photo

Saturday, July 26, 2008

फायन्स क्षेत्रात सुवर्णसंधी

18th July, 2008

फायन्स क्षेत्रात उत्तम करिअर घडवण्याची प्रचंड संधी आहे. देशातील नामांकित तसंच सरकारी संस्थांमध्ये फायनान्सशी संबंधित विविध कोसेर्स चालवले जातात. नागपुरातही अर्थातच त्याची सोय आहे.

व्यवसायातील चढउतार, समभागाच्या किमतीत वाढ झाली असो वा घट, प्रत्येक परिस्थितीत फायनान्स क्षेत्राचं महत्त्व अबाधित आणि कायम टिकून असतं. जागतिकीकरणामुळे व्यावसायिक क्षेत्रात प्रचंड आणि झपाट्याने बदल घडून आल्याचं दिसून येतं. गेल्या दहा वर्षांत व्यवसाय क्षेत्रात झालेली वाढ आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातील आगमनानंतर रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण झाल्या त्या फायनान्स क्षेत्रातच. एवढंच नव्हे तर दुसऱ्या देशांमध्ये गुंतवणूक करण्याची प्रत्येक देशात जणू स्पर्धाच लागली असल्याचं चित्र दिसून येतंय. एका सवेर्क्षणानुसार, मागील पाच वर्षात फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या सर्वाधिक संधी निर्माण झाल्या आहेत. फायनान्स क्षेत्रात प्रचंड संधी असली तरी प्रशिक्षित तरुणांनाच तिथं प्रवेश दिला जातो, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. विशेष उल्लेखनीय म्हणजे जगात विमाक्षेत्राची उलाढाल अब्जावधी रुपयांत आहे. भारताव्यतिरिक्त अमेरिकेत अंदाजे अडीच कोटी प्रोफेशनल्स या व्यवसायात आहेत.

गेल्या वषीर् शेअरच्या किमती जबरदस्त वाढल्या आणि घटल्यासुध्दा. फायनान्स क्षेत्रातील अशा प्रकारच्या चढउतारांचा अंदाज बांधता येईल अशा प्रशिक्षित तरुणांची निकड मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असल्याने एकप्रकारे ही सुवर्णसंधीच म्हणायला हवी. बँकेत गुंतवणूक, फायनान्स व्यवस्थापन, प्रॉपटीर्, संयुक्त वित्त योजना आणि विमा क्षेत्रात तर फायनान्सचे एकछत्री राज्य आहे. यामुळे प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञांची गरज निर्माण झाली आहे.

फायनान्स क्षेत्रविषयक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. बँका आणि विमा क्षेत्रात परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रोजगाराच्या प्रश्ानची बोच काहीशी कमी झाली आहे. क्रेडिट रेटिंग डेट, माकेर्ट रियल इस्टेट, कन्सल्टन्सी, आयटी कंपन्या, गुंतवणूक, बँका, सॉफ्टवेअर कॉल सेंटर, बीपीओ यासारख्या कितीतरी क्षेत्रात मॅनेजमेंट ट्रेनी, असिस्टंट मॅनेजर, सल्लागार, असोसिएट, व्हाइस प्रेसिडेंट आदी पदांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. इंजिनीअरिंगबरोबर मॅनेजमेंटची माहिती असणाऱ्या प्रोफेशल्सकडे 'प्रोजेक्ट मॅनेजर' म्हणून बघितलं जातं. उपरोक्त पदांसाठी सध्या 'कॅम्पस प्लेसमेंट' या माध्यमातून विविध कंपन्या वाषिर्क सहा ते आठ लाख रुपये पॅकेजवर हुशार विद्यार्थ्यांची निवड करतात. सरकारी तसंच खासगी क्षेत्रात फायनान्सशी संबंधित व्यक्तीच्या वेतनात फरक असतो. तरीसुध्दा सुरुवातीला दरमहा दहा-पंधरा हजार रुपये सहज मिळतात.

नागपुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध कॉलेजांमध्ये फायनान्सशी संबंधित कोसेर्स चालवले जातात. शिवाय, आयसीएफएआय, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, मणिपााल विद्यापीठ आणि दूरशिक्षण आयोगाची मान्यता असलेल्या संस्थांमध्ये पायनान्सशी संबंधित अभ्यासक्रम चालवले जातात.

No comments: