photo

Saturday, July 26, 2008

आय.टी. क्षेत्रातही करिअरच्या संधी

' नास्कॉम'च्या अंदाजानुसार येत्या काही वर्षांत फक्त भारतात १० लाखांपेक्षा जास्त आयटी प्रोफेशनल्सची गरज भासणार आहे. असं असताना उपलब्धता मात्र गरजेच्या फक्त पाच टक्के इतकीच आहे. यामुळे आयटी क्षेत्रात करिअर करण्याची जबरदस्त संधी आहे.

.......

अमेरिकेत मंदीचं वातावरण निर्माण झाल्यानंतर आयटी क्षेत्रातील नोकरीच्या संधी कमी होतील अशी भीती निर्माण झाली होती. पण हे सत्य नाही. अमेरिकेत निर्माण झालेली परिस्थिती तात्पुरती होती. खरं म्हणजे आयटी क्षेत्राची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. बारावी पास तरुणांना टेक्नीकल आणि नॉन टेक्नीकल अशा दोन्ही क्षेत्रांत उत्तम करिअर घडवण्याची संधी आहे.

इन्फमेर्शन टेक्नॉलॉजीत करिअर करायचा विचार असेल तर विपूल प्रमाणात पर्याय आणि रोजगार उपलब्ध आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक प्रकारच्या इंडस्ट्रीत काम करण्याची मुभा या क्षेत्रात आहे. संपूर्ण जग तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. 'इन्फमेर्शन टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ अमेरिका' अहवालानुसार आयटी क्षेत्रातील ९२ टक्के कर्मचारी नॉन आयटी कंपन्यांत काम करतात.

मिहानमध्ये येऊ घातलेल्या आयटी पार्कमध्ये विविध प्रकारच्या विभागात विविध प्रकारचे जॉब निर्माण झालेले आहेत. आयटी म्हटलं की टेक्निकलसंबंधीत गोष्टीच लक्षात येतात. पण आयटी क्षेत्र तेवढ्यापुरतंच मर्यादित नाही. नॉन टेक्निकल विभागातदेखील करिअर घडवण्याची संधी आयटी इंडस्ट्रीने प्रदान केली आहे. पण यासाठी पदवीधर असणं आवश्यक आहे. परदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना हवं असणारं सॉफ्टवेअर विकसित करण्याचं काम नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर होतं. कंपन्यांना त्यांच्या कामानुसार सॉफ्टवेअर विकसित करून द्यावं लागतं. सॉफ्टवेअर हवं तसं आहे की नाही हे तपासण्यासाठी टेक्निकल व्यक्तीची गरज नसते. नॉन-टेक्निकल व्यक्तीला संबंधित विषयाचं प्रशिक्षण देऊन त्यांच्यांकडून टेस्टिंगचं काम करवून घेतलं जातं. सॉफ्टवेअरचा करेक्टनेस, कम्प्लीटनेस, लायबॅलिटी, सिक्युरिटी या सर्व बाबी तपासल्यानंतरच सॉफ्टवेअर संबंधीत कंपनीला निर्यात केलं जातं. सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी माणसांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. शहरातील अनेक इन्स्टिट्यूटमधून टेस्टिंगचं प्रशिक्षण दिलं जातं आणि दोन महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण होताच प्लेसमेंट दिली जातात. सॉफ्टवेअर टेस्टरला सुरुवातीलाच साधारणत: १३-१४ हजार रुपये पगार दिला जातो. शिवाय प्रशिक्षण शुल्काची ५० टक्के रक्कम सुरुवातीला आणि उर्वरित रक्कम प्लेसमेंट झाल्यावर द्यायची सोय संस्थांनी उपलब्ध करून दिली आहे.

' नास्कॉम'च्या अंदाजानुसार येत्या काही वर्षांत फक्त भारतात १० लाखांपेक्षा जास्त आयटी प्रोफेशनल्सची गरज भासणार आहे. असं असताना उपलब्धता मात्र गरजेच्या फक्त पाच टक्के इतकीच आहे. यामुळे आयटी क्षेत्रात करिअर करण्याची जबरदस्त संधी आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पुरतंच हे क्षेत्रं मर्यादित नसून ऑफिस ऑटोमेशन, टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटिंग असे विविध विभाग यात आहेत. ज्यात क्वालिटी मॅनेजमेंट अँड स्टँडर्ड, एज्युकेशन अँड ट्रेनिंग, रिसर्च, सॉफ्टवेअर टेस्टिंग, डाटाबेस डिझाइन, सिस्टम डेव्हलपमेंट, वेब डिझाइनचाही समावेश आहे.

No comments: