photo

Wednesday, July 30, 2008

क्रिएटिव्ह अॅण्ड कलरफूल

अॅनिमेशन, मल्टिमीडिया, ग्राफिक डिझायनिंग हे शब्द आता विद्यार्थ्यांसाठी नवे राहिलेले नाहीत. यापैकी एखाद्या क्षेत्रात करिअर घडवण्याची, काहीतरी कोर्स करण्याची इच्छा सर्रास कानावर पडते. या क्षेत्राची व्याप्ती आणि त्यासाठी असलेला वाव आता लक्षात येऊ लागलाय, त्यामुळे असेल कदाचित. २०११ पर्यंत हे क्षेत्र २४ अब्ज डॉलरपर्यंत विस्तारेल असा अंदाज एका पाहणीत वर्तवण्यात आलाय. पण हे क्षेत्र वाढेल म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये आपल्याला काय संधी आहेत त्याविषयी जाणून घेऊ या.

........

ग्राफिक डिझायनर :

लोगो, माहितीपत्रक, न्यूजलेटर, पोस्टर्स, साइन आदी तयार करण्यासाठी ग्राफिक डिझायनर अक्षरं आणि ग्राफिक्स यांचा सुरेख मेळ घालतात. वर्तमानपत्रं, मासिकं, टीव्ही चॅनल, विविध कॉपोर्रेट हाऊसेस अशा ठिकाणी त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे. इन-हाऊस पब्लिसिटी आणि कम्युनिकेशन साहित्य तयार करण्यासाठी, तसंच कॉपोर्रेट प्रेझेण्टेशन तयार करण्यासाठी ग्राफिक डिझायनरची गरज भासते. कपडे आणि दागिने तयार करणाऱ्या कंपन्यांमध्येही त्यांची आवश्यकता असते. उत्तम ग्राफिक डिझायनर होण्यासाठी फोटोशॉप, कोरल ड्रॉ, इनडिझाइन/पेजमेकर/क्वार्क एक्स्प्रेस आदी मल्टिमीडिया टूल्स आणि सॉफ्टवेअरचं ज्ञान असलं पाहिजे.

व्हिज्युअलायजर :

प्रिण्ट मीडियामध्ये व्हिज्युअलायजरची भूमिका महत्त्वाची असते. संबंधित मजकुरासाठी व्हिज्युअलायजर काही संकल्पना आखतो आणि ती ग्राफिकच्या साहाय्याने दाखवण्यासाठी फोटोशॉप, इलस्ट्रेटर, कोरल ड्रॉसारख्या सॉफ्टवेअरचा वापर करतो. व्हिज्युअलायजर मासिकं, कव्हरपेज, जाहिराती, वर्तमानपत्रं, आदी तयार करतो.

टू-डी अॅनिमेटर :

कॅरेक्टर डिझाइन, क्लीन अप, डॉपिंग, मॉडेलिंग, स्लगिंग, स्टोरीबोडिर्ंगसाठी काम करावं लागत असल्याने टू-डी अॅनिमेटर विविध प्रकारच्या भूमिका बजावतात. लाइफ ड्रॉइंग, कॉम्पोझिशन आणि पस्पेर्क्टिव कोसेर्सच्या माध्यमातून प्रमाणबद्धता, संरचना, आदी शिकून अॅनिमेटर आपली कौशल्यं विकसित करतात.

थ्री-डी अॅनिमेटर :

थ्री-डी अॅनिमेटरना बऱ्याच अंशी टू-डी अॅनिमेटरची कामं करावी लागतात. थ्री-डी अॅनिमेटर त्रीमितीय मॉडेलिंग, टेक्स्चरिंग, लाइटिंग करावं लागतं. त्यासाठी त्यांना फोटोशॉप, सॉफ्ट इमेज, अॅलियास/वेव्हफ्रण्ट, माया, मॅक्स अशा सॉफ्टवेअरचा वापर करावा लागतो. थ्री-डी अॅनिमेटरनाही लाइफ ड्रॉइंग, कॉम्पोझिशन, कन्सेप्ट ड्रॉइंग, कॅरेक्टर डिझाइन माहीत असावं लागतं.

स्टोरीबोर्ड आटिर्स्ट :

स्टोरीबोर्ड आटिर्स्ट स्टोरीबोर्ड तयार करण्यासाठी स्क्रिप्ट उलगडून दाखवतो. सर्वसामान्यांसाठी हा स्टोरीबोर्ड म्हणजे चित्रातून व्यक्त केलेली संहिता असते. जसं की, विनोदी चित्रकथा.

यामध्ये, दृश्यं ठरवणं, कथा चित्ररूपात मांडणं आणि दृश्यांमध्ये सुसूत्रता राखणं, यांचा समावेश असतो. कटिंग, पेस्टिंग, ड्रॉइंग, स्केचिंग, पस्पेर्क्टिव, कॉम्पोझिशन, कथा पुढे नेणं ही स्टोरीबोर्ड आटिर्स्टची कामं असतात.

करिअरचा विचार करता, स्टोरीबोर्ड आटिर्स्ट सहायक म्हणून करिअर सुरू करतो. तेव्हा तो क्लीन अप आणि रिव्हिजनशी निगडित असतो. नंतर हळूहळू तो कथेचे छोटे छोटे भाग मार्गदर्शनाखाली तयार करू लागतो. त्यानंतर मात्र तो स्वतंत्रपणे काम सांभाळतो.

लेआऊट आटिर्स्ट :

अॅनिमेट करता यावं म्हणून अॅनिमेटरना कथेतील पात्र आणि इफेक्ट्स तयार करण्याचं काम लेआऊट आटिर्स्टचं असतं. प्रत्येक दृश्यासाठी पार्श्वभूमी देऊन एक पाया तयार करण्याची जबाबदारी लेआऊट आटिर्स्ट पार पाडतात. त्यासाठी ते स्टोरीबोर्डचा संदर्भ घेतात. ते पंच्ड अॅनिमेशन पेपरवर ग्रफाइट पेन्सिल वापरतात. ब्लूप्रिंट किंवा अण्डरड्रॉइंग म्हणून याचा वापर होतो. बॅकग्राऊण्ड पेण्टर्स नंतर त्यामध्ये रंग भरतात. अंतिम चित्रात मात्र हे लेआऊट कुठेच दिसत नाहीत. पात्रांची जागा ठरवण्यासाठी त्याची आवश्यकता असते.

इनबिटवीनर :

अॅनिमेटर आणि सहायकांना एखाद्या दृश्यातील हालचाली पूर्ण करण्यासाठी मदत करणारी व्यक्ती म्हणजे इनबिटवीनर. सर्वसाधारणपणे, अॅनिमेशन आटिर्स्ट इनबिटवीनर म्हणून करिअरला सुरुवात करतात. अॅनिमेशनमधील प्राथमिक बाबी आणि व्यावसायिक कौशल्यं आत्मसात करण्यासाठी इनबिटवीनर म्हणून काम करणं गरजेचं ठरतं. इनबिटवीनर आटिर्स्ट दोन मुख्य चित्रांमधील ट्रान्झिशन ड्रॉइंग तयार करतात. अॅनिमेशनसंबंधीच्या हालचाली यावरच अवलंबून असतात.

सीबीटी डेव्हलपर :

सीबीटी म्हणजे कम्प्युटर-बेस्ड ट्रेनिंग. हा शिक्षणाचाच एक प्रकार असून त्यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम कम्प्युटरवर आधारित असतो. अॅनिमेशन आणि मल्टिमीडिया शिकलेली व्यक्ती विविध कंपन्यांमध्ये किंवा स्वतंत्रपणे सीबीटी डेव्हलपर म्हणून काम करू शकते. सीबीटी कम्प्युटर अॅप्लिकेशनबरोबर शिकता येत असल्याने कम्प्युटर अॅप्लिकेशन शिकण्यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी ठरतं. सीबीटीला ट्युटोरिअल असंही म्हटलं जातं.

वेब डिझायनर :

कन्सेप्च्युअलायझेशन, प्लानिंग, मॉडेलिंग आणि वेबसाइट किंवा इण्टरनेट साइट तयार करणं, हे प्रामुख्याने वेब डिझायनरचं काम असतं. या इलेक्ट्रॉनिक फाइल वेब र्सव्हरमध्ये साठवल्या जातात. नंतर त्या वेब पेजच्या स्वरूपात बघता येतात. उत्तम काम करण्यासाठी वेब डिझायनरला ग्राफिक्स, अॅनिमेशन टूल्स, रंगांची निवड, कण्टेण्ट क्रिएशन, एचटीएमएल/एक्सएमएल ऑथरिंग, फ्लॅश, जावा स्क्रिप्ट याबाबतीतलं तांत्रिक ज्ञान असणं अत्यावश्यक आहे. आटिर्स्टना पर्ल, पीएचपी, एएसपी, जेएसपी, कोल्डफ्युजन अशा स्क्रिप्ट लँग्वेजही शिकाव्या लागतात.

स्पेशल इफेक्ट्स डिझायनर :

स्पेशल इफेक्ट्स एसपीएफएक्स किंवा एसएफएक्स नावाने ओळखले जातात. दृश्यामध्ये जिवंतपणा यावा तसंच ते अगदी प्रभावी व्हावं म्हणून सॉफ्टवेअरच्या साहाय्याने स्पेशल इफेक्ट्स दिले जातात. मनोरंजन क्षेत्रात एसएफएक्स मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याने जगभरात स्पेशल इफेक्ट्स आटिर्स्टना मोठी मागणी आहे. स्पेशल इफेक्ट्स प्रोफेशनल्सना सर्वसाधारण मल्टिमीडिया साधनांबरोबरच अन्य अनेक स्पेशल इफेक्ट्सची साधनंही माहीत असावी लागतात. एसएफएक्स दृश्य प्रभावी व्हावं म्हणून त्याला पारंपरिक थिएटर इफेक्ट्सपासून आधुनिक कम्प्युटर ग्राफिक्स इमेजरीपर्यंतचं ज्ञान असावं लागतं.

फिल्म एडिटर :

फिल्म एडिटिंग, व्हीडिओ एडिटिंग दोन प्रकारचं असतं - लीनिअर आणि नॉन-लीनिअर. अॅव्हिड, फायनल कट प्रो, व्हेलॉसिटी, झेडएस-४ व्हीडिओ एडिटर अशी व्हीडिओ एडिटिंग टूल शिकून या क्षेत्रात प्रवेश करता येईल.

कॅरेक्टर डिझायनिंग :

कॅरेक्टर डिझायनर पात्र तयार करतो. अॅनिमेशन करण्यासाठी कलात्मक दृष्टी आणि तांत्रिक माहिती असावी लागते. कॅरेक्टर अॅनिमेटर कागदावर प्रत्यक्ष दृश्यावर काम करतो.

कन्सेप्ट आटिर्स्ट :

कन्सेप्ट आटिर्स्ट डिजिटल ड्रॉइंग किंवा नैसगिर्क माध्यमांनी व्हिज्युअल तयार करतो. दिग्दर्शकाच्या संकल्पना प्रत्यक्षात साकारायचा आटिर्स्टचा प्रयत्न असतो.

मोशन ग्राफिक आटिर्स्ट :

मोशन ग्राफिक आटिर्स्ट अक्षरं, इमेज आणि कम्प्युटरवर आधारित कण्टेण्ट वापरून चित्रपटासाठी टायटल बनवण्यासारखी कामं करतो.

मॅटे पेण्टर :

मॅटे पेण्टर पार्श्वभूमीची जबाबदारी घेतो. ही पार्श्वभूमी डिजिटली वापरली जाते. त्यासाठी फोटोशॉप किंवा पेण्टरसारखी सॉफ्टवेअर वापरली जातात.

कम्पोझिटर :

पार्श्वभूमी, ऑब्जेक्ट, लाइव्ह अॅक्शन फूटेज असे सर्व घटक एकत्र एका लेयरमध्ये आणण्याचं आणि नंतर ते आकर्षकरीत्या मांडण्याचं काम कम्पोझिटरचं असतं.

टेक्स्चर आणि लायटिंग आटिर्स्ट :

कथेतील पात्राला त्याची ओळख, व्यक्तिमत्त्व आणि जिवंतपणा आणण्यासाठी टेक्स्चर आणि लायटिंग आटिर्स्ट टेक्स्चर आणि लायटिंग इफेक्ट्सचा वापर करतो. ते विशिष्ट स्टाइल, वातावरणही तयार करतात.

वरील सर्व गोष्टी अॅनिमेशन आणि मल्टिमीडिया क्षेत्रातील व्यक्ती करू शकते. सुरुवातीला दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं. अनुभवानुसार ते पन्नास हजार रुपयांवरही जातं. स्वत:चा व्यवसाय असेल तर या क्षेत्रामध्ये प्रंचड वाव आहे.

या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घ्यायला हवं. या क्षेत्रात मागणी खूप आहे आणि घेण्यासारखं तांत्रिक ज्ञानही. या ज्ञानात सतत वाढ होत असते. म्हणूनच अरेना अॅनिमेशन अॅकॅडमीने अरेना अॅनिमेशन अॅकॅडमी स्पेशलिस्ट प्रोग्राम (एएएसपी) सुरू केला आहे. या क्षेत्रासाठी आवश्यक सर्व कौशल्यांचा त्यामध्ये समावेश आहे, शिवाय अॅनिमेशनमधील प्रशिक्षण आणि सर्जनशीलतेवर भर दिला आहे. या क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम तयार केला असल्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना या क्षेत्राविषयी इत्थंभूत माहिती मिळेल, असं अरेना अॅनिमेशनचे ग्लोबल हेड आर. कृष्णन यांनी सांगितलं.

No comments: