचार करण्याची क्षमता त्यात असली पाहिजे.

* कंपनीच्या धोरणांमधले बदल अंतर्गत व्यवस्थेत अमलात आणण्याचं मुख्य काम एचआर प्रमुखाला करायचं असतं. त्यासाठी त्याला स्वत:साठी काही नियम घालून घ्यावे लागतात.

* एचआर प्रमुखाला टीमवर्कचं महत्त्व माहीत असावं लागतं. कंपनीतल्या विविध विभागांशी त्याचे संबंध चांगले असावे लागतात. त्या विभागांच्या तक्रारी, तंट्यांबाबत त्याने व्यवस्थापनाशी चर्चा करायची असते.

* व्यवस्थापनाची कार्यपद्धती त्यांना माहीत असावी लागते. व्यवस्थापनाच्या निर्णयांमध्ये त्याचा सहभाग अपेक्षित असतो.

* कंपनीच्या प्रगतीला हातभार लावू शकणाऱ्या कुशल कामगारांना आपल्या कंपनीकडे आकषिर्त करण्याची कला एचआर प्रमुखाला अवगत असणं आवश्यक असतं.

उत्तम एचआर प्रमुख बनण्यासाठीचे काही 'गोडन रूल्स':

* कर्मचाऱ्यांबद्दलची मतं स्पष्ट हवीत.

* प्रगतीचं मोजमाप करता आलं पाहिजे.

* कर्मचाऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेता आल्या पाहिजेत.

* ते करताना कामात लवचिकता असली पाहिजे. म्हणजे सर्व बाजूंचा विचार करता आला पाहिजे.

* दर्जाचं भान असलं पाहिजे.

* वेळेचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे.

* वेळेत निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे.

* नेहमी विजेत्याच्या दृष्टिकोनातून विचार करता आला पाहिजे.

* कामाच्या तणावावर विजय मिळवता आला पाहिजे.

नव्या बाजारपेठेत आमूलाग्र बदल होत असताना मनुष्यबळ विकासाच्या क्षेत्रालाही नवीन आयाम प्राप्त होत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना केवळ 'कर्मचारी व्यवस्थापन' या एकाच गोष्टीवर लक्ष केंदित करून चालणार नाही तर कर्मचारी विकास आणि त्यातून संस्थेचा विकास, असा मोठा दृष्टिकोन ठेवावा लागेल.

****************************

* ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्टचं हे पारंपरिक रूप आता बदलत असल्याचं मत आयटीएम ग्रुपचे चेअरमन पी. व्ही. रामण्णा यांनी व्यक्त केलं आहे. ते सांगतात, 'एचआरएच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी पुष्कळ आहेत. परंतु एचआर हा विषय घेऊन एमबीए करणाऱ्यांची संख्या त्या तुलनेत खूप कमी आहे. बड्या कंपन्यांखेरीज इतरांना एमबीए प्रोफेशनल्स ठेवणं शक्य नसतं. म्हणूनच अशा बऱ्याचशा कंपन्यांनी पे रोेल, कर्मचारी नेमणुकांसारख्या गोष्टींमध्ये आऊटसोसिर्ंग करण्यास सुरुवात केली आहे. परदेशी कंपन्यांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांमध्ये उत्पादनक्षमतेला फारचं दुय्यम स्थान दिलं जातं. त्यामुळे आपल्याकडे मनुष्यबळाचा पुरेसा वापर केला जात नाही. सध्या एचआर मॅनेजरपुढचं सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल तर त्याच्या कंपनीसाठी उत्तम आणि योग्य माणसांची नेमणूक करणं.'

* एचआर प्रोफेशनल्सनी आपल्या कामाच्या पलिकडच्या गोष्टींचाही उदा. माकेर्टिंग विचार करणं आवश्यक आहे, असं मत वालचंद टॅलेण्ट र्फस्ट लि. च्या एक्झिक्युटिव्ह सीएम पल्लवी झा व्यक्त करतात. 'सध्या एचआरमध्ये आऊटसोसिर्ंगचा ट्रेण्ड असल्याने ही मंडळी कंपनीतल्या वेगळ्या कामांसाठीच नेमली जातात. त्यात टॅलेण्ट मॅनेजमेण्ट, चेंज मॅनेजमेण्ट, सक्सेशन प्लॅनिंग आदींचा समावेश होतो. आजकाल कर्मचाऱ्यांच्या विकासाला भरपूर महत्त्व प्राप्त झाल्याने एचआर प्रोफेशनल्सनाही तितकंच महत्त्व प्राप्त झालं आहे, हेही तितकंच खरं आहे.'

* मेरिको इंडस्ट्रीजच्या एचआर अॅण्ड स्ट्रेटेजी विभागाचे प्रमुख मिलिंद सरवटे सांगतात, 'नव्या जगात एचआर प्रोफेशनल्सचं महत्त्व वाढतंय हे खरं असलं तरी त्यांच्या कामाचं स्वरूपही तितकंच किचकट बनत चाललं आहे, हेही तितकंच सत्य आहे. पूवीर् एचआरमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचा विचार केला जाई, परंतु आता मनुष्यबळाच्या प्रत्येक स्त्रोताचा विचार केला जातो. सध्या एचआरपुढचं मोठं आव्हान म्हणजे व्यवसायाच्या वृद्धीसाठी एचआरच्या धोरणांचा वापर करणं. त्यामुळे कुठल्याही बदलांमुळे एचआर विभागाला धक्का बसता कामा नये. उलट या बदलांचा वापर त्यांना सकारात्मकदृष्ट्या करून घेता आला पाहिजे.'

ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्टसंदर्भातले विविध अभ्यासक्रम

वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेण्ट, मुंबई

अॅडव्हान्स सटिर्फिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेण्ट :

कालावधी: सहा महिने

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेण्ट (एचआर सिस्टिम्स):

कालावधी : दोन वर्षं (पूर्णवेळ)

............................

सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेण्ट, पुणे

मास्टर्स इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (ह्युमन रिसोसेर्स):

कालावधी: दोन वर्षं (पूर्णवेळ)

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एचआरएम

कालावधी: एक वर्षं

एनएमआयएमएस युनिव्हसिर्टी, मुंबई

डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्ट (अर्धवेळ)

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेण्ट (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्ट)

एसआयईएस कॉलेज ऑफ मॅनेजमेण्ट स्टडीज, नवी मुंबई

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस

एम.ए. इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्ट अॅण्ड लेबर रिलेशन्स



ज्ञानकोशांच्या महाजालात!

नोकरीसाठी अर्ज करताना अचूक शब्द वापरणं फार महत्त्वाचं असतं. हे शब्द आणि त्यांच्या विविध अर्थच्छटा सांगण्यासाठी नेटवर तुमच्या मदतीला अनेक एन्सायक्लोपीडिया हजर आहेत. त्यांच्याविषयी:

नोकरीसाठी अर्ज करताना काय शब्द वापरावेत, हे बऱ्याच वेळेला सुचत नाही. बरे, सगळ्यांचे इंग्रजी चांगले असते असे नाही. म्हणजे एखादा इंग्रजी शब्द सुचला, पण तुमच्या अर्जासंदर्भात त्याचा अर्थ नेमका काय आहे हे कसे कळणार? नाहीतर अनेकदा शब्द बरोबर असतो, त्याचे स्पेलिंगही बरोबर असते, पण चुकीच्या ठिकाणी वापरल्यामुळे अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही. मग अशावेळेस काय करावे? प्रत्येकाला डिक्शनरी जवळ बाळगणे शक्य नसते. बरं, ती बाळगली तरी तुम्हाला हवे असलेले शब्द त्यात असतीलच; असेही नाही.

यावर उपाय आहे ऑनलाईन एन्सायक्लोपीडियाचा. होय, कम्प्युटरवर काम करतानाच असे एन्सायक्लोपीडिया तुम्ही तपासू शकता. तुम्हाला हवा तो शब्द शोधू शकता, त्याचा नेमका अर्थ समजावून घेऊन मग तो वापरायचा की नाही ते ठरवू शकता. हे एन्सायक्लोपीडिया विषयानुरूपही आहेत वा सगळ्या विषयांतले शब्द एका ठिकाणी असलेलेही आहेत. हे शब्द जर डिक्शनरीत सापडणार असतील तर मग एन्सायक्लोपीडिया कशाला हवा, हा विचार मनातून काढून टाका. कारण एन्सायक्लोपीडियात विस्तारित व सचित्र माहिती पाहायला मिळते. त्यामुळे अर्थही नेमका कळतो.

असे कोणते एन्सायक्लोपीडिया ऑनलाइन मिळतात?

त्यातल्या काहींची ही झलक.

पहिला ब्रिटानिका. इथे बातम्या आहेत, ब्लॉग्ज आहेत, देशविदेशाची तपशीलवार माहिती आहे. शिवाय असंख्य विषयांवरचे ताजे लेख आहेत. तुमची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी आवश्यक ते सारे आहे. पण अर्ज लिहिताना हे सारे पाहण्यासाठी वेळ असतो कुठे? मग तुम्हाला हव्या असलेल्या शब्दाचा फक्त सर्च द्या. त्या शब्दाचे सारे कंगोरे तुमच्यासमोर उलगडतील. संबंधित लिंक्सही मिळतील. म्हणजे ज्याला अधिक खोलात जायचे असेल त्याला जाता येईल.

दुसरा आहे एमएसएन एन्कार्टा एन्सायक्लोपीडिया. ब्रिटानिकापेक्षा याचा लेआऊट वेगळा आहे. याच्या वरच्या भागांत एन्सायक्लोपीडिया, डिक्शनरी, अॅटलास, कॉलेज अँड ग्रॅज्युएट स्कूल वगैरे विभाग आहेत. यात तुम्हाला शब्द आणि अर्थ याचा शोध घेणे सोपे जाते. असे विभागवार जायचे नसेल तर ब्रिटानिकासारखे फक्त सर्च द्या, की झाले काम. पण एक लक्षात घ्या, अर्ज लिहिताना शब्दांचा तांत्रिक अर्थ जाणून उपयोग नाही. एन्सायक्लोपीडियातली अधिक माहिती नेहमीच उपयोगी पडेल.

हायबीम एन्सायक्लोपीडिया हा नव्या प्रकारचा मार्गदर्शक आहे. एकच शब्द वेगवेगळ्या डिक्शनऱ्यांमध्ये कसा दिला आहे ते एकाच ठिकाणी पाहायचे असेल तर हा एन्सायक्लोपीडिया वापरा. अल्फाबेटिकली एखादा शब्द निवडा. तो किमान दोन डिक्शनरी अथवा एन्सायक्लोपीडियात कसा दिला आहे हे तुम्ही लगेच ताडून पाहू शकाल. एका शब्दाचे अर्थ वेगवेगळे असणे हे फारसे होणार नाही, पण त्या अर्थातील सूक्ष्म फरक मात्र कळू शकतील. शिवाय 'हायबीम'वर वेगवेगळ्या विषयावरचे (रोज एक विषय निवडून) ताजे लेखही पाहायला मिळतील.

मेडलाईन एन्सायक्लोपीडिया हा नावाप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्राबाबतचा ज्ञानकोश आहे. वेगवेगळे आजार, विविध चाचण्या, निदाने, उपचार या संदर्भातील हा एन्सायक्लोपीडिया आहे. या साइटवर शब्दाच्या आद्याक्षरानुसार वैद्यकीय शब्दांचे अर्थ शोधू शकता. आता नोकरीसाठी अर्ज करताना किचकट वैद्यकीय शब्द कशाला लागतील असे विचारू नका. एखाद्या तेल कंपनीत अर्ज करताना ऑइली हेअर, ऑइली स्किन. हेअर ऑइल या शब्दांविषयी अधिक जाणून घेण्यात तुम्हाला नक्कीच रस असेल. तसेच एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये अर्ज करताना फेशिअल स्वेलिंग, फेस पावडर, फेशिअल ट्रॉमा वगैरेची माहिती उपयुक्त ठरू शकेल. एखाद्या हार्ट हॉस्पिटलमध्ये अप्लाय करताना चेस्ट पेन, चेस्ट एमआरआय वगैरेबद्दल माहिती असलेली बरी. म्हणजे नेमका कोणता शब्द कुठे वापरायचा ते कळेल.

याशिवाय ऑनलाईन अनेक एन्सायक्लोपीडिया मिळू शकतील. नेमके जाणून घ्या आणि मगच अर्ज फायनल करा.

सरकारी नोकरी

सरकारी नोकरी करुन खितपत पडण्यापेक्षा एखाद्या आयटी कंपनीत किंवा कॉपोर्रेट जगतात दिमाखाने वावरुन लाखो रुपये कमावण्याकडे हल्लीच्या पिढीचा ओढा दिसतो. पण नुकत्याच जाहीर झालेल्या सहाव्या वेतन आयोगामुळे आजच्या तरुणांचा हा 'नजरिया' बदलतोय. खाजगी क्षेत्राप्रमाणे सरकारी नोकरीतही भरपूर पगार मिळू लागले आहेत. चांगला पगार, मिळवलेल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याची संधी आणि लोकांकडून मिळणारा मान सरकारी नोकरीत मिळतो.

सरकारी नोकरी म्हणजे सिक्युअर्ड जॉब. पूवीर्च्या काळी तर असा सिक्युअर्ड जॉब करण्याकडेच सगळ्यांचाच जाणीवपूर्वक कटाक्ष असायचा. पण हळूहळू सरकारी नोकऱ्यांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या वाढली नी नोकरीसाठी खाजगी क्षेत्रात नोकरदार वर्गाचा शिरकाव झाला. काळ बदलला, तसतशी नाइन टू फाइव्ह जॉब करण्याची संकल्पना कॉपोर्रेट जगताने मोडून काढली. बीपीओ सेक्टरने तर दिवसरात्र काम करण्याचा पायंडा पाडला.

आजच्या स्पधेर्च्या युगात कंपनीच्या नियमानुसार काम करावं लागतं. तुम्ही फक्त नाइन टू फाइव्ह जॉबची अपेक्षा कराल, तर आजच्या दुनियेत मागे पडाल. पुढे जायचं तर इण्डस्ट्रीच्या मागणीप्रमाणे आपली एफिशियन्सी दाखवावीच लागते. तुम्ही काम केलं नाही, तर तुमच्याऐवजी दुसरं कोणी तरी तयार असतंच. म्हणूनच कामाच्या प्रती आपली असणारी निष्ठा 'प्रेझेण्ट' करावी लागते.

आपलं ज्ञान आणि क्षमता दाखवायला मिळणारा स्कोप, भरपूर पगार, सिनीऑरिटीप्रमाणे नाही तर एफिशियन्सीमुळे मिळणारी बढती या सगळ्या बाबींमुळे आजच्या तरुणांचं कॉपोर्रेट सेक्टरकडे लक्ष वेधलं नसतं, तरच नवल! पण त्याचबरोबर गव्हन्मेर्ण्ट जॉब्समध्ये असणारी सिक्युरिटी आणि सगळ्याच दृष्टिकोनातून मिळणारे फायदे लक्षात घेता या क्षेत्राला आजही तेवढीच मागणी आहे.

सरकारी क्षेत्रातील जॉब्सची माहिती देणारे हे असेच काही पर्याय:

युपीएससी

( युनियन पब्लिक सविर्स कमिशन)

सरकारी उच्च आणि मध्यम स्तरावरील उमेदवारांची नेमणूक करण्यासाठी सेण्ट्रल गव्हन्मेर्ण्ट स्तरावर युपीएससी आणि स्टाफ सिलेक्शन आहे, तर राज्य पातळीवर राज्य सेवा आयोग (पब्लिक सविर्स कमिशन) आहेत.

केंद सरकारच्या अखत्यारित असणाऱ्या एकूण २५ पदांवरील भरती युपीएससीच्या स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाते.

नागरी सेवा परीक्षा :

पात्रता : कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन

वय : २१ ते ३० वर्ष

पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन स्तरावर ही परीक्षा घेतली जाते.

प्रशासकीय सेवा

( अॅडमिनिस्ट्रेशन सविर्सेस)

अकाऊण्ट्स ऑफिसर्स, आयएएस, आयएफएस, आयपीएस, सीबीआय, रेल्वे पोलिस, सीआयएसएफ, इन्कम टॅक्स, आडिर्नन्स फॅक्टरीज, पोस्टल सविर्सेस, रेल्वे ट्रॅफिक/ पसोर्नल, डिफेन्स, इन्फमेर्शन सविर्सेस, ट्रेड सविर्स, सेक्रेटरियल सविर्स, रेल्वे बोर्ड, आर्म्ड् फोसेर्स, सिविल सविर्सेस आदी पदांचा यात समावेश होतो.

पूर्व आणि मुख्य परीक्षा अशा दोन स्तरावर ही परीक्षा घेतली जाते.

जीओलॉजिस्ट

पात्रता : पोस्ट ग्रॅज्युएट इन जीओलॉजी/ अप्लाइड जीओलॉजी/ मरिन जीओलॉजी/ असोसिएट/ मिनरल एक्स्प्लोरेशन/ हायड्रोजीओलॉजी

वय : २१ ने ३२ वर्ष

इंजिनीअरिंग सविर्स : या अंतर्गत पुढील परीक्षा घेतल्या जातात

भारतीय रेल अभियांत्रिकी सेवा

भारतीय रेल विद्युत अभियांत्रिकी सेवा

भारतीय रेल सिग्नल अभियांत्रिकी सेवा

भारतीय रेल यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा

भारतीय रेल भांडार

स्पेशल क्लास रेल्वे अॅप्रेण्टिस

पात्रता : बारावी पास

वय : १७ ते २१ वर्ष

यात जनरल अॅबिलिटी टेस्ट, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

या अंतर्गत रेल्वे इंजिनीअर (स्पेशल क्लास रेल्वे अॅप्रेण्टिस) परीक्षाही घेतली जाते.

सिविल सविर्सेस एक्झामिनेशन

यात पुढील पदांचा समावेश होतो.

०इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सविर्स (केंद सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचा कारभार सांभाळणं),

०इंडियन फॉरेन सविर्स ऑफिसर (परदेशातील भारताच्या वकिलातीतील कामकाज पाहणं),

०इंडियन पोलिस सविर्स ऑफिसर (निर्धारित क्षेत्रात गुन्हेगारांवर लक्ष ठेवणं),

०पोस्टल सविर्स ऑफिसर (पोस्ट खात्याचा कारभार पाहणं)

०इंडियन डिफेन्स अकाऊण्टस सविर्स ऑफिसर (लष्कराचा खर्च नियंत्रणात ठेवणं)

०इंडियन ऑडिर्नन्स फॅक्टरीज सविर्स ऑफिसर (दारूगोळा कारखान्यांचे कामकाज पाहणं)

०इंडियन रेव्हेन्यू सविर्स ऑफिसर (आथिर्क कमाई संदर्भात कामकाज सांभाळणं)

०कस्टम्स अॅप्रेजर (परदेशातून भारतात येणाऱ्या किंमती मालाचं मूल्यांकन करणं)

०सेण्ट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन पोलीस ऑफिसर (गुप्तहेराचं काम)

०सेण्ट्रल सेक्रेटमरेएट सविर्स सेक्शन ऑफिसर

०इंडियन डिफेन्स इस्टेट सविर्स ऑफिसर (लष्करी मालमत्तेची देखभाल)

०इंडियन पोस्ट आणि टेलिग्राफ फायनान्स सविर्स ऑफिसर (पोस्ट खात्यातील आथिर्क व्यवहारांवर नियंत्रण ठेवणं)

०इंडियन सिविल अकाऊण्टस सविर्स ऑफिसर

०रेल्वे ट्रॅफिक सविर्स ऑफिसर

०आर्म्ड फोसेर्स हेडक्वार्टर्स सिविल सविर्सेस (लष्करी सैनिकांची काळजी घेणं)

०रेल्वे बोर्ड सेक्रेटरिएट सविर्स सेक्शन ऑफिसर (रेल्वे ऑफिसरला त्याच्या कामात मदत करणं)

०इंडियन रेल्वे अकाऊण्ट्स सविर्स ऑफिसर (रेल्वेच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं)

०इंडियन ऑडिट आणि अकाऊण्टस सविर्स ऑफिसर (सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवणं)

०इंडियन रेल्वे पसोर्नल सविर्स ऑफिसर (भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांविषयक काम पाहणं)

०इन्फमेर्शन ऑफिसर

०सेण्ट्रल ट्रेड सविर्स ऑफिसर (भारताच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर लक्ष ठेवणं)

०सेण्ट्रल एक्साइज ऑफिसर (अबकारी कराची अमलबजावणी)

०कस्टम्स ऑफिसर (परदेशातून येणाऱ्या मालावर करआकारणी)

०सेण्ट्रल इण्डस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स कमाण्डण्ट (राष्ट्रीय स्मारकांची सुरक्षाव्यवस्था)

इंडियन फॉरेस्ट सविर्स

वनसंरक्षकांची भरती या परीक्षेच्या माध्यमातून केली जाते.

पात्रता : अॅनिमल हजबण्ड्री/ व्हेटर्नरी सायन्स/ बॉटनी/ केमिस्ट्री/ जीओलॉजी/ मॅथ्स/ फिजिक्स/ स्टॅट्स/ झूओलॉजी यापैकी एका विषयात डिग्री किंवा बीएस्सी इन अॅग्रिकल्चर/ फॉरेस्ट्री किंवा बीई

कॉन्झव्हेर्टर ऑफ फॉरेस्ट्स

इकॉनॉमिक सविर्सेस :

पात्रता : पीजी (इकॉनॉमिक्स/ अप्लाइड इकॉनॉमिक्स/ बिझनेस इकॉनॉमिक्स/ इकॉनॉमेट्रिक्स)

इकॉनॉमिक/ स्टॅटिस्टिकल सविर्स ऑफिसर : वय : २१ ते ३० वर्ष

ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन

पात्रता : ग्रॅज्युएशन

डिव्हिजनल अकाऊण्टण्ट, ऑडिटर आदी पदं

सेण्ट्रल एक्साइज इन्स्पेक्टर : वय : १८ ते २७ वर्ष

कस्टम्स एक्झामिनर

इन्कम टॅक्स ऑफिसर

सीबीआय इन्स्पेक्टर

बारावी आणि ग्रॅज्युएशननंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करता येते. शालेय किंवा कॉलेजमधील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न परीक्षेत विचारले जात नाहीत. साधारणपणे फिजिक्स, मॅथ्स आणि केमिस्ट्री या विषयांवर आधारित प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्याचबरोबर जनरल नॉलेज, करण्ट अफेअर्स आदी विषयांची माहिती ठेवणं आवश्यक आहे.

या परीक्षांमध्ये सहजासहजी यश मिळत नाही. म्हणूनच बारावीपासूनच कसून तयारी करायला हवी. पूर्व परीक्षेपासून मुख्य परीक्षा, मुलाखत आणि काही पदांसाठी मानसिक आणि शारिरीक चाचणी पास व्हावी लागते. एकंदरच तावून सुलाखून निघाल्यावरच या क्षेत्रात प्रवेश करता येतो.

स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विविध संस्थामार्फत मार्गदर्शन करणारे सेमिनार्स, वर्कशॉप्स घेतले जातात. त्याचबरोबर कोचिंग क्लासेसही आहेत. याशिवाय मार्गदर्शक पुस्तकं, नियतकालिकंही बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची मदत घेता येईल.

नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी

आमीर् : यात लेफ्टनंण्ट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंण्ट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंण्ट जनरल, व्हाइस चीफ आमीर् स्टाफ, चीफ ऑफ आमीर् स्टाफ आदी पदांवर काम करता येतं.

नेव्ही : यात सब लेफ्टनंण्ट, लेफ्टनंण्ट, लेफ्टनंण्ट कमाण्डर, कमाण्डर, कॅप्टन, कमोडोर, रेअर अॅडमिरल, व्हाइस अॅडमिरल, व्हाइस चीफ ऑफ नेव्हल स्टाफ आणि अॅडमिरल आदी पदांचा समावेश होतो.

पात्रता : बारावी पास (फिजिक्स आणि मॅथ्स)

डॉक्टर्स : पात्रता : एमबीबीएस

सीडीएस : (कम्बाइण्ड डिफेन्स सविर्सेस)

आमीर्: पात्रता : पदवी, वय : १९ ते २४ वर्ष

नेव्ही : पात्रता : बीएससी (फिजिक्स, मॅथ्स)/ बीई, वय : १९ ते २२ वर्ष

एअरफोर्स : पात्रता : बीएससी (फिजिक्स, मॅथ्स)/ बीई, वय : १९ ते २५ वर्ष

ओटीए : डिग्री वय : १९ ते २५ वर्ष

असिस्टण्ट प्रॉव्हिडण्ट फण्ड कमिशनर : पात्रता : डिग्री, वय : जास्तीतजास्त ३५ वर्ष

सेण्ट्रल पोलीस ऑर्गनायझेशन्स कमाण्डण्ट्स :

पात्रता : ग्रॅज्युएशन

वय : २० ते २५ वर्ष

स्पर्धा परीक्षा - युपीएससी

गव्हन्मेर्ण्ट सेक्टरमध्ये समाविष्ट होणाऱ्या काही संस्था

* इंडिया टुरिझम डेव्हलपमेण्ट/ कॉपोर्रेशन लि.

* एअर इंडिया

* भारत पेट्रोलियम कॉपोर्रेशन लि.

* इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्स

* नॅशनल ब्रेन रिसर्च सेण्टर

* टाटा मेमोरियल सेण्टर

* एरोनॉटिकल डेव्हलपमेण्ट एजन्सी

* कॅनरा बँक

* गेल (इंडिया) लि.

* इंडियन इन्स्टि्यूट ऑफ जीओमॅग्नेटिझम

* सेण्टर फॉर डेव्हलपमेण्ट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग

* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स

* द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया

* इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन

* नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग

* नॅशनल मिनिरल डेव्हलपमेण्ट कॉपोर्रेशन लि.

* टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फण्डामेण्टल रिसर्च

* विक्रम साराभाई स्पेस सेण्टर

* नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेण्ट

* नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द व्हिज्युअली हॅण्डीकॅप्ड्

* नॅशनल शेड्युल्ड ट्राइब्स फायनान्स अॅण्ड डेव्हलपमेण्ट कॉपोर्रेशन

* कॉमनवेल्थ एज्युकेशनल मीडिया सेण्टर फॉर एशिया

* इंजिनीअर्स इंडिया लि.

* ब्युरो ऑफ एनजीर् एफिशियन्सी

* महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेण्ट कॉपोर्रेशन लि.

* नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अॅण्ड रिसर्च

* हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड्स लि.

* थापर युनिव्हसिर्टी

जॉब्जचं बूम!

प्रज्ञा विचारे

भारतात प्रचंड गुंतवणूक, अनेक क्षेत्रांचा विस्तार, हजारो नवे रोजगार असं सगळं अनुकूल चित्र आता साकारत आहे. येत्या पाच वर्षांमध्ये भारतात तब्बल पाच कोटी ८० लाख नवे रोजगार निर्माण होतील, असा अंदाज आहे. आता तरुणांसमोर आव्हान आहे ते अशा रोजगारांसाठी सुसज्ज होण्याचं....

भारतात नवनवीन इंजिनीअर कॉलेजं उघडली जात आहेत. इथे अॅडमिशन घेणाऱ्यांची संख्याही वाढतेय आणि त्यायोगाने भारतातील इंजिनीअर्सचीही. मात्र इंजिनीअर झालेल्या प्रत्येकालाच त्याच्या कुवतीचा जॉब मिळतो असे नव्हे. अशा इंजिनीअर पदवीधरांना अधिक प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी भारत सरकारच्या कृतिगटाने अशा इंजिनीअर्ससाठी 'फिनिशिंग स्कूल' उभारण्याची सूचना केली आहे. नॅसकॉमने अशा रोजगाराभिमुख विषयांचा मुद्दा उठवला होता. यावर 'फिनिशिंग स्कूल' उभारण्याची आणि उद्योगव्यवस्थेच्या गरजांनुसार कॉलेजांमधील अभ्यासक्रम बदलण्याची सूचना या कृतिगटाने केली आहे. या 'फिनिशिंग स्कूल'मध्ये आणखी कोणत्या गोष्टी असतील, हे अद्याप गुलदस्त्यातच असले तरी सर्वात प्रथम हे 'फिनिशिंग' केवळ आयटी क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवले जाणार आहे.

' जॉब रेट'मध्ये वाढ

डिग्री असूनही लायकीचा जॉब मिळत नाही... प्रत्येक कंपनीला अनुभवीच माणूस हवा आहे... त्यामुळे घरी बसावं लागतंय. असे शेरे आता जुन्या हिंदी चित्रपटांपुरतेच राहिलेत. आता अनुभवाअभावी जॉब नाकारला जातोय, हे फार अभावाने घडतं. इथे फ्रेशर्सनाही तितकीच किंबहुना अधिक मागणी आहे. आपल्या भारताचं उदाहरण द्यायचं झालं तर भारतातील रोजगाराच्या संधीमध्ये दरवषीर् २.६२ टक्क्यांची वाढ होतेय. 'नॅशनल सॅम्पल सव्हेर् ऑर्गनायझेशन (एनएसएसओ)च्या सवेर्क्षणाने तसं सांगितलंय. अकराव्या पंचवाषिर्क योजनेनेही याला अनुसरूनच एक भाकीत केलंय. येत्या पाच वर्षांत तब्बल पाच कोटी ८० लाख रोजगार निर्माण होतील. त्यामुळे 'नो व्हेकन्सी'चा बोर्ड पुढील पाच वर्षं तरी कुठल्याच कंपनीबाहेर दिसणार नाही.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात बूम

सध्या अधिकाधिक विस्तारणारं क्षेत्र म्हणून हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचं नाव घेतलं जातं. सध्या भारतात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये सुमारे चार कोटी प्रोफेशनल काम करतात आणि ही वाढ दहा टक्क्के दराने वाढणार असल्याचं भाकीत केलं जातंय. ही वाढ जर अशीच कायम राहिली तर २०१३ पर्यंत जगातील पर्यटनक्षेत्रात सर्वात मोठा तिसरा देश म्हणून भारताचे नाव घेतले जाईल. आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही तशीच वाढ होतेय. सध्या जगभरातले सुमारे २४ कोटी प्रोफेशनल या क्षेत्रात आहेत. एकट्या भारताचं म्हणायला गेलं तर पुढील दहा वर्षांत या क्षेत्रात तब्बल १५ ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक होऊ शकते. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रात काम करण्यासाठी भविष्यात 'हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनल'ची नितांत गरज भासणार आहे.

मॉडर्न डे सेक्रेटरी

बॉसची सेकेटरी म्हणजे फक्त छान दिसायचं, छान रहायचं, थोडं फार इंग्लिश बोलायचं आणि जोडीला स्टेनो आणि टायपिंगचं काम आलं म्हणजे सोने पे सुहागा, असंच म्हटलं जायचं. पण, आता हा समज पार बदललाय. सेक्रेटरीला केवळ स्टेनो किंवा टायपिस्ट होऊन भागत नाही तर त्यासोबत कम्प्युटर ज्ञान, टेलिफोन संभाषण कौशल्य, एचआर स्किल्स आणि कस्टमर सव्हिर्सची कलाही अवगत असली पाहिजे. इतकं ज्ञानकौशल्य येणाऱ्या सेक्रेटरींना दहा ते पंधरा हजार रुपये सहज मिळून जातात. त्याहून अधिक पगार द्यायलाही काही कंपन्या मागेपुढे पाहात नाहीत. त्यांना केवळ चांगल्या सेक्रेटरी हव्या आहेत. चेन्नईमध्ये 'स्टेनोग्राफर गिल्ड' इन्स्टिट्युट चालवणाऱ्या रामास्वामी यांनी अशा सेक्रेटरींना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचं सांगितलं. सध्या थोडं फार इंग्लिश बोलणाऱ्यांना बीपीओ आणि कॉल सेंटरमध्ये लगेच जॉब मिळतो. त्यामुळे अनेक कंपन्यांना सेक्रेटरींची वानवा जाणवू लागली आहे. त्यामुळे बीपीओ आणि कॉलसेंटरमध्ये काम करून झोपेची आणि पर्यायाने शरीराची आबाळ नको असणाऱ्यांसाठी हा पर्याय नक्कीच सुखावह ठरेल.

करिअर कम्प्युटर क्षेत्रातलं

कम्प्युटरचा वापर होत नाही, असं क्षेत्र शोधूनही सापडणार नाही. विद्यार्थ्यांपासून प्रोफेशनल्सपर्यंत प्रत्येकाकडे स्वतंत्र कम्प्युटर आज दिसून येतो. कम्प्युटरच्या वापरात जसजशी वाढ होत जाईल, तशी हार्डवेअर प्रोफेशनल्सची गरज आणि मागणीही वाढेल.

अलिकडेच झालेल्या एका सवेर्क्षणानुसार २००० ते २०१० दरम्यान कम्प्युटर आणि हार्डवेअरशी संबंधित क्षेत्रांत झपाट्याने वाढ होणार आहे. त्यामुळे २००९च्या अखेरपर्यंत एक लाख ३७ हजार नेटवर्क इंजिनीअर्सची उणीव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

सध्या कम्प्युटरवर काम होत नाही असे एकही कार्यालय सापडणार नाही. याव्यतिरिक्त घर, शाळा, कॉलेज प्रत्येक ठिकाणी कम्प्युटरचा वापर वाढला आहे. नव्हे, कम्प्युटरला पर्याय उरलेला नाही. थोडक्यात, दैनंदिन कामं, मग ती कार्यालयीन असोत किंवा वैयक्तिक, कम्प्युटरमध्ये बिघाड झाला की सगळंच ठप्प होतं. बँका किंवा सरकारी कार्यालयांतील कम्प्युटर बंद पडले तर काय परिस्थिती ओढवते हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. अशा स्थितीत हार्डवेअर प्रोफेशनल्सची गरज पडते. कार्यालयातील सर्व कम्प्युटर्स नेटवर्कच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले असतात. एकंदरीतच कम्प्युटर इन्स्टॉलेशन ते मेंटेनन्स आणि दैनंदिन काम व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी हार्डवेअर इंजिनिअरवर असते.

हार्डवेअर इंजिनीअर होण्यासाठी दोन प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हार्डवेअर आणि बेसिक नेटवकिर्ंग. हार्डवेअरशी संबंधित अभ्यासक्रमात कम्प्युटरच्या विविध भागांविषयी माहिती दिली जाते. या क्षेत्रात ए-प्लस सटिर्फिकेट कोर्सची मागणी सर्वाधिक आहे. हा अभ्यासक्रम दोन भागांत शिकविला जातो. ए-प्लस कोर हार्डवेअर एग्झाम आणि ए-प्लस कोर ऑपरेटिंग सिस्टीम एग्झाम. बेसिक नेटवकिर्ंग अंतर्गत मायक्रोसॉफ्ट विंडोज २००३, सर्वर सटिर्फिकेशन, एमसीएसई प्रमाणपत्रही मिळविता येते.

हार्डवेअर इंजिनीअर किंवा सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेटर होण्यासाठी दोन्ही अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे. नेटवकिर्ंगमध्ये आणखी पुढचा टप्पा गाठण्यासाठी आणखीही काही कोसेर्स करावे लागतात. जसे लॅन (लोकल एरिया नेटवकिर्ंग) आणि वॅन (वाईड एरिया नेटवकिर्ंग). या प्रकारचे सर्व अभ्यासक्रम सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये शिकवले जातात. शिवाय ऑनलाईन स्टडी मटेरियलच्या माध्यमातूनही हे कोर्स करता येतात. नेटवकिर्ंग कोर्स केल्यानंतर कम्प्युटर सपोर्ट स्पेशॅलिस्ट, हेल्प डेस्क टेक्निशियन नेटवर्क किंवा सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर, कम्प्युटर सिक्युरिटी स्पेशालिस्ट म्हणून करियर करता येतं.

फण्डा इंग्रजीचा

एमबीएसाठी कॅटची तयारी करताना इंग्रजी व्होकॅब्युलरीचाही सराव करावा लागतो. त्यासाठी अवांतर वाचनाबरोबरच विविध शब्द लक्षात ठेवणं आवश्यक असतं. इंग्रजीमध्ये टागेर्ट स्कोअर करताना व्होकलायझेशन, रिग्रेशनची योग्य पद्धत आत्मसात करून व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी वर्ड लिस्ट आणि फ्लॅश कार्डसारख्या सोप्या युक्त्या वापरता येतील.

* मनोधारणा/आवड ( mindset/interest )

आपल्यापैकी जवळजवळ सगळेच जण ४०० शब्द प्रति मिनिट, या वेगाने वाचतो. फरक एवढाच की हा वेग आपल्या आवडी-निवडीच्या विषयांबरोबर समप्रमाणात असतो. आणि आपल्या आवडीचे विषय हे खूपच थोडे असतात. 'कॅट'मध्ये एका विशिष्ट विषयावरचेच उतारे येतील, असं समजणं चुकीचं आहे. समाजशास्त्रापासून ( social science ) ते विज्ञानापर्यंत, अर्थशास्त्रापासून ( economics ) ते इंजिनीअरिंगपर्यंत थोडक्यात जगातल्या कुठल्याही विषयाशी संबंधित, वेगवेगळी पार्श्वभूमी असणारे पाच किंवा त्यापेक्षा जास्त उतारे परीक्षेमध्ये असतात.

तर पहिला अडथळा कोणता? तर काही विषयांबरोबर आपण करत असलेला पक्षपातीपणा. ज्या विषयांमध्ये रस नसतो ते वाचताना आपला वाचनाचा वेग मंदावतो. त्यामुळे आपण जे काही वाचत आहोत त्यामध्ये आवड निर्माण करण्याचा प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. वाचनाचा वेग राखण्यासाठी चिकित्सकपणा आणि वाचनाची तीव्र इच्छा असणं गरजेचं आहे.

याचा श्रीगणेशा करण्यासाठी काय करता येऊ शकेल? तर आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्राव्यतिरिक्त इतर विषयांशी संबंधित कमीतकमी एक लेख तरी प्रत्येक आठवड्याला वाचावा. त्या विषयाच्या मुळाशी घेऊन जाणारी पुस्तकं किंवा लेख वाचण्यास सुरुवात केली तर वाचन खूप सोपं होईल.

* व्होकलायझेशन ( vocalization)

व्होकलायझेशन म्हणजे मोठ्याने वाचणं. वाचताना जिभेची होणारी हालचाल हा व्होकलायझेशनचाच एक भाग आहे. व्होकालायझेशनमुळे लक्षात येतं की तुमच्या बोलण्याच्या वेगापेक्षा जास्त वेगाने तुम्ही वाचू शकत नाही आणि म्हणूनच मोठ्याने वाचणं ताबडतोब थांबवा. व्होकलायझेशन थांबवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तोंड बंद ठेवणं. वाचताना दातांमध्ये पेन्सिल ठेवा म्हणजे तुम्ही मोठ्याने वाचणार नाही.

* परागती ( regression)

अनेकदा काही ओळी वाचल्यानंतर आपल्याला जाणवतं की आपल्याला हे नीटसं कळलं नाहीय आणि आपण ते पुन्हा एकदा वाचतो किंवा उताऱ्यावरचे प्रश्न सोडवताना आपण त्या उताऱ्याकडे परत गेलोय आणि आपलं उत्तर निश्चित केलंय? यालाच रिग्रेशन म्हणतात. रिग्रेशनमुळे आपण तो उतारा दीड वेळा वाचतो आणि म्हणून आपला वाचताना वेग दोन तृतीयांश पटीने मंदावतो. एखादी ओळ न समजणं, पुन्हा वाचणं हे ताबडतोब आणि जाणीवपूर्वक थांबवलं पाहिजे. एखाद्या वाक्यामुळे उताऱ्याबद्दल काहीच कल्पना येत नाहीय, असं फार अभावानेच घडतं. एखादं वाक्य कळलं नाही तरी वाचणं थांबवू नका. तर्काने त्या वाक्याचं अर्थ कळण्याची शक्यता खूप असते.

घटनात्मक प्रश्नांची उत्तरं शोधताना पुन्हा उतरा बघणं ठीक आहे कारण ती घटना कुठे आहे हे तुम्हाला अचूक माहीत असतं आणि ते वेळखाऊ नसतं. पण तुम्हाला तुमच्या उत्तराबद्दल पूर्ण खात्री असल्यास पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी उतारा वाचू नका.

तर्कशास्त्रावरच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा उतारा वाचणं टाळलं पाहिजे. बरेचदा तो विशिष्ट भाग पुन्हा वाचूनही प्रश्न सुटत नाही.

* शब्दसंपत्ती ( vocabulary)

स्पर्धात्मक एमबीए प्रवेश परीक्षा पास होण्यासाठी शब्दांचा उत्तम खजीना तुमच्याकडे असणं पूर्वापेक्षित असतं. चांगल्या आणि दांगड्या वाचनाच्या सवयीची परिणिती. भरपूर शब्दांचा संग्रह गाठीशी असण्यात होते. म्हणूनच शब्दसंपत्ती वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रमुख म्हणजे वाचन.

शब्दसंचय वाढणं ही संथ आणि कंटाळवाणी प्रक्रिया आहे. प्रथम तुम्ही तुमची व्होकेब्युलरी किती आहे ते बघा. स्वत:च्या व्होकॅब्युलरीची परीक्षा घ्या. रीडर्स डायजेस्टमध्ये अशा टेस्ट्स असतात. किंवा मग कोणत्याही word list ३० शब्द उचला आणि तुम्हाला त्यापैकी किती माहीत आहेत हे बघा.

जर का तुम्हाला १८ पेक्षा जास्त शब्द माहीत असतील तर सरळ word list पाठ करायला सुरुवात करा. केण्ट मटेरिअल सोबत अशा word list मिळतात. आजकाल बाजारात अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत जी तुमची व्होकॅब्युलरी वाढवायला मदत करतात. एकाच वेळी ५० शब्द करण्याच्या प्रयत्नात वेळ वाया घालवू नका. कारण दुसऱ्या दिवशी त्यापैकी जास्तीत जास्त अर्धे शब्द तुम्हाला आठवतील.

याशिवाय word list कधीही क्रमाने पाठ करू नका. कारण तशी पाठ करताना, याच्या पुढचा शब्द म्हणजे हा, वरून अमक्या नंबरच्या या शब्दाचा हा अर्थ. अशाप्रकारे ती लक्षात राहण्याची शक्यता जास्त असते. आणि जेव्हा तोच शब्द उताऱ्यांमध्ये येतो तेव्हा तो आठवण जिकिरीचं होतं.

word list वापरताना १०-१५ शब्द कसेही निवडा आणि त्याची flash cards बनवा. म्हणजे एका बाजूला तो शब्द आणि त्याच्या उलट्या बाजूला त्याचा अर्थ. जिथे तुम्ही जाल तिथे ही कार्ड्स तुमच्या सोबत असू द्या. दिवसातून कमीत कमी तीन वेळा तरी ही कार्ड्स नजरेखालून घाला. दुसऱ्या दिवशी नवीन कार्ड्स बनवा.

जुन्या कार्ड्सची उजळणी करा आणि नवीन पाठ करा. तिसऱ्या दिवशी पहिल्या दोन लिस्ट्सची उजळणी करा आणि नवीन यादी पाठ करा. चौथ्या दिवशी पहिली यादी सोडून बाकीच्या याद्यांची उजळणी करा आणि नवीन यादी करा. तुम्ही एका वेळी तीन याद्यांचा अभ्यास करत असणार, दोन आधीच्या आणि एक नवीन. प्रत्येक यादी तुम्ही दिवसातून तीन वेळा असं तीन दिवस करत असणार. शेवटी तुमच्या असं लक्षात येईल की ही प्रक्रिया संथ असली तरी पुष्कळ फायद्याची आहे.

क्रिएटिव्ह अॅण्ड कलरफूल

अॅनिमेशन, मल्टिमीडिया, ग्राफिक डिझायनिंग हे शब्द आता विद्यार्थ्यांसाठी नवे राहिलेले नाहीत. यापैकी एखाद्या क्षेत्रात करिअर घडवण्याची, काहीतरी कोर्स करण्याची इच्छा सर्रास कानावर पडते. या क्षेत्राची व्याप्ती आणि त्यासाठी असलेला वाव आता लक्षात येऊ लागलाय, त्यामुळे असेल कदाचित. २०११ पर्यंत हे क्षेत्र २४ अब्ज डॉलरपर्यंत विस्तारेल असा अंदाज एका पाहणीत वर्तवण्यात आलाय. पण हे क्षेत्र वाढेल म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये आपल्याला काय संधी आहेत त्याविषयी जाणून घेऊ या.

........

ग्राफिक डिझायनर :

लोगो, माहितीपत्रक, न्यूजलेटर, पोस्टर्स, साइन आदी तयार करण्यासाठी ग्राफिक डिझायनर अक्षरं आणि ग्राफिक्स यांचा सुरेख मेळ घालतात. वर्तमानपत्रं, मासिकं, टीव्ही चॅनल, विविध कॉपोर्रेट हाऊसेस अशा ठिकाणी त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे. इन-हाऊस पब्लिसिटी आणि कम्युनिकेशन साहित्य तयार करण्यासाठी, तसंच कॉपोर्रेट प्रेझेण्टेशन तयार करण्यासाठी ग्राफिक डिझायनरची गरज भासते. कपडे आणि दागिने तयार करणाऱ्या कंपन्यांमध्येही त्यांची आवश्यकता असते. उत्तम ग्राफिक डिझायनर होण्यासाठी फोटोशॉप, कोरल ड्रॉ, इनडिझाइन/पेजमेकर/क्वार्क एक्स्प्रेस आदी मल्टिमीडिया टूल्स आणि सॉफ्टवेअरचं ज्ञान असलं पाहिजे.

व्हिज्युअलायजर :

प्रिण्ट मीडियामध्ये व्हिज्युअलायजरची भूमिका महत्त्वाची असते. संबंधित मजकुरासाठी व्हिज्युअलायजर काही संकल्पना आखतो आणि ती ग्राफिकच्या साहाय्याने दाखवण्यासाठी फोटोशॉप, इलस्ट्रेटर, कोरल ड्रॉसारख्या सॉफ्टवेअरचा वापर करतो. व्हिज्युअलायजर मासिकं, कव्हरपेज, जाहिराती, वर्तमानपत्रं, आदी तयार करतो.

टू-डी अॅनिमेटर :

कॅरेक्टर डिझाइन, क्लीन अप, डॉपिंग, मॉडेलिंग, स्लगिंग, स्टोरीबोडिर्ंगसाठी काम करावं लागत असल्याने टू-डी अॅनिमेटर विविध प्रकारच्या भूमिका बजावतात. लाइफ ड्रॉइंग, कॉम्पोझिशन आणि पस्पेर्क्टिव कोसेर्सच्या माध्यमातून प्रमाणबद्धता, संरचना, आदी शिकून अॅनिमेटर आपली कौशल्यं विकसित करतात.

थ्री-डी अॅनिमेटर :

थ्री-डी अॅनिमेटरना बऱ्याच अंशी टू-डी अॅनिमेटरची कामं करावी लागतात. थ्री-डी अॅनिमेटर त्रीमितीय मॉडेलिंग, टेक्स्चरिंग, लाइटिंग करावं लागतं. त्यासाठी त्यांना फोटोशॉप, सॉफ्ट इमेज, अॅलियास/वेव्हफ्रण्ट, माया, मॅक्स अशा सॉफ्टवेअरचा वापर करावा लागतो. थ्री-डी अॅनिमेटरनाही लाइफ ड्रॉइंग, कॉम्पोझिशन, कन्सेप्ट ड्रॉइंग, कॅरेक्टर डिझाइन माहीत असावं लागतं.

स्टोरीबोर्ड आटिर्स्ट :

स्टोरीबोर्ड आटिर्स्ट स्टोरीबोर्ड तयार करण्यासाठी स्क्रिप्ट उलगडून दाखवतो. सर्वसामान्यांसाठी हा स्टोरीबोर्ड म्हणजे चित्रातून व्यक्त केलेली संहिता असते. जसं की, विनोदी चित्रकथा.

यामध्ये, दृश्यं ठरवणं, कथा चित्ररूपात मांडणं आणि दृश्यांमध्ये सुसूत्रता राखणं, यांचा समावेश असतो. कटिंग, पेस्टिंग, ड्रॉइंग, स्केचिंग, पस्पेर्क्टिव, कॉम्पोझिशन, कथा पुढे नेणं ही स्टोरीबोर्ड आटिर्स्टची कामं असतात.

करिअरचा विचार करता, स्टोरीबोर्ड आटिर्स्ट सहायक म्हणून करिअर सुरू करतो. तेव्हा तो क्लीन अप आणि रिव्हिजनशी निगडित असतो. नंतर हळूहळू तो कथेचे छोटे छोटे भाग मार्गदर्शनाखाली तयार करू लागतो. त्यानंतर मात्र तो स्वतंत्रपणे काम सांभाळतो.

लेआऊट आटिर्स्ट :

अॅनिमेट करता यावं म्हणून अॅनिमेटरना कथेतील पात्र आणि इफेक्ट्स तयार करण्याचं काम लेआऊट आटिर्स्टचं असतं. प्रत्येक दृश्यासाठी पार्श्वभूमी देऊन एक पाया तयार करण्याची जबाबदारी लेआऊट आटिर्स्ट पार पाडतात. त्यासाठी ते स्टोरीबोर्डचा संदर्भ घेतात. ते पंच्ड अॅनिमेशन पेपरवर ग्रफाइट पेन्सिल वापरतात. ब्लूप्रिंट किंवा अण्डरड्रॉइंग म्हणून याचा वापर होतो. बॅकग्राऊण्ड पेण्टर्स नंतर त्यामध्ये रंग भरतात. अंतिम चित्रात मात्र हे लेआऊट कुठेच दिसत नाहीत. पात्रांची जागा ठरवण्यासाठी त्याची आवश्यकता असते.

इनबिटवीनर :

अॅनिमेटर आणि सहायकांना एखाद्या दृश्यातील हालचाली पूर्ण करण्यासाठी मदत करणारी व्यक्ती म्हणजे इनबिटवीनर. सर्वसाधारणपणे, अॅनिमेशन आटिर्स्ट इनबिटवीनर म्हणून करिअरला सुरुवात करतात. अॅनिमेशनमधील प्राथमिक बाबी आणि व्यावसायिक कौशल्यं आत्मसात करण्यासाठी इनबिटवीनर म्हणून काम करणं गरजेचं ठरतं. इनबिटवीनर आटिर्स्ट दोन मुख्य चित्रांमधील ट्रान्झिशन ड्रॉइंग तयार करतात. अॅनिमेशनसंबंधीच्या हालचाली यावरच अवलंबून असतात.

सीबीटी डेव्हलपर :

सीबीटी म्हणजे कम्प्युटर-बेस्ड ट्रेनिंग. हा शिक्षणाचाच एक प्रकार असून त्यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम कम्प्युटरवर आधारित असतो. अॅनिमेशन आणि मल्टिमीडिया शिकलेली व्यक्ती विविध कंपन्यांमध्ये किंवा स्वतंत्रपणे सीबीटी डेव्हलपर म्हणून काम करू शकते. सीबीटी कम्प्युटर अॅप्लिकेशनबरोबर शिकता येत असल्याने कम्प्युटर अॅप्लिकेशन शिकण्यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी ठरतं. सीबीटीला ट्युटोरिअल असंही म्हटलं जातं.

वेब डिझायनर :

कन्सेप्च्युअलायझेशन, प्लानिंग, मॉडेलिंग आणि वेबसाइट किंवा इण्टरनेट साइट तयार करणं, हे प्रामुख्याने वेब डिझायनरचं काम असतं. या इलेक्ट्रॉनिक फाइल वेब र्सव्हरमध्ये साठवल्या जातात. नंतर त्या वेब पेजच्या स्वरूपात बघता येतात. उत्तम काम करण्यासाठी वेब डिझायनरला ग्राफिक्स, अॅनिमेशन टूल्स, रंगांची निवड, कण्टेण्ट क्रिएशन, एचटीएमएल/एक्सएमएल ऑथरिंग, फ्लॅश, जावा स्क्रिप्ट याबाबतीतलं तांत्रिक ज्ञान असणं अत्यावश्यक आहे. आटिर्स्टना पर्ल, पीएचपी, एएसपी, जेएसपी, कोल्डफ्युजन अशा स्क्रिप्ट लँग्वेजही शिकाव्या लागतात.

स्पेशल इफेक्ट्स डिझायनर :

स्पेशल इफेक्ट्स एसपीएफएक्स किंवा एसएफएक्स नावाने ओळखले जातात. दृश्यामध्ये जिवंतपणा यावा तसंच ते अगदी प्रभावी व्हावं म्हणून सॉफ्टवेअरच्या साहाय्याने स्पेशल इफेक्ट्स दिले जातात. मनोरंजन क्षेत्रात एसएफएक्स मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याने जगभरात स्पेशल इफेक्ट्स आटिर्स्टना मोठी मागणी आहे. स्पेशल इफेक्ट्स प्रोफेशनल्सना सर्वसाधारण मल्टिमीडिया साधनांबरोबरच अन्य अनेक स्पेशल इफेक्ट्सची साधनंही माहीत असावी लागतात. एसएफएक्स दृश्य प्रभावी व्हावं म्हणून त्याला पारंपरिक थिएटर इफेक्ट्सपासून आधुनिक कम्प्युटर ग्राफिक्स इमेजरीपर्यंतचं ज्ञान असावं लागतं.

फिल्म एडिटर :

फिल्म एडिटिंग, व्हीडिओ एडिटिंग दोन प्रकारचं असतं - लीनिअर आणि नॉन-लीनिअर. अॅव्हिड, फायनल कट प्रो, व्हेलॉसिटी, झेडएस-४ व्हीडिओ एडिटर अशी व्हीडिओ एडिटिंग टूल शिकून या क्षेत्रात प्रवेश करता येईल.

कॅरेक्टर डिझायनिंग :

कॅरेक्टर डिझायनर पात्र तयार करतो. अॅनिमेशन करण्यासाठी कलात्मक दृष्टी आणि तांत्रिक माहिती असावी लागते. कॅरेक्टर अॅनिमेटर कागदावर प्रत्यक्ष दृश्यावर काम करतो.

कन्सेप्ट आटिर्स्ट :

कन्सेप्ट आटिर्स्ट डिजिटल ड्रॉइंग किंवा नैसगिर्क माध्यमांनी व्हिज्युअल तयार करतो. दिग्दर्शकाच्या संकल्पना प्रत्यक्षात साकारायचा आटिर्स्टचा प्रयत्न असतो.

मोशन ग्राफिक आटिर्स्ट :

मोशन ग्राफिक आटिर्स्ट अक्षरं, इमेज आणि कम्प्युटरवर आधारित कण्टेण्ट वापरून चित्रपटासाठी टायटल बनवण्यासारखी कामं करतो.

मॅटे पेण्टर :

मॅटे पेण्टर पार्श्वभूमीची जबाबदारी घेतो. ही पार्श्वभूमी डिजिटली वापरली जाते. त्यासाठी फोटोशॉप किंवा पेण्टरसारखी सॉफ्टवेअर वापरली जातात.

कम्पोझिटर :

पार्श्वभूमी, ऑब्जेक्ट, लाइव्ह अॅक्शन फूटेज असे सर्व घटक एकत्र एका लेयरमध्ये आणण्याचं आणि नंतर ते आकर्षकरीत्या मांडण्याचं काम कम्पोझिटरचं असतं.

टेक्स्चर आणि लायटिंग आटिर्स्ट :

कथेतील पात्राला त्याची ओळख, व्यक्तिमत्त्व आणि जिवंतपणा आणण्यासाठी टेक्स्चर आणि लायटिंग आटिर्स्ट टेक्स्चर आणि लायटिंग इफेक्ट्सचा वापर करतो. ते विशिष्ट स्टाइल, वातावरणही तयार करतात.

वरील सर्व गोष्टी अॅनिमेशन आणि मल्टिमीडिया क्षेत्रातील व्यक्ती करू शकते. सुरुवातीला दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं. अनुभवानुसार ते पन्नास हजार रुपयांवरही जातं. स्वत:चा व्यवसाय असेल तर या क्षेत्रामध्ये प्रंचड वाव आहे.

या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घ्यायला हवं. या क्षेत्रात मागणी खूप आहे आणि घेण्यासारखं तांत्रिक ज्ञानही. या ज्ञानात सतत वाढ होत असते. म्हणूनच अरेना अॅनिमेशन अॅकॅडमीने अरेना अॅनिमेशन अॅकॅडमी स्पेशलिस्ट प्रोग्राम (एएएसपी) सुरू केला आहे. या क्षेत्रासाठी आवश्यक सर्व कौशल्यांचा त्यामध्ये समावेश आहे, शिवाय अॅनिमेशनमधील प्रशिक्षण आणि सर्जनशीलतेवर भर दिला आहे. या क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम तयार केला असल्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना या क्षेत्राविषयी इत्थंभूत माहिती मिळेल, असं अरेना अॅनिमेशनचे ग्लोबल हेड आर. कृष्णन यांनी सांगितलं.

Sunday, July 27, 2008

रिटेल...जॉब्सची नवी खाण

महिन्यागणिक रस्तोरस्ती नवं मॉल उभं राहतंय. रिलायन्स, टाटा अशा अनेक बड्या कंपन्या रिटेल दुकानांच्या चेन्स उघडताहेत. या रिटेल बूममध्येच दडल्या आहेत जॉब्सच्या अनेक नव्या संधी. त्याचीच ही माहिती.

................

चकाचक ऑफिस. टकाटक स्टाफ. आरशासारख्या स्वच्छ आणि पॉश टाइल्स. अशा स्वप्नवत ऑफिसात आपणही कधी काम करू, अशी कल्पनाही एकेकाळी न करणारी अनेक तरुण मंडळी या ऑफिसांचा एक भाग झाली आहेत आणि महिन्याकाठी पुरेसे पैसेही कमावत आहेत. झपाट्याने विस्तारत असलेल्या रिटेल क्षेत्रानं असे ड्रीमजॉब प्रत्यक्षात आणले आहेत.

' जॉब'गंगा

एका अर्थी रिटेल क्षेत्राला जॉबगंगाच म्हणावं लागेल. मुंबईत, उपनगरांत अनेक मोक्याच्या जागी टोलेजंग मॉल उभे राहात आहेत. मॉल, सुपरमार्केट कल्चर मुंबईला लागून असलेल्या छोट्या शहरांत, अगदी ग्रामीण भागातही पोहोचलंय आणि उत्साहात स्वीकारलं गेलंय. तिथे धडाधड उभ्या राहणाऱ्या मॉल, डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या संधीही वाढताहेत. रिटेलचा हिशोब चौरस फुटांप्रमाणे असतो. सर्वसाधारणपणे ३५० चौफुटांसाठी एक कर्मचारी लागतो. लाइफस्टाइल स्टोअर, हायपरमार्केट याप्रमाणे हा आकडा कमीजास्त होतो.

एकूण रिटेल क्षेत्राचा विचार केला तर तीन स्तरांवर मनुष्यबळ आवश्यक असतं- ऑपरेशन्स, सपोर्ट फंक्शन आणि व्हिज्युअल मर्चंडायजिंग. सपोर्ट फंक्शनमध्ये आयटी, अॅडमिनिस्ट्रेशन, एचआर असे विभाग येतात. त्यांचं काम अन्य कंपन्यांप्रमाणेच असतं. स्टोअर नेमकं केव्हा सुरू करायचं, माणसं केव्हा, किती आणि कोण घ्यायची, मार्केटिंग स्ट्रॅटेजी... असे काही निर्णय हे विभाग घेतात.

मर्चंडायजिंग हा यातला इंटरेस्टिंग भाग आहे. आपल्या ब्रँडकडे ग्राहकांचं लक्ष कसं वेधता येईल आणि ते खिळवून कसं ठेवता येईल याचा आटोकाट प्रयत्न यामध्ये सुरू असतो. मॉल किंवा स्टोअरमध्ये पाऊल टाकल्यापासून प्रत्येक गोष्ट नीटनेटकी, वेधक असावी, यावर सगळ्यांचाच कटाक्ष असतो. वस्तू कशा मांडायच्या, किमती कशा लिहायच्या, कुठली उत्पादनं कुठे असावीत... सगळंच कसं नेटकं असावं लागतं. सौंदर्यदृष्टी, कल्पकता, क्रिएटिव्हिटी या सगळ्याचाच मेळ घालून ग्राहकांच्या मनाचा ठाव घेणारी रचना करण्याची जबाबदारी व्हिज्युअल मर्चंडायजिंगवाल्यांची असते.

Saturday, July 26, 2008

आय.टी. क्षेत्रातही करिअरच्या संधी

' नास्कॉम'च्या अंदाजानुसार येत्या काही वर्षांत फक्त भारतात १० लाखांपेक्षा जास्त आयटी प्रोफेशनल्सची गरज भासणार आहे. असं असताना उपलब्धता मात्र गरजेच्या फक्त पाच टक्के इतकीच आहे. यामुळे आयटी क्षेत्रात करिअर करण्याची जबरदस्त संधी आहे.

.......

अमेरिकेत मंदीचं वातावरण निर्माण झाल्यानंतर आयटी क्षेत्रातील नोकरीच्या संधी कमी होतील अशी भीती निर्माण झाली होती. पण हे सत्य नाही. अमेरिकेत निर्माण झालेली परिस्थिती तात्पुरती होती. खरं म्हणजे आयटी क्षेत्राची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. बारावी पास तरुणांना टेक्नीकल आणि नॉन टेक्नीकल अशा दोन्ही क्षेत्रांत उत्तम करिअर घडवण्याची संधी आहे.

इन्फमेर्शन टेक्नॉलॉजीत करिअर करायचा विचार असेल तर विपूल प्रमाणात पर्याय आणि रोजगार उपलब्ध आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक प्रकारच्या इंडस्ट्रीत काम करण्याची मुभा या क्षेत्रात आहे. संपूर्ण जग तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. 'इन्फमेर्शन टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ अमेरिका' अहवालानुसार आयटी क्षेत्रातील ९२ टक्के कर्मचारी नॉन आयटी कंपन्यांत काम करतात.

मिहानमध्ये येऊ घातलेल्या आयटी पार्कमध्ये विविध प्रकारच्या विभागात विविध प्रकारचे जॉब निर्माण झालेले आहेत. आयटी म्हटलं की टेक्निकलसंबंधीत गोष्टीच लक्षात येतात. पण आयटी क्षेत्र तेवढ्यापुरतंच मर्यादित नाही. नॉन टेक्निकल विभागातदेखील करिअर घडवण्याची संधी आयटी इंडस्ट्रीने प्रदान केली आहे. पण यासाठी पदवीधर असणं आवश्यक आहे. परदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना हवं असणारं सॉफ्टवेअर विकसित करण्याचं काम नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर होतं. कंपन्यांना त्यांच्या कामानुसार सॉफ्टवेअर विकसित करून द्यावं लागतं. सॉफ्टवेअर हवं तसं आहे की नाही हे तपासण्यासाठी टेक्निकल व्यक्तीची गरज नसते. नॉन-टेक्निकल व्यक्तीला संबंधित विषयाचं प्रशिक्षण देऊन त्यांच्यांकडून टेस्टिंगचं काम करवून घेतलं जातं. सॉफ्टवेअरचा करेक्टनेस, कम्प्लीटनेस, लायबॅलिटी, सिक्युरिटी या सर्व बाबी तपासल्यानंतरच सॉफ्टवेअर संबंधीत कंपनीला निर्यात केलं जातं. सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी माणसांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. शहरातील अनेक इन्स्टिट्यूटमधून टेस्टिंगचं प्रशिक्षण दिलं जातं आणि दोन महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण होताच प्लेसमेंट दिली जातात. सॉफ्टवेअर टेस्टरला सुरुवातीलाच साधारणत: १३-१४ हजार रुपये पगार दिला जातो. शिवाय प्रशिक्षण शुल्काची ५० टक्के रक्कम सुरुवातीला आणि उर्वरित रक्कम प्लेसमेंट झाल्यावर द्यायची सोय संस्थांनी उपलब्ध करून दिली आहे.

' नास्कॉम'च्या अंदाजानुसार येत्या काही वर्षांत फक्त भारतात १० लाखांपेक्षा जास्त आयटी प्रोफेशनल्सची गरज भासणार आहे. असं असताना उपलब्धता मात्र गरजेच्या फक्त पाच टक्के इतकीच आहे. यामुळे आयटी क्षेत्रात करिअर करण्याची जबरदस्त संधी आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पुरतंच हे क्षेत्रं मर्यादित नसून ऑफिस ऑटोमेशन, टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटिंग असे विविध विभाग यात आहेत. ज्यात क्वालिटी मॅनेजमेंट अँड स्टँडर्ड, एज्युकेशन अँड ट्रेनिंग, रिसर्च, सॉफ्टवेअर टेस्टिंग, डाटाबेस डिझाइन, सिस्टम डेव्हलपमेंट, वेब डिझाइनचाही समावेश आहे.

ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेण्टग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेण्ट

आयटी क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि बूम लक्षात घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर अॅण्ड टेक्नॉलॉजीने (आयआयएचटी) आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेण्ट सव्हिर्स ( IT-IMS ) हा आऊटसोर्सिंगचा नवा ट्रेण्ड सुरू केला. परंतु आयटी इण्डस्ट्रीमधील नामांकित फर्म गार्टनर इंकच्या अंदाजानुसार २०११ मध्ये जगभरात आयटी बिझनेसमध्ये आयटी इन्फ्रास्ट्रक्चरचा ४० टक्के वाटा असेल. काळाची ही गरज ओळखून जागतिक स्तरावर आयटी क्षेत्राचा वाढता पसारा आणि मनुष्यबळाची आवश्यकता यांतील पोकळी भरून काढण्यासाठी आयआयएचटीने ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेण्ट स्पेशालिस्ट ( GIMS) हा कोर्स सुरू केला आहे.

आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेण्ट सव्हिर्ससाठी स्पेशालिस्ट निर्माण करणं हा या कोर्सचा प्रमुख उद्देश आहे. कोर्सचा कालावधी दोन वर्षं आहे. आयआयएचटीने जगभरातील नऊ मोठ्या आयटी कंपन्यांशी टायअप केलं असून या कोर्सअंतर्गत १७ आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र देण्यात येतील. या कोर्समध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेण्ट सव्हिर्समधील प्रत्येक विभागाचं प्रशिक्षण देण्यात येईल. त्यामध्ये हार्डवेअर आणि नेटवर्किंगविषयी बेसिक्सपासून लेटेस्ट टेक्नॉलॉजीपर्यंत प्रत्येक विषयाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी आयआयएचटीने भारतात आणि भारताबाहेर सुमारे २२० पेक्षा जास्त सेण्टर्समधून २५०० पेक्षा जास्त एर्क्स्पट्सची नेमणूक करण्यात आली आहे. येत्या काळात आयटी क्षेत्रात कुशल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेण्ट सव्हिर्स स्पेशालिस्ट घडवण्यासाठी आयआयएचटी प्रयत्नशील आहे.

बँकेच्या परीक्षेची पूर्वतयारी

गॅज्युएट झाल्यावर वर्तमानपत्रांतून येणाऱ्या निरनिराळ्या बँकांच्या जाहिराती आपलं लक्ष वेधायला सुरुवात करतात. पुढच्या शिक्षणाचा विचार असला तरी बँकेतली नोकरी ही नेहमीच पदवीधरांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. बँकेच्या परीक्षा देताना नेमकी काय पूर्वतयारी करावी याविषयी...

......

हल्ली बँकेची नोकरी ही पूवीर्प्रमाणे आरामाची नोकरी राहिलेली नाही. कोर बँकिंग सिस्टम, कामाचे वाढलेले तास, स्पधेर्चं युग असल्याने नव्याने सुरू झालेली ८ ते ८ बँकिंग सेवा तसंच सातही दिवस अखंडित सेवा यामुळे बँकेची नोकरीही इतर नोकऱ्यांसारखीच हेक्टिक जॉब झालीए. तरीही एलआयसी, बँक या नोकऱ्या सर्वांच्याच आकर्षणाचा विषय आहेत. सिक्युअर्ड जॉब म्हणून बँकेतील नोकरीचा विचार केला जातो. हल्ली रिझर्व बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, देना बँक, अलाहाबाद बँक, एन केजीएसबी, शामराव विठ्ठल सहकारी बँक अशा विविध बँकांच्या नोकरीसाठी वर्तमानपत्रात जाहिराती दिसतात. मुलंही पटापट फॉर्म्स भरून पाठवतात. मग इतका खर्च करून फॉर्म्स भरल्यावर परिक्षेची पूर्वतयारी करणं तितकंच महत्त्वाचं आहे.

या परीक्षा म्हणजे अॅप्टिट्यूड टेस्ट असतात. प्रश्नपत्रिका पूर्णपणे ऑब्जेक्टिव असते. काही बँकाच्या परीक्षेत मात्र निबंधलेखन किंवा उताऱ्यावरून प्रश्नोत्तरंही समाविष्ट करतात. ही परीक्षा २०० मार्कांची असते. त्यासाठी वेळ असतो एक तास ४५ मिनिटं. म्हणजेच वेळ, वेग आणि अचूकता महत्त्वाची. या ऑब्जेक्टिव प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नाची चार ते पाच संभाव्य उत्तरं दिलेली असतात. आपल्याला फक्त अचूक उत्तर शोधून त्याला खूण करायची असते. चार विषयांचे प्रत्येकी ५० प्रश्न असतात. पेपर पूर्ण होण्यासाठी आणि परीक्षा पास होण्यासाठी अगोदर प्रत्येक विषयाचे किमान २० प्रश्न सोडवण्याचं टागेर्ट ठेवलं पाहिजे. मग वेळेचा अंदाज घेऊन इतर पेपर पूर्ण करावा. राष्ट्रीयकृत बँकेच्या परीक्षेत निगेटिव माकिर्ंगची पद्धत असते हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे.

टेस्ट ऑफ रिझनिंग म्हणजे लॉजिक, टेस्ट ऑफ न्युमरिकल अॅप्टिट्यूड म्हणजे गणित, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्रजी व्याकरण आणि टेस्ट ऑफ क्लेरिकल अॅप्टिट्यूड म्हणजे सामान्यज्ञान हे विषय या परीक्षेत समाविष्ट केलेले आहेत.

काही राष्ट्रीयकृत बँका टेस्ट ऑफ कम्प्युटर अॅप्टिट्यूडचाही पेपर ठेवतात. त्यामध्ये कम्प्युटरची बेसिक माहिती असणं आवश्यक असतं. तांत्रिक बाबींवरचे प्रश्न विचारले जात नाहीत. टेस्ट ऑफ न्युमरिकल अॅप्टिट्यूड ही गणिताची परीक्षा असते. क्लेरिकल पदासाठी असलेल्या परीक्षेत दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम तर प्रोबेशनरी ऑफिसर ग्रेडसाठी असलेल्या परीक्षेत थोड्या वरच्या अभ्यासक्रमाचा समावेश असतो. गणितासाठी नफा-तोटा, काळ-काम-वेग, चक्रवाढव्याज, सरळव्याज, सरासरी, घनमूळ, वर्गमूळ, टक्केवारी, गुणत्तोर इत्यादी अभ्यासक्रम असतो.

इंग्रजीची प्रश्नपत्रिका पूर्णपणे व्याकरणावर आधारित असते. समान अथीर् आणि विरुद्ध अथीर् शब्द, गाळलेल्या जागा भरा, वाक्य पूर्ण करा, काळ ओळखा इत्यादी प्रश्नोत्तरांवर आधारित ही प्रश्नपत्रिका असते.

सामान्यज्ञान या विषयावरील प्रश्नपत्रिकेसाठी मात्र राजकारण, समाजकारण, क्रीडा, आथिर्क, भौगोलिक या विषयांवरील माहिती असणं आवश्यक आहे. चालू घडामोडींविषयी स्वत:ला अपडेट ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे नियमित वर्तमानपत्र वाचन हवं.

राष्ट्रीयकृत बँकांची प्रोबेशनरी आफिसर्ससाठी परीक्षा जेव्हा ठरते तेव्हा त्यात बऱ्याचदा वर्गवारीही केली जाते. साधारणपणे र्फस्ट क्लास ग्रॅज्युएट झालेल्यांकडून अर्ज मागवले जातात. परंतु आयटी आणि अॅग्रिकल्चर डिपार्टमेण्टसाठी मात्र या विषयात प्रविण्य असणं महत्त्वाचं असतं. तसंच एमबीए, सीए, कॉस्ट अकाउण्टण्ट यांना असिस्टण्ट मॅनेजर वगैरे पदांसाठी बोलावण्यात येतं.

नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग ही संस्था दादरला बँकांच्या परीक्षा या विषयावरचे क्लासेस घेते. याशिवाय 'कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू' या पुस्तकातील निरनिराळ्या अॅप्टिट्यूड टेस्ट, स्टडी सर्कलतफेर् प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकातील माहिती आणि जुने सराव पेपर्सही खूप उपयुक्त ठरतात. प्रो. एस. चांद, प्रो. आर. गुप्ता यांची बँकेच्या सराव परीक्षांवरील पुस्तकंही उत्तम मार्गदर्शक आहेत. वेग आणि अचूकता हाच या परीक्षेतील यशाचा मूलमंत्र असल्यामुळे वेगवेगळ्या पुस्तकातील प्रश्नपत्रिका वारंवार सोडवून सराव करणं गरजेचं असतं.

बँकेत नोकरी मिळवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मुलांसाठी आजकाल पदवीधर झाल्यानंतरही अनेक कोसेर्स उपलब्ध आहेत. बीकॉम झाल्यानंतर डिप्लोमा इन बँकिंग अॅण्ड फायनान्स हा एक वर्षाचा करस्पॉण्डन्स कोर्सही त्यापैकी एक.

ज्यांनी येत्या काही महिन्यातील बँकाच्या परीक्षेसाठी अर्ज भरलेत त्यांनी आता कसून सरावाला सुरुवात करा. वेग आणि अचूकता साधायची असल्यामुळे बँकेच्या परीक्षांसाठी सराव महत्त्वाचा असतो.

..............

* बँकेत जॉब लागल्यावर बँक एम्ल्पॉयर्सना प्रमोशनसाठी आणि इन्क्रिमेण्टसाठी जेआयआयबी, सीआयआयबी या परीक्षा देता येतात.

* ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी प्रॉम्प्टनेस आणि कस्टमर रिलेशनशिपची कौशल्यं आत्मसात करावी लागतात.

फायन्स क्षेत्रात सुवर्णसंधी

18th July, 2008

फायन्स क्षेत्रात उत्तम करिअर घडवण्याची प्रचंड संधी आहे. देशातील नामांकित तसंच सरकारी संस्थांमध्ये फायनान्सशी संबंधित विविध कोसेर्स चालवले जातात. नागपुरातही अर्थातच त्याची सोय आहे.

व्यवसायातील चढउतार, समभागाच्या किमतीत वाढ झाली असो वा घट, प्रत्येक परिस्थितीत फायनान्स क्षेत्राचं महत्त्व अबाधित आणि कायम टिकून असतं. जागतिकीकरणामुळे व्यावसायिक क्षेत्रात प्रचंड आणि झपाट्याने बदल घडून आल्याचं दिसून येतं. गेल्या दहा वर्षांत व्यवसाय क्षेत्रात झालेली वाढ आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातील आगमनानंतर रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण झाल्या त्या फायनान्स क्षेत्रातच. एवढंच नव्हे तर दुसऱ्या देशांमध्ये गुंतवणूक करण्याची प्रत्येक देशात जणू स्पर्धाच लागली असल्याचं चित्र दिसून येतंय. एका सवेर्क्षणानुसार, मागील पाच वर्षात फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या सर्वाधिक संधी निर्माण झाल्या आहेत. फायनान्स क्षेत्रात प्रचंड संधी असली तरी प्रशिक्षित तरुणांनाच तिथं प्रवेश दिला जातो, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. विशेष उल्लेखनीय म्हणजे जगात विमाक्षेत्राची उलाढाल अब्जावधी रुपयांत आहे. भारताव्यतिरिक्त अमेरिकेत अंदाजे अडीच कोटी प्रोफेशनल्स या व्यवसायात आहेत.

गेल्या वषीर् शेअरच्या किमती जबरदस्त वाढल्या आणि घटल्यासुध्दा. फायनान्स क्षेत्रातील अशा प्रकारच्या चढउतारांचा अंदाज बांधता येईल अशा प्रशिक्षित तरुणांची निकड मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असल्याने एकप्रकारे ही सुवर्णसंधीच म्हणायला हवी. बँकेत गुंतवणूक, फायनान्स व्यवस्थापन, प्रॉपटीर्, संयुक्त वित्त योजना आणि विमा क्षेत्रात तर फायनान्सचे एकछत्री राज्य आहे. यामुळे प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञांची गरज निर्माण झाली आहे.

फायनान्स क्षेत्रविषयक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. बँका आणि विमा क्षेत्रात परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रोजगाराच्या प्रश्ानची बोच काहीशी कमी झाली आहे. क्रेडिट रेटिंग डेट, माकेर्ट रियल इस्टेट, कन्सल्टन्सी, आयटी कंपन्या, गुंतवणूक, बँका, सॉफ्टवेअर कॉल सेंटर, बीपीओ यासारख्या कितीतरी क्षेत्रात मॅनेजमेंट ट्रेनी, असिस्टंट मॅनेजर, सल्लागार, असोसिएट, व्हाइस प्रेसिडेंट आदी पदांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. इंजिनीअरिंगबरोबर मॅनेजमेंटची माहिती असणाऱ्या प्रोफेशल्सकडे 'प्रोजेक्ट मॅनेजर' म्हणून बघितलं जातं. उपरोक्त पदांसाठी सध्या 'कॅम्पस प्लेसमेंट' या माध्यमातून विविध कंपन्या वाषिर्क सहा ते आठ लाख रुपये पॅकेजवर हुशार विद्यार्थ्यांची निवड करतात. सरकारी तसंच खासगी क्षेत्रात फायनान्सशी संबंधित व्यक्तीच्या वेतनात फरक असतो. तरीसुध्दा सुरुवातीला दरमहा दहा-पंधरा हजार रुपये सहज मिळतात.

नागपुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध कॉलेजांमध्ये फायनान्सशी संबंधित कोसेर्स चालवले जातात. शिवाय, आयसीएफएआय, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, मणिपााल विद्यापीठ आणि दूरशिक्षण आयोगाची मान्यता असलेल्या संस्थांमध्ये पायनान्सशी संबंधित अभ्यासक्रम चालवले जातात.

फायन्स क्षेत्रात सुवर्णसंधी

18th July, 2008

फायन्स क्षेत्रात उत्तम करिअर घडवण्याची प्रचंड संधी आहे. देशातील नामांकित तसंच सरकारी संस्थांमध्ये फायनान्सशी संबंधित विविध कोसेर्स चालवले जातात. नागपुरातही अर्थातच त्याची सोय आहे.

व्यवसायातील चढउतार, समभागाच्या किमतीत वाढ झाली असो वा घट, प्रत्येक परिस्थितीत फायनान्स क्षेत्राचं महत्त्व अबाधित आणि कायम टिकून असतं. जागतिकीकरणामुळे व्यावसायिक क्षेत्रात प्रचंड आणि झपाट्याने बदल घडून आल्याचं दिसून येतं. गेल्या दहा वर्षांत व्यवसाय क्षेत्रात झालेली वाढ आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातील आगमनानंतर रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण झाल्या त्या फायनान्स क्षेत्रातच. एवढंच नव्हे तर दुसऱ्या देशांमध्ये गुंतवणूक करण्याची प्रत्येक देशात जणू स्पर्धाच लागली असल्याचं चित्र दिसून येतंय. एका सवेर्क्षणानुसार, मागील पाच वर्षात फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या सर्वाधिक संधी निर्माण झाल्या आहेत. फायनान्स क्षेत्रात प्रचंड संधी असली तरी प्रशिक्षित तरुणांनाच तिथं प्रवेश दिला जातो, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. विशेष उल्लेखनीय म्हणजे जगात विमाक्षेत्राची उलाढाल अब्जावधी रुपयांत आहे. भारताव्यतिरिक्त अमेरिकेत अंदाजे अडीच कोटी प्रोफेशनल्स या व्यवसायात आहेत.

गेल्या वषीर् शेअरच्या किमती जबरदस्त वाढल्या आणि घटल्यासुध्दा. फायनान्स क्षेत्रातील अशा प्रकारच्या चढउतारांचा अंदाज बांधता येईल अशा प्रशिक्षित तरुणांची निकड मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असल्याने एकप्रकारे ही सुवर्णसंधीच म्हणायला हवी. बँकेत गुंतवणूक, फायनान्स व्यवस्थापन, प्रॉपटीर्, संयुक्त वित्त योजना आणि विमा क्षेत्रात तर फायनान्सचे एकछत्री राज्य आहे. यामुळे प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञांची गरज निर्माण झाली आहे.

फायनान्स क्षेत्रविषयक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. बँका आणि विमा क्षेत्रात परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रोजगाराच्या प्रश्ानची बोच काहीशी कमी झाली आहे. क्रेडिट रेटिंग डेट, माकेर्ट रियल इस्टेट, कन्सल्टन्सी, आयटी कंपन्या, गुंतवणूक, बँका, सॉफ्टवेअर कॉल सेंटर, बीपीओ यासारख्या कितीतरी क्षेत्रात मॅनेजमेंट ट्रेनी, असिस्टंट मॅनेजर, सल्लागार, असोसिएट, व्हाइस प्रेसिडेंट आदी पदांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. इंजिनीअरिंगबरोबर मॅनेजमेंटची माहिती असणाऱ्या प्रोफेशल्सकडे 'प्रोजेक्ट मॅनेजर' म्हणून बघितलं जातं. उपरोक्त पदांसाठी सध्या 'कॅम्पस प्लेसमेंट' या माध्यमातून विविध कंपन्या वाषिर्क सहा ते आठ लाख रुपये पॅकेजवर हुशार विद्यार्थ्यांची निवड करतात. सरकारी तसंच खासगी क्षेत्रात फायनान्सशी संबंधित व्यक्तीच्या वेतनात फरक असतो. तरीसुध्दा सुरुवातीला दरमहा दहा-पंधरा हजार रुपये सहज मिळतात.

नागपुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध कॉलेजांमध्ये फायनान्सशी संबंधित कोसेर्स चालवले जातात. शिवाय, आयसीएफएआय, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, मणिपााल विद्यापीठ आणि दूरशिक्षण आयोगाची मान्यता असलेल्या संस्थांमध्ये पायनान्सशी संबंधित अभ्यासक्रम चालवले जातात.

करिअर ट्रॅक बदलताना...

23rd July 2008.


जॉब होपिंग तसं आपल्याला नवीन नाही. पण, हल्ली एखादा जॉब करत असताना, ते क्षेत्रच सोडून दुसऱ्याच एखाद्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेणारे अनेक जण आजूबाजूला पाहायला मिळतात. काही जण त्या क्षेत्राची बूम ओसरल्यामुळे, तर काही जण कामात न मिळणाऱ्या समाधानामुळे किंवा काही जण इतर क्षेत्रातील आकर्षक संधींमुळे चालू करिअर मध्येच बदलण्याचा निर्णय घेतात. असा निर्णय घेताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.


......

एखाद्या क्षेत्राचं शिक्षण घेतलं, म्हणजे त्याच क्षेत्रात करिअर करायला हवं, असं हल्ली अजिबात राहिलेलं नाही. आज आजूबाजूला पाहिलं, तर अशा अनेक व्यक्ती पाहायला मिळतात, ज्यांनी करिअरच्या मध्येच दुसरं क्षेत्र निवडून त्यात बस्तान बसवलं आहे. इंजिनीअरिंग केल्यानंतर एमबीए करणाऱ्यांचीही संख्या भरपूर आहे. आजकाल, तर असा ट्रेण्डच पाहायला मिळतो.

असा ट्रेण्ड सेट होण्यामागचं एक कारण, म्हणजे हल्ली अनेक क्षेत्रं नव्याने उदयाला येत आहेत आणि तेवढ्याच वेगाने ही क्षेत्रं अस्तालाही जात आहेत. त्यामुळे, अर्थातच अशा इण्डस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांना दुसरी नोकरी शोधावी लागते. ही नोकरी त्याच क्षेत्रात मिळेल असं नाही. यामुळे अनेकांना स्वत:च्या इच्छेसाठी, नाही तर नाइलाजास्तव दुसऱ्या क्षेत्राकडे वळावं लागतं. काही वेळेस दुसऱ्या क्षेत्रातील आकर्षक पगार, बढतीच्या जलद संधी, त्या क्षेत्राला असणारं ग्लॅमर आदी कारणांमुळे अनेक जण एका क्षेत्रात चांगलं बस्तान बसलेलं असूनही दुसऱ्या क्षेत्राकडे वळण्याचा विचार करतात. काही वेळेस चालू असणाऱ्या जॉब/क्षेत्रात समाधानी नसल्यामुळेही अनेक जण इतर क्षेत्रांकडे वळतात, तर काही जण आपला छंद जोपासण्यासाठी फुलटाइम करिअर सोडून एखाद्या पार्टटाइम किंवा फ्रीलान्स जॉबकडे वळतात आणि दुसऱ्या विषयाचा आपला अभ्यास सुरू करतात. पण हे सगळं करायचं, तर तुमच्याकडे थोडं धैर्य असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारासार विचार करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता.

एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात सेटल होताना सुरुवातीला थोड्या अडचणी येऊ शकतात. नवीन वातावरणात जीव घुसमुटल्यासारखाही वाटू शकतो. याचं कारण म्हणजे आधीच्या ऑफिसमध्ये आपण सेट झालेलो असतो. मात्र, याचा अर्थ असा नाही, की नवीन वातावरणात तुम्ही रूळूच शकत नाही. एकदा का, तुम्ही या नवीन ऑफिसमध्ये सेट झालात, तिथल्या सहकाऱ्यांशी चांगली ओळख झाली, मैत्री झाली, की तुम्ही या नवीन ऑफिसमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवायला तयार व्हालच!

करिअरच्या मध्यंतरात असा बदल करण्याची इच्छा अनेकांना असते. पण, काही कारणामुळे ठाम निर्णय घेता येत नाही. तुम्हीही अशाच परिस्थितीत आहात? पण, घाबरू नका. थोडा वेळ घ्या आणि तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफसाठी योग्य असा निर्णय घ्या. काही नवीन करण्यासाठी कधीही उशीर झालेला नाही, हे लक्षात ठेवा. तुमची इच्छा, आवडनिवड आणि कामाप्रती मिळणारं समाधान लक्षात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा. काही जण पालकांच्या दबावामुळे करिअरसाठी एखाद्या क्षेत्राची निवड करतात, पण कालांतराने अपयश किंवा फ्रस्ट्रेशन येऊ लागल्यावर आपण इथे सुटेबल नाही हे लक्षात येतं. मग, अशा वेळेस कामातून न मिळणाऱ्या समाधानासाठी करिअर बदलण्याचाच पर्याय स्वीकारायला हवा. अन्यथा, होणारी घुसमट त्या व्यक्तीला कायमचं फ्रस्ट्रेट करून ठेवू शकते. तर, काही जण कामातील एकसुरीपणामुळे करिअर बदलण्याचा निर्णय घेतात. कारण काहीही असो, करिअरटॅक बदलताना योग्य त्या सर्व बाबींचा विचार करायला हवाच.

.........

* तुम्ही चुकीच्या क्षेत्रात आहात आणि आपण कोणत्या क्षेत्रात नक्की सेट होऊ शकतो, हे जर तुम्हाला माहीत असेल तर त्याप्रमाणे पावलं उचला. सध्याच्या कामात असमाधानी आहात, पण नक्की कोणत्या क्षेत्राची निवड करायची हे माहीत नसल्यास कौन्सिलरची मदत घ्या. करिअर बदलण्याचा निर्णय पक्का झाल्यास विश्वासाने पुढची पावलं उचला. काही वेळेस आत्मविश्वासाच्या अभावी निर्णय घेऊनही अनेक जण स्वत:ला रोखून ठेवतात. मात्र, भिऊन चालणार नाही

* स्वत:च्या क्षमता आणि मर्यादा ओळखायला शिका.

* सध्या तुम्ही काम करत असणाऱ्या संस्थेतच तुमच्या इण्टरेस्ट/स्किल्सनुसार काही संधी असतील, तर त्यासंबंधी वरिष्ठांशी बोलून घ्या.

* नवीन क्षेत्रातील जॉब शोधताना त्या जॉबनुसार आपल्या क्षमता विकसित करायला सुरुवात करा.

* नवीन जॉब शोधताना जिथे अर्ज करणार, त्या कंपनीची योग्य ती माहिती करून घ्या.

* महत्त्वाचं म्हणजे, आत्मविश्वास येत नसेल तर सध्या करत असलेला जॉब तसाच सुरू ठेवून तुमच्या इण्टरेस्टचा पार्टटाइम जॉब करा. यामुळे तुम्ही त्या क्षेत्रात समाधानी राहू शकता, की नाही याची खातरजमा करता येईल. तसंच जॉबच्या आवश्यकतेनुसार स्किल्स विकसित करता येतील.

करिअर ट्रॅक बदलताना...





'आव्हाने स्वीकारणाऱ्यांनाच 'आयटी'त यश'

23rd July. 2008

' दैनंदिन जीवनातील वस्तूंचा संबंध आयटीशी आहे. भविष्यात या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे. त्यामुळे नवनवी आव्हाने स्वीकारायची उर्मी असलेल्यांना या क्षेत्रात यशस्वी होता येईल', असे प्रतिपादन कोर्ट इन कम्प्युटरचे एम. डी. महेंद कुलकणीर् यांनी मंगळवारी केले. 'मटा'चे प्रगती फास्ट मॅगझिन आणि जेटकिंगने आयोजित केलेल्या 'करिअरला द्या नवी दिशा' या सेमिनारमध्ये कुलकणीर् आणि मैत्रयी आयटी सव्हिर्सिंगचे एम. डी. उत्तम बर्धन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रगती फास्ट मॅगझिनच्या प्रकाशनानिमित्त प्रभादेवीतील रवींद नाट्यमंदिरात हा सेमिनार आयोजित केला होता. यावेळी मॅगझिनचे कौतुक करताना जेटकिंगचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर नंदू भारवानी म्हणाले : या मॅगझिनने नेहमीच चाकोरीबाहेरील करिअरचा वेध घेतला आहे. नवनव्या करिअरची माहिती तरुण पिढीपर्यंत पोहोचवली आहे. तरुणांचा मित्र होऊन त्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे हे मॅगझिन विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारे आहे.

जेटकिंग, विद्यार्थ्यांना केवळ कम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवकिर्ंगचे शिक्षण न देता त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवून आत्मविश्वास देते. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी शिदोरी असते, असे सांगून भारवानी यांनी प्रगती फास्ट मॅगझिनच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बर्धन म्हणाले की, जेटकिंगच्या मुशीतून तयार झालेला विद्यार्थ्यांचा पाया मजबूत असतो. आवश्यक ते प्रशिक्षण देऊन त्यांची तयारी करून घेतली जाते.

यावेळी व्यासपीठावर 'मटा'चे रिस्पॉन्स हेड संजय सॅमसन, जेटकिंगचे टेक्नॉलॉजी हेड गुरूप्रसाद शेणॉय आणि प्रगती फास्ट मॅगझिनच्या संपादिका कल्पना राणे उपस्थित होते. या सेमिनारमध्ये आयटी क्षेत्रातील बूम, त्यातील रोजगाराच्या संधी आणि भविष्यकाळातील वाढती मागणी, अशा मुद्द्यांवर पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन करण्यात आले. सेमिनारमध्ये मनोरंजनात्मक खेळ, मेंदूला ताण देणारे प्रश्न यांचाही समावेश होता.

करिअर कम्प्युटर क्षेत्रातलं

करिअर कम्प्युटर क्षेत्रातलं
25 Jul 2008, 0456 hrs IST








टीम महाराष्ट्र प्लस

कम्प्युटरचा वापर होत नाही, असं क्षेत्र शोधूनही सापडणार नाही. विद्यार्थ्यांपासून प्रोफेशनल्सपर्यंत प्रत्येकाकडे स्वतंत्र कम्प्युटर आज दिसून येतो. कम्प्युटरच्या वापरात जसजशी वाढ होत जाईल, तशी हार्डवेअर प्रोफेशनल्सची गरज आणि मागणीही वाढेल.

अलिकडेच झालेल्या एका सवेर्क्षणानुसार २००० ते २०१० दरम्यान कम्प्युटर आणि हार्डवेअरशी संबंधित क्षेत्रांत झपाट्याने वाढ होणार आहे. त्यामुळे २००९च्या अखेरपर्यंत एक लाख ३७ हजार नेटवर्क इंजिनीअर्सची उणीव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

सध्या कम्प्युटरवर काम होत नाही असे एकही कार्यालय सापडणार नाही. याव्यतिरिक्त घर, शाळा, कॉलेज प्रत्येक ठिकाणी कम्प्युटरचा वापर वाढला आहे. नव्हे, कम्प्युटरला पर्याय उरलेला नाही. थोडक्यात, दैनंदिन कामं, मग ती कार्यालयीन असोत किंवा वैयक्तिक, कम्प्युटरमध्ये बिघाड झाला की सगळंच ठप्प होतं. बँका किंवा सरकारी कार्यालयांतील कम्प्युटर बंद पडले तर काय परिस्थिती ओढवते हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. अशा स्थितीत हार्डवेअर प्रोफेशनल्सची गरज पडते. कार्यालयातील सर्व कम्प्युटर्स नेटवर्कच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले असतात. एकंदरीतच कम्प्युटर इन्स्टॉलेशन ते मेंटेनन्स आणि दैनंदिन काम व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी हार्डवेअर इंजिनिअरवर असते.

हार्डवेअर इंजिनीअर होण्यासाठी दोन प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हार्डवेअर आणि बेसिक नेटवकिर्ंग. हार्डवेअरशी संबंधित अभ्यासक्रमात कम्प्युटरच्या विविध भागांविषयी माहिती दिली जाते. या क्षेत्रात ए-प्लस सटिर्फिकेट कोर्सची मागणी सर्वाधिक आहे. हा अभ्यासक्रम दोन भागांत शिकविला जातो. ए-प्लस कोर हार्डवेअर एग्झाम आणि ए-प्लस कोर ऑपरेटिंग सिस्टीम एग्झाम. बेसिक नेटवकिर्ंग अंतर्गत मायक्रोसॉफ्ट विंडोज २००३, सर्वर सटिर्फिकेशन, एमसीएसई प्रमाणपत्रही मिळविता येते.

हार्डवेअर इंजिनीअर किंवा सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेटर होण्यासाठी दोन्ही अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे. नेटवकिर्ंगमध्ये आणखी पुढचा टप्पा गाठण्यासाठी आणखीही काही कोसेर्स करावे लागतात. जसे लॅन (लोकल एरिया नेटवकिर्ंग) आणि वॅन (वाईड एरिया नेटवकिर्ंग). या प्रकारचे सर्व अभ्यासक्रम सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये शिकवले जातात. शिवाय ऑनलाईन स्टडी मटेरियलच्या माध्यमातूनही हे कोर्स करता येतात. नेटवकिर्ंग कोर्स केल्यानंतर कम्प्युटर सपोर्ट स्पेशॅलिस्ट, हेल्प डेस्क टेक्निशियन नेटवर्क किंवा सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर, कम्प्युटर सिक्युरिटी स्पेशालिस्ट म्हणून करियर करता येतं.