photo

Wednesday, July 30, 2008

विकास मनुष्यबळाचा

ह्युमन रिसोसेर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे आधुनिक कंपन्यांमधलं सर्वांत महत्त्वाचं खातं बनलं आहे. कर्मचारी आणि कंपनीचं व्यवस्थापन यांच्यातला सर्वांत बळकट दुवा असतं ते एचआर डिपार्टमेंट. कंपनीनं ठरवलेली सारी लक्ष्यं पुरी करण्याची सर्वाधिक जबाबदारी असते ती याच 'एचआर'वर.

' ग्लोबल व्हिलेज' बनत असल्याच्या पार्श्वभूमीवर कॉपोरेर्ट जगात किती स्पर्धा असेल याची आपल्याला कल्पना आहेच. या स्पधेर्त टिकण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा (ह्युमन रिसोर्स) विकास साधणं कॉपोर्रेट्ससाठी अत्यंत आवश्यक असतं. हे साध्य करण्यासाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्ट/डेव्हलपमेण्ट हा विभाग अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. किंबहुना कंपनीला 'शॉक प्रूफ' बनवण्याचं काम हा विभाग करत असतो.

कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमधला दुवा म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्ट हा विभाग. ही दोन टोकं एकत्र आल्यानेच त्या कंपनीला आखलेली सर्व ध्येयं साधणं शक्य होतं. या घडीला भारतातल्या कॉपोर्रेट क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येत आहेत. इथल्या यंत्रणेमध्ये बदल होताहेत, मॅनेजमेण्ट संस्कृती बदलत आहे आणि जागतिकीकरणामुळे कॉपोर्रेट फिलॉसॉफीही बदलत आहे. या सगळ्यात एचआर मॅनेजरची भूमिका बदलणंही स्वाभाविकच आहे.

स्पर्धा वाढत असल्याने कुशल आणि 'सजग' कर्मचाऱ्यांना वाढती मागणी आहे. तर अकुशल कर्मचाऱ्यांंना जवळपास मागणीच नाहीए. अशा कुशल कर्मचाऱ्यांंना हेरणं, कंपनीच्या वाढीसाठी त्यांचं कौशल्य वापरणं ही महत्त्वाची कामं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्ट या विभागाला करावी लागत असल्याने सध्या हा विभाग सर्वात महत्त्वाचा बनला आहे.

कंपनीची प्रगती साधण्यासाठी कुशल कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीकडे आकषिर्त करण्याचं काम एचआरएमला करावं लागतं. त्यामुळे या विभागात काम करणारी मंडळी पूर्वग्रहदूषित असून चालत नाही. म्हणूनच कंपनीच्या प्रगतीमध्ये हा विभाग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो, असंच म्हणावं लागेल. त्यासाठी एचआर प्रमुखांमध्येही काही कौशल्यं असावी लागतात.

* एचआरप्रमुखाला आपल्या कंपनीची सर्व रचना माहिती असावी लागते. बाजारातल्या घडामोडींची माहिती त्याला असावी लागते. आपल्या कंपनीचा व्यवहार भविष्यात कसा असेल, याचा विचार करण्याची क्षमता त्यात असली पाहिजे.

* कंपनीच्या धोरणांमधले बदल अंतर्गत व्यवस्थेत अमलात आणण्याचं मुख्य काम एचआर प्रमुखाला करायचं असतं. त्यासाठी त्याला स्वत:साठी काही नियम घालून घ्यावे लागतात.

* एचआर प्रमुखाला टीमवर्कचं महत्त्व माहीत असावं लागतं. कंपनीतल्या विविध विभागांशी त्याचे संबंध चांगले असावे लागतात. त्या विभागांच्या तक्रारी, तंट्यांबाबत त्याने व्यवस्थापनाशी चर्चा करायची असते.

* व्यवस्थापनाची कार्यपद्धती त्यांना माहीत असावी लागते. व्यवस्थापनाच्या निर्णयांमध्ये त्याचा सहभाग अपेक्षित असतो.

* कंपनीच्या प्रगतीला हातभार लावू शकणाऱ्या कुशल कामगारांना आपल्या कंपनीकडे आकषिर्त करण्याची कला एचआर प्रमुखाला अवगत असणं आवश्यक असतं.

उत्तम एचआर प्रमुख बनण्यासाठीचे काही 'गोडन रूल्स':

* कर्मचाऱ्यांबद्दलची मतं स्पष्ट हवीत.

* प्रगतीचं मोजमाप करता आलं पाहिजे.

* कर्मचाऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेता आल्या पाहिजेत.

* ते करताना कामात लवचिकता असली पाहिजे. म्हणजे सर्व बाजूंचा विचार करता आला पाहिजे.

* दर्जाचं भान असलं पाहिजे.

* वेळेचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे.

* वेळेत निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे.

* नेहमी विजेत्याच्या दृष्टिकोनातून विचार करता आला पाहिजे.

* कामाच्या तणावावर विजय मिळवता आला पाहिजे.

नव्या बाजारपेठेत आमूलाग्र बदल होत असताना मनुष्यबळ विकासाच्या क्षेत्रालाही नवीन आयाम प्राप्त होत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना केवळ 'कर्मचारी व्यवस्थापन' या एकाच गोष्टीवर लक्ष केंदित करून चालणार नाही तर कर्मचारी विकास आणि त्यातून संस्थेचा विकास, असा मोठा दृष्टिकोन ठेवावा लागेल.

****************************

* ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्टचं हे पारंपरिक रूप आता बदलत असल्याचं मत आयटीएम ग्रुपचे चेअरमन पी. व्ही. रामण्णा यांनी व्यक्त केलं आहे. ते सांगतात, 'एचआरएच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी पुष्कळ आहेत. परंतु एचआर हा विषय घेऊन एमबीए करणाऱ्यांची संख्या त्या तुलनेत खूप कमी आहे. बड्या कंपन्यांखेरीज इतरांना एमबीए प्रोफेशनल्स ठेवणं शक्य नसतं. म्हणूनच अशा बऱ्याचशा कंपन्यांनी पे रोेल, कर्मचारी नेमणुकांसारख्या गोष्टींमध्ये आऊटसोसिर्ंग करण्यास सुरुवात केली आहे. परदेशी कंपन्यांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांमध्ये उत्पादनक्षमतेला फारचं दुय्यम स्थान दिलं जातं. त्यामुळे आपल्याकडे मनुष्यबळाचा पुरेसा वापर केला जात नाही. सध्या एचआर मॅनेजरपुढचं सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल तर त्याच्या कंपनीसाठी उत्तम आणि योग्य माणसांची नेमणूक करणं.'

* एचआर प्रोफेशनल्सनी आपल्या कामाच्या पलिकडच्या गोष्टींचाही उदा. माकेर्टिंग विचार करणं आवश्यक आहे, असं मत वालचंद टॅलेण्ट र्फस्ट लि. च्या एक्झिक्युटिव्ह सीएम पल्लवी झा व्यक्त करतात. 'सध्या एचआरमध्ये आऊटसोसिर्ंगचा ट्रेण्ड असल्याने ही मंडळी कंपनीतल्या वेगळ्या कामांसाठीच नेमली जातात. त्यात टॅलेण्ट मॅनेजमेण्ट, चेंज मॅनेजमेण्ट, सक्सेशन प्लॅनिंग आदींचा समावेश होतो. आजकाल कर्मचाऱ्यांच्या विकासाला भरपूर महत्त्व प्राप्त झाल्याने एचआर प्रोफेशनल्सनाही तितकंच महत्त्व प्राप्त झालं आहे, हेही तितकंच खरं आहे.'

* मेरिको इंडस्ट्रीजच्या एचआर अॅण्ड स्ट्रेटेजी विभागाचे प्रमुख मिलिंद सरवटे सांगतात, 'नव्या जगात एचआर प्रोफेशनल्सचं महत्त्व वाढतंय हे खरं असलं तरी त्यांच्या कामाचं स्वरूपही तितकंच किचकट बनत चाललं आहे, हेही तितकंच सत्य आहे. पूवीर् एचआरमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचा विचार केला जाई, परंतु आता मनुष्यबळाच्या प्रत्येक स्त्रोताचा विचार केला जातो. सध्या एचआरपुढचं मोठं आव्हान म्हणजे व्यवसायाच्या वृद्धीसाठी एचआरच्या धोरणांचा वापर करणं. त्यामुळे कुठल्याही बदलांमुळे एचआर विभागाला धक्का बसता कामा नये. उलट या बदलांचा वापर त्यांना सकारात्मकदृष्ट्या करून घेता आला पाहिजे.'

ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्टसंदर्भातले विविध अभ्यासक्रम

वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेण्ट, मुंबई

अॅडव्हान्स सटिर्फिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेण्ट :

कालावधी: सहा महिने

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेण्ट (एचआर सिस्टिम्स):

कालावधी : दोन वर्षं (पूर्णवेळ)

............................

सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेण्ट, पुणे

मास्टर्स इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (ह्युमन रिसोसेर्स):

कालावधी: दोन वर्षं (पूर्णवेळ)

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एचआरएम

कालावधी: एक वर्षं

एनएमआयएमएस युनिव्हसिर्टी, मुंबई

डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्ट (अर्धवेळ)

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेण्ट (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्ट)

एसआयईएस कॉलेज ऑफ मॅनेजमेण्ट स्टडीज, नवी मुंबई

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस

एम.ए. इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेण्ट अॅण्ड लेबर रिलेशन्स



No comments: