photo

Saturday, July 26, 2008

बँकेच्या परीक्षेची पूर्वतयारी

गॅज्युएट झाल्यावर वर्तमानपत्रांतून येणाऱ्या निरनिराळ्या बँकांच्या जाहिराती आपलं लक्ष वेधायला सुरुवात करतात. पुढच्या शिक्षणाचा विचार असला तरी बँकेतली नोकरी ही नेहमीच पदवीधरांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. बँकेच्या परीक्षा देताना नेमकी काय पूर्वतयारी करावी याविषयी...

......

हल्ली बँकेची नोकरी ही पूवीर्प्रमाणे आरामाची नोकरी राहिलेली नाही. कोर बँकिंग सिस्टम, कामाचे वाढलेले तास, स्पधेर्चं युग असल्याने नव्याने सुरू झालेली ८ ते ८ बँकिंग सेवा तसंच सातही दिवस अखंडित सेवा यामुळे बँकेची नोकरीही इतर नोकऱ्यांसारखीच हेक्टिक जॉब झालीए. तरीही एलआयसी, बँक या नोकऱ्या सर्वांच्याच आकर्षणाचा विषय आहेत. सिक्युअर्ड जॉब म्हणून बँकेतील नोकरीचा विचार केला जातो. हल्ली रिझर्व बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, देना बँक, अलाहाबाद बँक, एन केजीएसबी, शामराव विठ्ठल सहकारी बँक अशा विविध बँकांच्या नोकरीसाठी वर्तमानपत्रात जाहिराती दिसतात. मुलंही पटापट फॉर्म्स भरून पाठवतात. मग इतका खर्च करून फॉर्म्स भरल्यावर परिक्षेची पूर्वतयारी करणं तितकंच महत्त्वाचं आहे.

या परीक्षा म्हणजे अॅप्टिट्यूड टेस्ट असतात. प्रश्नपत्रिका पूर्णपणे ऑब्जेक्टिव असते. काही बँकाच्या परीक्षेत मात्र निबंधलेखन किंवा उताऱ्यावरून प्रश्नोत्तरंही समाविष्ट करतात. ही परीक्षा २०० मार्कांची असते. त्यासाठी वेळ असतो एक तास ४५ मिनिटं. म्हणजेच वेळ, वेग आणि अचूकता महत्त्वाची. या ऑब्जेक्टिव प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नाची चार ते पाच संभाव्य उत्तरं दिलेली असतात. आपल्याला फक्त अचूक उत्तर शोधून त्याला खूण करायची असते. चार विषयांचे प्रत्येकी ५० प्रश्न असतात. पेपर पूर्ण होण्यासाठी आणि परीक्षा पास होण्यासाठी अगोदर प्रत्येक विषयाचे किमान २० प्रश्न सोडवण्याचं टागेर्ट ठेवलं पाहिजे. मग वेळेचा अंदाज घेऊन इतर पेपर पूर्ण करावा. राष्ट्रीयकृत बँकेच्या परीक्षेत निगेटिव माकिर्ंगची पद्धत असते हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे.

टेस्ट ऑफ रिझनिंग म्हणजे लॉजिक, टेस्ट ऑफ न्युमरिकल अॅप्टिट्यूड म्हणजे गणित, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्रजी व्याकरण आणि टेस्ट ऑफ क्लेरिकल अॅप्टिट्यूड म्हणजे सामान्यज्ञान हे विषय या परीक्षेत समाविष्ट केलेले आहेत.

काही राष्ट्रीयकृत बँका टेस्ट ऑफ कम्प्युटर अॅप्टिट्यूडचाही पेपर ठेवतात. त्यामध्ये कम्प्युटरची बेसिक माहिती असणं आवश्यक असतं. तांत्रिक बाबींवरचे प्रश्न विचारले जात नाहीत. टेस्ट ऑफ न्युमरिकल अॅप्टिट्यूड ही गणिताची परीक्षा असते. क्लेरिकल पदासाठी असलेल्या परीक्षेत दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम तर प्रोबेशनरी ऑफिसर ग्रेडसाठी असलेल्या परीक्षेत थोड्या वरच्या अभ्यासक्रमाचा समावेश असतो. गणितासाठी नफा-तोटा, काळ-काम-वेग, चक्रवाढव्याज, सरळव्याज, सरासरी, घनमूळ, वर्गमूळ, टक्केवारी, गुणत्तोर इत्यादी अभ्यासक्रम असतो.

इंग्रजीची प्रश्नपत्रिका पूर्णपणे व्याकरणावर आधारित असते. समान अथीर् आणि विरुद्ध अथीर् शब्द, गाळलेल्या जागा भरा, वाक्य पूर्ण करा, काळ ओळखा इत्यादी प्रश्नोत्तरांवर आधारित ही प्रश्नपत्रिका असते.

सामान्यज्ञान या विषयावरील प्रश्नपत्रिकेसाठी मात्र राजकारण, समाजकारण, क्रीडा, आथिर्क, भौगोलिक या विषयांवरील माहिती असणं आवश्यक आहे. चालू घडामोडींविषयी स्वत:ला अपडेट ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे नियमित वर्तमानपत्र वाचन हवं.

राष्ट्रीयकृत बँकांची प्रोबेशनरी आफिसर्ससाठी परीक्षा जेव्हा ठरते तेव्हा त्यात बऱ्याचदा वर्गवारीही केली जाते. साधारणपणे र्फस्ट क्लास ग्रॅज्युएट झालेल्यांकडून अर्ज मागवले जातात. परंतु आयटी आणि अॅग्रिकल्चर डिपार्टमेण्टसाठी मात्र या विषयात प्रविण्य असणं महत्त्वाचं असतं. तसंच एमबीए, सीए, कॉस्ट अकाउण्टण्ट यांना असिस्टण्ट मॅनेजर वगैरे पदांसाठी बोलावण्यात येतं.

नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग ही संस्था दादरला बँकांच्या परीक्षा या विषयावरचे क्लासेस घेते. याशिवाय 'कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू' या पुस्तकातील निरनिराळ्या अॅप्टिट्यूड टेस्ट, स्टडी सर्कलतफेर् प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकातील माहिती आणि जुने सराव पेपर्सही खूप उपयुक्त ठरतात. प्रो. एस. चांद, प्रो. आर. गुप्ता यांची बँकेच्या सराव परीक्षांवरील पुस्तकंही उत्तम मार्गदर्शक आहेत. वेग आणि अचूकता हाच या परीक्षेतील यशाचा मूलमंत्र असल्यामुळे वेगवेगळ्या पुस्तकातील प्रश्नपत्रिका वारंवार सोडवून सराव करणं गरजेचं असतं.

बँकेत नोकरी मिळवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मुलांसाठी आजकाल पदवीधर झाल्यानंतरही अनेक कोसेर्स उपलब्ध आहेत. बीकॉम झाल्यानंतर डिप्लोमा इन बँकिंग अॅण्ड फायनान्स हा एक वर्षाचा करस्पॉण्डन्स कोर्सही त्यापैकी एक.

ज्यांनी येत्या काही महिन्यातील बँकाच्या परीक्षेसाठी अर्ज भरलेत त्यांनी आता कसून सरावाला सुरुवात करा. वेग आणि अचूकता साधायची असल्यामुळे बँकेच्या परीक्षांसाठी सराव महत्त्वाचा असतो.

..............

* बँकेत जॉब लागल्यावर बँक एम्ल्पॉयर्सना प्रमोशनसाठी आणि इन्क्रिमेण्टसाठी जेआयआयबी, सीआयआयबी या परीक्षा देता येतात.

* ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी प्रॉम्प्टनेस आणि कस्टमर रिलेशनशिपची कौशल्यं आत्मसात करावी लागतात.

No comments: