photo

Tuesday, April 28, 2009

सेव्ह करावे कुठे? 11 Apr 2008,

फाइल्स सेव्ह करण्याच्या सुरक्षित आणि सोईस्कर पद्धती आहेत. तसंच घुसखोर व्हायरसचा बंदोबस्त करण्याचेही मार्ग आहेत. त्यांचाच सोदाहरण घेतलेला वेध...

...........


Where To Save (in Marathi)
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये अथवा कोणत्याही अॅप्लिकेशनमध्ये मजकूर ऑपरेट केल्यावर तो कसा सेव्ह करावा याच्या काही पद्धती आहेत. ' म. टा. ' चे एक वाचक राजन रानडे यांनी याविषयी बरेच प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांचा आशय असा : ते वेगवेगळ्या विषयांवर फाइल्स तयार करतात , त्या फाइल्सच्या समूहाचे वेगवेगळे फोल्डर तयार करतात आणि या सगळ्या फोल्डरचा पुन्हा एक मोठा फोल्डर तयार करतात. हा मोठा फोल्डर ते सीडीवर सेव्ह करतात. इथपर्यंत ठीक आहे. पण कम्प्युटरमधली एखादी फाइल तुम्ही अपडेट केलीत , तर त्याचे काय करायचे ? कारण सीडीतला डाटा जुना झाला असा त्याचा अर्थ आहे. मग तोही अपडेट कसा करायचा असा प्रश्न आहे.

याचे उत्तर सोपे आहे. कम्प्युटरमधली फाइल अपडेट झाली की तिचे फाइल नेम न बदलता सीडीत सेव्ह करायची. पण सीडीत त्याच नावाची दुसरी फाइल असल्याने तुम्हाला ' डू यू वाँट टू रिप्लेस धिस फाइल विथ न्यू फाइल ?' असे विचारले जाईल. तेव्हा तुम्ही हो म्हणा. काम झाले. सारा मजकूर एकाच फोल्डरमध्ये सेव्ह करावा का , या त्यांच्या प्रश्नावर उत्तर नकाराथीर्च द्यावे लागेल. वेगवेगळे फोल्डर करून तशी वर्गवारी असलेले मोठे फोल्डर करणे केव्हाही चांगले. म्हणजे एखादा फोल्डर व्हायरसमुळे करप्ट झाला , तर बाकीचे सुरक्षित राहू शकतात. सीडीमध्ये फोल्डर सेव्ह करताना त्याची झिप फाइल करणे केव्हाही चांगले. म्हणजे थोड्या जागेत जास्त फाइल मावू शकतात.

आजकाल कम्प्युटरच्या बाहेरून लावता येतील अशा हार्ड डिस्क बऱ्याच मिळतात. दोन हजार रुपयांपासून आठ हजार रुपयांपर्यंत व चार जीबीच्या पेन ड्राइव्हपासून ते १६० जीबीच्या हार्ड डिस्कपर्यंत बरेचसे पर्याय उपलब्ध आहे. ज्यांना फार मोठ्या फाइल्स करायच्या नसतात , त्यांना चार वा आठ जीबीच्या पेन ड्राइव्हचा मोठा आधार आहे. हे पेन ड्राइव्ह शर्टाच्या वरच्या खिशात राहणारे अगदी लहान असतात. साध्या वर्ड फाइल्स असतील तर त्यात काही हजार फाइल्स राहू शकतात. घरगुती काम करणाऱ्याला ते पुरेसे आहे. शिवाय खिशात घालून कोठेही नेता येत असल्याने इंटरनेटशिवाय आपण कोणत्याही फाइल्स कोठेही नेऊ शकतो.

महत्त्वाच्या फाइल सेव्ह करण्याचा माझा स्वत:चा मार्ग वेगळा आहे. समजा दहा लेखांची मालिका लिहून झाली की त्यांच्या फाइल्सची मिळून एक झिप फाइल तयार करायची आणि ती स्वत:च्याच मेलवर अटॅचमेंट म्हणून पाठवून द्यायची. एकदा इंटरनेटवरच्या तुमच्या पर्सनल मेलबॉक्समध्ये ती फाइल सेव्ह झाली की प्रश्न संपला. तुमचा कम्प्युटर जळून खाक झाला तरी फाइल्स नेटवर सुरक्षित राहतात. मेलवरच्या या फाइल्स मेलवरच वेगळा फोल्डर बनवून सेव्ह करा , नियमित ' इनबॉक्स ' मध्ये ठेवू नका. नाही तर अनवधानाने त्या डीलिट होण्याचा धोका असतो.

रानडे यांनीच आणखी एक प्रश्न विचारला आहे. त्यांना अनोळखी माणसांकडून ई-मेल येतात. ते ओपन करावेत का असा हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर नाही असेच आहे. विशेषत: अटॅचमेंट असलेले मेल ओपन करायच्या भानगडीतच पडायचे नाही. ते थेट डीलिट करावेत. इंटरनेटवर मेलमध्ये व्हायरस आहेत का , हे चेक करण्यासाठी बरेच अँटीव्हायरस उपलब्ध आहेत. त्यापैकी एखादा फुकटातला डाऊनलोड केलात , तर प्रश्न सुटेल. मेलवरचा प्रत्येक मेसेज स्कॅन होईल. या अँटीव्हायरसबद्दल पुन्हा केव्हा तरी.

दुसरे एक वाचक अनिल भिसे यांनी एका व्हायरसबद्दल प्रश्न विचारला आहे. त्यांनी एव्हीजी अँटिव्हायरस बसवला आहे. हा फुकटात डाऊनलोड करता येतो आणि चांगलाही आहे. तो त्यांच्या मशीनमधला व्हायरस काढून टाकतो ; पण पुन्हा मशीन सुरू केल्यावर व्हायरस परत येतो. हेच चक्र चालू राहते. यावर उपाय असा की मशीन ' सेफ मोड ' मध्ये चालवा. म्हणजे मशीन रिस्टार्ट करा व लगेचच (स्क्रीनवर काहीही नसतानाच) कीबोर्डवरची एफ८ ही की सतत दाबत राहा. काही सेकंदांनी मशीन ' सेफ मोड ' मध्ये सुरू होईल. तिथे तुम्हाला ऑप्शन दिली जातील. तेव्हा ' सेफ मोड विथ नेटवकीर्ंग ' असे ऑप्शन निवडा. मशीन त्या मोडमध्ये जाईल. मग तुमच्या मशीनमधला अँटिव्हायरस चालवा. ' स्मार्ट स्कॅन ' नव्हे तर ' फूल सिस्टिम स्कॅन ' करा. तो व्हायरस काढून टाकला जाईल. मग मशीन पुन्हा सुरू करा , पण यावेळी एफ८ अजिबात दाबू नका. तो नेहमीसारखा सुरू होऊ द्या. मग तो व्हायरस पुन्हा येणार नाही. असे का होते ? कारण काही व्हायरस हे मूळ सिस्टिममध्ये गेलेले असतात. ते सेफ मोडमध्येच काढले जातात. अर्थात तरीही तो व्हायरस गेला नाही तर काय करायचे ? मग अधिक शक्तिशाली अँटिव्हायरस मशीनमध्ये बसवावा लागेल.

आणखी काही वाचकांच्या प्रश्नांची उत्तरे पुढील आठवड्यात.

मेल 'अशी' साठवायची... 18 Apr 2008,

कम्प्युटरचा मोह आणि आकर्षण आता सर्वच वयातल्या लोकांमध्ये दिसून येत आहे. साहजिकच बऱ्याचजणांना अनेक प्रश्नही पडतात. अशाच काही प्रश्ानंची उदाहरणांसह केलेली ही उकल...

...

कम्प्युटरचा मोह सर्व वयोगटातल्या लोकांना पडत आहे हे मला मिळत असलेल्या प्रतिक्रियांवरून कळत आहे. कम्प्युटर या वयात शिकायला वेगळीच मजा येते असे नाशिकचे ७५ वर्षं वयाचे आजोबा कळवतात; तर त्याच वेळेस शाळेत शिकणारी विद्याथिर्नी या यंत्राकडे आकषिर्त होत असते. या सगळ्यांच्या कम्प्युटरकडून असणाऱ्या अपेक्षा वेगवेगळ्या, काम वेगळे आणि काम करण्याची सफाईही वेगवेगळी. पण सगळ्यांचा उत्साह मात्र सारखाच. यापैकी काही वाचकांच्या प्रश्नांना दिलेली ही उत्तरे.

न्नागदा, मध्य प्रदेश इथून अजय महामुने यांनी दोन प्रश्न विचारले आहेत. ते नवीन सॉफ्टवेअर डाऊनलोड करायला गेले तेव्हा 'तुमच्याकडे विंडोज एक्सपी सव्हिर्स पॅक दोन नाही, तो आधी डाऊनलोड करा', असे त्यांना सांगण्यात आले. असे का, असे त्यांनी विचारले आहे. विंडोज एक्सपी प्रणाली मायक्रोसॉफ्ट हळूहळू निकालात काढत आहे. म्हणूनच त्यांनी विंडोज व्हिस्ता ही नवी प्रणाली आणली. पण ती म्हणावी तितकी यशस्वी झाली नाही आणि लोकांनी एक्सपीच अधिक पसंत केली. मायक्रोसॉफ्टने मात्र एक्सपीच्या सव्हिर्स पॅक दोननंतर थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ एक्सपी प्रणालीतील दोष दूर करताना पहिल्यांदा जी सुधारणा करण्यात आली, तिला सव्हिर्स पॅक वन म्हटले गेले, दुसऱ्यांदा व अंतिम सुधारणा केली तिला सव्हिर्स पॅक दोन म्हटले गेले. तुमच्याकडे विंडोज एक्सपी प्रणाली असली तर कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी सव्हिर्स पॅक दोन अत्यावश्यक करण्यात आले आहे. याचे कारण सर्व सॉफ्टवेअर सव्हिर्स पॅक दोनशी कम्पॅटिबल करण्यात आलेले आहे.

या सव्हिर्स पॅकची साइझ खूप मोठी आहे. तुम्ही सव्हिर्स पॅक एक डाऊनलोड केला नसला तरी थेट दुसरा पॅक डाऊनलोड करू शकता. घरी ब्रॉडबँड नसेल तर ते डाऊनलोड करायला काही तास लागतील. म्हणून मायक्रोसॉफ्टकडे मागणी केल्यास ते तुम्हाला मोफत ही सीडी पाठवतात. अट एवढीच की तुमची मायक्रोसॉफ्टची विंडोजची प्रत ओरिजिनल असायला हवी. ती पायरेटेड असली तर मायक्रोसॉफ्ट सहकार्य करत नाही. मायक्रोसॉफ्टच्या साइटवर गेल्यास आपोआप तुमची विंडोज व्हर्जन ओरिजिनल आहे की नाही हे तपासले जाते आणि असली तर तुम्हाला सीडी कोणत्या पत्त्यावर पाठवू असे विचारले जाते. ती विंडोज एक्सपी असलेल्या प्रत्येकाने डाऊनलोड करणे आवश्यक आहे.

महामुने यांनी दुसरा प्रश्न जीमेलमध्ये इनबॉक्सशिवाय दुसरे फोल्डर तयार कसे करता येतील व मेल त्यात कसे साठवता येतील असा विचारला आहे. अशा वर्गवारीसाठी जीमेल अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही जीमेल ओपन केलेत की वरती उजव्या बाजूला सेटिंग्जवर क्लिक करा. नंतर जी विंडो येईल त्यावर लेबल्सवर क्लिक करा. ही लेबल्स म्हणजेच मेलवरचे तुमचे फोल्डर समजा. हे फोल्डर कितीही तयार होऊ शकतात. क्रिएट न्यू लेबलवर क्लिक केल्यास नवे लेबल तयार करता येईल. समजा पती वा पत्नीच्या नावाचे एक व मित्र अथवा मैत्रिणीच्या नावाचे दुसरे लेबल तयार केलेत. या व्यक्तींकडून आलेले मेल या लेबलकडे वर्ग करू शकता. तुम्ही जीमेल ओपन करा. तुम्हाला समजा दहा मेल एकाचवेळेस एखाद्या लेबलमध्ये वर्ग करायच्या आहेत. तर आधी लेबल तयार करा व मग मेलमध्ये येऊन कोणते मेल संबंधित लेबलमध्ये टाकायचे आहेत त्यांच्या डावीकडील बॉक्सवर क्लिक करा. मेलच्या वरती आर्काइव्ह, रिपोर्ट स्पॅम व डिलीट असे पर्याय दिसतील. त्याच्याचपुढे 'मोअर अॅक्शन्स' असे दिसेल. त्यावर क्लिक करा. खाली येऊन 'अप्लाय लेबल'वर क्लिक करा. तुम्ही तयार केलेली सगळी लेबल्स दिसतील. मग ज्या लेबलमध्ये आधी सिलेक्ट केलेले मेल जायला हवे असतील ते सिलेक्ट करा आणि क्लिक करा. मूळ मेलच्या समोर त्या लेबलचे नाव दिसायला लागेल. ते दिसले की वरच्या 'आर्काइव्ह'वर क्लिक करा की झाले काम. ते मेल इनबॉक्समधून अदृश्य होऊन संबंधित लेबलमध्ये जातील.

असे मेल ट्रान्स्फर करण्याचे काम तुम्ही एकदा कराल, दोनदा कराल... पण रोजच्या रोज हे करायला वेळ कोणाला आहे? तोही विचार जीमेलने केला आहे. पुन्हा जीमेल ओपन करून 'सेटिंग्ज'मध्ये जा. तिथे लेबल्सच्या बाजूला फिल्टर असा शब्द दिसेल. तेथे गेल्यावर ज्या व्यक्तीकडून येणारा मेल विशिष्ट लेबलमध्ये जाणे आवश्यक असेल त्या व्यक्तीचा इमेल अॅड्रेस संबंधित ठिकाणी टाइप करा. नंतर बाकीचे बॉक्स भरलेत की लेबलबद्दल विचारणा केली जाईल. ते सिलेक्ट करून ओके म्हणा. नंतर तुम्ही दिलेल्या व्यक्तीच्या इमेलवरून येणारे सगळेच्या सगळे मेल इनबॉक्समध्ये न येता थेट त्या लेबलमध्ये जाऊन पडतील.

अँटिव्हायरस आणि फोटो सॉफ्टवेअर 2 May 2008

अँटिव्हायरस यंत्रणा असणे आपल्याच हिताचे असते. याचे कारण त्यामुळे आपला कम्प्युटर सुरक्षित राहतो. म्हणूनच ही यंत्रणही सतत अपडेट करावी लागते...
......
आपण जे सॉफ्टवेअर डाऊनलोड करत असतो त्याचे वेळोवेळी अपडेट्सही डाऊनलोड करायला हवेत. अन्यथा ते सॉफ्टवेअर काहीच उपयोगी ठरत नाही. मग आपण आपल्याकडे ते सॉफ्टवेअर आहे, पण उपयोग तर काहीच होत नाही असे मानतो व ते डीलिट करून टाकतो. असे करण्याचे कारण नाही. ते सॉफ्टवेअर डाऊनलोड करतानाच तुम्हाला विचारले जाते की या सॉफ्टवेअरचे अपडेट्स ऑटोमॅटिकली डाऊनलोड व्हायला हवेत की तुम्ही मॅन्युअली ते करणार? यावर बरेचजण ऑटोमॅटिकवर क्लिक करत नाहीत. काही विशिष्ट बाबतींत ते योग्य असले तरी अँटिव्हायरस, ब्राऊझर यांसारख्या सॉफ्टवेअरबद्दल ते योग्य नाही. हे सॉफ्टवेअर अपडेट झाले नाही तर काय होईल? अँटिव्हायरस काम करायचे थांबेल का? नाही. पण त्याच्या डेफिनिशन्स अपडेट नसल्या तरी तो मशीन स्कॅन करील. पण त्याचा प्रभाव कमी झालेला असेल.

अँटिव्हायरस अपडेट होतो म्हणजे काय होते? त्याच्या निर्मात्याला समजा जगातल्या पाचशे व्हायरसची माहिती आहे. त्याच्यापैकी कोणताही व्हायरस मशीनमध्ये शिरल्यास तो प्रभावीपणे काढून टाकण्याची यंत्रणा तो या अँटिव्हायरसमध्ये बसवतो. त्यामुळे त्याच्या आधारे मशीन स्कॅन केल्यास तो व्हायरस निघून जातो. पण व्हायरसचे निर्मातेही शांत बसलेले नसतात. ते अधिकाधिक संहारक व्हायरस आणायचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक अपडेटेड व्हायरसला तितकाच अपडेटेड अँटिव्हायरस आणणे आवश्यक असते. अँटिव्हायरसचे निर्माते ते करत असतात. पण त्यांनी केले म्हणजे काम झाले असे नाही. त्यांनी ते सॉफ्टवेअर अपडेट केले की आपणही करायला हवे. नाहीतर होईल असे की तुमच्या मशीनमधला सॉफ्टवेअर आधीचेच पाचशे व्हायरस शोधत बसेल आणि नवे आलेले व्हायरस त्याला सापडणारच नाहीत.

हीच बाब प्रत्येक सॉफ्टवेअरबाबत लागू ठरते. तुम्ही फायरफॉक्स, फ्लॉक, अवंत, ऑपेरा यापैकी कोणताही ब्राऊझर वापरत असाल व त्यातल्या सेटिंग्जमधल्या 'अपडेट ऑटोमॅटिकली' या ऑप्शनवर क्लिक केले असेल तर अलीकडे तुम्हाला मध्येच 'या ब्राऊझरची नवीन व्हर्जन आली आहे. तुम्हाला अपडेट करायचे आहे का', असे विचारले जाते. तेव्हा ती व्हर्जन डाऊनलोड करून घ्या. फॉक्सीट रिडर, सीक्लीनर वगैरेचीही अपडेटेड व्हर्जन आली आहे.

श्रीमती आशा फाटक यांनी अँटिव्हायरस कोणते डाऊनलोड करून घ्यावेत असे विचारले आहे. मी अँटिव्हायरसबद्दल पूवीर् लिहिले होते; पण सर्वांच्या सोयीसाठी पुन्हा यादी देत आहे. हे सगळे डाऊनलोड करण्याच्या फंदात पडू नका. प्रत्येकात जसे गुण आहेत तसेच दोषही आहेत. पण डाऊनलोड करण्याच्या प्राधान्यक्रमानुसार मी ही यादी देत आहे. ती अशी :

AVG Antivirus Free Edition

Ad-Aware 2007

Avast Home Edition

Spybot-Search and Destroy

Avira Antivir Personal Edition Classic

Spyware Blaster

Ccleaner

Trend Micro Hijack This

Spyware Terminator

PcTools Antivirus Free Edition

हे सारे फुकटातले पण चांगले अँटिव्हायरस आहेत. यातले काही लोड केलेत तरी चालेल. सुमारे दीड ते दोन हजार रुपये भरायची तयारी असेल तर पुढील अँटिव्हायरस अतिशय उपयुक्त आहेत.

Norton AntiVirus

McAfee Virusscan Plus

kaspersky Antivirus

Spyware Doctor

AshampooAntispyware

TrendMicro Internet security 2008

श्रीमती दीप्ती बांदेकर यांनी फोटोचा साइझ कमी करण्यासाठी काय करावे असे विचारले आहे. मेलवरून पाठवताना फोटोची झिप फाइल करून पाठवावी हे एक उत्तर झाले. पण झिप फाइलचाही आकार लहान नसला तर? मग तुम्हाला मूळ फोटोचा साइझच लहान करावा लागेल. त्यासाठी गुगलने पिकासा हा प्रोग्राम आणला आहे. सध्या याची दोन व्हर्जन चालू आहेत. हा मोफत प्रोग्राम आहे. मेलवर एखादा फोटो पाठवायचा असेल तर त्याची साइझ कमी करून पाठवता येते. त्यासाठी तुमचे जीमेलवर अकाऊंट मात्र हवे. पिकासा ओपन केल्यावर टूल्समध्ये जा, ऑप्शन्स ओपन करा आणि मग इमेलवर क्लिक करा. तिथे कोणत्या साइझचे फोटो तुम्हाला पाठवायचे आहेत ते ठरवा. काहीही असले तरी 'ओरिजिनल साइझ'वर क्लिक करू नका. मग तुम्ही निवडलेली साइझच प्रत्येक वेळेस ग्राह्य धरून मेलवरून तोच फोटो पाठवता येईल. (या पिकासात आणखी असंख्य गमतीजमती आहेत. त्याविषयी पुन्हा कधीतरी) याशिवाय 'इरफानव्ह्यू ४' नावाचा एक प्रोग्रामही आहे. तो पिकासाएवढा प्रभावी व सोपा नसला तरी त्यातही फोटोचा साइझ कमी करता येतो. एसीडीसी हे आणखी एक प्रभावी माध्यम आहे. पण त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. ती तयारी असली तर फोटो लहानमोठा करणे एकदम सोपे जाईल.

गर्जतो मराठी! 23 May 2008

गेल्या दोन महिन्यांमध्ये मराठीमध्ये दोन चांगल्या वेबसाइट तयार झाल्या आहेत. त्यांचा घेतलेला वेध...
......
इंटरनेटला भाषा नसते. आपण म्हणू त्या भाषेत ते आपल्यासमोर सादर होते असे म्हणतात. तरीही नेटवरील मराठी भाषेबद्दल आपल्यासाठी योग्य ती सुविधा निर्माण झालेली नाही. म्हणूनच इंटरनेटवर मराठीतून टाइप कसे करावे, आपल्याकडे एक फाँट असेल पण दुसऱ्याकडे तो नसला तर आपला मजकूर त्याला दिसेल का वगैरेसारखे प्रश्न निर्माण होतात. यावर तोडगा म्हणून युनिकोड पद्धती अवलंबिण्यात आली. म्हणजे तुमच्या मशीनमध्ये अमुक एक मराठी फाँट उपलब्ध आहे की नाही हा प्रश्नच नाही. युनिकोडची साइट मशीनवर दिसणारच.

मराठीत गेल्या दोन महिन्यांत चांगल्या वेबसाइट तयार झाल्या आहेत. त्यातली एक म्हणजे 'सहजच.कॉम'. ही साइट वाटते तेवढ्या सहजतेने निर्माण झालेली नाही. सचिन पिळणकर या अतिशय जिद्दी तरुणाने नवशिक्या अथवा त्यापेक्षा थोडेसे जास्त ज्ञान असणाऱ्या व्यक्तींसाठी ही साइट तयार केली आहे. कम्प्युटर ऑपरेट करताना काही मूलभूत अडचणी निर्माण होतात. प्रश्न साधे वाटतात; पण त्यावरची उत्तरे कशी व कुठे शोधायची ते कळत नाही. अशा नवोदितांसाठी पिळणकरांनी ही साइट गेल्याच महिन्यात पाडव्यापासून सुरू केली आहे. यात वेगवेगळे विभाग आहेत. प्रत्येक विभागावर क्लिक करा म्हणजे त्याचे अंतरंग उघडत जाईल. बहुसंख्य वाचक मला ज्या शंका विचारतात, त्यांचे निरसन या साइटवर केलेले आढळेल. विंडोज ९८वर मात्र ही साइट ओपन होणार नाही. विंडोज एक्सपी व विंडोज व्हिस्ता यावर ही साइट दिसेल.

साइट ओपन केल्यावर 'मला शिकायचंय', 'मला थोडंफार येतंय', 'मी हुशार आहे', 'मला भरपूर येते', मी एक्सपर्ट आहे' यांसारखे विभाग येतात. कम्प्युटर वापरणाऱ्यांच्या हुशारीच्या श्रेणीनुसार ते बनविण्यात आले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या शंकांचे निरसन करू शकता. तुमच्या मनात शंका आहे पण त्याचे उत्तर साइटवर नाही असे होऊ शकते. पण म्हणून ती शंका विचारण्याची सोयही साइटवर आहे. या साइटच्या होमपेजवर 'आमची ओळख' या सदरात गेलात तर सचिन पिळणकर ही काय चीज आहे ते लक्षात येईल. या साइटमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. जसजसा या साइटला प्रतिसाद मिळेल तसतशी ती सुधारणा होत जाईल यात शंका नाही.

याच आठवड्यात सुरू झालेली एक वेगळी साइट म्हणजे 'जयमहाराष्ट्र.कॉम'. विविध वृत्तपत्रांमधील बातम्यांचे एकत्रित संकलन म्हणजे ही साइट असे म्हटले तर ती ओळख अपुरी ठरेल. ताज्या घडामोडी, भावलेलं...आवडलेलं, आजची शिफारस, महाराष्ट्रातल्या विविध शहरांतल्या ताज्या बातम्या हे याचे वैशिष्ट्य आहेच, पण शासन, गुंतवणूक, उद्योगव्यवसाय, पर्यटन, खुचीर् (राजकारण), आरोग्य, नियतकालिके आदि विविध विभाग तयार करून त्या क्षेत्राबद्दलची माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या साइटमध्येही मल्टिमीडियाच्या क्षेत्रातील बऱ्याच सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. घरोघरी दोन मराठी वृत्तपत्रेे घेण्याचा कल आता वाढत असला तरी सर्व मराठी वृत्तपत्रेे, नियतकालिके, ब्लॉग्ज आदिंची एकत्रित माहिती मिळण्याची सोय या जयमहाराष्ट्र.कॉमवर झाली आहे.

अशाच प्रकारची एक साइट इंग्रजीमध्ये सुरू झाली आहे. ती म्हणजे 'न्यूजदॅटमॅटर्स.इन'. यात आरोग्य, उद्योग, म्युच्युअल फंड, हॉस्पिटॅलिटी वगैरेसारखे विभाग सुरू करून त्या-त्या विभागातल्या ताज्या बातम्या देण्याची योजना आहे. काही प्रमाणात या बातम्या मोफत पाहायला मिळतात. पण जर तुमच्या मेलवरील इनबॉक्समध्ये या बातम्या रोज यायला हव्या असतील, तर मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतील; तेही प्रत्येक सेक्टरसाठी दहा हजार रुपये. हे पैसे सामान्य वाचकाच्या आवाक्यातले नाहीत. अशा प्रकारची साइट चालविण्याचे काम खचिर्क असते हे मान्य; पण वाचक आपल्याला किती पैसे द्यावे लागतात याचा विचार करणारच. प्रामुख्याने ही साइट व्यावसायिकांसाठीच आहे असे म्हणावे लागेल. रोजच्या रोज साइटवर जाऊन मर्यादित बातम्या पाहायच्या असतील तर मात्र सारे चकटफु आहे. वृत्तपत्रे, नियतकालिके व तत्सम २०० सोर्स, ५० वेबसाइट्स आणि दहा भाषा यांतून सारा मालमसाला जमा केला जातो. साइट वाचनीय आहे यात शंका नाही.

मागे एका वाचकाने इंटरनेटवर इंग्रजी-मराठी डिक्शनरी आहे का, असे विचारले होते. त्याचे उत्तर होकाराथीर् आहे. तुम्ही खांडबहाले.कॉम ( khandbahale.com ) टाइप करा आणि समोरच वरच्या बाजूला इंग्लिश-मराठी ऑनलाइन डिक्शनरीवर क्लिक करा. ज्या इंग्रजी शब्दाचा अर्थ हवा आहे तो शब्द टाइप करा व 'लुकअप'वर क्लिक करा. क्षणार्धात त्याचा मराठी अर्थ तुमच्यासमोर येईल. जर मराठीतून दिसला नाही तर या साइटवरचा मराठी फाँट डाऊनलोड करावा तो फाँट्स फोल्डरमध्ये इन्स्टॉल करावा लागेल. पुन्हा ब्राऊझर सुरू करा म्हणजे मराठीतून अर्थ दिसायला लागतील.

ता. क. : तुम्ही विंडोज एक्सपी वापरत असाल आणि सव्हिर्स पॅक २ डाऊनलोड केलेले असेल तर यापुढचा व शेवटचा सव्हिर्सपॅक ३ डाऊनलोड करायला हरकत नाही. इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये जाऊन विंडोज अपडेटवर जा, पुढच्या सूचनांचे पालन करा आणि सव्हिर्स पॅक ३ डाऊनलोड करा. यामुळे तुमचे मशीन अधिक सुरक्षित होईल का वा अधिक वेगाने पळेल का, या प्रश्ानंवर कामात फारसा फरक पडणार नाही असेच उत्तर द्यावे लागेल.

गर्जतो मराठी! 23 May 2008

वर्ड प्रोसेसर्स 6 Jun 2008

' वर्ड प्रोसेसर'ला पर्याय आहेत; मात्र ते डाऊनलोड करून घेताना आवश्यक ती काळजी घ्यायलाच हवी. तशी ती घेतली नाही, तर कम्प्युटर क्रॅश होण्याचीच भीती जास्त असते...
......
आपला कम्प्युटर आपण कितीही काळजीपूर्वक वापरायचे ठरविले तरी नंतर आपण योग्य ती खबरदारी घेत नाही. मी हे काही अर्थांनी म्हणतोय. एक म्हणजे कम्प्युटरचा वाट्टेल ते पाहण्यासाठी दुरुपयोग केला जातो अथवा त्यावर नवनवे प्रोग्राम डाऊनलोड करून ते कसे आहेत ते पाहण्याची चटक लागते. तिसरी बाब म्हणजे तुम्ही रोज वापरत असलेल्या सॉफ्टवेअरला अधिक चांगला (आणि अर्थातच फुकटातला) पर्याय उपलब्ध आहे का याचा आपण सतत शोध घेत असतो. सध्या तरी आपण तिसऱ्या बाबीविषयी बोलू. तुम्ही सर्वजण कम्प्युटरवर काम करताना मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करत असणार. कारण जर तुम्ही विंडोज सिस्टिम वापरत असाल तर हे वर्ड मायक्रोसॉफ्ट ऑफिसबरोबर आपोआपच मिळते. या वर्डला आपण 'वर्ड प्रोसेसर' म्हणतो. म्हणजे त्यात मजकूर टाइप करता येतो, काही प्रमाणात त्याचे डिझायनिंग करता येते, अगदी माफक प्रमाणात नखरे करता येतात. हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस फुकटात मिळत नाही. परंतु, आता नेटवर कितीतरी वर्ड प्रोसेसर उपलब्ध आहेत; ज्यात मायक्रोसॉफ्ट वर्डपेक्षा कितीतरी अधिक सुविधा आहेत आणि मुख्य म्हणजे त्यातील बरेचसे फुकट डाऊनलोड करता येतात.

स्टार ऑफिस आणि ओपन ऑफिस हे सध्याचे दोन उत्कृष्ट पर्याय आहेत. यातील ओपन ऑफिस संपूर्णपणे फुकट आहे आणि अतिशय चांगले आहे. यात मायक्रोसॉफ्ट वर्डसारख्याच सोयी असलेला 'रायटर' आहे. त्याचप्रमाणे स्प्रेडशीट, ड्रॉईंग, मॅथ्स वगैरेसाठी वेगळ्या सुविधा असलेला हा प्रोग्राम आहे. त्याचा साइझ मात्र तीनशे एमबीच्या आसपास असल्याने घरी ब्रॉडबँड इंटरनेट नसणाऱ्या लोकांना तो सहजपणे डाऊनलोड करता येणार नाही. ब्रॉडबँड नसल्यास त्यास खूप वेळ लागेल. पण ही त्रुुटी सोडली तर मायक्रोसॉफ्ट वर्डला हा सर्वात उत्तम पर्याय आहे. स्टार ऑफिसमध्ये अधिक सुविधा आहेत; पण त्या पॅकेजसाठी तुम्हाला स्वत:च्या खिशात हात घालावा लागेल. त्यामुळे सध्या तरी ओपन ऑफिसवर समाधान माना. याचा आणखी एक फायदा असा की ते मायक्रोसॉफ्ट वर्डशी कम्प्ॅाटिबल आहे. म्हणजे आधी तुम्ही वर्डच्या फाइल्स सेव्ह केलेल्या असतील तर त्या ओपन ऑफिसमध्येही ओपन होतील.

कोरल वर्डपरफेक्ट, लोटस वर्डप्रो, अॅपलर्वक्स, गोबी प्रॉडक्टिव, अॅबिलीटीराइट, वर्डएक्स्प्रेस अशांसारखे आणखी काही वर्ड प्रोसेसर्स उपलब्ध आहेत. पण ओपन ऑफिसची सर कोणालाच नाही. अॅबिवर्ड हा प्रोग्राम मात्र मर्यादित सुविधांसह का असेना, पण चांगला आहे. यात वर्डइतक्या नाहीत, पण आपल्याला मजकूर ऑपरेट करायला ज्या किमान सुविधा लागतात त्या सर्व आहेत. त्याचा साइझही अत्यंत कमी आहे. त्यामुळे तो डाऊनलोड करणे हे अजिबात कष्टाचे काम नाही.

खुद्द मायक्रोसॉफ्ट आता 'थिंकफ्री' नावाने काढलेल्या सॉफ्टवेअरकडे वळते आहे. ते फुकटात मिळत नाही. वाषिर्क वर्गणी भरावी लागते. पण यात केलेली डॉक्युमेंट्स जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेलात तरी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. कारण ते डॉक्युमेंट मायक्रोसॉफ्टच्या र्सव्हरवर सेव्ह होते. ती लिंक सतत मिळत असल्याने घरच्या पीसीवर केलेले डॉक्युमेंट ऑफिसमध्ये सहज उघडता येईल. अर्थात याही बाबतीत गूगल पुढे आहे. त्यांनी 'गूगल डॉक्स' नावाचे सॉफ्टवेअर आधीच आणले आहे. यात अशी डॉक्युमेंट्स ऑनलाइन साठवायची सोय आहे. त्यातही गूगलने आपले वैविध्य कायम राखले आहे. गुगल डॉक्स वापरायला तुमचा जीमेलवर अकाऊंट असावा लागतो. जीमेलवर अकाऊंट नाही असा इमेलधारक फारच विरळा असेल. पण तुमचे अकाऊंट नसलेच तर गूगलडॉक्स ओपन केल्यावर तिथे अकाऊंट ओपन करायची सोय आहे.

मी इथे सांगितलेल्या अथवा तुम्ही इंटरनेटवर 'वर्ड प्रोसेसर्स' असा सर्च देऊन मिळालेल्या वर्ड प्रोसेसरबद्दल एक काळजी मात्र घ्या. ती ही की तो वर्ड प्रोसेसर कम्प्युटरच्या कोणत्या सिस्टिमशी कम्पॅटिबल आहे ते तपासून घ्या. बहुतेक प्रोसेसर विंडोजमध्ये चालतात; पण काही अॅपल अथवा मॅकसाठीच तयार झालेले आहेत. जो विंडोजसाठी चालत नाही तो डाऊनलोड करायच्या भानगडीत पडू नका. कारण मग ते सॉफ्टवेअर वापरायला लागल्यावर कम्प्युटर क्रॅश होण्याची शक्यता असते. मी वेगळ्या संदर्भात अशी चूक केली होती. मी सफारी ब्राऊझर डाऊनलोड केला. तो चालविल्यावर मशीन बंद पडत असे. हा ब्राऊझर विंडोज सिस्टिमशी कम्पॅटिबल आहे असे सांगण्यात येत असले तरी माझा अनुभव वेगळा होता. मग मी तो ब्राऊझर लगेचच काढून टाकला.

या वर्ड प्रोसेसरमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन असे प्रकार आहेत. जी डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठूनही ओपन करता येतील, ती ऑनलाईन. मशीनमधले मायक्रोसॉफ्ट वर्डमधले डॉक्युमेंट तुम्ही मेलने पाठविल्याशिवाय अथवा पेनड्राइव्हने दुसरीकडे नेल्याशिवाय दुसरीकडे ओपन होणार नाही. ऑनलाईन प्रोसेसरमध्ये साठवता येणाऱ्या मजकुराचा साइझ वेगवेगळा असतो; पण साधारणत: एक जीबी मजकूर साठवता येतो. मी उल्लेख केलेल्या वर्ड प्रोसेसरशिवाय आणखी काही प्रोसेसरही आहेत. त्याची यादी खाली देत आहे.

वेगे वेगे धावू... 13 Jun 2008

आपला कम्प्युटर खूपच हळूबाई झाला आहे, असा अनुभव अनेकांना येतो. हा वेळखाऊपणा कसा काढून टाकायचा, असा त्यांना प्रश्नच पडतो. परंतु यावरही उपाय आहेत आणि ते सहजपणाने करता येण्यासारखेच आहेत...
..........
माझे मशीन खूप स्लो चालते, सुरू करतानाही खूप वेळ लागतो, अशावेळी काय करू असे विचारणारे अनेक वाचकांचे ईमेल गेल्या पंधरा दिवसांत आले आहेत. मशीन स्लो चालण्यामागे एकच कारण नसते. त्यात मशीन जुने झाल्यावरही अद्ययावत सॉफ्टवेअर भरत राहिल्याने त्रास होऊ शकतो. किंवा मशीन नवे असले आणि आपण 'स्टार्ट अप'मध्ये जरूरीपेक्षा जास्त प्रोग्राम टाकले तरी सुरुवातीलाच मशीन थंडावते. कधी मशीनमध्ये व्हायरस शिरलेला असतो तर कधी टेम्पररी फाइल्स डीलिट न केल्याने अनावश्यक कचरा साठून मशीन 'जड' होते व स्लो चालते. प्रत्येक मशीनच्या संदर्भात वेगवेगळे कारण असू शकेल.

नेमके कारण शोधून काढण्यासाठी यातील प्रत्येक उपाय स्वतंत्रपणे करावा लागेल. प्रथम 'स्टार्ट अप'मध्ये (स्टार्टवर क्लिक करा, नंतर ऑल प्रोग्राम्स व नंतर स्टार्ट अप) कोणकोणते प्रोग्राम्स आहेत ते पाहा. त्यातील अत्यावश्यक तेवढेच ठेवा व बाकीचे काढून टाका. या यादीत प्रोग्रामचे नाव नाही, पण तरीही तो मशीन सुरू होताना आपोआप सुरू होत राहातो व भरपूर वेळ घेतोय असे दिसले तर काय कराल? 'स्टार्ट'वर क्लिक करून 'रन'वर क्लिक करा. मग एमएसकॉन्फिग (msconfig) असे टाइप करा. मग एक बॉक्स तुमच्यासमोर येईल. त्यातील वरच्या टॅबपैकी स्टार्टअपवर क्लिक करा. मशीन सुरू होताना नेमके कोणते प्रोग्राम्स लोड होतात ते दिसेल. त्यातील नको असतील ते अनक्लिक करा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. बरेच प्रोग्राम सिलेक्ट केलेले असतील तर ते सगळे एकदम अनसिलेक्ट करू नका. तसे केल्यास तुमची विंडोज सिस्टिम मायक्रोसॉफ्टकडून पुन्हा व्हॅलिडेट करावी लागेल. एकएक प्रोग्राम सिलेक्ट वा अनसिलेक्ट करा. मशीन पुन्हा सुरू करा. यावेळेला तुम्हाला बराच फरक पडलेला दिसेल.

एवढे करूनही मशीन सुधारले नाही तर? एक शक्यता अशी की मशीनमध्ये व्हायरस शिरलेला असू शकेल. त्यासाठी चालू असलेले सर्व प्रोग्राम्स बंद करून अपडेट केलेला अँटिव्हायरस चालवून 'फूल स्कॅन' करा. व्हायरस निघून गेल्यावर पुन्हा मशीन रिस्टार्ट करा. या दोन बाबी केल्यावर साधारणपणे मशीन शहाण्यासारखे सरळ येते. तरीही काही गोष्टी आवश्यक आहेत. वर म्हटल्याप्रमाणे अनावश्यक फाइल्स प्रमाणाबाहेर साठल्या असल्या तरी मशीन थंडावते. त्यासाठी पूवीर्च्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे सीक्लिनर (ccleaner) हा प्रोग्राम इंटरनेटवरून डाऊनलोड करा. तो चालविल्यावर अनावश्यक फाइल्स आपोआप डीलिट होतील. यात तुमच्या महत्त्वाच्या फाइल्स डीलिट झाल्या तर, अशी भीती बाळगू नका. त्या जात नाहीत. प्रामुख्याने टेम्पररी फाइल्सच जातात. आणखी एक चांगला प्रोग्राम म्हणजे डबलकिलर (Doublekiller) मशीनमध्ये एकाच नावाच्या फाइल्स एकापेक्षा जास्त झाल्या असतील तर त्या हा प्रोग्राम काढून टाकतो. तो ही क्रिया आपोआप करत नाही. एकच नाव असलेल्या फाइल्स तो तुमच्यासमोर आणतो. मग खरोखरच ज्या फाइल्स नको आहेत त्या तुम्ही काढून टाकू शकता. वेगवेगळ्या ड्राइव्हमध्ये तुम्ही एकाच नावाची फाइल तयार केलेली असू शकते व त्यात मजकूरही वेगवेगळा असेल. मग केवळ नाव सारखे म्हणून फाइल आपोआप डीलिट करण्याचे काहीच कारण नाही. उलट अधिक सावधानता बाळगायला हवी.

मशीनचे डिफ्रॅगमेंटेशन करणे हा आणखी एक उपाय तुम्हाला करता येईल. स्टार्ट-ऑल प्रोग्राम्स-अॅक्सेसरीज- सिस्टिम टुल्स-डिस्क डिफ्रॅगमेंटर या मार्गाने गेल्यावर तुम्हाला मशीन डिफ्रॅग करता येईल. या डिफ्रॅगमेंटेशनवर मी याच कॉलममध्ये स्वतंत्र लेख लिहिला होता. आपण काम करताना अनेक फाइल्स तयार करतो, आधीच्या नको असलेल्या काढून टाकतो. मग डिस्कवर अशी स्थिती निर्माण होते की सलग दोन फाइल्सच्या मधल्या फाइल्स डीलिट केल्याने फाइलना पुढची लिंक लगेच मिळत नाही व त्या ओपन व्हायला वेळ लागतो. रिकामे स्लॉट काढून टाकून सगळ्या फाइल्सची एकजूट करण्याचे काम हे डिफ्रॅगमेंटेशन करते.

खूप मोठ्या साइझचे प्रोग्राम विनाकारण लोड करून ठेवणे, गाणी ऐकण्याचा सोस असल्यास हार्डडिस्कची क्षमता लक्षात न घेता भरपूर गाणी लोड करून ठेवणे, व्हीडिओ पाहण्यासाठी पुरेशी क्षमता नसतानाही तसे प्रोग्राम लोड करणे ही आणखी काही कारणे मशीन स्लो होण्यामागे असू शकतील. आपल्याकडे विंडोज एक्सपी आहे, पण त्याचा लूक विंडोज व्हिस्तासारखा दिसला पाहिजे या मोहापायी वेगवेगळे प्रोग्राम्स लोड केले जातात आणि मशीन स्लो होण्यास मदत केली जाते.

थोडक्यात आपण स्वत:वर नियंत्रण ठेवले तर मशीन फास्ट चालायला मदतच होईल.

बहुगुणी टास्कबार 27 Jun 2008

टास्कबार म्हणजे काय, त्याचा उपयोग करून आपली कामे कशी आणि का सोपी होतात, टास्कबारवरील सोई कोणत्या आदी बाबींचा आढावा...
........
आपला कम्प्युटर फास्ट चालावा असे कोणालाही वाटेल. प्रत्यक्षात तो का गोगलगायीसारखा चालतो याची कारणे बरीच आहेत. त्याविषयी आधीच्या लेखांत माहिती येऊन गेली आहे. अनावश्यक फाइल्स काढून टाकणे, अँटिव्हायरस चालवून मशीन निरोगी करणे, डिफ्रॅगमेंटेशन करून सगळ्या फाइल्स एकत्रित आणणे या व अशा पद्धतीच्या कामांनी कम्प्युटर फास्ट चालवता येतो. पण हे सारे केले, कम्प्युटर वेगातही चालला तरी काही गोष्टी अशा करता येतील की कम्प्युटर चालवताना त्या उपयोगी पडतील. समजा कम्प्युटरमधला एखादा फोल्डर वा त्यातली फाइल तुम्हाला सतत लागते. तुम्ही वर्डमध्ये काम करताहात आणि ते करतानाच दुसऱ्या एखाद्या फाइलमधला रेफरन्स तुम्हाला हवा आहे तर प्रत्येकवेळी मूळ वर्ड फाइल क्लोज करण्याची गरज नाही. एकाचवेळेस दोन वा अधिक वर्ड फाइल ओपन राहू शकतात. एकातून दुसऱ्यात जाण्यासाठी वरच्या मेन्यूमधील 'विंडो'वर क्लिक केले की सगळ्या ओपन फाइल दिसतील. मग तुम्ही हवी ती ओपन ठेवू शकता. शिवाय याच फाइल्स 'अल्ट व टॅब' ही बटन्स एकाचवेळेस दाबूनही तुम्ही हवी ती फाइल ओपन करू शकता. परंतु एखाद्या फोल्डरमधल्या फाइल्स सतत लागत असतील तर?

यासाठी टास्कबारचा उपयोग करू शकता. टास्कबार म्हणजे 'स्टार्ट' बटनाच्या ओळीतला बार. त्यावर या फोल्डरचा शॉर्टकट केला जातो. त्यासाठी टास्कबारच्या रिकाम्या जागेत राइट क्लिक करा, मग 'न्यू टूलबार'वर जा. तिथून हव्या असलेल्या फोल्डरवर जा. ओके म्हणा. की झाला शॉर्टकट तयार. टास्कबारच्या अगदी उजवीकडे तो दिसेल. कोणत्याही फाइलवर काम करताना या फोल्डर वा फाइलमधला मजकूर तुम्ही पटकन उघडू शकाल.

' क्विकलाँच' हा असाच एक सोईचा प्रकार असतो. याच टास्कबारवर क्लिक करून पुन्हा 'टूलबार'वर क्लिक करा आणि 'न्यू टूलबार'च्या वरती असलेल्या 'क्विकलाँचवर' जा. आता तुम्हाला दोन टास्कबार दिसायला लागतील. यात डेस्कटॉपवरचा कोणताही आयकॉन पकडून आणून 'क्विकलाँच'च्या जागेत सोडून द्या. तो आयकॉन तिथेच राहील आणि तुम्ही काम करत असलेली फाइल क्लोज न करता या आयकॉनवर क्लिक करून तो प्रोग्राम सुरू करता येईल. पण या पद्धतीचा तोटाही आहे. यात तुम्ही जितके जास्त आयकॉन आणाल तितकी मशीनची मेमरी जास्त वापरली जाईल. त्यामुळे आवश्यक तेच प्रोग्राम्स तुम्ही आणा.

तुम्ही जे प्रोग्राम्स ओपन करता ते नंतर पटकन ओपन करता येतील का? शेवटचे सहा प्रोग्राम्स आपल्याला पटकन दिसू शकतात. तुम्ही स्टार्ट बटनवर क्लिक केले की 'ऑल प्रोग्राम्स'च्या वरती तुम्ही आधी वापरलेले प्रोग्राम्स दिसतील. साधारणपणे तेथे सहा प्रोग्राम्स दिसतात. ते वाढवून दहा-बाराही करता येतात. त्यासाठी 'स्टार्ट'वर राइट क्लिक करा, मग 'प्रॉपटीर्ज' व नंतर 'कस्टमाइज' बटनवर जा. जी विंडो येईल त्यातल्या मधल्या 'प्रोग्राम्स'वर जा. त्यातला आकडा तुम्हाला हवा तसा सेट करा. जितका आकडा सेट कराल तितके प्रोग्राम्स तुम्हाला दिसतील. तरीही दहा प्रोग्राम्स पुष्कळ झाले. मशीन सुरू होताना 'स्टार्ट अप'मधले प्रोग्राम्स व 'स्टार्ट' बटनावर क्लिक केल्यावर दिसणारे आधीचे दहा प्रोग्राम्स याची गल्लत करू नका. यांचा एकमेकांशी संबंध नाही.

तुम्हाला एकाच वेळेस बऱ्याच फाइल्स ओपन करण्याची सवय असली तर 'टास्कबार'वर फाइलची गदीर् होते. यावर उपाय म्हणजे एकाच प्रकारच्या फाइल्सचा गट करणे. म्हणजे फाइल्स दहा ओपन असल्या तरी टास्कबारवर तीनच गट दिसतात असे होऊ शकते. म्हणजेच ओपन असलेल्या वर्ड फाइल्स एका गटात, एक्सेल फाइल्स दुसऱ्यात अशा दिसू शकतील. मग वर्ड फाइलच्या गटावर क्लिक करून हवी ती वर्ड फाइल ओपन करू शकता. त्यासाठी टास्क-बारमधील रिकाम्या जागेवर राइट क्लिक करा, मग प्रॉपटीर्जवर क्लिक करा. एक विंडो ओपन होईल. त्यात टास्कबार हेडिंगखाली 'ग्रूप सिमीलर टास्कबार बटन्स'वर क्लिक करा व ओके म्हणा. याच विंडोमध्ये इतर ऑप्शन्सही दिसतील. आवश्यकते-ेप्रमाणे क्लिक वा अनक्लिक करा.

याच विंडोत अगदी तळाला 'हाइड इनअॅक्टिव आयकॉन्स' असे एक ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर काय होईल? 'स्टार्ट' बटनाच्या ओळीत शेवटी घड्याळातली वेळ व इतर आयकॉन्स दिसतात. यातला प्रत्येक आयकॉन वापरला जातोच असे नाही. जो प्रोग्राम बराच काळ वापरला जात नाही, तो स्क्रीन-वरून नाहीसा होतो. नेहमी वापरले जाणारे आयकॉन्सच दिसतात. पुन्हा ते प्रोग्राम ओपन करायची वेळ आली तर? याच आयकॉनच्या बाजूला अॅरो दिसेल. त्यावर क्लिक करा. की तोच आयकॉन पुन्हा सेवेला हजर.

या टास्कबारवर आणखी एक महत्त्वाची सोय आहे. ती म्हणजे टास्क मॅनेजरची. टास्कबारवर राइट क्लिक करून 'टास्क मॅनेजर'वर क्लिक करा. एक विंडो ओपन होईल. त्यात मशीन चालू असताना कोणकोणते प्रोग्राम्स सुरू आहेत त्याची यादी दिसेल. जितके जास्त प्रोग्राम्स सुरू, तितके मशीन हळू चालेल. त्यामुळे नको असलेला प्रोग्राम सिलेक्ट करून खालील 'एंड टास्क' बटनावर क्लिक करा की तो बंद होईल. एखादा प्रोग्राम हँग झाला तरीही हीच युक्ती वापरून तो बंद करता येईल. या टास्कबारवर राइट क्लिक करून आणखी काही सुविधा मिळतात. त्या स्वत:च करून पाहायला हरकत नाही.

शॉर्टकट्स! 11 Jul 2008

कम्प्युटरवर वेगाने काम करावयाचे असेल, तर त्याच्या अनेक युक्त्या आहेत. 'शॉर्टकट्स' ही त्यातील सर्वात महत्त्वाची. काही शॉर्टकट तुम्हाला नेटवर सापडतील. हे शॉर्टकट माणसाला आळशी बनवतात, हे खरे असले तरी काम वेगाने व्हायला हवे असेल तर हे शॉर्टकट वापरायलाच हवेत.
......
गेल्या वेळेस आपण टास्कबारच्या काही करामती पाहिल्या. आता आणखी काही सोप्या पण खूप उपयोगी पडणाऱ्या गोष्टी. कम्प्युटर फास्ट चालावा म्हणून कायकाय करावे लागते ते आपण याआधीच्या लेखांत पाहिले. आता आणखी एक युक्ती. कम्प्युटर चालू असला की त्याचे इंडेक्सिंगचे काम सतत चालू असते. इंडेक्सिंग म्हणजे कम्प्युटरमधल्या सगळ्या फाइल्स नीट एकामागोमाग एक लावून ठेवणे. हार्ड डिस्कमध्ये बरोबर त्या बसवल्या जातात. ज्यांच्या घरातील कम्प्युटरमध्ये हजारो फाइल्स आहेत आणि प्रत्येक वेळेस एखादी फाइल ज्यांना शोधावी लागते, त्यांना सर्च केल्यावर ती फाइल पटकन मिळावी यासाठी हे फंक्शन आहे. पण त्यामुळे कम्प्युटर किंचित स्लो होतो. ज्यांच्याकडे जास्त फाइल्स नाहीत किंवा वारंवार सर्च करायला लागत नाहीत त्यांनी हे इंडेक्सिंग बंद केले तरी चालेल. त्यामुळे मशीन थोडे फास्ट चालेल. त्यांनी डेस्कटॉपवरील 'माय कम्प्युटर'वर राइट क्लिक करावे. नंतर 'सी' ड्राइव्ह निवडा, 'प्रॉपटीर्ज'वर क्लिक करा. तेथे तळाला 'अलाऊ इंडेक्सिंग' असे एक ऑप्शन असेल. ते अनटिक करा. मग मशीन पुन्हा सुरू करा.

तुम्ही कम्प्युटर अपडेट ठेवत असालच. 'ऑटोमॅटिक अपडेट' ऑन ठेवले असेल तर उत्तमच, पण हे ऑप्शन ऑन न ठेवता तुम्हाला तुमच्या सोयीनुसारच अपडेट्स डाऊनलोड करायचे असतील तर? त्यासाठी इंटरनेट एक्स्प्लोरर ओपन करून विंडोज अपडेटवर जाण्याची गरज नाही. डेस्कटॉपवर एक शॉर्टकट करून ठेवा. त्यावर डबल क्लिक केले की झाले काम. डेस्कटॉपवरच्या मोकळ्या जागेत राइट क्लिक करा मग न्यू - शॉर्टकट या मार्गाने जा. तिथे डब्लूडब्लूडब्लू डॉट विंडोजअपडेट असे टाइप करा व नेक्स्ट म्हणा. नंतर आणखी एक बॉक्स येईल. तेथे 'अपडेट शॉर्टकट' असे म्हणा व ओके करा. जेव्हा केव्हा अपडेट करायचे असेल तेव्हा त्यावर डबलक्लिक करा. झाले अपडेट सुरू. (मात्र तुमचा डिफॉल्ट ब्राऊझर इंटरनेट एक्स्प्लोरर हवा.)

तुम्हाला कम्प्युटर सुरू करताना तुमचे यूजरनेम आणि पासवर्ड नेहमी विचारला जातो का? प्रत्येकवेळेस घरच्या कम्प्युटरवर पासवर्ड देणे कटकटीचे वाटू शकते. कम्प्युटर सुरू केल्यावर तो थेट सुरू व्हायला हवा असेच वाटते ना? पासवर्ड विचारला जाणे नको असेल तर एक काम करा. आधी 'स्टार्ट' व नंतर 'रन'वर क्लिक करा. तिथे कंट्रोल युजरपासवर्डस्२ असे टाइप करा. एक विंडो ओपन होईल. मशीनमध्ये ज्यांचे ज्यांचे अकाऊंट्स आहेत ते तिथे दिसेल. समजा घरचा कम्प्युटर असेल तर कदाचित अॅडमिनिस्ट्रेटर आणि तुमच्या नावाचे अशी दोनच अकाऊंट दिसतील. त्यातल्या तुमच्या नावावर क्लिक करा. वरच्या बाजूला 'युजर्स मस्ट एंटर अ यूजर नेम अँड पासवर्ड टू यूज धिस कम्प्युटर' असे दिसेल. ते टिक केलेले असेल तर अनटिक करा. पुन्हा एक बॉक्स येईल व तुम्हाला पासवर्ड विचारेल. तो टाइप करून ओके म्हणा. मशीन रिस्टार्ट करा. आता पासवर्ड विचारला जाणार नाही व थेट मशीन सुरू होईल.

तुमच्या मशीनच्या कीबोर्डवर एक विंडोजची की दिसेल. माझ्या कीबोर्डवर एकदम तळाच्या ओळीत कंट्रोल बटनाच्या शेजारी आहे. आता नवनवीन कीबोर्ड येत असल्याने ती कुठे असेल ते पाहावे लागेल. पण ही विंडोज की जादुई आहे. ती की व अन्य काही अक्षरे एकदम दाबली की भराभर काही अॅप्लिकेशन्स ओपन होतात. उदा विंडोज व एम दाबा. कितीही फाइल्स ओपन असल्या तरी तुम्हाला डेस्कटॉप लगेच दिसेल. विंडोज व इ एकदम दाबली की विंडोज एक्स्प्लोरर सुरू होईल. विंडोज व आर की दाबली की 'रन' बॉक्स सुरू होईल. विंडोज व एफ दाबल्यावर सर्चचा बॉक्स ओपन होईल. विंडोज एम म्हटले की ज्या फाइल्स ओपन असतील त्या साऱ्या मिनिमाइज होतील. असेच काही शॉर्टकट तुम्हाला नेटवर सापडतील. हे शॉर्टकट माणसाला आळशी बनवतात हे खरे असले तरी काम अधिक वेगाने व्हायला हवे असेल तर हे शॉर्टकट वापरायलाच हवेत. समजा तुम्हाला काही काम करताना कॅलक्युलेटरची गरज भासली तर तो मशीनमध्ये कुठे आहे ते शोधत बसण्यापेक्षा विंडोज आर दाबा, तेथे सीएएलसी असे टाइप करा की झाला कॅलक्युलेटर हजर. टास्कबारवरच्या क्विकलाँचमध्ये तो आणून ठेवणे हा अधिक सोपा मार्ग झाला. तरी क्विकलाँच तुमच्या मशीनला स्लो बनवितो. त्यामुळे अत्यावश्यक दोनतीन प्रोग्राम्सच या क्विकलाँचमध्ये असावेत, असे माझे मत आहे.

पासवर्डच नापास 25 Jul 2008,

हॅकर मंडळी वा तुमचा पासवर्ड चोरणारी मंडळी शेवटी काय करतात? तुम्ही की बोर्डवर ज्या 'की'ज मारता त्या नोंदवून पासवर्ड पळवतात. म्हणजेच 'की'बोर्डवरच्या बटनांना हॅकर मंडळींमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
.......
मध्यंतरी ठाण्याहून नीलेश देसाई यांचा मेल होता. त्यांच्या घरी कम्प्युटर आहे, पण इंटरनेट कनेक्शन नाही. ऑफिसमधल्या कम्प्युटरवर ते इंटरनेटचा वापर करतात. एकदा काही तातडीच्या कामामुळे त्यांना ऑफिसला काही महत्त्वाची माहिती पाठवायची होती. घरून मेल पाठविणे शक्य नसल्याने ते जवळच्या सायबर कॅफेत गेले. मेल ओपन करून आवश्यक ती माहिती पाठवली आणि ते घरी आले. काही दिवसांनी त्यांना आपला मेल कोणीतरी पाहात आहे की काय अशी शंका वाटली. कारण ते मेल त्यांनी बघायच्या आधीच कोणीतरी ओपन केलेले त्यांच्या लक्षात आले. ऑफिसमधलेच कोणी तसे करत असावे असे वाटून त्यांनी तसा तपास केला. पण हाती काही लागले नाही. शेवटी तपासाअंती असे लक्षात आले की ज्या सायबर कॅफेत ते गेले होते त्या ठिकाणीच कोणीतरी त्यांचा मेल ओपन करून पाहात होते. त्या व्यक्तीला पासवर्ड माहीत नसतानाही मेल कसा ओपन होत होता?

कारण सरळ आहे. इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये 'रिमेंबर पासवर्ड अँड माय युजरनेम' हे ऑप्शन ऑन होते. त्यामुळे त्या कम्प्युटरने त्यांचे युजरनेम आणि पासवर्ड लक्षात ठेवला. हे ऑप्शन ऑन होते हे तेथे कोणाला तरी माहीत होते. त्यामुळे दुसऱ्याला हे मेल पाहणे सहज शक्य होते. त्यामुळे सायबर कॅफेत जाऊन अथवा दुसऱ्याच्या कोणाच्याही घरी जाऊन तुम्ही इंटरनेट वापरत असाल तर बाहेर पडताना हे ऑप्शन ऑन नाही ना, याची खात्री करून घ्यायला विसरू नका. त्यासाठी असे करा. इंटरनेट एक्स्प्लोररच्या टूल्सवर क्लिक करून नंतर 'इंटरनेट ऑप्शन्स'वर जा. तिथे जनरल टॅबवर क्लिक करा. तिथे 'टेम्पररी इंटरनेट फाइल्स' या विभागातील 'डीलिट फाइल्स' व 'डीलिट कूकीज'वर क्लिक करा. नंतर ओके म्हणा. हा झाला पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यात याच विंडोतील 'कंटेन्ट' टॅबवर जा. तिथे 'ऑटोकम्प्लीट'च्या सेटिंग्जवर जा. तेथे 'पर्सनल इन्फमेर्शन'वर क्लिक करा. तेथे जी ऑप्शन असतील ती सगळी अनक्लिक करा. नंतर क्लिअर फॉर्मस आणि क्लिअर पासवर्डस् यावर क्लिक करा. म्हणजे त्या कम्प्युटरवर सेव्ह असलेले तुमचे पासवर्ड नाहीसे होतील व दुसऱ्याला तुमचा मेल पाहता येणार नाही. हे सारे करायचे नसेल तर अगदी सोपा उपाय म्हणजे मेलचा पासवर्ड बदलणे. हा पासवर्ड दर महिन्याला बदलला तरी चालेल.

असे केल्याने तुमचा मेल अगदी सुरक्षित राहू शकतो. घरीच इंटरनेट कनेक्शन असले तर प्रश्न नाही. तरी पासवर्ड सतत बदलता असावा. म्हणजे हॅकर कंपनीचे काम कठीण होते. ही हॅकर मंडळी वा तुमचा पासवर्ड चोरणारी मंडळी शेवटी काय करतात? तुम्ही की बोर्डवर ज्या 'की'ज मारता त्या नोंदवून पासवर्ड पळवतात. म्हणजेच 'की'बोर्डवरच्या बटनांना हॅकर मंडळींमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावरही मार्ग काढण्यात येत आहे. समजा तुम्हाला एचडीएफसीसारख्या बँकेच्या अकाऊंटवर लॉगीन करायचे आहे. तर कीबोर्डवर नुसता लॉगीन कोड टाइप करायचा, पण पासवर्ड मात्र तिथे असलेल्या छापील कीबोर्डवर माऊसने क्लिक करून ऑपरेट करायचा. हा पासवर्ड 'टाइप' केलेला नसल्याने तो हॅकर मंडळींना मिळत नाही आणि नुसते लॉगीन नेम मिळवून हॅकर्सचा काही फायदा होत नाही.

तुमचे जितके मेल जास्त तितके पासवर्ड जास्त. प्रत्येक पासवर्ड वेगवेगळा ठेवल्यास तो लक्षात ठेवणे कठीण जाते. म्हणून हा पासवर्ड वेगवेगळा नसावा. एखादा महत्त्वाचा मेल आयडी असला तर त्याच्या पासवर्डमध्ये इतर पासवर्डपेक्षा एखादेच अक्षर वा आकडा बदलून तो वापरावा. पासवर्ड विसरल्यास मेलमधून तो परत मिळू शकतो. पण त्यासाठी पासवर्ड मुळात देतानाचा प्रश्न, त्याचे उत्तर हे सारे तुमच्या लक्षात हवे. ते नसले तर पासवर्ड पुन्हा मिळविणे कठीण जाते. म्हणून पासवर्ड देताना नेहमी एकच प्रश्न द्यावा. प्रश्न माहीत नाही म्हणून इमेल आयडी नवे तयार करणारी माणसे भरपूर आहेत. मग कुठला मेल कशाला तयार केला हेच लक्षात राहात नाही आणि सगळाच गोंधळ होतो. काही इमेल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी पासवर्ड दर ९० दिवसांनी बदलावाच लागेल अशी व्यवस्था केली आहे. ती चांगली आहे.

कम्प्युटर सुरू करतानाही पासवर्ड शक्यतो देऊ नये. दिलाच तर कुठेतरी लिहून ठेवा. कारण हा पासवर्ड मिळवायचा म्हणजे कटकटच असते. अॅडमिनिस्ट्रेटरचे लॉगीन करून तोही बदलता येतो. किवा कम्प्युटर पासवर्ड न विचारताच थेट सुरू व्हावा असे वाटत असेल तर 'कंट्रोल पॅनल - युजर अकाऊंट्स' या मार्गाने जाऊन तशीही सोय करता येते.

मोबाइल रिमाइंडर 8 Aug 2008,

कार्यक्रमांची आठवण करून देण्यासाठी किंवा आपण ठरवत असलेल्या समारंभाची निमंत्रणे पाठविण्यासाठी सर्वांनाच सेक्रेटरी असते असे नाही. पण म्हणून नाउमेद होऊ नका. आता गूगलच ती भूमिका बजावणार आहे...
.........
तुम्हाला आठवड्याभरानंतरची कोणाची तरी अपॉईंटमेंट आहे असे समजा. ज्याला भेटायचे असते त्याला अगदी तोंड भरून आश्वासन देता की आपली भेट पक्की! तुम्ही तुमच्या डायरीतही लिहून ठेवता. पण 'त्या' दिवशी तुम्ही सकाळीच कामानिमित्त बाहेर गेलात आणि डायरी बघायची राहिली तर तुमची अपॉईंटमेंट मिस होऊ शकते. मग त्या मित्राचे वा मैत्रिणीचे खडे बोल ऐकायचे नशिबी येते. अशा वेळी तुम्हाला कोणी आठवण करून दिली तर? यासाठी सेक्रेटरी असते. पण ते 'भाग्य' सर्वांनाच मिळते असे नाही. मग काय करणार? यावेळी तुमच्या मदतीला धावते गूगल कॅलेंडर. अर्थात ज्यांना इंटरनेटची सोय उपलब्ध आहे त्यांनाच या सुविधेचा वापर करता येतो.

नेटवर कॅलेंडरमध्ये त्या-त्या तारखेला आणि वेळेला अपॉईंटमेंटची नोंद केली तरी पुरेसे नसते. कारण सतत कॅलेंडर ओपन करून आपल्या काय अपॉईंटमेंट्स आहेत हे कोण बघत राहणार? म्हणूनच गूगलने एसएमएसद्वारे मोबाइलवर रिमाईंडर पाठवायची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी नेट ओपन करून गूगल डॉट कॉम टाइप करा. डाव्या बाजूला उपलब्ध सेवा दिसतील. त्यातील 'मोअर'वर क्लिक करून मग कॅलेंडरवर क्लिक करा. ते ओपन होईल. त्यातील ज्या तारखेला तुम्हाला काही नोंद करायची आहे, त्या तारखेवर क्लिक करा. आणि अपॉईंटमेंटची नोंद करा. पण एवढेच करून मोबाइलवर अॅलर्ट कसा मिळेल? त्यासाठी तुमच्या मोबाइलची माहिती तेथे द्यावी लागेल. म्हणून गूगल कॅलेंडरमध्येच उजवीकडे वरच्या बाजूला 'सेटिंग्ज' असे दिसेल. त्यावर जा. तेथे तीन भाग दिसतील. तुम्हाला हे कॅलेंडर कशा प्रकारे दिसायला हवे (दिवसाचे, आठवड्याचे, की महिन्याचे वगैरे), त्यात हवामानासारख्या अतिरिक्त सोयी हव्यात का हे सारे पहिल्या टॅबमध्ये ठरविता येईल.

दुसऱ्या टॅबमध्ये आणखी काही कॅलेंडर वा इव्हेंट अॅड करता येतात. आता उरतो तिसरा टॅब. तोच आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो टॅब आहे 'मोबाइल सेटअप'चा. त्यावर क्लिक करा. देशाच्या जागी स्क्रोल करून भारताचे नाव आणा. खालच्या टॅबमध्ये तुमचा मोबाइल नंबर टाइप करा. तो दिल्यावर 'सेंड व्हेरिफिकेशन कोड'वर क्लिक करा. काही सेकंदातच तुमच्या मोबाइलवर हा कोड नंबर येईल. तो 'व्हेरिफिकेशन कोड'मध्ये टाइप करा आणि 'फिनीश सेटअप' म्हणा व नंतर 'सेव्ह' म्हणा. आता तुमच्या मोबाइलची नोंदणी झाली. आता ऑप्शन्समध्ये जाऊन रिमाईंडर इमेलने हवा की एसएमएसने हवा ते ठरवा. दुसरा पर्याय निवडा. संबंधित रिमाईंडर नियोजित वेळेआधी कधी यायला हवा ते ठरवा. म्हणजे तुमचे ऑफिस अंधेरीला असेल आणि अपॉईंटमेंट चर्चगेटला असेल तर किमान तासभर आधी तुम्हाला रिमाईंडर यायला हवा, अशा बेताने सेटअप करा. मात्र हा सेटअप सर्व रिमाईंडरना लागू होत असल्याने सर्वच रिमाईंडर तासभर आधी मिळतील. (काय हरकत आहे?)

गूगल ही सेवा फुकटात पुरवते. काही मोबाइल कंपन्या त्यासाठी नेहमीचा एसएमएसचा चार्ज आकारतात. पण एखादी महत्त्वाची मीटिंग चुकवायची नसेल तर तो चार्ज द्यायला काहीच हरकत नसावी.

तुमच्या मायक्रोसॉफ्ट आऊटलूकमध्येही असे रिमाईंडर सेट करता येतात. पण तो सेटअप गूगलच्या तुलनेने क्लिष्ट आहे आणि त्याचे रिमाईंडर मोबाइलवर नव्हे तर ऑनलाईनच मिळत असल्याने गूगल रिमाईंडरइतका त्याचा फायदा होत नाही. तुम्ही नेटवर 'कॅलेंडर रिमाईंडर' असा सर्च दिलात की काही 'फ्री रिमाईंडर' तुम्हाला दिसतील. त्यात व्हायरस नाही ना हे चेक करून त्यातला एखादा तुम्ही डाऊनलोड करू शकता. मात्र हे सारे रिमाईंडर तुम्हाला ऑनलाइनच आठवण करतील. (हेही नसे थोडके).

गूगल कॅलेंडरचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एखाद्या इव्हेंटला जायचे असेल व त्याचे निमंत्रण आपल्या मित्रमंडळींनाही मिळावे असे वाटत असेल तर प्रत्येकाला वेगळे पाठवण्याची गरज नाही अथवा त्यासाठी तुमचा इमेल उघडण्याचीही गरज नाही. वर सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही अपॉईंटमेंटची नोंद कराल तेव्हाच बाजूला 'गेस्ट' असा कॉलम तुम्हाला दिसेल. संबंधित अपॉईंटमेंट वा कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थित राहण्याची गरज असेल त्यांचे इमेल पत्ते इथे टाइप करा. (तुम्ही जीमेल वापरत असाल आणि या लोकांचे पत्ते जीमेलमध्ये असतील तर ते आपोआप तुम्हाला मिळतील). ओके म्हटल्यावर या गेस्टनाही निमंत्रण पाठवायचे आहे का असे विचारले जाईल. तेव्हा 'येस' म्हणून ओके करा. म्हणजे साऱ्या पाहुण्यांना ताबडतोब निमंत्रणे मिळतील. पण एवढ्यावर गूगल थांबत नाही. संबंधित माणसाला तो मेसेज त्याच्या कॅलेंडरवर आणि जीमेलवर अशा दोन्ही ठिकाणी मिळतो. तेव्हा या कार्यक्रमाला येणे शक्य आहे की नाही असे त्याला विचारले जाते. काही कारणामुळे त्याने नकार दिला की तो नकार आमंत्रण पाठविणाऱ्याला कळतो. म्हणजे नेमके कोण येणार आहेत त्याचा अंदाज येतो.

तेव्हा ओपन करा गूगल कॅलेंडर आणि सेव्ह करा अपाईंटमेंट्स. अर्थात पुढे जाऊन (एकदाच) मोबाइल सेटअप करायला विसरू नका. नाहीतर एकही रिमाईंडर मोबाइलवर येणार नाही.

मॅनेजर,पण वेगळे! 22 Aug 2008,

इंटरनेटवर 'डाऊनलोड मॅनेजर' असा सर्च दिलात की असंख्य मॅनेजर्स मिळतील. त्यातील काही चांगल्या मॅनेजर्सची ही तोंडओळख. आपल्या सर्वांच्याच उपयोगी पडणारी...
....
आपल्याला एखादी फाइल डाऊनलोड करायची असते पण ती डाऊनलोड व्हायला इतका वेळ लागतो की वैताग येतो. प्रत्येकाकडे ब्रॉडबँड असेलच असे नाही, त्यामुळे जे काही इंटरनेट कनेक्शन असेल त्याच्याशी झटापट करावी लागते. हे डाऊनलोडिंग चालू असताना दुसरे काही काम करता येत नाही. मध्येच वीज गेली वा कम्प्युटर हँग झाला तर पुन्हा सारे डाऊनलोडिंग पहिल्यापासून करावे लागते. अशा वेळेस आपल्या मदतीला येतात वेगळ्या प्रकारचे मॅनेजर्स. त्यांना डाऊनलोड मॅनेजर म्हणतात. फार हौस असेल तर असे 'डाऊनलोड मॅनेजर्स' तुम्ही विकतही घेऊ शकता. पण फुकटातले मॅनेजर्स असतील आणि तेच काम अधिक कार्यक्षमतेने करत असतील तर? विकत घेतलेल्या मॅनेजरमध्ये थोड्या अधिक सुविधा असतात हे खरे, पण फुकट्यांत पुरेशा सोयी असतात हेही खरे.

इंटरनेटवर 'डाऊनलोड मॅनेजर' असा सर्च दिलात की असंख्य मॅनेजर्स मिळतील. त्यातील काही चांगल्या मॅनेजर्सची ही तोंडओळख. 'डाऊनलोड अॅक्सलरेटर प्लस'ची ८.६ क्रमांकाची व्हर्जन सध्या उपलब्ध आहे. कोणतेही डाऊनलोड अत्यंत वेगाने करणारा मॅनेजर म्हणून त्याला ओळखले जाते. कोणत्याही कारणाने डाऊनलोडिंग खंडित झाले तर पुन्हा आपोआप सुरू करण्याची क्षमता यात आहे. म्हणजे आधी एखाद्या फाइलचा जेवढा भाग डाऊनलोड झाला असेल त्याच्यापुढचा भाग डाऊनलोड होत राहातो. हा मॅनेजर वेगवान असला तरी अन्य साइटवर जाऊन त्याहीपेक्षा अधिक वेगाने डाऊनलोड करायचे असेल तर पर्यायी साइट सुचविण्याचेही काम केले जाते. हा फुकटात मिळत असला तरी तो अपग्रेड करण्यासाठी पैसे मोजावे लागतात. ते मोजायचे नसतील तर 'डाऊनलोड अॅक्सलरेटर मॅनेजर ३.२' डाऊनलोड करा. त्यातही 'प्लस'ची बरीच वैशिष्ट्ये आहेत.

' फ्लॅशगेट' या डाऊनलोड मॅनेजरची लोकप्रियता या अॅक्सलरेटरएवढीच आहे. त्याची व्हर्जन १.९.६ सध्या चालू आहे. तेथे वेगाने फाइल डाऊनलोड होतेच, पण डाऊनलोड झालेल्या फाइलमध्ये व्हायरस नाही ना हे पाहण्याचे काम हा मॅनेजर लगेचच करतो. म्हणजे व्हायरसयुक्त फाइल मशीनमध्ये जाऊच शकत नाही. 'फ्लॅशगेट' डाऊनलोड केल्यावर डेस्कटॉपवर उजव्या बाजूला त्याचा एक आयकॉन येतो. 'ऑबिर्ट डाऊनलोडर' हाही एक अत्यंत उपयुक्त मॅनेजर आहे. म्युझिक, व्हीडिओ, मीडिया फाइल्स वेगाने डाऊनलोड करण्याचे काम तो करतो. शिवाय इंटरनेट एक्सप्लोअरर, फायरफॉक्स, मॅक्सथॉन, ऑपेरा या सर्व ब्राऊझरमध्ये तो चांगल्या पद्धतीने काम करतो. कोणत्याही कारणाने खंडित झालेले डाऊनलोडिंग पुन्हा पुढे सुरू करण्यात त्याचा हातखंडा आहे.

याशिवाय, 'फ्री डाऊनलोड मॅनेजर (व्हर्जन २.५.७५८), 'इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर' (५.१४.३), फ्रेश डाऊनलोड (८.०२) असे काही चांगले डाऊनलोड मॅनेजर आहेत. यापैकी 'इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर' हा फ्लॅश व्हीडिओ, यूट्यूबवरचे व्हीडिओ, गूगल व्हीडिओ वगैरे डाऊनलोड करायला उपयोगी पडतो. प्रत्येकाने आपापल्या मशीनच्या क्षमतेनुसार आणि इंटरनेटच्या प्रकारानुसार मॅनेजर डाऊनलोड करावा. मॅनेजर कोणताही असला तरी फाइल त्यात थेट सामावल्या जातात. त्यावर डबल क्लिक करून ती फाइल ओपन करता येते वा इएक्सइ फाइल म्हणजे एखादे अॅप्लिकेशन असले तर तो प्रोग्राम थेट डाऊनलोड होणे सुरू होते. प्रोग्राम डाऊनलोड झाल्यावरही ती अॅप्लिकेशन फाइल तेथेच राहात असल्याने पुन्हा कधी काही कारणाने तो प्रोग्राम चालवायचा झाला तर बरे पडते.

मास डाऊनलोडर (व्हर्जन ३.४.७) हा उत्तम डाऊनलोडर-पैकी एक ओळखला जातो. एखादी झिप फाइल डाऊनलोड करायची असेल तर तिच्यातल्या फाइल्स पाहण्याची संधी डाऊनलोड करण्याआधी आपल्याला मिळते हे याचे वैशिष्ट्य. एका वेळेस शंभर वेगवेगळ्या फाइल्स डाऊनलोड करता येतात. म्हणून त्याला 'मास' डाऊनलोडर म्हणतात. 'गेटराइट ६.३डी' हा आणखी एक डाऊनलोडर आहे. पण तो ३० दिवस फुकटात वापरता येतो. नंतर त्याचे लायसन्स विकत घ्यावे लागते. फाइल डाऊनलोड करताना अडथळा आला अथवा इंटरनेट कनेक्शन तुटले तरी नंतर ती फाइल व्यवस्थित डाऊनलोड करता येते. हा डाऊनलोडर दिसायला साधा आहे आणि त्याची फीचर्स आपल्याला हव्या त्या पद्धतीने सेट करता येतात. तरीही केवळ ३० दिवसांसाठी तो स्वीकारावा का हा प्रश्ान् उरतोच.

ब्राऊझरमधला 'क्रोम' 5 Sep 2008

गूगलने आणलेल्या 'क्रोम' या ब्राऊझरमध्येे काही सोयी अशा आहेत की ज्या अन्य ब्राऊझरमध्ये नाहीत वा अंशत: आहेत. काय आहेत या सोयी आणि त्यांचे नेमके काय आणि कसे फायदे होतात?
........
इंटरनेट ब्राऊझर्सच्या युद्धात आता गूगलच्या 'क्रोम' या अतिशय हलक्याफुलक्या ब्राऊझरची भर पडली आहे. मंगळवारी गूगलने हा ब्राऊझर वापरासाठी उपलब्ध केला, त्याबरोबर त्यावर नेटकरांच्या उड्या पडल्या. याचे कारण गूगल जे काही देईल ते चांगलेच असेल अशी भावना इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये आहे. हा 'क्रोम' घाईगदीर्ने डाऊनलोड केला गेलाही. पण त्याच्या वापरानंतर संमिश्र भावना मनामध्ये आल्या. चांगली बाजू अशी की एकतर ब्राऊझर अतिशय हलका आहे. पटकन ओपन होतो, दिसण्यातही साधेपणा आहे. रिकामी चौकट ओपन झाली आहे का असे वाटते. अन्य ब्राऊझर्सच्या तुलनेत तो खूपच सुटसुटीत दिसतो. इतरत्र दिसणारी 'फाइल', 'ओपन', 'हिस्ट्री', 'हेल्प' अशी अगदी वरती दिसणारी बटन्स इथे नाहीत. इथे थेट बुकमार्क बार दिसतो. त्याच्या वरती अॅड्रेस बार आहे. तिथे अॅड्रेस टाइप केला की पान क्षणार्धात उघडते. उजव्या बाजूलाही बटनांची गदीर् नाही. त्यामुळे हा ब्राऊझर 'नटलेला, सजलेला' वाटत नाही. काहीच सोयी नाहीत, मग तो वापरायचा कसा असा प्रश्ान् मनात येतो. बुकमार्क बारवर तुमचे बुकमार्क आणून ठेवायला सुरुवात केलीत की तो किती फास्ट आहे ते कळते.

या 'क्रोम'मध्ये काही सोयी अशा आहेत की ज्या अन्य ब्राऊझरमध्ये नाहीत वा अंशत: आहेत. ब्राऊझर स्लो झाला आहे असे वाटले तर किती अॅप्लिकेशन्स त्यात ओपन आहेत हे पाहण्यासाठी शिफ्ट व एस्केप की दाबा. लगेच टास्क मॅनेजर ओपन होईल. त्यात कोणकोणती अॅप्लिकेशन्स चालू आहेत ते त्यांच्या साइझसह कळेल. एखादे अनावश्यक अॅप्लिकेशन असेल तर ते 'एंड प्रोसेस'वर क्लिक करून थांबवू शकता. तसेच मेमरीबाबतही करता येईल. अबाऊट : मेमरी असे अॅड्रेसबारमध्ये टाइप करा की कोणते अॅप्लिकेशन किती मेमरी खात आहे ते कळेल. नको ते अॅप्लिकेशन बंद करता येईल. क्रोमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जसजसे नवीन टॅब उघडले जातील तसतशी आधीच्या टॅबची मेमरी डिलिट होते. वेगळ्या भाषेत सांगायचे तर जो टॅब वापरात असेल त्यावरच ब्राऊझरची सारी शक्ती एकवटली जाते व काम वेगाने होते. तुम्ही एखादा टॅब चुकून बंद केलात तरी घाबरायचे कारण नाही. कंट्रोल टी करा की आधी बंद केलेल्या सर्व टॅबची चित्रे दिसतील. जो हवा तो ठेवून बाकी बंद करू शकता.

ब्राऊझरवर हिस्ट्रीचे बटन नाही असे मी वरती म्हटले आहे. मग आधी पाहिलेली पाने कशी उघडायची? त्यासाठी कंट्रोल एच करा. हिस्टरी ब्लॉक उघडतो. तुम्ही पाहिलेल्या साइटची जंत्री येते. एवढेच नव्हे तर प्रत्येक साइटचे चित्रही दिसते. म्हणजे नेमके काय पाहिले ते कळते. हिस्ट्रीबरोबरच सर्च अशीही वेगळी सोय उपलब्ध नाही. मग काय करायचे? ती महत्त्वाची सोय म्हणजे अॅड्रेस बारमध्ये त्यांनी करून दिली आहे. या बारमधून तुम्ही सर्च करू शकता. उदा. सर्च डॉट महाराष्ट्र डॉट कॉम असे म्हटले की महाराष्ट्राविषयी सारे काही तुमच्या समोर उलगडेल. वेगळ्या सर्चबारची गरज नाही. तेवढी जागा त्यांनी वाचवली आहे.

तरीही मंगळवारी 'क्रोम' आला आणि वादातही सापडला. कारण गूगलने आधुनिकतेची कास धरत हा ब्राऊझर आणला असला तरी तो तयार करण्यासाठी 'वेबकिट' नावाची जुनी ओपन सोर्स ब्राऊझर टेक्नॉलॉजी वापरली आहे. हा ब्राऊझर विंडोज सिस्टिम ज्यांच्याकडे आहे त्यांनाच डाऊनलोड करता येईल. मॅक अथवा अॅपलसाठी तो नंतर बाजारात येईल. पण विंडोजची आधुनिकता लक्षात न घेता हा 'क्रोम' आणण्यात आला आहे का याचे उत्तर तज्ज्ञच देऊ शकतील. कारण तो डाऊनलोड केल्यावर काही वेळाने क्रॅश होण्याची शक्यता आहे. अॅपलचा 'सफारी' ब्राऊझरही याच तंत्रावर आधारित आहे. त्यामुळे तो मी डाऊनलोड केल्यावर काही वेळातच क्रॅश झाला होता. तेव्हा माझा कम्प्युटर 'सफारी'साठी योग्य नाही, असे वाटले होते. 'क्रोम'ही काहीवेळा असाच क्रॅश झाला, काही वेळा चांगला चालला. त्यात 'महाराष्ट्र टाइम्स'ची वेबसाइटही अतिशय उत्तम दिसते. इंटरनेट एक्स्प्लोरर वगळता अन्य ब्राऊझरमध्ये ती इतकी चांगली दिसत नाही. पण 'क्रोम' का क्रॅश झाला यावर वेगवेगळी उत्तरे मिळत आहेत. तो हॅक करायला सोपा आहे किंवा त्यात अशा काही त्रुटी आहेत की त्याद्वारे हॅकर्सना तुमच्या कम्प्युटरमध्ये घुसायची संधी मिळते अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात तथ्य किती हे आताच सांगता येणार नाही.

कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना त्या सॉफ्टवेअर निमिर्ती करणाऱ्या कंपनीच्या काही अटी असतात. त्याला 'लायसन्स अॅग्रीमेंट' म्हणतात. हे आपण सहसा वाचायच्या भानगडीत पडत नाही. पटापट एखादे सॉफ्टवेअर डाऊनलोड करतो. पण 'क्रोम'चे लायसन्स अॅग्रीमेंट काही लोकांनी वाचले आणि त्याबद्दलचे आक्षेपही लगेचच नोंदविले. नव्या ब्राऊझरमध्ये नेटचा वापर करणाऱ्या माणसांनी जे जे काही पाहिले असेल वा लोड केले असेल वा स्वत:ची माहिती दिली असेल त्यावर गूगलचा शंभर टक्के हक्क राहील, असे या अॅग्रीमेंटमध्ये म्हटले होते. याचाच अर्थ तुम्ही तुमच्या ब्लॉगवर, अथवा ऑर्कुट, मायस्पेससारख्या सोशल साइटवर जे जे 'लिहाल' त्यावर 'क्रोम'चा अधिकार असेल आणि तुम्हाला एक पैसाही न देता गूगल ते वापरू शकेल. लोकांच्या आक्षेपानंतर हा भाग बदलण्यात आला. यापासून आपल्याला एक धडा घ्यायला हवा. कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना 'लायसन्स अॅग्रीमेंट' वाचणे आवश्यक असते. तो भाग किचकट असला तरी काळजीपूर्वक वाचायला हवा.

' क्रोम'मुळे ब्राऊझर वॉर चांगलेच तापणार आहे. इंटरनेट एक्स्प्लोरर ७ (आयई ७) येऊन दोनच वषेर् झाली आहेत. लगेचच मायक्रोसॉफ्ट आयई ८ आणत आहे. त्याची बेटा व्हर्जन दोन उपलब्ध आहे. ज्या फायरफॉक्सने आयईच्या अनभिषिक्त सत्तेला खिंडार पाडायचा प्रयत्न केला (त्यात ते काही प्रमाणात यशस्वीही झाले) त्याची म्हणजेच 'फायरफॉक्स ३'ची बेटा व्हर्जन पाच आली आहे. ऑपेरा ब्राऊझरनेही ९.५ ही लेटेस्ट व्हर्जन आणली आहे. अतिशय फास्ट अशा 'अवंत' ब्राऊझरचीही सध्या ११.६.२० ही व्हर्जन बाजारात आणली आहे. सारेचजण सज्ज झाले आहेत. अशा वेळेस 'क्रोम' किती यश मिळवितो आणि 'क्रोम'मुळे अन्य ब्राऊझरमध्ये किती बदल घडून येतात ते लवकरच कळेल. तेव्हा, 'हॅपी क्रोम'...

फायरवॉल! 19 Sep 2008,

तुमचा कम्प्युटर आणि बाहेरचे जग यांच्यात एक भिंत असतेच. तिला म्हणतात 'फायरवॉल'. ही भिंत सर्वात महत्त्वाची असते. कुठे असते ही फायरवॉल?
.........
तुमचा कम्प्युटर अगदी शहाण्या मुलासारखा नीट चालला आहे, तरी त्यात काहीतरी गडबड आहे असे म्हटले तर हा विरोधाभास वाटेल. परंतु, वरवर हे मशीन चांगले चालत असल्याचे वाटले तरी प्रत्यक्षात अत्यंत असुरक्षित असू शकते. गेल्या काही महिन्यांत भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांआधी जो ई-मेल पाठविण्यात आला तो वायफाय तंत्रज्ञान वापरताना झालेल्या मानवी उणिवा शोधून पाठविण्यात आला होता. ही उणीव म्हणजे आपला लॅपटॉप पूर्णपणे सुरक्षित आहे व तो बाहेरून कोणी अॅक्सेस करू शकत नाही याची खात्री संबंधितांनी केली नव्हती. ही खरी गंमतच आहे. आपल्याला इंटरनेटद्वारे सारे जग आपल्याजवळ आणायचे आहे. ब्रॉडबँड घरी असले तर मग अधिक वेगाने हे जग जवळ येऊ शकते. त्याच वेळेला, आपल्या कम्प्युटरमध्ये काय दडलेय ते बाहेरच्यांना कळता कामा नये, अशा प्रकारचा अट्टाहास आपण धरायचा. हा प्रकार एकतफीर् वाटला तरी सध्याच्या परिस्थितीत तो फारच महत्त्वाचा आहे.

तुमच्या कम्प्युटरमध्ये अशी सोय हवी की बाहेरचे जग आपल्या मजीर्प्रमाणे पाहता येईल, पण आपल्या कम्प्युटरमध्ये काय आहे ते अन्य जगाला पाहता येणार नाही. म्हणजेच तुमचा कम्प्युटर आणि बाहेरचे जग यांच्यात एक भिंत उभी करावी लागेल. प्रत्येक कम्प्युटरमध्ये अशी भिंत असतेच. तिला म्हणतात 'फायरवॉल'. ही भिंत सर्वात महत्त्वाची असते.

कोणत्याही कम्प्युटरमधली फायरवॉल 'ऑन' असली पाहिजे. याचा अर्थ बाहेरून येणारी प्रत्येक फाइल तपासून ती सुरक्षित असेल तरच तिला कम्प्युटरमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. हेच काम तुमचा अँटिव्हायरस व अँटिस्पायवेअर करतो; मग फायरवॉलची गरज काय, असा प्रश्न येईल. पण प्रत्येक वेळेस व्हायरस वा स्पायवेअरच मशीनमध्ये शिरेल असे नाही. तुमचे मशीन कोणी 'हॅक' केले म्हणजेच मशीनचा बाहेरून अॅक्सेस घेऊन मशीनवर ताबा मिळविला तर तुमची सगळी गोपनीय माहिती बाहेरच्या माणसाला मिळू शकते. तुम्ही बँक अकाऊंटवर लॉगिन करून काही व्यवहार केलेत तर ते हॅकरला कळू शकतील. म्हणून फायरवॉल नेहमी ऑन असायला हवी. कुठे असते ही फायरवॉल?

त्यासाठी 'स्टार्ट' बटनवर क्लिक करा, नंतर 'कंट्रोल पॅनेल'वर जा. तिथे 'विंडोज फायरवॉल' दिसेल. त्यावर क्लिक करा. आता तीन ऑप्शनचे टॅब दिसतील. जनरल, एक्सेप्शन्स आणि अॅडव्हान्स्ड. पहिल्याच टॅबमध्ये फायरवॉल ऑन ठेवण्याच्या सूचना असतील. (ऑन - रिकमेंडेड). त्यावर क्लिक करा. खाली 'डोंट अलाऊ एक्सेप्शन्स' याच्यावरही क्लिक करा. तिसरे ऑप्शन असेल ते 'ऑफ - नॉट रिकमेंडेड' असे असेल. ती आज्ञा निमूटपणे पाळा व त्यावर क्लिक करू नका. तीन टॅबपैकी बाकी दोन टॅबना शक्यतो हात लावू नका; कारण ती सेटिंग्ज जाणकाराकडूनच ओके करून घ्यायला हवीत. पण या एक्सेप्शन्सचा अर्थ असा की फायरवॉलला न जुमानता कोणत्या सुविधा इंटरनेटवर मिळत राहाव्यात त्याची यादी इथे दिलेली असते. त्यातील काय हवेनको पाहून त्यावर क्लिकअनक्लिक करू शकता.

अर्थात ही फायरवॉल ऑन केली की कम्प्युटरला काहीही धोका नाही असे समजण्याचे कारण नाही. कारण काही व्हायरस वा स्पायवेअर वेगवेगळ्या वेषात तुमच्या कम्प्युटरमध्ये शिरायचा प्रयत्न करतच असतात. म्हणजे अँटिव्हायरस सॉफ्टवेअर मजबूत हवेच. मशीनचे स्कॅनिंग आठवड्यातून एकदा तरी पूर्ण झाले पाहिजे. म्हणजेच केवळ फायरवॉल ऑन असून चालत नाही. अन्य सॉफ्टवेअरचीही मदत घ्यावी लागते. म्हणूनच इंटरनेटवरून फायरवॉल डाऊनलोड करून घेता येतात. काही लोकप्रिय फायरवॉलची यादी इथे देत आहे. त्यातील कोणतीही डाऊनलोड करू शकता. झोनअलार्म ( zonealarm याची बेसिक व्हर्जन फुकटात मिळेल, पण अधिक सुरक्षा हवी असेल तर अंदाजे १६०० ते २५०० रुपये दर वर्षाला मोजावे लागतील.) Comodo, Agnitum, PCtools, Ashampoo यापैकी कोणतीही फायरवॉल मशीनमध्ये आल्यावर मूळ फायरवॉलचे सेटिंग काय राहील हे पाहावे लागेल. ती ऑनच राहायला हवी. प्रत्येकाची सेटिंग्ज वेगवेगळी असतात. ती एकदा जाणून घेतलीत की मग तुम्ही निर्धास्त राहायला मोकळे! कारण शेवटी डबल प्रोटेक्शन केव्हाही चांगलेच. काही वेळेला एखादा प्रोग्राम डाऊनलोड केलेला असतो. पण तो चालत नाही. अशावेळी वेड लागायची पाळी येते. प्रोग्राममध्ये कोणताही व्हायरस नाही, तो अधिकृत ठिकाणाहून तो डाऊनलोड केलेला आहे, कम्प्युटरच्या सेटिंगमध्ये गडबड नाही तरी प्रोग्राम चालत नाही. अशा वेळी तुमच्या अँटिव्हायरसने अथवा फायरवॉलने तो प्रोग्राम ब्लॉक केलेला असू शकतो. हा अनुभव मी घेतला आहे. मी जरी फायरफॉक्स ब्राऊझर वापरत असलो तरी इंटरनेट एक्स्प्लोरर मायक्रोसॉफ्ट अपडेटसाठी वापरावे लागते. हा आयई सुरूच होईना. एकदा अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल केला, तरीही काही उपयोग नाही. मग अँटिव्हायरसचे सेटिंग तपासले तेव्हा हा प्रोग्राम ब्लॉक केलेला आढळला. तो अनब्लॉक केला आणि आयई पुन्हा सुरू झाला. अशीच अवस्था तुमची झाली, तर अँटिव्हायरस आणि फायरवॉल दोन्ही तपासून पाहायला विसरू नका.

या फायरवॉल कशा अस्तित्वात आल्या, त्याच्याआधी काय सुविधा होत्या, त्याचे रूपांतर आजच्या सुरक्षाकवचात कसे झाले याची झलक वाचायची असेल तर पुढील लिंकवर जा : http://en.wikipedia.org/wiki/Firewall

पॉवरटॉइज! 17 Oct 2008

केवळ ब्राऊझर असून चालत नाही. प्रत्येकासाठी काही अॅडऑन्स म्हणजेच अतिरिक्त सोयी आवश्यक असतात. त्याही डाऊनलोड कराव्या लागतात. नाहीतर त्या ब्राऊझरच्या निर्मात्याने केलेला मूळ ब्राऊझरच तुमच्या वाट्याला येईल... इंटरनेटचा वापर करणाऱ्यांनी हे ध्यानात ठेवायलाच हवं...
.....
इंटरनेटचा वापर करताना अनेक ब्राऊझर्स उपलब्ध आहेत. उदा. इंटरनेट एक्स्प्लोरर (आयई), फायरफॉक्स, गूगल क्रोम, फ्लॉक, सफारी, अवंती वगैरे. प्रत्येकाची स्वत:ची अशी खास वेशिष्ट्येे आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने फायरफॉक्स सर्वात चांगला आहे असे आतापर्यंतच्या पाहण्यांतून सिद्ध झालेले आहे. परंतु, केवळ ब्राऊझर असून चालत नाही. प्रत्येकासाठी काही अॅडऑन्स म्हणजेच अतिरिक्त सोयी आवश्यक असतात. त्याही डाऊनलोड कराव्या लागतात. नाहीतर त्या ब्राऊझरच्या निर्मात्याने केलेला मूळ ब्राऊझरच तुमच्या वाट्याला येईल. आयईसाठी आयई७प्रो डाऊनलोड केलेत की तुम्हाला तुमच्या मनासारखा ब्राऊझर मिळू शकेल. म्हणजे मूळ ब्राऊझरमध्ये तुम्हाला हव्या तशा सुधारणा करता येऊ शकतील. सध्या याची २.४ व्हर्जन उपलब्ध आहे. साइझ फक्त २.४ एमबी आहे. त्यामुळे डाऊनलोड करायला अगदी सोपा आहे. या अॅडऑनमुळे काय होते? मुख्यत: आयई ब्राऊझर हवा तसा कस्टमाइझ करता येतो. मात्र फक्त आयईसाठीच तो वापरता येईल. अन्य ब्राऊझरसाठी वेगवेगळ्या सुविधा डाऊनलोड कराव्या लागतील.

आयई७प्रो डाऊनलोड झाल्यावर ती फाइल 'रन' करा. त्याचे लायसन्स अॅग्रीमेंट मंजूर केलेत की हा प्रोग्राम आयईच्या तळाला उजव्या बाजूला आयकॉनच्या स्वरूपात दिसेल. त्यावर डबलक्लिक करा. एक विंडो ओपन होईल. त्यात अगदी डावीकडे बऱ्याच प्रकारचे ऑप्शन्स दिलेले दिसतील. त्यातील एकेकावर क्लिक केले की त्यातील उपऑप्शन्स उजव्या बाजूच्या खिडकीत ओपन होतील. त्यातील जी तुम्हाला आवश्यक वाटतील ती क्लिक वा अनक्लिक करा. उदा. 'शॉर्टकट कीज'वर क्लिक केल्यावर उजवीकडे बरेच शॉर्टकट दिसतील. किंवा 'अॅड ब्लॉकर'वर क्लिक केल्यावर बाजूच्या ऑप्शनमध्ये फ्लॅश ब्लॉक करायचाय का अथवा जाहिराती ब्लॉक करायच्या आहेत का हे विचारले जाते. 'ऑनलाइन सव्हिर्सेस'मध्ये गेल्यावर तुमचे बुकमार्कस् आपोआप सिंक्रोनाइझ करायचे आहेत का असे विचारले जाते. 'सर्च'वर गेल्यास डिफॉल्ट सर्च इंजिन कोणते हवे त्याप्रमाणे सेट करता येते. 'प्रायव्हसी'मध्ये तुमचा डाटा वा पासवर्ड सेव्ह करू नये असे आदेश तुम्ही देऊ शकता. अशा असंख्य सोयी तुम्हाला या आयई७प्रोमध्ये मिळतील.

तसे पाहता मायक्रोसॉफ्टने विंडोज कस्टमाइझ करण्यासाठी काही शक्तिशाली टूल्स उपलब्ध करून दिली आहेत. त्याला नावही 'पॉवरटॉईज' असे आहे. इंटरनेटवर विंडोज पॉवरटॉईज असा सर्च दिलात की या टूल्सची यादी तुमच्या समोर येतील. हे पॉवरटॉइज मायक्रोसॉफ्टने तयार केलेले नाहीत. त्यामुळे एक प्रकारचा अनधिकृतपणा त्याला आहे. पण घाबरायचे काहीच कारण नाही. यातला 'ट्विकयूआय' हे टूल वरील 'आयई७प्रो'सारखेच आहे. विंडोज सिस्टिम कशी चालावी याची सेटिंग्ज तुम्ही इथे करू शकता. या 'ट्विकयूआय'ची साइझ फक्त १४७ केबी असल्याने एका मिनिटात डाऊनलोड होऊ शकते.

' कलर कंट्रोल पॅनल अॅपलेट' हे टूलही उपयुक्त आहे. प्रत्यक्ष फोटोचा रंग, कम्प्युटरवर दिसणारे फोटोचे रंग आणि तो छापून आल्यावर दिसणारा रंग काहीवेळा वेगवेगळा असू शकतो. तो एकसारखाच असेल याची खबरदारी हे टूल घेईल. (प्रत्येक पॉवरटॉय डाऊनलोड केल्यावर त्याच्या सेटिंग्जमध्ये जाऊन आवश्यक ते बदल करता येतील.) क्लिअर टाइप ट्युनर हे टूल स्क्रीनवर दिसणारी अक्षरे स्पष्ट दिसण्यासाठी मदत करील. अल्ट व टॅब वापरून आपण ओपन डॉक्युमेंटस क्रमाक्रमाने पाहू शकतो हे आपल्याला माहीत आहेच. या अल्ट टॅबची जागा घेणारे 'अल्ट टॅब रिप्लेसमेंट' हे टूल डाऊनलोड करता येईल. यात जादा फायदा असा की जो प्रोग्राम तुम्हाला ओपन करायचा आहे त्याचे चित्रही दिसेल. म्हणजे एकाच प्रोग्राममधल्या अनेक विंडोज ओपन असतील तर नेमकी कोणती विंडो ओपन करायची हे लक्षात येईल. 'इमेज रिसायझर' हे टूल तुम्हाला मेलवरून मोठा फोटो पाठवायचा असेल तर उपयोगी पडते. नावाप्रमाणेच फोटोचा साइझ कमी-जास्त करण्यासाठी या टूलचा वापर होतो. मेलवरून बऱ्याचवेळा मोठे फोटो जात नाहीत, मग त्याचा साइझ कमी करून पाठवावा लागतो. ते काम हे टूल करते.

तुम्हाला कम्प्युटरमध्ये सीडी घालून त्यातील फोटो क्रमवारीने बघायचे असतील तर? मग 'सीडी स्लाइड शो जनरेटर' डाऊनलोड करा. सीडीतल्या फोटोंचा स्लाइडशो पाहता येईल. याशिवायही काही पॉवरटॉइज उपलब्ध आहेत. विंडोज एक्सपी सिस्टिम अधिक वेगाने व अधिक सुलभतेने चालायची असेल तर हे टॉइज आवश्यक आहेत. यातील सुविधा कम्प्युटरमध्ये आधी उपलब्ध नव्हत्या का? आहेत, पण सर्वसामान्य माणसाला त्या शोधून वापरणे कठीण असते. म्हणून पॉवरटॉइजचे महत्त्व वाढते.

नेटवरचा खेळ! 31 Oct 2008,

विश्वनाथन आनंद याचा अजिंक्यपदापर्यंतचा प्रवास लाखो लोकांनी लाइव्ह पाहिला, तो इंटरनेटच्या माध्यमातून. पण केवळ बुद्धिबळच नाही, तर क्रिकेट आणि लॉन टेनिस, फुटबॉल आणि बास्कटेबॉल अशा खेळांच्याही साइटस आता आहेत आणि त्यावरून क्रीडारसिकांना अगदी भरभरून माहिती सतत मिळत असते...
.......
भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद पाडव्याच्या दिवशी पुन्हा एकदा र्वल्ड चँपियन झाला आणि आपल्याकडे खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटली. आनंद काही पहिल्यांदा र्वल्ड चँपियन बनला नव्हता, तरीही एकदा मिळवलेले विजेतेपद टिकविण्यासाठी अधिक श्रम करावे लागतात. ते त्याने केले आणि विजेतेपद टिकविले, हे स्पधेर्च्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काहीशे लोकांनी पाहिले आणि जगभरातील लाखो बुद्धिबळ रसिकांनी पाहिले. जगभरातील लोक हे पाहू शकले याचे कारण एकच. इंटरनेट. बुद्धिबळ महासंघाच्या www.fide.com या साइटवरून लोकांनी आनंद आणि क्रामनिक या दोघांची प्रत्येक मूव्ह पाहिली, त्यावरून मनातल्या मनात दोन्ही खेळाडूंच्या पुढच्या चाली काय असतील याचा अंदाज केला. म्हणजेच प्रेक्षकांचे नकळत चांगले प्रशिक्षण झाले.

इंटरनेटवरून क्रीडा क्षेत्रातल्या घडामोडींची लाइव्ह माहिती मिळण्याची सोय आज नव्याने झालेली नाही. पण बुद्धिबळाच्या सामन्यातील प्रत्येक चाल पाहताना जी मजा येते, ती अन्य कोणत्याही खेळात येत नाही. तसे पाहता क्रिकेटपटूंची http://www.cricinfo.com/ ही अत्यंत आवडती साइट आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कोठेही प्रथम श्रेणीचे क्रिकेट चालू असले वा या खेळासंबंधी काहीही घडामोडी होत असल्या तरी या साइटवर त्याची माहिती ताबडतोब मिळणारच, असा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक खेळाडूची अगदी अपटूडेट आकडेवारी, त्याचे पूर्ण प्रोफाइल, देशाची माहिती आणि प्रत्येक स्थानिक स्पधेर्चा तपशील ही साइट देते.

पूवीर्च्या काळी (म्हणजे अगदी पाच वर्षांपूवीर्पर्यंत) काही उत्साही लोकांना वहीत प्रत्येक देशाच्या टेस्ट वा वनडे मॅचेस यांची माहिती लिहून काढण्याचा छंद होता. पण गेल्या काही वर्षांत क्रिकेट एवढे वाढले की असे घरच्या घरी रेकॉर्ड ठेवायचे म्हणजे नोकरीधंदा सोडून घरी बसण्याची पाळी. इंटरनेटमुळे आणि क्रिकइन्फोमुळे हा सारा प्रश्न सुटला आहे.

अर्थात क्रिकेटबद्दल ही एकच साइट अस्तित्वात आहे असे मात्र नाही. त्याची कितीतरी उदाहरणे देता येतील. प्रत्येकाचे काही ना काही तरी वैशिष्ट्य आहेच. पण 'क्रिकइन्फो' ही 'दादा' साइट आहे. बुद्धिबळाचेही तसेच. या खेळाच्या असंख्य साइट्स असल्या तरी अधिकृत असलेली www.fide.com ही साइटच मोठ्या प्रमाणावर पाहिली जाते. या साइटचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळासंबंधी मूलभूत माहिती, खेळाचा इतिहास, टॉप प्लेअर्स, त्यांची माहिती, बुद्धिबळातल्या रेटिंग्जची माहिती, महत्त्वाच्या असणाऱ्या स्पर्धा, त्यांचे निकाल आदि संपूर्ण माहिती या साइटवर मिळते. जगातील प्रमुख बुद्धिबळ संघटना म्हणून या साइटला मान असला तरी अन्य लहानसहान संघटनांनी काढलेल्या वा खाजगीरीत्या चालणाऱ्या साइट्स आहेतच. प्रत्येक देशाच्या बुद्धिबळ संघटनेची साइट असते; शिवाय काही खेळाडूंनी स्वत:च्या खाजगी साइटही बनविल्या आहेत. क्रिकेटबाबतही तसेच. प्रत्येक देशाच्या क्रिकेट मंडळाची स्वत:ची अधिकृत साइट आहे. त्यावर त्या देशातल्या स्थानिक स्पर्धांबाबत अधिक तपशील मिळू शकतो. भारतीय क्रिकेट मंडळाची अधिकृत साइट http://www.bcci.tv/ ही आहे. उदा. एखाद्या संघात एखादा नवोदित खेळाडू आला, तर त्याची जुजबी माहिती वर्तमानपत्रांना देण्यात येते. पण त्याची खरी माहिती पाहायची असेल, तर अशा साइट्स उपयोगी पडतात.

जे क्रिकेट व बुद्धिबळाचे, तेच अन्य खेळांचे. फुटबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस (विम्बल्डनची साइट http://www.wimbledon.org/ en_GB/index.html) बॅडमिंटन ( http:// www.badmintonindia.org /home.html) या सर्वांच्या प्रमुख संघटना, प्रत्येक देश, त्या देशांची प्रमुख संघटना आणि बऱ्याच वेळेस राज्यांच्या संघटना यांच्याही साइट्स आहेत. टीव्हीवर एखादी मॅच लाइव्ह पाहात असताना मजा येते खरी; पण एखाद्या बाबीविषयी बॅकग्राऊंडर हवा असेल तर इंटरनेटचाच आधार घ्यावा लागतो. शिवाय प्रत्येक इंग्रजी वृत्तपत्रांच्या साइटवर क्रीडा विषयक बातम्यांसाठी वेगळी लिंक दिलेली असते. उदा. टाइम्स ऑफ इंडियाची क्रीडाविषयक लिंक http:// sports.timesofindia.indiatimes.com/ अशी आहे.

जगभरातून क्रीडाप्रेमी वेगवेगळ्या खेळांच्या साइटवर लॉगीन करत असतात. काहींना भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीचा लाइव्ह स्कोअरबोर्ड पाहावासा वाटतो, तर काहींना विम्बल्डन मॅचेसचा पॉईंट बाय पॉईंट आढावा घ्यायचा असतो, तर काहींना आनंदची जगज्जेतेपदाच्या दिशेने चाललेली वाटचाल पाहायची असते. खेळ कोणताही असो, इंटरनेट तुमच्या सेवेसाठी हजर आहे

वर्डची उघड गुपिते! 14 Nov 2008, 0052 hrs IST

ऑडिओ किंवा व्हीडिओ फाइल आपल्या कम्प्युटरमध्ये घालता येतात. मात्र त्याचंही एक तंत्र आहे. ते समजून घेतलं की या प्रकारातल्या फाइल कम्प्युटरमध्ये घालणं अगदीच सोप्पं होऊन जातं. पण याच नाहीत, तर अगदी एक्सेलशीट जरी टाकायची ठरवली, तरी तीसुद्धा टाकता येणं सहजशक्य आहे. मात्र या साऱ्याचा मंत्र नीटपणं माहीत असणं आवश्यक आहे...

.........

तुम्ही वर्ड २००३मध्ये एखादी वर्ड फाइल तयार करत आहात; पण त्यात नुसताच मजकूर भरून ती फाइल रटाळ करण्याऐवजी मध्येमध्ये काही फोटो, काही व्हीडिओ फाइल्स, काही नुसत्याच वेगवेगळ्या आवाजाच्या फाइल्स अशा घातल्या तर? जरा गंमत येईल. या आवाजाच्या फाइल्स तुमच्या स्वत:च्या आवाजातल्याही असू शकतील. अगदी मोबाइलवर रेकॉर्ड केलेल्या फाइल्स तुम्ही वर्ड फाइलमध्ये घालू शकाल. हे करणे अगदी सोपे आहे. ज्या मजकुरानंतर ऑडिओ फाइल टाकायची आहे, तिथे माऊसचा कर्सर न्या. नंतर वरती 'इन्सर्ट' मेन्यूमधून 'ऑब्जेक्ट' असे ऑप्शन निवडा. ऑब्जेक्ट डायलॉग बॉक्स ओपन झाला की त्यात 'क्रिएट फ्रॉम फाइल' या नावाच्या टॅबवर क्लिक करा. नंतर ब्राऊजवर क्लिक करून तुम्ही कम्प्युटरमध्ये ज्या फोल्डरमध्ये ऑडिओ फाइल ठेवली असेल तिथे जा व त्यातील हव्या असलेल्या फाइलवर क्लिक करा व ओके म्हणा. वर्डमधल्या मजकुरापाशी एक आयकॉन दिसेल. त्याचे स्वरूप एखाद्या स्पीकरसारखे असेल. त्या आयकॉनवर डबलक्लिक केल्यास आवाज स्पष्टपणे ऐकू येईल.

या ऑडिओफाइल्स तुमच्या मशीनमध्ये आधी डाऊनलोड केलेल्या असल्या पाहिजेत. मोबाइलवरचे रेकॉडिर्ंग असले तर मोबाइलच्या डाटाकेबलच्या मदतीने ती फाइल मशीनमध्ये टाकली पाहिजे. इंटरनेटवरून एखादे गाणे डाऊनलोड केलेले असले तर ते मशीनमध्ये तुम्ही निवडलेल्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले असेलच.

हे झाले ऑडिओ फाइलचे. अशाच पद्धतीने व्हीडिओ फाइलही टाकता येईल, साधे चित्र टाकता येईल वा दुसऱ्या एखाद्या फाइलची लिंक द्यायची असली तरी ती देता यईल. तुमच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या आवाजातला संदेश पाठविण्याचा हा एक वेगळा मार्ग म्हणायला हवा. एक गोष्ट मात्र लक्षात घ्या. जितक्या जास्त ऑडिओ वा व्हीडिओ फाइल्स तुम्ही इन्सर्ट कराल, तेवढा तुमच्या वर्ड फाइलचा साइझ वाढेल. आणि मग कदाचित साध्या ईमेलवरून पाठविताना त्रास होईल. तेव्हा, किती मोहात पडायचे याचा विचार आधी करा!

या फाइल्स झाल्या केवळ विरंगुळा म्हणून टाकण्यासाठी. परंतु, एखादी खरोखरच महत्त्वाची फाइल टाकायची असली आणि ती टेबल अथवा एक्सेल शीट असली तर? तीही टाकता येईल. वर्ड २००३च्या मेन्यूबारमध्येच एक्सेलशीटचे चित्र असलेले आयकॉन असते. त्यावर कर्सर नेलात की 'इन्सर्ट मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट' असे दिसेल. त्यावर क्लिक करा. एक चार्ट समोर येईल आणि या शीटचा आकार किती बाय किती कॉलम हवा ते विचारले जाईल. तुम्हाला हवा तो साइझ निवडा. ओके म्हटल्याबरोबर तुम्ही वर्ड फाइलमध्ये ज्या ठिकाणी कर्सर ठेवला असेल तिथे ही एक्सेलशीट दिसेल. तीत मजकूर भरा की मूळ साध्या मजकुराच्या फाइलला एकदम वजन प्राप्त होईल. एक्सेलच्याच बाजूला इन्सर्ट टेबल असे ऑप्शन आहे. एक्सेलशीट अवघड वाटत असली तर हे टेबल इन्सर्ट करा. इन्सर्ट करतानाही किती साइझचे टेबल हवे आहे ते विचारले जाईलच. मग हवे तेवढेच निवडा. त्याच ओळीत इन्सर्ट हायपरलिंक असेही ऑप्शन आहे. तिथे एखाद्या फाइलची लिंक देता येईल. ऑप्शनवर क्लिक केल्यास एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यातून हव्या त्या फोल्डरला जा आणि हवी ती फाइल निवडा व ओके म्हणा. ती फाइल निळ्या रंगात तुमच्या वर्ड फाइलमध्ये दिसेल. ती लिंक ओपन करायची असेल तर 'कंट्रोल' बटन दाबून मग लिंकवर डबलक्लिक करा. ती फाइल थेट ओपन होईल. आता मायक्रोसॉफ्ट वर्डला ओपन ऑफिससारखे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी वर्डची उपयुक्तता कमी झालेली नाही. घरच्याघरी त्यावर अनेक गोष्टी करता येतात. स्वत:चे लेटरहेड तयार करता येते किंवा वर्ड फाइलमधला मजकूर कसा दिसावा हेही ठरवता येते म्हणजेच त्याची 'थीम' ठरवता येते. मग साधा वाटणारा मजकूर एकदम आकर्षक होतो.

स्वत:चे लेटरहेड! 12 Dec 2008, 0010 hrs IST

वर्डचा उपयोग करून अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. अगदी स्वत:चे किंवा स्वत:च्या कंपनीचे लेटरहेडसुद्धा बनविता येते. त्यासाठी काय करावे लागते, त्याचा वेध...
.........
आज इंटरनेटवर कितीही फ्री वर्ड सॉफ्टवेअर उपलब्ध असले तरी आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डची सवय लागलेली आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डला पर्याय कोणते ते यापूवीर् आपण एका लेखात पाहिले आहे. पण या वर्डचा उपयोग आणखी किती पद्धतीने करता येतो हे फारजणांना माहीत नसते. मजकूर ऑपरेट करायला, त्यात एखादा चार्ट अथवा टेबल इन्सर्ट करायला, तसेच फोटो टाकायला वर्ड उपयोगी पडते. त्याचप्रमाणे मागील लेखात म्हटल्याप्रमाणे लेटरहेड तयार करायलाही उपयोगी पडते. यासाठी कोणी आटिर्स्ट मदतीला असण्याची गरज नाही.

प्रथम मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करा. वरती डाव्या बजूला फाइल, एडिटच्या रांगेत तिसरे बटन व्ह्यू असे असेल. त्यावर क्लिक करा. नंतर त्यातील हेडर अँड फूटरवर क्लिक करा. आपोआप तुमच्या ओपन फाइलमध्ये एक बॉक्स दिसेल. त्यात तुमचे नाव, आवश्यक असल्यास एखादे स्लोगन, स्वत:चे नाव द्यायचे नसल्यास कंपनीचे नाव टाइप करा. ते झाल्यावर वरच्या टूलबारमधून ते सेंटरला आणा. (बी आय यू या बटनांच्या लाइनमध्ये पुढे सेंटरचे बटन आहे) तुम्हाला वरच्या भागात तुमचा स्वत:चा फोटो अथवा कंपनीचा लोगो इन्सर्ट करायचा असल्यास तोही करा. मात्र हा लोगो अथवा फोटो तुमच्या मशीनमध्ये आधी सेव्ह करायला लागेल. जिथे तो इन्सर्ट करायचा असेल तिथे माऊसचा कर्सर न्या आणि वरती डावीकडे व्ह्युनंतर असलेल्या इन्सर्ट बटनावर क्लिक करा. तिथे बरीच ऑप्शन्स असतील. अगदी तारीखही इन्सर्ट करता येईल, पेज नंबर टाकता येईल अथवा एखादा डायग्रामही टाकता येईल. पण तुम्हाला आत्ता फोटो टाकायचा असल्याने 'इन्सर्ट पिक्चर'वर क्लिक करा. मग तो फोटो कुठे सेव्ह केला आहे तिथे जाऊन तो अपलोड करा. तो फोटो दिसायला लागल्यावर ज्या जागेवर असणे आवश्यक आहे तिथे नेऊन ठेवा. आणखी काही तपशील हेडिंगमध्ये द्यायचा असेल तर तो द्या, त्याचा फाँट साइझ कमीजास्त करा.

हे झाले लेटरहेडच्या वरच्या भागाचे. आता तळाला तुमचा वा कंपनीचा पत्ता आणि फोन नंबर देता येईल. त्यासाठी 'हेडर अँड फूटर' या पट्टीतच 'स्विच बिटविन हेडर अँड फूटर' यावर क्लिक करा. की पानाच्या तळाला बॉक्स तयार होईल. त्यात पत्ता व इतर तपशील द्या. त्याचा लेआऊटही आवश्यकतेनुसार करा. हे झाले की सारे पान सेव्ह करायला हवे. इथे विशेष खबरदारी घ्यावी लागेल. लेटरहेडच्या 'फाइल'मध्ये जा, 'सेव्ह अॅज' म्हणा व फाइल 'डॉक्युमेंट टेम्प्लेट' म्हणजेच डॉट फाइल म्हणून सेव्ह करा. डॉक किंवा आरटीएफ वगैरे सेव्ह करू नका. म्हणजेच फाइलला तुम्ही लेटरहेरड असे नाव दिले असेल तर 'लेटरहेड.डॉट' अशी फाइल तयार होईल. ती सेव्ह कुठे कराल? हार्डडिस्कच्या (उदा. सी ड्राइव्ह) ड्राइव्हमध्ये टेम्प्लेट असा वेगळा फोल्डर असेल त्यात सेव्ह करा. साऱ्या डॉट फाइल यातच सेव्ह केल्या तर शोधाशोध करायला लागणार नाही. या फाइलची एक कॉपी डेस्कटॉपवर करून ठेवा. जेव्हाकेव्हा लेटरहेडवर काही मजकूर टाइप करायचा असेल, तेव्हा डेस्कटॉपवरची फाइलच ओपन करा व त्यात टाइप करा. तुमच्याकडे कलर प्रिंटर उपलब्ध असेल तर चांगलेच; नसला तरी ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटरवरही स्वत:च्या लेटरहेडवरचे पत्र चांगलेच दिसेल.

लेटरहेडच्या मांडणीत आणखी विविधता आणायची असेल तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्येच वरती फाइल, व्ह्यूच्याच ओळीत फॉरमॅट म्हणून बटन असेल. (वर्ड २००३मध्ये ते आहे) त्यावर क्लिक केलेत की खाली 'थीम' असे दिसेल. त्यातली कोणतीही थीम निवडा व त्याप्रमाणे लेटरहेड तयार करा. एकच थीम कायम ठेवायची नसेल तर लेटरहेड थीमशिवाय तयार करा व पत्र पाठवतेवेळी वेगवेगळी थीम द्या. वर्डमध्ये काम करायला वेगळीच गंमत येईल.

इंटरअॅक्टिव्ह व्हा! 26 Dec 2008, 0923 hrs IST

इंटरनेटवर आपली स्वत:ची वेबसाइट असावी असे अनेकांना वाटते. पण ही साइट तयार करणे म्हणजे मोठे कठीण काम आहे आणि त्याला खर्चही बराच येतो, असे मानले जाते. परंतु याही बाबतीत गुगल आपल्या मदतीला धावून आले आहे. त्यांनी गूगलपेजेस नावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
...
गेल्या वेळेस या कॉलममध्ये आपण स्वत:चे लेटरहेड कसे तयार करायचे ते पाहिले. ते टपालाने पत्र पाठवायला उपयोगी पडतेच, पण ईमेलचा उपयोग करतानाही त्याचा उपयोग होतो. त्यापुढे जाऊन इंटरनेटवर आपली स्वत:ची वेबसाइट असावी असे अनेकांना वाटते. पण ही साइट तयार करणे म्हणजे मोठे कठीण काम आहे आणि त्याला खर्चही बराच येतो, असे मानले जाते. काही प्रमाणात ते खरेही आहे. परंतु याही बाबतीत गुगल आपल्या मदतीला धावून आले आहे. त्यांनी गूगलपेजेस नावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यावर तुम्ही तुमचे स्वत:चे पेज तयार करू शकता. त्यात वेगवेगळ्या लिंक्स देऊ शकता, तुमचे फोटो टाकू शकता, स्वत:चा उद्योगधंदा असला तर त्याची जाहिरातही करू शकता. आणि हे सारे चकटफु करू शकता ...अट फक्त एकच. तुमचा ईमेल पत्ता जीमेलचा असायला हवा. कारण पेज तयार करताना तो वापरावा लागतो. गुगलने एक गोष्ट चांगली केली आहे. ती म्हणजे गूगलच्या कोणत्याही सेवा वापरायच्या असल्या तरी एकच जीमेल पत्ता व त्याचा पासवर्ड पुरतो.

तुुम्हाला पेज तयार करायचे असेल तर गूगलपेजेस डॉट कॉम या साइटवर जा. तिथे जीमेलचा पत्ता टाइप करा आणि जीमेलचाच पासवर्ड द्या. नंतर तुम्ही गुगल पेज क्रिएटरवर जाल. तिथे वेबपेजचे हेडिंग कसे द्यायचे, खालील मजकूर कसा तयार करायचा, फोटो इन्सर्ट करायचे असले तर कसे करायचे याच्या अत्यंत सोप्या भाषत्ेा सूचना दिलेल्या आहेत. त्या पाळा आणि वेबसाइट तयार करा. स्वत:चा ब्लॉग तयार करण्यासंबंधी मी काही महिन्यांपूवीर् लिहिले होते. तसा ब्लॉग तयार केला असलात तर त्याची लिंक इथे देऊ शकता. नाहीतर हे वेबपेज इंटरअॅक्टिव्ह होऊ शकणार नाही. ब्लॉग नाही तर तुमचा ईमेल अथवा अन्य काही लिंक द्यावी लागेल. तरच लोक तुमच्याशी संवाद साधू शकतील. अर्थात गुगलपेजेसवर पान तयार करतानाच तुम्हाला 'ईमेल दिल्यास स्पॅममेल (जंकमेल... नको असलेल्या, व्हायरस असलेल्या मेल्स) पाठविणाऱ्यांना मोकळे रान मिळेल', असा वैधानिक इशारा देऊन ठेवलेला आहे. पण तसे पाहिले तर ब्लॉग अथवा कोणतीही लिंक दिली की हा प्रश्न येणारच. त्यामुळे इंटरअॅक्टिव्ह व्हायचे तर स्पॅममेलचा धोका पत्करावा लागेल. या स्पॅममेलपासून कम्प्युटरला धोका पोचू नये असे वाटत असेल तर मशीनमधला अँटीव्हायरस तसाच मजबूत हवा हे लक्षात घ्या. इंटरअॅक्टिव्ह होण्याचे आणखी काही प्रकार म्हणजे सोशल नेटवकिर्ंगमध्ये भाग घेणे. हे सोशल नेटवकिर्ंग म्हणजे ऑर्कुट, फेसबुक, हायफाइव्ह वगैरे. प्रत्येकात फायदेतोटे आहेतच. कॉलेजमधला तरुणवर्ग या साऱ्याच्या फारच जवळ आहे. वडीलधाऱ्या मंडळींनीही या प्रकारांशी जुळवून घ्यायला हरकत नाही. मला ऑर्कुटवर खूप जुने मित्र भेटले. काही अनोळखी लोकांनी मी ज्या 'प्रार्थना समाज' शाळेत होतो त्या शाळेची नोंद पाहून शाळेची आस्थेने चौकशी केली. सोशल नेटवर्कवरच्या कम्युनिटीज काही वेळेला खूपच फायदेशीर ठरतात. जग आणखी लहान करायला त्यांनी मदतच केली आहे.

इंटरअॅक्टिव्ह होण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे उपलब्ध असलेले वेगवेगळे मेसेंजर. गूगल, याहू, एओएल, हॉटमेल यांचे मेसेंजर जगाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या माणसाबरोबरही संवाद घडवून आणू शकतात, तोही लाइव्ह. त्यामुळे आज माणसे फक्त शारीरिकरीत्या वेगवेगळी आहेत एवढेच. बाकी इंटरनेटने त्यांना केव्हाच एक कम्युनिटी केले आहे.

तुमचा कम्प्युटर जितका अद्ययावत तितके इंटरअॅक्टिव्ह व्हायला अधिक सोपे. जुन्या एसडी रॅमचा जमाना आता गेला. आता कोअर टु ड्युओ आणि सेव्हन आय इंटेल प्रोसेसरचा जमाना आहे. यात मशीन खूप फास्ट चालते. तुमच्याकडे ब्रॉडबँड कनेक्शन असले तर दुधात साखरच. पाच-सात वर्षांपूवीर्चे मशीन आताच्या सॉफ्टवेअरनेे चालत नाही. सारखे क्रॅश होते. त्यामुळे अशा मशीनला अपडेट करणे केव्हाही चांगले. चांगल्या कॉन्फिगरेशनचे मशीन साधारण २५ हजारांपर्यंत मिळू शकते. फक्त एकच धोका आहे. तुमच्याकडे विंडोजची ओरिजिनल सीडी असली तरी ती नव्या कॉन्फिगरेशनच्या मशीनला चालेल असे नाही. किंबहुना चालणारच नाही. कारण बऱ्याच वेळा ती तुमच्या जुन्या मशीनच्या मदरबोर्डाशीच कम्पॅटिबल असते. मदरबोर्ड बदलला की विंडोजचे नवे सॉफ्टवेअरही घ्यावे लागेल अशी शक्यता आहे. मग विंडोज व्हिस्ता घ्यायचे की विंडोज सेव्हनसाठी थांबायचे ते तुम्हीच ठरवा. काहीही घेतलेत तरी मशीन वेगवान होईल आणि चॅटिंग वा सफिर्ंग करायचा आनंद दुप्पट नव्हे, चौपट होईल हे नक्की.

या वर्षातली आपली ही अखेरची नेटभेट. आतापर्यंत सुमारे ६५ लेख प्रसिद्ध झाले आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. कम्प्युटरमधील तज्ज्ञांसाठी हा कॉलम नाही, तर ज्यांना तो शिकण्याची भीती वाटते वा ज्यांना कम्प्युटर म्हणजे काही कठीण गोष्ट आहे असे वाटते त्यांच्यासाठी काही गोष्टी सोप्या करून सांगायचा प्रयत्न मी केला. तो किती सफल झाला ते आपणच सांगू शकाल.

'डिजीटलायजेशने बदलली अॅक्सेसरीजची दुनिया 24 Apr 2009, 0021 hrs IST

आंतरराष्ट्रीय बँड्स, जीपीएस ट्रॅकींगसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजीटल साउण्ड सिस्टम्स अशा 'डिजिटलायजेशन'ने गेल्या काही वर्षांत व्हेईकल अॅक्सेसरीजची अवघी दुनियाच बदलून टाकली आहे. या बदलांमुळे अॅक्सेसरीजचे अनेक पर्याय ग्राहकांना उपलब्ध झालेत.

गाडीच्या अॅक्सेसरीज म्हटल्या की, डोळ्यासमोर येतात सन कंट्रोल फिल्म्स, सीट कवर्स, कारपेट मॅट्स आणि बॉडी कवर. मात्र याच अॅक्सेसरीजच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत एवढे बदल झालेत की यातील प्रत्येक गोष्टीसाठी कितीतरी पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध झालेत. याला जोड मिळाली, ती आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची. अर्थात आजही रेडिओ अँटेना, विविध प्रकारातील लाईट्स, कार फेशनर, हॉर्न्स, डॅशबोर्डवरील देवदेवतांच्या मूतीर् अशा गोष्टींना मागणी कायम आहे.

इतर क्षेत्रांसोबतच तंत्रज्ञानाने कार अॅक्सेसरीजच्या क्षेत्रातही मोठे बदल घडवून आणले. याचाच परिपाक म्हणून गाडीत एलसीडी, एमपीथ्री प्लेयर, डीव्हीडी प्लेयर्ससारख्या सिस्टम्स आल्या. नंतर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील अशा, रिअर व्ह्यू सिस्टीम, मुवमेण्ट डिटेक्शन सिस्टम, पाकिर्ंग सेन्सर्स अशा विविध यंत्रणा उपलब्ध झाल्या आहेत. रिअर व्ह्यू सिस्टीममध्ये गाडी रिवर्स घेत असताना ड्रायवरला पाठीमागे मान वळवून बघण्याची गरज भासणार नाही. त्याच्यासमोरील स्क्रिनवर पाठीमागचा भाग दिसेल. तर मुवमेण्ट डिटेक्शनमध्ये गाडी लॉक केलेल्या अवस्थेत कुणीही चोरीच्या उद्देशाने काच कापून आत हात घालण्याचा प्रयत्न जरी केला, तरी सायरन वाजू लागेल. अनेकदा सेंट्रल लॉकींग सिस्टममध्ये केवळ गाडीच्या दरवाजांना सुरक्षा यंत्रणा लावलेली असते. दरवाजा उघडण्याचा अथवा तोडण्याचा प्रयत्न केला तरच याचा सायरन वाजतो. मात्र अनेकदा चोरटे काच कापून आतील महागडे म्युझिक प्लेयर्स, पैसे वा इतर सामुग्री अलगद काढून नेतात. मात्र सेन्सर्स लावलेल्या यंत्रणेत असे होत नाही.

अॅक्सेसरीजच्या क्षेत्रातील बदल्यत्या गरजांबाबत बोलताना 'ऋषी कार डेकोर'चे संचालक राज लुथरा सांगतात की, 'तंत्रज्ञानातील बदलांप्रमाणेच ग्राहकांच्या आवडीनिवडीदेखील बदलत आहेत. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन आम्ही शहरात सर्वप्रथम सीट कवर्ससाठी स्वतंत्र बुटीक सुरू केले आहे.' या नव्या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही लुथरा सांगतात. तर 'वैष्णवी कार डेकोर'चे विजय व जयेश तन्ना यांनी त्यांच्याकडे असलेल्या एलिगण्ट या बँडेड सीट कवर्सच्या श्रेणीची माहिती दिली. किमान पाच वषेर् आयुष्य असलेल्या या बँडच्या सीट कवर्सना एक वर्षाची वॉरण्टीदेखील असते. त्यामुळे ग्राहक मोठ्या विश्वासाने हा बँड घेत असल्याचं तन्ना सांगतात. 'एकनाथ कार डेकोर'चे संचालक युगांत गुजराथी यांच्या मते ग्राहकांच्या मागणीनुसार सर्व गोष्टी उपलब्ध करुन द्याव्या लागतात. मात्र यात क्वॉलिटीला प्राधान्य देणे गरजेचे असते. त्याचमुळे आम्हाला ग्राहकांचे मोठे पाठबळ लाभल्याचं गुजराथी बोलून दाखवतात. 'हिरामोती' या दालनाने ग्राहकांसाठी विविध अॅक्सेसरीज उपलब्ध करुन देतानाच काळानुरुप त्यांच्या शोरुममध्ये बदल केले आहेत. त्यामुळे आजही ग्राहकांच्या समाधानाकडे लक्ष दिले जात असल्याचे 'हिरामोती'चे संचालक ठाकूर सांगतात.

गाड्यांच्या अॅक्सेसरीज आणि त्यांची मागणी आजही कायम असली, तरी 'डिजिटलायजेशन'मुळे ही दुनिया पूर्णपणे बदलली आहे. यातूनच वाहनधारकांना सुरक्षा, समाधान आणि निवडीसाठी विविध पर्याय खुले झालेत.

Saturday, April 25, 2009

'फिशिंग' नको! 9 Jan 2009, 0121 hrs IST

लोकांना फसवून त्यांची खाजगी माहिती, बँक अकाऊंट, क्रेडिट कार्डाची माहिती वगैरे काढणे याच प्रकाराला 'फिशिंग' म्हणतात. सोशल नेटवकिर्ंग करणाऱ्या साइटनाही यापासून धोका पोचू शकतो. म्हणूनच सर्वांनीच सावध राहण्याची आणि आवश्यक ते उपाय योजण्याची गरज आहे...

.....

पाकिस्तान आपल्यावर 'सायबर अॅटॅक' करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि हा 'सायबर अॅटॅक' म्हणजे नेमके काय असा प्रश्न सर्वांच्याच मनात आला. 'सायबर अॅटॅक' म्हणजे तुमच्या इंटरनेटवर केलेला हल्ला. अर्थात तो तुमचे इंटरनेट चालू असतानाच होणार. तुमचा कम्प्युटर सेफ नसला आणि त्यात चांगला अँटीव्हायरस आणि फायरवॉल नसली तर तुमचा डाटा बाहेरचा माणूस सहज चोरू शकतो. म्हणून या ठिकाणी अँटीस्पायवेअरचेही महत्त्व आहे. परंतु अलीकडच्या काळात 'फिशिंग' नावाचा तुम्हाला अलगद जाळ्यात पकडण्याचा प्रकार जास्त फोफावला आहे. याचा पहिला वापर होऊन तेरा वषेर् झाली असली तरी सध्याच्या काळात त्याचा प्रसार होण्याचे कारण कदाचित हॅकर्सपाशी अधिक सुसज्ज अशी साधने उपलब्ध झाली हे असावे. १९८७ सालीच 'फिशिंग' नावाचा काही प्रकार अस्तित्वात आहे हे लक्षात आले होते. परंतु त्याचा प्रत्यक्ष वापर २ जानेवारी १९९६ रोजी झाल्याचे उघड झालेे. अमेरिकेच्या एओएल साइटवर हा हल्ला झाला होता. ही साइट वा त्यावरील मेल वापरणाऱ्यांना एक मेल आला आणि त्यांचे पासवर्ड, बँक अकाऊंट, क्रेडिट कार्ड नंबर यांची माहिती विचारण्यात आली. ही माहिती एओएलला अधिकृत कारणासाठी हवी आहे, असेही भासविण्यात आले. म्हणून काहीजणांनी ही माहिती दिलीही. नंतर ते फसले व आपल्या बँक अकाऊंटवरून अथवा क्रेडिट कार्डाचा वापर करून आपला खिसा कोणीतरी हलका केला हे लक्षात आले. खडबडून जागे झाल्यावर ग्राहकांच्या लक्षात आले की प्रत्यक्षात तो मेल एओएलने पाठवलाच नव्हता तर काही हॅकर्सनी पाठविला होता. परंतु, तो खरा एओएलकडूनच आला असावा इतक्या बेमालुम पद्धतीने पाठविला गेला होता. मूळ वेबसाइटसारख्या हुबेहूब दुसऱ्या वेबसाइटवरून आपल्याला काही माहिती विचारण्यात येते. सामान्य नेटयूजरला हा फरक कळत नाही आणि तो फसतो. लोकांना फसवून त्यांची खाजगी माहिती, बँक अकाऊंट, क्रेडिट कार्डाची माहिती वगैरे काढणे याच प्रकाराला 'फिशिंग' म्हणतात.

सोशल नेटवकिर्ंग करणाऱ्या साइटनाही यापासून धोका पोचू शकतो. ऑर्कुट, फेसबुक वगैरेवरचे तुमचे प्रोफाइल हुबेहुब नवे करून तुमची फसवणूक केली जाते. तुमच्या मित्रमैत्रिणीचे प्रोफाइल बनावट आहे हे लक्षात न आल्याने आपण मनमोकळेपणाने गप्पा मारतो वा खासगी माहिती देतो. जेव्हा लक्षात येते तेव्हा उशीर झालेला असतो. याचा आथिर्क फटका अमेरिकेत भल्याभल्यांना बसला आहे. मे २००४ ते मे २००५ या काळात अमेरिकेत बारा लाख लोकांना याचा फटका बसला. त्याचे आथिर्क मूल्य होते तब्बल ९० कोटी डॉलर. दरवषीर् अमेरिकन कंपन्यांना दोन अब्ज डॉलरचा तोटा होतो. २००७मध्ये हाच आकडा ३६ लाख ग्राहक आणि सव्वातीन अब्ज डॉलर असा झाला. ब्रिटनमध्येही २००५मध्ये या 'फिशिंग'चा आथिर्क फटका होता सव्वादोन कोटी पौंड. अन्य देशांत तो किती बसत असेल याची कल्पनाच केलेली बरी.

यावर आपण काय करू शकतो? इंटरनेट एक्प्लोरर, फायरफॉक्स, सफारी, ऑपेरा या ब्राऊझर्सनी 'अँटीफिशिंग टूल' ब्राऊझरमध्ये घातलेच आहे. एखादी बोगस साइट लोड होत असली तर लगेचच तुम्हाला तसा संदेश मिळतो. त्यासाठी त्या ब्राऊझरच्या सेटिंग्जमध्ये जाऊन 'अँटीफिशिंग टूल' एनेबल करावे लागेल. या ऑप्शनच्या आधी असलेल्या बॉक्समध्ये टिकमार्क असला तर ते एनेबल होईल. तुम्ही फसविले जाण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमचा वेबवरचा सर्च. तुम्ही एखाद्या साइटवर सर्च दिलात आणि समोर दिसलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर भलतीच साइट उघडली तर पंचाईत होते. म्हणून ती लिंक खरी आहे की फसवी, हे ओळखायला 'मॅकअॅफी साइटअॅडव्हायझर' नावाच्या सॉफ्टवेअरची मदत होते. नेटवरून ते डाऊनलोड केल्यावर तुमच्या स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात तळाला इंग्रजी 'एम' असे अक्षर लाल रंगात दिसेल. हाच आपला सल्लागार. इंटरनेटवरील सर्चमधून समोर आलेली लिंक खरी असली तर तिच्या शेवटी आपोआपच हिरव्या रंगातील टिकमार्क येईल. लिंक उघडण्यास धोकादायक असेल तर लाल रंगाची फुली मारलेली दिसेल. ती लिंक ओपन करू नका.

एखाद्या बनावट साइटवरून तुम्हाला बँक अकाऊंट अथवा अन्य महत्त्वाच्या बाबीची माहिती देण्यास सांगितली गेली तर एक काम करा. ज्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायला सांगितले असेल त्यावर क्लिक न करता बँकेची मूळ साइट ओपन करा व तिथे अशी काही माहिती मागितली आहे काय याचा तपास करा. प्रत्येक बँकेच्या साइटवर तुम्हाला 'आम्ही कधीही मेलवर ग्राहकांकडून पासवर्ड वा अन्य महत्त्वाची माहिती मेलवर मागवणार नाही, ती ग्राहकांनी देऊ नये', असे स्पष्ट म्हटलेले असते.

तुमची कम्प्युटर यंत्रणा किती सक्षम आहे त्यावरही फिशिंगमध्ये तुम्ही अडकाल की नाही हे ठरते. म्हणूनच नव्या वर्षाचा नवा संकल्प करा, इंटरनेट नेटवर्क सुरक्षित करा. हॅपी सफिर्ंग...!

'फिशिंग' नको! 9 Jan 2009, 0121 hrs IST

लोकांना फसवून त्यांची खाजगी माहिती, बँक अकाऊंट, क्रेडिट कार्डाची माहिती वगैरे काढणे याच प्रकाराला 'फिशिंग' म्हणतात. सोशल नेटवकिर्ंग करणाऱ्या साइटनाही यापासून धोका पोचू शकतो. म्हणूनच सर्वांनीच सावध राहण्याची आणि आवश्यक ते उपाय योजण्याची गरज आहे...

.....

पाकिस्तान आपल्यावर 'सायबर अॅटॅक' करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि हा 'सायबर अॅटॅक' म्हणजे नेमके काय असा प्रश्न सर्वांच्याच मनात आला. 'सायबर अॅटॅक' म्हणजे तुमच्या इंटरनेटवर केलेला हल्ला. अर्थात तो तुमचे इंटरनेट चालू असतानाच होणार. तुमचा कम्प्युटर सेफ नसला आणि त्यात चांगला अँटीव्हायरस आणि फायरवॉल नसली तर तुमचा डाटा बाहेरचा माणूस सहज चोरू शकतो. म्हणून या ठिकाणी अँटीस्पायवेअरचेही महत्त्व आहे. परंतु अलीकडच्या काळात 'फिशिंग' नावाचा तुम्हाला अलगद जाळ्यात पकडण्याचा प्रकार जास्त फोफावला आहे. याचा पहिला वापर होऊन तेरा वषेर् झाली असली तरी सध्याच्या काळात त्याचा प्रसार होण्याचे कारण कदाचित हॅकर्सपाशी अधिक सुसज्ज अशी साधने उपलब्ध झाली हे असावे. १९८७ सालीच 'फिशिंग' नावाचा काही प्रकार अस्तित्वात आहे हे लक्षात आले होते. परंतु त्याचा प्रत्यक्ष वापर २ जानेवारी १९९६ रोजी झाल्याचे उघड झालेे. अमेरिकेच्या एओएल साइटवर हा हल्ला झाला होता. ही साइट वा त्यावरील मेल वापरणाऱ्यांना एक मेल आला आणि त्यांचे पासवर्ड, बँक अकाऊंट, क्रेडिट कार्ड नंबर यांची माहिती विचारण्यात आली. ही माहिती एओएलला अधिकृत कारणासाठी हवी आहे, असेही भासविण्यात आले. म्हणून काहीजणांनी ही माहिती दिलीही. नंतर ते फसले व आपल्या बँक अकाऊंटवरून अथवा क्रेडिट कार्डाचा वापर करून आपला खिसा कोणीतरी हलका केला हे लक्षात आले. खडबडून जागे झाल्यावर ग्राहकांच्या लक्षात आले की प्रत्यक्षात तो मेल एओएलने पाठवलाच नव्हता तर काही हॅकर्सनी पाठविला होता. परंतु, तो खरा एओएलकडूनच आला असावा इतक्या बेमालुम पद्धतीने पाठविला गेला होता. मूळ वेबसाइटसारख्या हुबेहूब दुसऱ्या वेबसाइटवरून आपल्याला काही माहिती विचारण्यात येते. सामान्य नेटयूजरला हा फरक कळत नाही आणि तो फसतो. लोकांना फसवून त्यांची खाजगी माहिती, बँक अकाऊंट, क्रेडिट कार्डाची माहिती वगैरे काढणे याच प्रकाराला 'फिशिंग' म्हणतात.

सोशल नेटवकिर्ंग करणाऱ्या साइटनाही यापासून धोका पोचू शकतो. ऑर्कुट, फेसबुक वगैरेवरचे तुमचे प्रोफाइल हुबेहुब नवे करून तुमची फसवणूक केली जाते. तुमच्या मित्रमैत्रिणीचे प्रोफाइल बनावट आहे हे लक्षात न आल्याने आपण मनमोकळेपणाने गप्पा मारतो वा खासगी माहिती देतो. जेव्हा लक्षात येते तेव्हा उशीर झालेला असतो. याचा आथिर्क फटका अमेरिकेत भल्याभल्यांना बसला आहे. मे २००४ ते मे २००५ या काळात अमेरिकेत बारा लाख लोकांना याचा फटका बसला. त्याचे आथिर्क मूल्य होते तब्बल ९० कोटी डॉलर. दरवषीर् अमेरिकन कंपन्यांना दोन अब्ज डॉलरचा तोटा होतो. २००७मध्ये हाच आकडा ३६ लाख ग्राहक आणि सव्वातीन अब्ज डॉलर असा झाला. ब्रिटनमध्येही २००५मध्ये या 'फिशिंग'चा आथिर्क फटका होता सव्वादोन कोटी पौंड. अन्य देशांत तो किती बसत असेल याची कल्पनाच केलेली बरी.

यावर आपण काय करू शकतो? इंटरनेट एक्प्लोरर, फायरफॉक्स, सफारी, ऑपेरा या ब्राऊझर्सनी 'अँटीफिशिंग टूल' ब्राऊझरमध्ये घातलेच आहे. एखादी बोगस साइट लोड होत असली तर लगेचच तुम्हाला तसा संदेश मिळतो. त्यासाठी त्या ब्राऊझरच्या सेटिंग्जमध्ये जाऊन 'अँटीफिशिंग टूल' एनेबल करावे लागेल. या ऑप्शनच्या आधी असलेल्या बॉक्समध्ये टिकमार्क असला तर ते एनेबल होईल. तुम्ही फसविले जाण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमचा वेबवरचा सर्च. तुम्ही एखाद्या साइटवर सर्च दिलात आणि समोर दिसलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर भलतीच साइट उघडली तर पंचाईत होते. म्हणून ती लिंक खरी आहे की फसवी, हे ओळखायला 'मॅकअॅफी साइटअॅडव्हायझर' नावाच्या सॉफ्टवेअरची मदत होते. नेटवरून ते डाऊनलोड केल्यावर तुमच्या स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात तळाला इंग्रजी 'एम' असे अक्षर लाल रंगात दिसेल. हाच आपला सल्लागार. इंटरनेटवरील सर्चमधून समोर आलेली लिंक खरी असली तर तिच्या शेवटी आपोआपच हिरव्या रंगातील टिकमार्क येईल. लिंक उघडण्यास धोकादायक असेल तर लाल रंगाची फुली मारलेली दिसेल. ती लिंक ओपन करू नका.

एखाद्या बनावट साइटवरून तुम्हाला बँक अकाऊंट अथवा अन्य महत्त्वाच्या बाबीची माहिती देण्यास सांगितली गेली तर एक काम करा. ज्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायला सांगितले असेल त्यावर क्लिक न करता बँकेची मूळ साइट ओपन करा व तिथे अशी काही माहिती मागितली आहे काय याचा तपास करा. प्रत्येक बँकेच्या साइटवर तुम्हाला 'आम्ही कधीही मेलवर ग्राहकांकडून पासवर्ड वा अन्य महत्त्वाची माहिती मेलवर मागवणार नाही, ती ग्राहकांनी देऊ नये', असे स्पष्ट म्हटलेले असते.

तुमची कम्प्युटर यंत्रणा किती सक्षम आहे त्यावरही फिशिंगमध्ये तुम्ही अडकाल की नाही हे ठरते. म्हणूनच नव्या वर्षाचा नवा संकल्प करा, इंटरनेट नेटवर्क सुरक्षित करा. हॅपी सफिर्ंग...!

काही 'शॉर्टकट्स!' 23 Jan 2009, 0018 hrs IST

फोल्डरमधल्या काही मोजक्याच फाइल डीलिट करायच्या आहेत; काय करायचे? नेहमी वापरले जाणारे प्रोग्राम्स डेस्कटॉपऐवजी कुठे ठेवणे सोईचे असते? काही फोल्डर्स 'गुप्त' ठेवायचे असले तर...? तर काय करायचे या प्रश्नांची केलेली उकल...
....
नवख्या मंडळींना कम्प्युटर चालवताना काही सोप्या गोष्टीही कठीण वाटू शकतात. याचे कारण कम्प्युटर तंत्रज्ञानाबद्दल असलेली अनभिज्ञता. ही माहिती किमान मूलभूत तरी असलीच पाहिजे. काही शॉर्टकट्स, काही सोप्या युक्त्या वगैरे माहीत पाहिजेत. अशाच काही युक्त्या आपण माहीत करून घेऊ या.

समजा तुम्हाला तुमच्या फोल्डरमधल्या काही फाइल्स डीलिट करायच्या आहेत. अन्य फाइल्स घालवायच्या नाहीत. एकएक फाइल सिलेक्ट करून डीलिट करायला वेळ लागेल. अशा वेळेस एका हाताने 'कंट्रोल'चे बटन दाबून ठेवून तुम्हाला डीलिट करायच्या असतील त्या साऱ्या फाइल्स सिलेक्ट करा. उदाहरणार्थ पहिली, सातवी, दहावी अशा फाइल्स सिलेक्ट करा. सगळ्या सिलेक्ट झाल्या की 'कंट्रोल' बटनावरचा हात सोडा व एकदाच डीलिटचे बटन दाबा. त्या एकदमच डीलिट होतील व डेस्कटॉपवरच्या 'रिसायकल बिन'मध्ये जाऊन पडतील. त्या या कचऱ्याच्या डब्यात जाऊन पडाव्यात असे वाटत नसेल व थेट कम्प्युटरमधून डीलिट व्हाव्यात असे वाटत असेल तर डीलिट करताना 'शिफ्ट'चे बटन दाबून मग डीलिटचे बटन दाबा. त्या फाइल्स रिसायकल बिनमध्ये न जाता नाहीशाच होतील. पण माझ्या मते फाइल बिनमध्येच गेलेली बरी. कारण एखादी फाइल आपण चुकून डीलिट केली असे वाटले तर ती पुन्हा रिकव्हर करता येते. बिनमध्ये असलेल्या फाइलवर राइट क्लिक करा व 'रिस्टोअर फाइल' म्हणा. ती मूळ फोल्डरमध्ये जाऊन बसेल.

काही सतत वापरले जाणारे प्रोगाम्स आयकॉनच्या स्वरूपात डेस्कटॉपवर आणून ठेवले तर सुरू करायला सोपे जाते हा भाग आहेच. परंतु, डेस्कटॉपवर जास्त आयकॉन आणल्यास तो फार हेवी होतो. त्यामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डेस्कटॉपऐवजी स्टार्ट मेन्यूवर ते आणून ठेवावेत. त्यासाठी डेस्कटॉपवरच्या 'स्टार्ट' बटनावर राइट क्लिक करा. मग 'प्रॉपटीज'वर क्लिक करा. जी ऑप्शन्स दिसतील त्यातील 'स्टार्ट मेन्यू' सिलेक्ट करा व नंतर ओके म्हणा. आता पुन्हा स्टार्ट बटनावर क्लिक करा. नंतर 'ऑल प्रोग्राम्स'वर क्लिक करा. म्हणजे तुमच्या मशीनमध्ये असलेले सगळे प्रोग्राम्स दिसतील. त्यातील जो प्रोग्राम तुम्हाला 'स्टार्ट मेन्यू'मध्ये हवा आहे त्यावर राइट क्लिक करा. तुम्हाला 'पिन टू स्टार्ट मेन्यू' असे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. आता जेव्हा केव्हा हा प्रोग्राम ओपन करायचा असेल तेव्हा स्टार्ट बटनावर क्लिक केलेत की उभ्या डाव्या पट्टीत तो दिसेल. त्यावर क्लिक करा की झाले काम.

पुढची टिपही अनेकांना उपयोगी पडेल. समजा तुमचा कम्प्युटर ऑफिसमध्ये वा घरात एकापेक्षा अधिक माणसे वापरतात. अशावेळेस तुम्ही तयार केलेले काही फोल्डर्स अन्य लोकांनी पाहू नयेत वा पाहिले तर त्यात काही बदल कोणीही करू नये असे तुम्हाला वाटत असेल. मग त्यावर काय करायचे? त्यासाठी थोडी किचकट प्रोसेस आहे. तुमचे मशीन रिस्टार्ट करा आणि ताबडतोब कीबोर्डवरचे 'एफ ८' हे बटन सतत दाबत राहा. काही वेळाने कम्प्युटर 'सेफ मोड'मध्ये सुरू होईल. नेहमीच्या स्क्रीनपेक्षा अगदीच वेगळा व मोठ्या अक्षरातला हा स्क्रीन दिसेल. तिथे तुमच्या युजरनेमने लॉगीन करा. मग तुम्ही जो फोल्डर प्रायव्हेट करू इच्छिता तो शोधा. (तो 'सी' ड्राइव्हमध्ये आहे का 'डी'मध्ये वगैरे) त्या फोल्डरवर राइट क्लिक करून 'प्रॉपटीज'वर जा. नंतर 'सिक्युरिटी' टॅबवर जा. दोन भागांतला स्क्रीन दिसेल. वरच्या भागात ग्रूप ऑर युजर नेम अशा हेडखाली मशीनमध्ये ज्यांच्या ज्यांच्या नावाने मशीनला लॉगीन होऊ शकते त्याची यादी असेल. त्यातील प्रत्येक नाव आळीपाळीने सिलेक्ट करा आणि नंतर खालच्या भागात कोणते राइट्स कोणाला द्यायचे ते सिलेक्ट करा. तुमचे लॉगीन सोडून बाकी सर्वांना राइट्स 'डिनाय' म्हणजेच नाकारू शकता अथवा बाकीच्यांना फोल्डर दिसेल पण त्यात बदल करू शकणार नाही अशी सोय करायची असेल तर 'अलाऊ' सेक्शनखाली हवे तेच राइट्स द्या. दुसऱ्या व्यक्तीला 'फुल कंट्रोल' व 'मॉडीफाय'वर क्लिक करू नका. म्हणजे इतर लोक फोल्डरमध्ये काही बदल करू शकणार नाहीत. तुमच्या स्वत:च्या लॉगीनला मात्र सवं काही 'अलाऊ' हवे हे मात्र लक्षात ठेवा. नाहीतर तुम्हालाच काही बदल करता येणार नाहीत. मग मशीन रिस्टार्ट करा.

समजा तुम्हाला एक फोल्डर वारंवार वापरावा लागतो. तोे समजा 'सी' ड्राइव्ह - डाटा- वर्ड फाइल्स- पर्सनल फोल्डर- हवा असलेला फोल्डर इतक्या लांब असेल तर प्रत्येक वेळेला तो शोधणे कठीण जाते. तोे कायम डेस्कटॉपवर आणून ठेवला तर किती काम सोपे होईल? त्यासाठी डेस्कटॉपवर राइट क्लिक करा. मग 'न्यू' आणि मग 'शॉर्टकट'वर क्लिक करा. नंतर ब्राऊज बटनावर क्लिक करून तुम्हाला हव्या त्या फोल्डरची लिंक द्या. नंतर 'नेक्स्ट'वर क्लिक करा व त्या शॉर्टकटला काहीही नाव द्या. ओके म्हणा की तो फोल्डर डेस्कटॉपवर हजर झालाच पाहिजे.

आणखी काही शॉर्टकट्स! 20 Feb 2009, 0052 hrs IST

आपला कम्प्युटर सुरक्षित आहे का? नको असलेले प्रोग्राम सुरू झाले तर काय करायचे? कम्प्युटर अपडेट कसा करायचा? अशा अनेक प्रश्नांनी आपण गोंधळून जातो. अशावेळी काय करायचे असते त्याचा वेध...
.......
आपण कम्प्युटर सुरू करतो तेव्हा अनेक प्रोग्राम्स आपोआप सुरू होतात. काही प्रोग्राम्स सुरू झालेले आपल्याला दिसतात, काही दिसत नाहीत. कारण ते पडद्याआड सुरू असतात. ते बऱ्याचदा आवश्यक नसतात. उदा. 'विंडोज मेसेंजर' हा कम्प्युटर सुरू होतानाच पडद्याआड चालू असतो. अशा नको असलेल्या प्रोग्राममुळे कम्प्युटर स्लो होतो. हा मेसेंजर सुरू झालाय हेच कळत नसल्याने तो बंद केला जात नाही. तो आपोआप सुरू व्हावा अशी यंत्रणा विंडोज प्रणालीतच असते. ती आपण डिसेबल करू शकतो. त्यासाठी तुमच्या 'सी' ड्राइव्हमधल्या प्रोग्राम्स फोल्डरवर क्लिक करा. त्यातील मेसेंजर फोल्डर उघडा. तिथे mmsgs.exe फाइल असेल. त्यावर डबल क्लिक करा. मेसेंजर ओपन होईल. त्यातील 'प्रेफरन्सेस' टॅबवर क्लिक करा. सुरुवातीलाच दोन ऑप्शन्स दिसतील. 'रन विंडोज मेसेंजर व्हेन विंडोज स्टार्ट' आणि त्याखाली 'अलाऊ विंडोज मेसेंजर टू रन इन द बॅकग्राऊंड' अशा दोन ऑप्शन्सवर क्लिक केलेले असेल. ते अनक्लिक करा. ओके म्हणा व मशीन रिस्टार्ट करा. आता मेसेंजर आपोआप सुरू होणार नाही. तुम्हाला हवा असेल तेव्हाच तो सुरू करता येईल. उगाचच तो चालणार नसल्याने कम्प्युटरची तेवढी मेमरी सेव्ह होईल. असे अनेक प्रोग्राम्स बंद करता येतात. पण कोणते प्रोग्राम्स आवश्यक आहेत आणि कोणते नाहीत याची नीट माहिती असल्याशिवाय ते करू नका.

***

आपण आपला कम्प्युटर सुरक्षित राहावा म्हणून अँटीव्हायरस व अँटीस्पायवेअर लोड करतो. एकाने भागेल का अशी शंका आल्यास आणखी एखादा असा अँटीव्हायरस आपण लोड करतो. तरीही आपला कम्प्युटर खरोखरच सुरक्षित आहे का हे आपल्याला कसे कळेल? तुमच्या कम्प्युटरवर विंडोज एक्सपी सव्हिर्स पॅक दोन अथवा व्हिस्ता लोड केलेले असेल, तर ते पाहणे सोपे आहे. त्यासाठी 'स्टार्ट' बटनवर क्लिक करा. मग 'कंट्रोल पॅनल'वर जा. तिथून 'सिक्युरिटी सेंटर'वर जा. तिथे प्रामुख्याने 'फायरवॉल', 'ऑटोमेटिक अपडेट्स' आणि 'व्हायरस प्रोटेक्शन' अशी तीन ऑप्शन्स दिसतील. ती तीनही हिरव्या रंगात 'ऑन' असा स्टेटस दाखवत असतील, तर तुमचा कम्प्युटर व्हायरस व स्पायवेअरशी मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे, असे समजा. यातील एखादी गोष्ट जरी 'ऑफ' असली तरी ती धोक्याची घंटा असते. 'ऑफ' असल्यास काय खबरदारी घ्यायची याच्या सूचनाही तिथेच दिलेल्या असतात. त्या पाळा आणि कम्प्युटर सुरक्षित बनवा.

तुमचा कम्प्युटर आऊटडेटेड झालाय; तो अपडेट करायचाय असे तुम्हाला वाटत असते. तुम्ही तुमच्या कम्प्युटर मेंटेन करणाऱ्या माणसाकडे जाता आणि अपडेट करायचे असल्याचे सांगता. तो तुम्हाला मशीनमध्ये सध्या काय काय लोड केलेले आहे ते विचारतो. काहीजण प्रोग्राम्सची नावे सांगू शकतील; पण त्याचे कुठले व्हर्जन लोड आहे हे त्यांना सांगता येईलच असे नाही. किंबहुना हा तांत्रिकपणा बहुतेकांना माहीत नसतोच. या गोष्टी स्वत:लाच माहीत हव्यात असे नाही वाटत? त्यासाठी 'स्टार्ट' बटनावर क्लिक करा व नंतर 'रन'वर क्लिक करा. खाली डाव्या कोपऱ्यात एक छोटीशी विंडो ओपन होईल. त्यात msinfo32 असे टाइप करा व ओके म्हणा. तुमच्या कम्प्युटरमधल्या प्रत्येक 'अवयवा'ची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल.

तुम्ही एखाद्या वेळेस कम्प्युटर पूर्णपणे स्कॅन करता. या स्कॅनिंगला पंधरा मिनिटांपासून दीड तासापर्यंत कितीही वेळ लागू शकतो. कम्प्युटरमध्ये फाइल्स किती आहेत, 'कम्प्लिट स्कॅन' करताय की 'स्मार्ट स्कॅन' त्यावर हा वेळ अवलंबून असतो. मग बऱ्याच वेळेस तुम्ही इतर काही काम करू शकत नाही. कम्प्युटर स्कॅनिंगला टाकून तुम्ही तुमची अन्य कामे आटोपता. पण या दीड तासात कम्प्युटर किती वीज खाईल या कल्पनेने तुम्ही घाबरत असाल. सध्या सर्वच कंपन्यांची वीजबिले ज्या झपाट्याने आकाशाकडे झेपावत आहेत, ते पाहता ही भीती रास्तच आहे. कम्प्युटर तर चालू ठेवायचाय; पण वीजही वाचवायची आहे असे करायचे असेल तर काय कराल? नुसतेच स्कॅनिंग करायचे असेल तर ते सुरू करून मॉनिटर स्वीचऑफ करू शकता. सीपीयू चालू राहील आणि मशीनचे स्कॅनिंगही होत राहील. किंवा ठराविक वेळेने मॉनिटर 'ऑफ' व्हावा अशीही सोय करता येईल. त्यासाठी स्टार्ट - कंट्रोल पॅनल - पॉवर ऑप्शन्स या मार्गाने जा. तिथे 'पॉवर स्किम्स' या पहिल्याच ऑप्शनमध्ये 'टर्न ऑफ मॉनिटर' असे दिलेले असेल व त्याखाली वेळ दिलेली असेल. '२० मिनिटांनंतर' वगैरे. ती बदलून तुम्हाला हवी असेल त्याप्रमाणे सेट करू शकता. अगदी एक मिनिटांपासून ते पाच तासांपर्यंत सेटिंग करता येते. बॅकग्राऊंडला स्कॅनिंग चालूच राहील अथवा तुम्ही जी फाइल ओपन केली असेल तीही ओपनच राहील; पण मॉनिटर ऑफ असल्याने दिसणार मात्र नाही. यामुळे विजेची बचत होईल हे महत्त्वाचे

फोल्डरचा फिटनेस! 6 Mar 2009, 0106 hrs IST

आपल्याला नको असलेल्या किंवा आता अनावश्यक ठरत असलेल्या फाईल्स काढून तरी कशा टाकायच्या? आपला कोणता फोल्डर 'हेवी' झाला आहे हे कसे जाणून घ्यायचे, फोल्डरची साइज कशी समजून घ्यायची याबाबतचे काही मार्ग. त्यांचा अवलंब केला की अनेक गोष्टी सोप्या होऊन जातात...
........
तुम्हाला तुमचा कम्प्युटर कासवगतीने चालतो असे वाटते का? मग अनावश्यक फाइल्स काढून टाकण्याचे काही मार्ग आहेत. त्याबद्दल मी मागे सविस्तरपणे लिहिलेच आहे. त्यातच काही उपायांची भर टाकत आहे. काही वेळेला या अनावश्यक फाइल्स कुठे आहेत ते कळत नाही. किंवा कोणता फोल्डर 'हेवी' झाला आहे ते लक्षात येत नाही. प्रत्येक फोल्डरवर राइट क्लिक करून प्रॉपटीजवर जायचे आणि फाइल फोल्डरचा साइझ पाहात राहायचा ही बाब फारच कंटाळवाणी आणि वेळखाऊ असते. अशावेळेस मशीनमधल्या सगळ्या फोल्डरचे साइझ एकाच दृष्टिक्षेपात दिसले तर? त्यासाठी 'फोल्डर साइझ' हा प्रोग्राम डाऊनलोड करा. सध्या याची २.४ व्हर्जन उपलब्ध आहे. गूगलवर 'फोल्डर साइझ २.४' असा सर्च द्या. तिथून 'फोल्डरसाइझ२.४.एमएसआय' ही फाइल डेस्कटॉपवर डाऊनलोड करा. डाऊनलोड संपले की त्या फाइलवर डबलक्लिक करा. मग 'रन'वर क्लिक करा. पुढील सूचना पाळा की 'फोल्डर साइझ' मशीनमध्ये लोड होईल.

आता तुमच्या डेस्कटॉपवरच्या 'माय कम्प्युटर' आयकॉनवर क्लिक करा. सगळे ड्राइव्ह दिसतील. त्यातल्या कोणत्याही ड्राइव्हवर क्लिक करा. उदा. 'सी' ड्राइव्हवर क्लिक केल्यावर त्यामधले सगळे फोल्डर दिसतील. ते फोल्डरचे आयकॉन असतील. त्यात फोल्डर साइझ दिसणार नाही. मग वरती 'व्ह्यू'वर क्लिक करून खाली 'डिटेल्स'वर क्लिक करा. आता सगळे फोल्डर एकाखाली एक दिसतील व प्रत्येक फोल्डरची पूर्ण माहिती त्यासमोर दिसेल. पण एवढे करूनही 'फोल्डर साइझ' दिसत नाही हे कसे? त्यासाठी पुन्हा 'व्ह्यू'वर जा, खाली 'चूज डिटेल्स'वर क्लिक करा. तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसतील. त्यातच 'फोल्डर साइझ'चे ऑप्शन दिसेल. (नुसते 'साइझ' नाही. त्यावर क्लिक असेलच) या 'फोल्डर साइझ'वर क्लिक करा. मग 'फोल्डर साइझ' शब्दावर क्लिक करून बाजूला 'मूव्ह अप' बटनावर जा. हे ऑप्शन अगदी वरून दुसरे आणून ठेवा. ओके म्हणा की प्रत्येक फोल्डरचा साइझ दिसायला लागेल. ज्या फोल्डरमध्ये अधिकाधिक फाइल्स साठल्या असतील ते पटकन कळेल व त्या अनावश्यक असल्यास काढूनही टाकता येतील. गंमत अशी की तुम्ही वरती सांगितल्याप्रमाणे 'फोल्डर साइझ'वर जसे क्लिक करून साइझ जाणून घेऊ शकता, तसेच अन्य काही ऑप्शन्सवरही क्लिक करू शकता. उदा. फोल्डर क्रिएटेड, फोल्डर चिल्ड्रन (म्हणजे एका मुख्य फोल्डरमध्ये किती सबफोल्डर आहेत) वगैरे. याची आवश्यकता प्रत्येकाला असेलच असे नाही. पण गंमत म्हणून ही ऑप्शन्स क्लिक करून पाहा.

नको असलेल्या फाइल्स काढताना टेम्पररी फाइल्स काढणे वगैरे उपाय आहेतच. परंतु, आणखी एक उपाय आहे. 'माय कम्प्युटर'वर क्लिक करा. मग 'सी' ड्राइव्हवर राइट क्लिक करा. नंतर प्रॉपटीर्जवर जा. पहिल्याच 'जनरल' टॅबमध्ये 'डिस्क क्लीनअप' वर क्लिक करा. प्रथम एक छोटा बॉक्स दिसेल आणि त्यानंतर आपोआप मोठा बॉक्स दिसेल. त्यातील 'मोअर ऑप्शन्स'वर जा. त्यात सर्वात खाली 'सिस्टिम रिस्टोअर' ग्रूपमध्ये 'क्लीनअप' असे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा व ओके म्हणा. हार्ड डिस्कमधील सगळ्या अनावश्यक फाइल्स नाहीशा होतील. 'सिस्टिम रिस्टोअर' साफ करण्याचे दुसरे एक कारण म्हणजे कम्प्युटरमध्ये विविध कारणांनी हा पॉईंट तयार होत असतो. मशीन ज्या अवस्थेमध्ये आहे आणि त्यात जे प्रोग्राम्स आहेत, त्याची नोंद असलेला हा पॉईंट असतो. त्याचा साइझ खूप मोठा असतो. आपण सर्वात ताजा 'रिस्टोअर पॉईंट' ठेवून आधीचे सर्व डिलीट करायचे की मशीन हलके होते.

काही महिन्यांत 'विंडोज ७' ही प्रणाली येईल आणि बऱ्याचशा प्रमाणात अपयशी ठरलेल्या व्हिस्ताचे आयुष्य अकाली संपेल. ज्यांनी व्हिस्ता घेतलेले नाही आणि एक्सपीवरच प्रेम केले, त्यांनाही व्हिस्ताचे आकर्षण नाही असे नाही. प्रणाली एक्सपीचीच, पण दिसायला व्हिस्ता अशी इच्छा कोणाच्या मनात बळावली तर आश्चर्य वाटायला नको. मायक्रोसॉफ्टने ती इच्छा पूर्ण केली आहे. तसेच काही खाजगी कंपन्यांचे सॉफ्टवेअरही नेटवर उपलब्ध आहे. 'व्हिस्तामायझर' हे असेच एक सॉफ्टवेअर आहे. गूगलला सर्च देऊन ते डाऊनलोड करून घ्या आणि त्या फाइलवर डबलक्लिक करून ती 'रन' करा. तुम्हाला मशीन रिस्टार्ट करावे लागेल. रिस्टार्ट होतानाच मशीनचा लूक बदललेला दिसेल. नवा लूक अधिक आल्हाददायक असेल. 'व्हिस्ता स्टार्ट मेन्यू २.९२' हेही वेगळे सॉफ्टवेअर आहे. ते डाऊनलोड करा आणि आपल्या मशीनवरच्या 'स्टार्ट बटनावर क्लिक करा आणि बघा मेन्यू कसा दिसतो ते. हे प्रोग्राम्स नको असतील तर मायक्रोसॉफ्टने असंख्य ऑप्शन्स उपलब्ध करून दिली आहेत. गूगलवर सर्च केल्यास ते कळू शकेल.

नेटवरची वंशावळ!20 Mar 2009, 0014 hrs IST

आपली वंशावळ तयार करायची हे तसे किचकट काम आहे. आपल्याला आई-वडील, आजोबा-आजी यांची पूर्ण नावे माहीत असतात. परंतु, त्या आधीच्या पिढीतील लोकांची नावे प्रत्येकाला माहीत असतीलच असे नाही. ती माहिती मिळविलीच तर ती नीट जपून ठेवणे आणखी कष्टाचे असते. अशा वेळेस इंटरनेटवरची एक वेबसाइट कामाला येते.
.....
हल्ली वर्तमानपत्रात आपण वंशावळ, अमुक एका घराण्याचे संमेलन (म्हणजे अभ्यंकर कुलसंमेलन, दामले, रानडे कुलसंमेलन वगैरे) भरणार असल्याच्या बातम्या वाचतो. एकाच आडनावाच्या (परंतु प्रत्येकाचे नाते असेलच असे नाही) मंडळींचेसुद्धा संमेलन होते. ज्यांना नाती जपणे महत्त्वाचे वाटते अथवा ज्यांना अधिक ओळखी करून घ्यायच्या असतात किंवा वाढवायच्या असतात अशी मंडळी आवर्जून अशा संमेलनाला उपस्थित राहतात.

आपली वंशावळ तयार करायची हे तसे किचकट काम आहे. आपल्याला आई-वडील, आजोबा-आजी यांची पूर्ण नावे माहीत असतात. परंतु, त्या आधीच्या पिढीतील लोकांची नावे प्रत्येकाला माहीत असतीलच असे नाही. ती माहिती मिळविलीच तर ती नीट जपून ठेवणे आणखी कष्टाचे असते. अशा वेळेस इंटरनेटवरची एक वेबसाइट कामाला येते. तिचे नाव जेनी डॉट कॉम. (geni.com)

तुमची 'फॅमिली ट्री' म्हणजेच वंशावळ काही मिनिटांत इंटरनेटवर टाकता येते. प्रत्येकाचा ईमेल पत्ता देता येतो, प्रत्येकाचा वाढदिवस देता येतो, प्रत्येकाची माहिती देता येते आणि कुटुंबात एखादा कार्यक्रम असला तर त्याचे निमंत्रणही या साइटवर देता येते. (टपालाने पत्रिका पाठवल्या आणि त्या मिळाल्या नाहीत वगैरे भानगडच नाही). हे करणे अगदी सोपे आहे. इंटरनेट ब्राऊझरमध्ये जेनी.कॉम उघडा. समोर येईल त्या बॉक्समध्ये केवळ तुमचे पहिले नाव आणि आडनाव लिहायचे आहे. ओके म्हणा की झाली वंशावळ लिहिण्याची सुरुवात. मग तुमचे आईवडील, त्यांचे आईवडील, त्यांची मुलेबाळे (म्हणजे तुमच्या आत्या, काका) या सगळ्यांची माहिती तिथे देता येईल. प्रत्येक नावाच्या बाजूला तीन बाण दिसतील. त्यातील प्रत्येकावर क्लिक करून त्या व्यक्तीच्या नातेवाईकांची आणखी माहिती भरता येईल. प्रत्येकाची जन्मतारीख देता येईल.

मुख्य पानावर गेलात की वरच्या बाजूला होम, ट्री, प्रोफाइल, टाइमलाइन, फोटोज आणि व्हीडिओज असे टॅब दिसतील. यातील प्रत्येक टॅब उघडून पाहा. त्यात अनेक सोयी आहेत. वंशावळ कोणत्या फॉर्ममध्ये दिसायला हवी, प्रत्येकाचा फोटो अॅड करायचा असला तर कसा करायचा, एखाद्या कौटुंबिक कार्याचा व्हीडिओ लोड करायचा असला तर तो कसा करायचा याच्या स्पष्ट सूचना यावर पाहायला मिळतील. तुम्ही प्रत्येकाची जन्मतारीख दिलीत आणि टाइमलाइनवर क्लिक केलेत की तुमच्या घराण्यात जन्मलेली पहिली व्यक्ती कोण हे समजेल. (तुमच्या आजोबा-आजीच्या जन्मतारखा माहीत असतील, पण त्या आधीच्या प्रत्येक माणसाच्या जन्मतारखा आणायच्या कुठून? त्यासाठी घरातील ज्येष्ठांची मदत घ्यावी लागेल.) तसेच कॅलेंडरवर क्लिक केलेत की वर्षभरात कोणाचे वाढदिवस कधी येतात ते कळेल. त्याचा एकदा प्रिंटआऊट काढून ठेवला की काम झाले. एखाद्या नव्या कुटुंबीयाची भर पडली तरच साइटवरच्या 'ट्री'मध्ये बदल करावा लागेल. एखाद्याचा मृत्यू झाला तर तसाही बदल करता येईल.

एकदा तुम्ही ही 'ट्री' बनवायला सुरुवात केलीत की प्रत्येकाचे मूळ शोधण्याचा छंदच लागेल आणि सुरुवातीला केवळ स्वत:चे व पत्नी, मुलांचे डिटेल्स देण्यासाठी सुरू केलेली वंशावळ आणखी विस्तारत जाईल. नातेवाईक व मित्रांचे वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी गुगल कॅलेडरचा चांगला उपयोग होऊ शकतो. या कॅलेडरमध्ये सेटिंग केलेत की तुमच्या मोबाइलवर वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मेसेज येतो. मग तुम्ही लगेचच इतरांच्या आधी त्याला शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही इंटरनेटवर जाऊन 'बिल्डिंग फॅमिली ट्री ऑन वेब' असा सर्च दिलात तर असंख्य साइटची माहिती मिळेल. प्रत्येकाचे काही प्लस/ मायनस पॉईंट असतातच. पण मला तरी जेनी.कॉम ही अगदी सामान्यांनाही वापरायला सुलभ राहील अशी शक्यता वाटते.

ही कॅलेंडरंही अनेक प्रकारची असतात. याहू आणि एमएसएनने स्वत:चे कॅलेंडर नेटवर ठेवले आहे. 'सनबर्ड' नावाचे मोझिला ग्रूपने काढलेले कॅलेंडर खास याच गोष्टीसाठी काढलेले आहे. या 'सनबर्ड'मध्ये खूप अतिरिक्त सोयी आहेत. ही सगळी कॅलेंडर्स चकटफू आहेत. सनबर्ड एकदा लोड करून पाहा. पण मला वापरायला सुलभ म्हणून गूगल कॅलेंडरच आवडते. कॅलेंडरवर कमी तपशील मावतो असे वाटले तर ब्लॉगद्वारे तुम्ही डायरीही ठेवू शकता. पण कॅलेंडरमधल्या बऱ्याच सोयी ब्लॉगमध्ये नसतात.