photo

Saturday, May 2, 2009

बॅकअप हवा; पण कशाचा? 12 Nov 2007,

बॅकअप फाइल्स आवश्यक असतात खऱ्या; पण त्याबाबतचा निर्णय काळजीपूर्वकच घ्यावा लागतो. नाहीतर हा उद्योग महागात पडू शकतो.


विंडोज एक्सपीची सीडी कम्प्युटरमध्ये घालून बॅकअपची सोय कशी करायची ते आपण पाहिले. पण ती सोय झाल्यावर कशाचा बॅकअप घ्यायचा याचाही विचार करावा लागतो. All Information on this computer या ऑप्शनवर क्लिक करण्याचा मोह तुम्हाला होईल. पण तसे करणे 'महागाचे' पडू शकते. कारण मग प्रत्येक मजकूर वा फोटो दोनदोनदा साठवला जाईल. तुमचा कम्प्युटर जास्त क्षमतेचा नसेल (सर्वसाधारणपणे हार्डडिस्क ४० जीबीची असतेच) तर सर्व काही साठवण्याचा उद्योग महागात पडू शकेल. म्हणून काय साठवायचे हे ठरवा. My documents and settings हा फोल्डर ब-याचजणांसाठी पुरेसा आहे. सगळ्या डाटा फाईल्स आणि विंडोज रजिस्ट्रीवरील वैयक्तिक माहिती आपोआप साठविली जाते.

समजा घरातले सगळेजण एकच कम्प्युटर वापरत असले तर? (एका घरात दोन टीव्ही ही पद्धत आपल्याकडे आहे; पण घरात प्रत्येक खोलीत एक कम्प्युटर ही कल्पना सुदैवाने आपल्याकडे यायची आहे) तर Everyone’s documents and settings वर क्लिक करा. कम्प्युटरवर ज्यांची ज्यांची अकाऊंट्स असतील त्यांच्या नावावरचा सारा डाटा सेव्ह होत राहील. तुमच्या प्रोफाइलच्या बाहेरचा डाटा सेव्ह करायचा असेल तर Let me choose what to backup वर क्लिक करा. तिथे My Documents चेकबॉक्सवर क्लिक करा. म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती साठविली जाईल. नंतर My Computer वर जाऊन उपलब्ध पर्यायांमधील तुम्हाला आवश्यक वाटणा-या पर्यायांचे चेकबॉक्स क्लिक करा. यात काहीही सेव्ह करता येईल. तुम्ही गाणी जमवून ठेवली असतील तर ती करता येतील. (माय म्युझिक फोल्डर). तुमचे खास फोटो सेव्ह करता येतील (माय पिक्चर्स).

हा डाटा सेव्ह होतो कुठे? ते तुम्हालाच ठरवता येते. शक्यतो ज्या ड्राइव्हमध्ये तुमचा डाटा आहे तो सोडून दुसऱ्या ड्राइव्हमध्ये डाटा सेव्ह करावा. उदा. समजा हार्डडिस्कचे सी, डी, ई अशा तीन ड्राइव्हमध्ये पाटिर्शन केले आहे आणि तुमचा सध्याचा डाटा सी ड्राइव्हमध्ये आहे, तर बॅकअपसाठी ई किंवा डी निवडा. तिथे करायचे नसेल तर एखादी External Hard Disk सुद्धा उपयोगी पडू शकेल.

पण त्यासाठी तुम्हाला ती विकत घेऊन कम्प्युटरला जोडावी लागेल. मूळ हार्डडिस्क जर ८० जीबी वा त्याहून अधिक क्षमतेची असेल तर अशा बाहेरच्या हार्डडिस्कची गरजच उरत नाही. तुम्ही डाटाचा कुठे बॅकअप घ्यायचा हे ठरविले, तर बॅकअप फाइलला नाव द्या. तुम्ही ही प्रक्रिया संपविलीत की ताबडतोब बॅकअपची प्रक्रिया सुरू होते. या पद्धतीशिवाय फोटो साठवून ठेवण्यासाठी बऱ्याच सोयी उपलब्ध आहेत. गूगलचे पिकासा सॉफ्टवेअर आपल्या बहुतांश गरजा पूर्ण करते.

त्यावर वेब आल्बम बनवून आपण ते मेलने कोणालाही पाठवू शकतो. एका वेळा कितीही फोटोंचा वेब आल्बम करता येतो. मेलवरून इतके सारे फोटो एका वेळेला कसे पाठवता येतील असा प्रश्न निर्माण होईल. पण मेलवर या आल्बमची लिंकच जात असल्याने हा प्रश्न उद्भवतच नाही.

शॉर्टकट: तुम्ही एखादी सीडी वा डीव्हीडी कम्प्युटरमध्ये घातलीत आणि ती लगेच 'रन' होत असेल तर म्हणजे थेट सुरू होत असेल पण ते तुम्हाला नको असेल तर? सीडी घालताच स्क्रीनवर सुरू झालेली दिसत असेल तर खरे म्हणजे योग्यच आहे. पण हे 'ऑटोरन' नको असेल तर सीडी घालताना shift की दाबून ठेवा. म्हणजे सीडीला ऑटोमॅटिक रनचा पर्याय राहणार नाही.

Alt + Space की दाबल्या की मेन विंडोचा सिस्टिम मेन्यू ओपन होतो. मग ओपन असलेली विंडो रिस्टोअर करायला वा मिनिमाइज अथवा मॅक्झीमाइझ करायला सोपे जाते. विंडो बंद करायची असेल तरी त्याचा उपयोग होतो.
Alt + F4 या कीज दाबल्या की ओपन असलेली विंडो बंद होते. माऊसचा वापर करायची गरज नाही.

No comments: