photo

Saturday, May 2, 2009

इंटरनेटच्या जाळ्यात! 12 Nov 2007, 1153 hrs IST

घरात कम्प्युटर आहे, पण त्यावर इंटरनेट नाही अशी घरे झपाट्याने कमी होत आहेत. त्याला कारणेही तशीच आहेत. पूर्वी श्री
मंतांचे खेळणे वाटणारा कम्प्युटर आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडू शकतो इतक्या आवाक्यात आला आहे. इंटरनेटची सुविधाही सामान्यांच्या कक्षेत आल्याने आणि इंटरनेटमुळे ज्ञानाची असंख्य कवाडे एकाचवेळी खुली होतात हे लक्षात आल्याने या कम्प्युटरवर इंटरनेट कधी स्वार झाले ते कळलेच नाही.

भारतात इंटरनेटचा वापर इतका झपाट्याने वाढत आहे की २००५पेक्षा २००६मध्ये हा वापर करणा-यांची संख्या ५७ टक्क्यांनी वाढली. जगभरात इंटरनेट वापरात भारताचा चौथा क्रमांक लागतो. २००६-०७मध्ये सव्वासात कोटी भारतीय इंटरनेटचा आनंद लुटत होते. आता २००७-०८मध्ये हा आकडा किमान दहा कोटींवर आणि २०१०मध्ये १५ कोटींवर जाईल, अशी अपेक्षा आहे. एकूण लोकसंख्येच्या मानाने हा आकडा कमी असला तरी ज्या वेगाने तो वाढत आहे ते पाहता, पाच वर्षांत हा आकडा ५० कोटींवर जाईल. खरे म्हणजे २००० सालापासून इंटरनेट युजर्सच्या संख्येत तब्बल ७०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

याबाबत अलीकडेच प्रसिद्ध झालेली एक बातमी पुरेशी बोलकी आहे. कम्प्युटरचा प्रसार फक्त महानगरांमध्येच झाला, असे समजण्याचे कारण नाही. ४९ टक्के इंटरनेट युजर्स हे सर्वात मोठ्या महानगरांच्या बाहेरचे आहेत. म्हणजेच शहरांतलेच लोक 'पुढारलेले' आहेत, असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही. इंटरनेट पुरविणा-या सरकारी कंपन्यांबरोबरच काही खासगी कंपन्याही इंटरनेट सेवा देत असल्याने हा विस्तार अधिक वेगाने झाला. ब्रॉडबँड सेवेने तर ही सेवा अधिक वेगाने स्वीकारली गेली. या ब्रॉडबँडचे दर महिन्याला दोनशे रुपयांपर्यंत खाली आल्याने, भारतात ब्रॉडबँडचा वापर दरमहा २० टक्क्यांनी वाढत आहे, यात नवल ते काय?

इंटरनेटचा वापर ज्ञान मिळविण्यासाठी होतोच, पण व्यापारी कारणासाठीही होतो. किंबहुना भारतातही हा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. २००६-०७मध्ये कम्प्युटरवरून २२१० कोटी रुपयांचे व्यवहार झाले. हा आकडाही झपाट्याने वाढत आहे. क्रेडिट कार्डाचा वापर करून लोक कितीही मोठ्या रकमेची खरेदी करीत आहेत. पर्यटन आणि त्यासाठीची तिकिट खरेदी यासाठी सर्वाधिक प्रमाणावर (३७ टक्के) इंटरनेटचा वापर होत आहे. एकंदर आशियाई देशच यात पुढे आहेत.

केवळ हवी ती माहिती मिळवून ज्ञानार्जन करण्यापुरता कम्प्युटरचा वापर मर्यादित राहिलेला नाही. ई-मेल हे त्याच्या वापराचे महत्त्वाचे कारण होते, ते अजूनही असले तरी अन्य असंख्य कारणासाठी कम्प्युटरचा वापर वाढला आहे. मोठ्या आकाराचे फोटो, व्हीडिओ, इन्स्टंट मेसेजर्स, फोन कॉल्स आदि असंख्य कारणामुळे कम्प्युटरचा वापर वाढला आहे. आणखी काही काळाने घरातली प्रत्येक वस्तू कम्प्युटरने नियंत्रित केली तर आश्चर्य वाटायला नको. जगभरात हा वापर एवढा वाढला की गेल्या वषीर् लोकांनी १६१ अब्ज गिगाबाईट्स इतकी माहिती डाऊनलोड करून घेतली. म्हणजे पृथ्वीपासून सूर्याच्या अंतराच्या बारापट अंतराएवढी पुस्तके लावून ठेवली तर जितकी माहिती होईल तितकी ही माहिती आहे. २००३ साली हा आकडा केवळ तीन अब्ज गिगाबाईट्स होता हे लक्षात घेतले तर इंटरनेट युजर्सच्या वापरात किती झपाट्याने वाढ होत आहे, ते लक्षात येते. जगभरात रोज पाच लाख नवे लोक कम्प्युटरचा आधार घेऊन इंटरनेटवर सफर करत आहेत.

या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळेच जागतिक कंपन्यांचे भारतावर लक्ष लागून राहिले आहे. मायक्रोसॉफ्ट या वडिलधा-या कंपनीने तर भारतात बस्तान बसविले आहेच, पण नंतर त्याच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनीही भारतातले जाळे वाढवायला सुरूवात केली आहे. गूगल, याहू यांनी भारतात सेंटर्स उभारली आहेत, शिवाय या आठवड्यात एओएल ही टाइम वॉर्नर गटातली कंपनीही भारताला टागेर्ट करीत आहे. या कंपन्याही भारतीयांना सलाम करीत आहेत, हे चित्र दशकभरापूर्वी कोणाच्याही नजरेसमोर आले नसावे. गूगल तर भारतीय भाषांमध्ये लोकांसमोर आले आहे.

No comments: