photo

Saturday, May 2, 2009

नको ते स्पाय... 12 Nov 2007,

गेल्या वेळेस आपण अॅडवेअर आणि स्पायवेअर या प्रकारातले प्रोग्रॅम्स पाहिले. आज याच प्रकारातील आणखी प्रोग्रॅम्स पाहू या.


' हायजॅक धिस' या नावाने थेट हॅकर्सना आव्हान देणारा एक प्रोग्रॅम आहे. 'माझ्या गल्लीत येऊन तर पाहा असे सरळ आव्हान तो देतो. कम्प्युटरमधली रजिस्ट्री आणि हार्ड डिस्क या सर्वांत महत्त्वाच्या भागांचे रक्षण तो करतो. तुम्ही विशिष्ट वेबसाइटवर जावे यासाठी हॅकर्स सतत प्रयत्न करत असतात. ते हाणून पाडण्याचे काम तो करतो.

पण त्या ओघात तो इतक्या प्रोग्रॅम्सबाबत शंका घेतो की त्यातला कोणता कम्प्युटरमधून काढून टाकायचा ते सर्वसामान्य माणसाला कळत नाही. म्हणून 'हायजॅक धिस' वापरून जर तुम्ही स्कॅनिंग केलेत तर डझनावारी प्रॉब्लेम दिसतील. पण त्यामुळे लगेच घाबरून जाऊन 'फिक्स चेक्ड आयटम्स'वर क्लिक करू नका. अन्यथा विनाकारण एखादा प्रोग्रॅम नाहीसा होईल. मग 'इन्फो ऑन सिलेक्टेड आयटम्सवर क्लिक करा. म्हणजे 'दोषी' असणा-या सर्वांची माहिती दिसेल. तो दोषी का त्याची कारणे दिलेली असतील.

पण या प्रोग्रॅममधला सर्वात मोठा दोष असा की तो आयटम खरोखरच बोगस आहे का याची माहिती तो देत नाही. मग तुम्ही काय करणार? स्पायवेअरइन्फो अथवा कम्प्युटर कॉप्स नावाच्या साइट्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तिथे ही माहिती पाठविलीत की तज्ज्ञांकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. किंवा त्या साइटवरील माहितीशी तुमची माहिती ताडून पाडू शकता. मग दोषी कोण आणि नुसताच संशय कोणावर घेतला गेला ते कळेल. थोडक्यात, अनुभवी व तज्ज्ञ माणसानेच या प्रोग्रॅमच्या वाटेला जावे.

स्पायवेअर नेमके काय काम करतो? तुमची वैयक्तिक माहिती चोरणे, तुम्ही कोणकोणत्या साइट्स पाहता त्याची नोंद ठेवणे, तुमच्या कम्प्युटरमधले सॉफ्टवेअर नेमके कसे आहे याची नोंद ठेवणे अशी कामे स्पायवेअर करतो. तो तुमच्या कम्प्युटरमध्ये ज्याने घुसविलेला असेल त्याच्याकडे ती माहिती गेली की तुमचे नुकसान झालेच समजा. कम्प्युटरला कितीही सुरक्षा कवच घातले तरी हा स्पायवेअर कोणालाही टाळता येत नाही. म्हणूनच कोणी घुसखोर आलाय का ते पाहण्यासाठी मशीन सतत स्कॅन करावे लागते. त्यासाठी वेगवेगळे स्पायक्लीनर डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. 'स्पायक्लीनर गोल्ड' हा असाच एक प्रोग्रॅम आहे.

तो कम्प्युटरमध्ये नेमके कोणते स्पायवेअर घुसले आहे त्याची तपासणी करतो आणि त्याला बाहेर फेकून देतो. विशेष म्हणजे तुम्हाला एखादी फाईल काढून टाकायची आहे, पण त्यातले काही भाग (कम्पोनन्टस) हवे आहेत, तर त्याचा बॅकअप घेण्याची सोय यात आहे. या प्रोग्रॅमसाठी पैसे मोजावे लागतील. पण एकदा घेतलात की परिणाम चांगलेच होतील. त्याचे स्कॅनिंग इतरांपेक्षा लवकर होते हा आणखी एक गुण. कम्प्युटरची सर्वात चांगली स्थिती (बेस्ट सिस्टिम सेटअप) असेल तेव्हाच्या स्थितीचा बॅकअप घेऊन ठेवतो. जर एखादा स्पायवेअर काढून टाकण्याची क्षमता त्याच्यात नसेल तर तसे स्पष्टपणे सांगितले जाते, मग दुसरा स्पायक्लीनर प्रोग्रॅम वापरून तो काढून टाकता येतो.

पैसे द्यायला तयार असलात तर आणखी एक चांगला प्रोग्रॅम आहे. 'नॉर्टन ३६०' हे त्याचे नाव. हा केवळ अँटिस्पायवेअर नसून अँटिव्हायरस, अँटिफिशींग, दुहेरी फायरवॉल म्हणूनही त्याचा उपयोग होतो. नेटवरून बँकेचे व्यवहार करत असाल तरी काळजी करण्याचे कारण नाही. शिवाय तुमच्या सिस्टिमचा ऑटोमॅटिक बॅकअप आणि रिस्टोअर करण्याची क्षमताही त्यात आहे. त्या 'नॉर्टन ३६०'ची एक प्रत विकत घेतली की तीन कम्प्युटरवर बसवता येतो. शिवाय त्यावर दोन जीबी क्षमतेच्या फाइल्स साठवून ठेवण्याची सोयही त्यात आहे. 'फ्री इमेल' आणि 'लाइव्ह चॅट सपोर्ट' ही त्याची आणखी वैशिष्ट्ये आहेत. थोडक्यात हा ऑलराऊंडर प्रोग्रॅम आहे.

शॉर्टकट

तुम्ही एखादी सीडी कम्प्युटरमध्ये घालता आहात, पण तसे केल्याबरोबर ती सीडी आपोआप चालू होते (ऑटोरन). हे नको असेल तर कीबोर्डवरची शिफ्टची की दाबून सीडी सीडी ड्राइव्हमध्ये घाला. ऑटोरन होणार नाही.

समजा डेस्कटॉपवर एखादी फाइल आहे. ती तुम्हाला एखाद्या ड्राइव्हमध्ये टाकायची आहे, पण त्याचवेळी तिची कॉपीही हवी आहे. तर कंट्रोल की दाबून ती फाइल हलवली तर मूळ फाइल सुरक्षित राहून नवीन फोल्डरमध्ये कॉपी तयार होते. फाइल हलवताना शिफ्ट व कंट्रोल एकत्रित दाबले तर मूळ फाइलीचा शॉर्टकट नवीन फोल्डरमध्ये तयार होतो.

No comments: