photo

Saturday, May 2, 2009

गूगलची घोडदौड रोखणार कशी? 12 Nov 2007, 1158 hrs IST

गूगल कंपनीची आगेकूच जोरात चालूच आहे. त्यामुळेच तिच्या प्रतिस्पर्ध्यांना एकत्र यावे लागत आहे...मायक्रोसॉफ्ट आणि याहू या दोन कंपन्
या विलीन होणार या बातमीने हा आठवडा गाजला खरा; पण खरे म्हणजे गेली कित्येक वर्षे ही बोलणी चालूच होती. मग आताच या बोलण्यांनी वेग का घ्यावा? याचे कारण उघड आहे. या दोन्ही कंपन्यांची प्रतिस्पर्धी कंपनी गूगल खूपच वेगाने पुढे जात आहे. यामुळे मायक्रोसॉफ्ट आणि याहू यांना एकत्र येण्यावाचून पर्यायच राहिलेला नाही.

यंदाच्या पहिल्या तिमाहीत या कंपन्यांची कामगिरी पाहिली की याचा अंदाज येईल. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गूगलचा नफा ६९ टक्क्यांनी वाढून एक अब्ज डॉलरवर गेला. महसूल ६३ टक्के वाढून साडेतीन अब्ज डॉलरच्या पुढे गेला. याउलट याहूचा याच कालावधीतला नफा ११ टक्क्यांनी कमी झाला आणि विक्रीत केवळ १९ टक्के वाढ झाली. गूगलच्या जाहिरातबाजीला तोंड देण्यासाठी याहूने 'पनामा' आणले. पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. अर्थात हे 'पनामा' अद्याप बाल्यावस्थेत आहे आणि त्याला बाळसे धरायला खूप वेळ लागणार आहे.

गूगलचा बराचसा पैसा त्यांच्या सर्च इंजिनमधून आणि जाहिरातीमधून मिळतो. यंदाच्या पहिल्या तिमाहीतच गूगलने २२६ अब्ज जाहिरातीच्या लिंक्स दिल्या. (गेल्या वषीर्च्या पहिल्या तिमाहीपेक्षा ८५ टक्के जादा). इंटरनेटचा वापर करणारे ४८ टक्के लोक गूगलला प्राधान्य देतात. याहूचा शेअर २८ टक्के तर मायक्रोसॉफ्टचा केवळ ११ टक्के आहे. म्हणजेच या दोघांच्या शेअरपेक्षाही गूगल खूपच पुढे आहे.

त्यांना टक्कर देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट व याहू एकत्र आले; तर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने गूगल व 'सन मायक्रोसिस्टिम्स' हे दोघे एकत्र आले. गेल्याच महिन्यात गूगलने 'डबलक्लिक' ही इंटरनेटवर जाहिराती देणारी कंपनी विकत घेतली, तेव्हा याहूबरोबर खरोखरच जायला हवे याची तातडी मायक्रोसॉफ्टला जाणवू लागली, एवढेच! असो.

येथे उल्लेख केलेल्या चार कंपन्याच नव्हे तर नजीकच्या भविष्यकाळात रिअल, एओएल आणि कॉमकास्ट या कंपन्याही वेगवेगळ्या गटांत सामील झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. मग इंटरनेटचे वेगळेच चित्र दिसेल.

मी गेल्या आठवड्यात कम्प्युटर वापरतानाचे काही शॉर्टकट दिले होते. आता आणखी काही. कीबोर्डच्या वरच्या भागात असणारा एफ१ हा आपला खरा मदतनीस म्हणायचा. तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काम करा अथवा या वर्डशी स्पर्धा देणारा अॅबीवर्ड हा प्रोग्रॅम असेल किंवा इंटरनेट एक्स्प्लोररवर काम करत असा, ही की दाबली की त्या त्या प्रोग्रॅमची सविस्तर माहिती देणारा बॉक्स तुमच्यापुढे अवतरतो. मग तुम्ही संबंधित माहिती त्यात शोधू शकता.

कंट्रोल आणि एस्केप ही दोन बटणे एकदम दाबल्यावर कम्प्युटरचा स्टार्ट मेन्यू ओपन होतो. तो ओपन झाल्यावर तुम्ही हव्या त्या प्रोग्रॅमवर जाऊ शकता. इथेही माऊसचा वापर करायचा नसेल, तर 'अॅरो कीज्ने' हवा तो प्रोग्रॅम ओपन करू शकता. इथेही एका लिंकचा विस्तार अनेक लिंकमध्ये झाला असेल तर राइट अॅरोने तिथेही जाता येते. उदाहरणार्थ, वरील पद्धतीने स्टार्ट मेन्यू ओपन केला व कंट्रोल पॅनेलवर गेले व राइट अॅरो दाबला की या छत्राखाली येणा-या सगळ्या लिंक्स दिसतील.

हव्या असणा-या लिंकवर अॅरो नेला की मग एंटर की दाबा, तो प्रोग्रॅम थेट ओपन होईल. अशा शॉर्टकटनी काम भराभर होते. अन्यथा प्रत्येक वेळेस माऊसचा वापर करावा लागला तर वेळ जास्त लागतोच; पण कम्प्युटरच्या वापरातली गंमत निघून जाते.

No comments: