photo

Saturday, July 26, 2008

'आव्हाने स्वीकारणाऱ्यांनाच 'आयटी'त यश'

23rd July. 2008

' दैनंदिन जीवनातील वस्तूंचा संबंध आयटीशी आहे. भविष्यात या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे. त्यामुळे नवनवी आव्हाने स्वीकारायची उर्मी असलेल्यांना या क्षेत्रात यशस्वी होता येईल', असे प्रतिपादन कोर्ट इन कम्प्युटरचे एम. डी. महेंद कुलकणीर् यांनी मंगळवारी केले. 'मटा'चे प्रगती फास्ट मॅगझिन आणि जेटकिंगने आयोजित केलेल्या 'करिअरला द्या नवी दिशा' या सेमिनारमध्ये कुलकणीर् आणि मैत्रयी आयटी सव्हिर्सिंगचे एम. डी. उत्तम बर्धन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रगती फास्ट मॅगझिनच्या प्रकाशनानिमित्त प्रभादेवीतील रवींद नाट्यमंदिरात हा सेमिनार आयोजित केला होता. यावेळी मॅगझिनचे कौतुक करताना जेटकिंगचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर नंदू भारवानी म्हणाले : या मॅगझिनने नेहमीच चाकोरीबाहेरील करिअरचा वेध घेतला आहे. नवनव्या करिअरची माहिती तरुण पिढीपर्यंत पोहोचवली आहे. तरुणांचा मित्र होऊन त्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे हे मॅगझिन विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारे आहे.

जेटकिंग, विद्यार्थ्यांना केवळ कम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवकिर्ंगचे शिक्षण न देता त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवून आत्मविश्वास देते. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी शिदोरी असते, असे सांगून भारवानी यांनी प्रगती फास्ट मॅगझिनच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बर्धन म्हणाले की, जेटकिंगच्या मुशीतून तयार झालेला विद्यार्थ्यांचा पाया मजबूत असतो. आवश्यक ते प्रशिक्षण देऊन त्यांची तयारी करून घेतली जाते.

यावेळी व्यासपीठावर 'मटा'चे रिस्पॉन्स हेड संजय सॅमसन, जेटकिंगचे टेक्नॉलॉजी हेड गुरूप्रसाद शेणॉय आणि प्रगती फास्ट मॅगझिनच्या संपादिका कल्पना राणे उपस्थित होते. या सेमिनारमध्ये आयटी क्षेत्रातील बूम, त्यातील रोजगाराच्या संधी आणि भविष्यकाळातील वाढती मागणी, अशा मुद्द्यांवर पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन करण्यात आले. सेमिनारमध्ये मनोरंजनात्मक खेळ, मेंदूला ताण देणारे प्रश्न यांचाही समावेश होता.

No comments: