photo

Sunday, May 3, 2009

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांचं निधन । हृदयविकाराच्या झटक्यानं निधन । प्रा. शेवाळकर ७६ वर्षांचे होते । स्पॅममेलसाठी स्वनियंत्रण 12 Nov 2

गेल्या आठवड्यात स्पॅममेल म्हणजे काय ते आपण पाहिले. ब-याच ई-मेल कंपन्यांनी मेलमध्येच स्पॅम रोखण्याची सोय केली आहे. याबाबत
ीत जीमेल हे सर्वात उपयोगी आहे. ते इनबॉक्समध्ये आलेल्या मेलची चाळण लावून स्पॅम मेल वेगळ्याच फोल्डरमध्ये टाकते. त्यामुळे इनबॉक्स उघडला की चांगलेच मेल दिसतात.

स्पॅममेल फोल्डरमधले मेल तीस दिवसांनी आपोआप काढून टाकले जातात. त्यामुळे तुम्ही तो फोल्डर उघडलाच नाहीत तरी चालेल. उघडायचा मोह झाला तर कोणताही मेल ओपन करू नका. याहूनेही अशीच सोय मेलमध्ये केली आहे. हॉटमेलमध्ये काही प्रमाणात स्पॅममेल इनबॉक्समध्ये राहते. ते न उघडताच काढून टाकावे.

स्पॅम मेल यायला लागले तेव्हापासूनच त्यावर उपाय शोधायला सुरुवात झाली. आज अनेक अँटिस्पॅम प्रोग्रॅम्स नेटवर उपलब्ध आहेत. त्यातले बरेचसे फुकटात डाऊनलोड करता येतात. स्पॅमिहिलेटर हा त्यातलाच एक प्रोग्रॅम. त्याची ०.९.९.३० क्रमांकाची व्हर्जन सध्या लेटेस्ट आहे. पॉप ३ व आयमॅप अकाऊंटना तो उपयोगी पडतो. डाऊनलोड केल्यावर सर्वसामान्य माणसाला समजेल अशा अवतारात तो तुमच्या स्क्रीनवर झळकतो. त्यातील सूचनांप्रमाणे वागलात की एखाद्या मिनिटांत तो कम्प्युटरमध्ये स्थिरावतो. तो डाऊनलोड करताना तुम्हाला तुमच्या मेलच्या सर्व्हरचे नाव द्यावे लागते. ते दिलेत की त्या मेलवरून येणारे सगळे ई-मेल काटेकोरपणे तपासले जातात. उदा. स्पॅमिहिलेटरच्या सेटिंगमध्ये गेल्यावर संबंधित ठिकाणी याहूच्या सर्व्हरचे नाव दिले की याहूवरचे सगळे मेल आपोआप तपासले जातील व स्पॅम नसलेलेच मेल तुमच्यापर्यंत पोचतात. वापरत असलेल्या सर्व मेलच्या र्सव्हरची नावे दिली तर सगळेच मेल तपासले जातील. त्याची फाइलसाईझ १.८२५ एमबी आहे. सहा जुलैला ही लेटेस्ट व्हर्जन नेटवर टाकण्यात आली असून आतापर्यंत सुमारे १५ लाख लोकांनी तो डाऊनलोड केला आहे.

याशिवाय बरेचसे अँटिस्पॅम फिल्टर नेटवर उपलब्ध आहेत. 'मेलवॉशर' हा त्यातलाच एक. फुकटात मिळतो, डाऊनलोड करायला सोपा आणि फाइलची साइझही छोटी. अधिक प्रगत म्हणजे 'मेलवॉशर प्रो' हवा असेल तर पैसे मोजायची तयारी ठेवा. नाही म्हणायला तीस दिवस ट्रायल म्हणून फुकटात वापरता येतो. साधा मेलवॉशर आतापर्यंत ७० लाख लोकांनी डाऊनलोड केलेला आहे.

अँटिस्पॅमच नव्हे तर कोणताही प्रोग्रॅम डाऊनलोड करताना त्याचे फायदे असतात तसेच तोटेही असतात हे लक्षात घ्यायला हवे. उदा. 'बुलगार्ड इंटरनेट सिक्युरिटी ७' कम्प्युटरमध्ये बसविलेत, तर त्यात अँटिव्हायरस तंत्रज्ञानही समाविष्ट आहे. काही प्रश्न आला तर २४ तास मदत उपलब्ध आहे. ही मदत चॅटिंगद्वारे मिळवता येईल. ई-मेल आणि फाइल यांची साठवणूक करण्याची क्षमताही यात आहे. पण त्याचवेळी काही चांगल्या मेलना स्पॅमच्या फोल्डरमध्ये टाकून तो तुमची पंचाईतही करून टाकतो. अँटिस्पायवेअर सॉफ्टवेअर असले तरी सगळ्या दूषित फाइल्स काढून टाकण्याची क्षमता त्यात नाही. तुम्ही (दोन वर्षांसाठी) तीन हजार रुपयांच्या आसपास पैसे मोजून एव्हीजी अँटिव्हायरस घेतलात, तर त्यामध्येही अँटिव्हायरस, अँटिस्पॅम, अँटिस्पायवेअर आणि फायरवॉल अशा चारही सेवा उपलब्ध आहेत. 'नॉर्टन इंटरनेट सिक्युरिटी २००७' (एक ते तीन हजार रु.) घेतल्यावरही एव्हीजीत उपलब्ध असणाऱ्या चारही सेवा मिळतात. मात्र यातले अँटिस्पायवेअर पूर्णपणे सुरक्षित नाही. कम्प्युटरला हानी न पोचवणारे स्पायवेअर कम्प्युटरमध्ये घुसतेच. अँटिस्पॅमही काहीवेळा एखाद्या स्पॅममेलकडे 'काणाडोळा' करतो आणि तो मेल इनबॉक्समध्ये येऊन पडतो. पण एकंदरीत नॉर्टन चांगले प्रभावी आहे. 'कॅस्परस्की इंटरनेट सिक्युरिटी ६' घ्यायचा तर ३२०० रु.च्या आसपास पैसे मोजावे लागतात. पण सोयी मात्र त्या तुलनेत कमी आहेत.

हा प्रत्येक प्रोग्रॅम प्रभावी आहेच; पण विकत घेताना त्याचे अधिकउणे पाहून मगच घ्या. कारण प्रत्येकजण आपणच शंभर टक्के प्रभावी आहोत असाच दावा करतो. तोवर फुकटातला स्पॅमिहिलेटर बरा. याशिवायही अनेक अँटिस्पॅम सॉफ्टवेअर्स नेटवर उपलब्ध आहेत, पण सर्वात प्रभावी उपाय म्हणजे वाट्टेल ते मेल ओपन करण्याची घाई करू नका. स्वत:साठी दोन वा तीन ई-मेल आयडी ठेवा. त्यातले दोन रोजचे व्यवहार करण्यासाठी व एखादा बँकेचे वा क्रेडिट कार्डाचे व्यवहार करण्यासाठी. तिन्हीचे पासवर्ड सतत बदलत ठेवा आणि मुख्य म्हणजे तीनही मेलचे पासवर्ड वेगवेगळे ठेवा. म्हणजे एखादा पासवर्ड कोणी पळवला तर बाकीचे दोन सुरक्षित राहतील. मेल पाठवताना स्वत:ची पूर्ण ओळख जाहीर करू नका. काहीतरी टोपण नाव अथवा आपले शॉर्ट नाव टाकून ई-मेल आयडी बनवा. स्वत:वर नियंत्रण ठेवलेत तर हा प्रश्न ब-याच प्रमाणात सुटू शकेल.

No comments: