photo

Wednesday, July 30, 2008

करिअर कम्प्युटर क्षेत्रातलं

कम्प्युटरचा वापर होत नाही, असं क्षेत्र शोधूनही सापडणार नाही. विद्यार्थ्यांपासून प्रोफेशनल्सपर्यंत प्रत्येकाकडे स्वतंत्र कम्प्युटर आज दिसून येतो. कम्प्युटरच्या वापरात जसजशी वाढ होत जाईल, तशी हार्डवेअर प्रोफेशनल्सची गरज आणि मागणीही वाढेल.

अलिकडेच झालेल्या एका सवेर्क्षणानुसार २००० ते २०१० दरम्यान कम्प्युटर आणि हार्डवेअरशी संबंधित क्षेत्रांत झपाट्याने वाढ होणार आहे. त्यामुळे २००९च्या अखेरपर्यंत एक लाख ३७ हजार नेटवर्क इंजिनीअर्सची उणीव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

सध्या कम्प्युटरवर काम होत नाही असे एकही कार्यालय सापडणार नाही. याव्यतिरिक्त घर, शाळा, कॉलेज प्रत्येक ठिकाणी कम्प्युटरचा वापर वाढला आहे. नव्हे, कम्प्युटरला पर्याय उरलेला नाही. थोडक्यात, दैनंदिन कामं, मग ती कार्यालयीन असोत किंवा वैयक्तिक, कम्प्युटरमध्ये बिघाड झाला की सगळंच ठप्प होतं. बँका किंवा सरकारी कार्यालयांतील कम्प्युटर बंद पडले तर काय परिस्थिती ओढवते हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. अशा स्थितीत हार्डवेअर प्रोफेशनल्सची गरज पडते. कार्यालयातील सर्व कम्प्युटर्स नेटवर्कच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले असतात. एकंदरीतच कम्प्युटर इन्स्टॉलेशन ते मेंटेनन्स आणि दैनंदिन काम व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी हार्डवेअर इंजिनिअरवर असते.

हार्डवेअर इंजिनीअर होण्यासाठी दोन प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हार्डवेअर आणि बेसिक नेटवकिर्ंग. हार्डवेअरशी संबंधित अभ्यासक्रमात कम्प्युटरच्या विविध भागांविषयी माहिती दिली जाते. या क्षेत्रात ए-प्लस सटिर्फिकेट कोर्सची मागणी सर्वाधिक आहे. हा अभ्यासक्रम दोन भागांत शिकविला जातो. ए-प्लस कोर हार्डवेअर एग्झाम आणि ए-प्लस कोर ऑपरेटिंग सिस्टीम एग्झाम. बेसिक नेटवकिर्ंग अंतर्गत मायक्रोसॉफ्ट विंडोज २००३, सर्वर सटिर्फिकेशन, एमसीएसई प्रमाणपत्रही मिळविता येते.

हार्डवेअर इंजिनीअर किंवा सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेटर होण्यासाठी दोन्ही अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे. नेटवकिर्ंगमध्ये आणखी पुढचा टप्पा गाठण्यासाठी आणखीही काही कोसेर्स करावे लागतात. जसे लॅन (लोकल एरिया नेटवकिर्ंग) आणि वॅन (वाईड एरिया नेटवकिर्ंग). या प्रकारचे सर्व अभ्यासक्रम सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये शिकवले जातात. शिवाय ऑनलाईन स्टडी मटेरियलच्या माध्यमातूनही हे कोर्स करता येतात. नेटवकिर्ंग कोर्स केल्यानंतर कम्प्युटर सपोर्ट स्पेशॅलिस्ट, हेल्प डेस्क टेक्निशियन नेटवर्क किंवा सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर, कम्प्युटर सिक्युरिटी स्पेशालिस्ट म्हणून करियर करता येतं.

No comments: