photo

Sunday, May 3, 2009

सर्च नेमका हवा! 12 Nov 2007,

कोणत्याही विषयाची माहिती शोधण्यासाठी अनेक सर्च इंजिन्सचा पर्याय उपलब्ध असतो . मात्र त्यातील नेमका कोणता वापरावयाचा , ते अनुभवातूनच ठरवता येते ...
........
गेल्या वेळेस आपण सर्च इंजिनबद्दल माहिती घेतली . बऱ्याच वाचकांनी त्यांना आलेल्या सर्च इंजिनच्या अनुभवाबाबत माहितीही कळवली . पण नेहमीच्या गूगल सर्चपेक्षा आणखी असंख्य सर्चचे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत . काहींमध्ये तर तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळते . उदाहरणार्थ , ' चाचा डॉट कॉम '. तिथे एखादा प्रश्न विचारला की दोन पर्याय तुमच्यासमोर येतात . एक निव्वळ सर्चचा आणि दुसरा तज्ज्ञांकडून ' लाइव्ह ' मार्गदर्शन मिळविण्याचा . मात्र त्यासाठी तुम्हाला या साइटवर नोंदणी करावी लागेल . लॉगीन नेम , ई - मेल आयडी आणि पासवर्ड वगैरे द्यावे लागतील . फुकटातली ही सेवा रजिस्टर्ड यूजर्सनाच उपलब्ध आहे . एखादा प्रश्न विचारला की साइटवरचा जाणकार माणूस त्याची उत्तरे देतो . असे लाइव्ह मार्गदर्शन फार कमी साइटवरून मिळते .

' डॉगपाइल डॉट कॉम ' ही आणखी एक शोधसेवा आहे . तिचे वैशिष्ट्य असे की गूगल , याहू , विंडोज लाइव्ह , आस्क डॉट कॉम या सर्वांवरचे सर्च ती एकदम करते आणि अगदी मोजकेच निष्कर्ष तुमच्यापुढे सादर करते . गेल्या वेळेप्रमाणेच मी ' सचिन तेंडुलकर ' असा सर्च देऊन पाहिला , तेव्हा फक्त ६२ रिझल्ट्स आले . पण ते महत्त्वाचे होते . सर्च डॉट कॉमवर १ , २३ , २० आले ; तर ऑलदवेब डॉट कॉमवर ९८ , २० , ००० आले . इतका फरक का पडतो असा प्रश्न आपल्यापुढे येतो . पण प्रत्येक गोष्ट शोधणे आणि नेमकी गोष्ट शोधणे यात महदंतर आहे . म्हणूनच नेमके कुठले सर्च इंजिन आपल्याला उपयोगी पडते आहे त्याचा स्वत : च अभ्यास करून तेच नेहमी वापरले तर फायदा होईल .

एका साइटद्वारे जगातल्या टॉप टेन सर्च इंजिनचा आढावा घेतला जातो . लोकांनी जास्तीतजास्त कुठे जाऊन सर्च केला , हे पाहिले जाते . यंदाच्या जुलै महिन्यातले क्रमवारीने टॉप टेन असे : गूगल , याहू , एमएसएन अथवा विंडोज लाइव्ह , एओएल , आस्क , मायवेबसर्च , बेलसाऊथ , कॉमकास्ट , डॉगपाइल , आणि मायवे डॉट कॉम . यानंतर इतर सर्च इंजिन्सचा वापर होतो . ही यादी अर्थातच दर महिन्याला बदलत असते . पण साधारणपणे पहिले चार क्रमांक कायम राहतात . तरीही या यादीत नसलेली पण चांगली अशी काही सर्च इंजिन्स आहेत . ' टेक्नोरॅटी डॉट कॉम ' हे त्यातलेच एक . मुख्यत : ब्लॉगच्या सर्चसाठी ते वापरले जाते . ब्लॉगरविषयी सर्व माहिती इथे मिळते . कोणत्या प्रकारच्या ब्लॉगचा अधिक शोध घेण्यात आला आहे , त्याची यादी दिसते . म्हणजे तुम्हालाही त्यातलाच ब्लॉग शोधायचा असेल तर सरळ तुम्ही त्या लिंकवर जाऊ शकता . इथेे दोन प्रकारचे सर्च उपलब्ध आहेत . एक म्हणजे सर्वांत नवीन ब्लॉग कोणता आहे ते आधी दिसेल व जुना ब्लॉग शेवटी दिसेल . दुसऱ्या प्रकारात सर्वात जास्त वेळा जो ब्लॉग पाहिला गेला असेल , तो आधी पडद्यावर येतो . नंतर उलट्या क्रमाने ब्लॉग दिसतात . म्हणजे सर्वात लोकप्रिय ब्लॉग कोणते ते पटकन कळते . अर्थात तरीही अधिक सर्च केलेला चांगला ; कारण लोकांची पसंती ही तुमचीही पसंती असेलच असे नाही . एखाद्या गंभीर विषयावरचा वा विशिष्ट विषयावरचा ब्लॉग हवा असेल , तर अधिक सर्च करावा लागेल .

' कॉसमिक्स डॉट कॉम ' ही आणखी एक सर्च साइट . ती काही प्रमाणात मोफत आणि काही प्रमाणात पेड साइट आहे . इथे विषयानुसार शोध घेता येतो . उदाहरणार्थ , आरोग्य , वाहने , अर्थव्यवहार , राजकारण वगेरे . फुकटातला सर्च चांगले रिझल्टस देत नाही ; पण पैसे भरून केलेला सर्च अत्यंत उपयुक्त माहिती देतो . विषयवार सर्चचे पर्यायही उपलब्ध आहेत . गूगलवर पुस्तकांचा सर्च घेता येतो . काही वेळा त्या पुस्तकातली काही पानेही वाचता येतात . एखाद्या लायब्ररीत असावी अशी विषयवार रचना या साइटवर मिळते . पुस्तकाचे नाव माहीत असेल तर प्रश्र्नच नाही . ते टाइप करून थेट सर्च करू शकता . साहित्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी ही साइट आहे .
......
शॉर्टकट :

तुम्ही एखादा प्रोग्रॅम नेहमी वापरत असाल तर त्याचा शॉर्टकट डेस्कटॉपवर करून ठेवणे केव्हाही इष्ट ठरते . म्हणजे प्रत्येकवेळा प्रोग्रॅम फोल्डर ओपन करून इच्छित स्थळी जाण्याचे काहीच कारण नाही . उदाहरणार्थ , फायरफॉक्स ब्राऊझर वापरायचा असेल , तर आधी स्टार्टवर क्लिक करायचे , मग ऑल प्रोग्रॅम्सवर क्लिक करायचे , फायरफॉक्स शोधत बसायचे व तो मिळाल्यावर त्यावर क्लिक करायचे ... हे सर्व करण्यात वेळ जातो . त्यापेक्षा त्याचा शॉर्टकट तुम्ही डेस्कटॉपवर करून ठेवलात , तर अधिक सोपे जाईल . त्यासाठी मशीनच्या डाव्या बाजूला खाली ' स्टार्ट ' वर क्लिक करा , ऑल प्रोग्रॅमवर क्लिक करा , फायरफॉक्स मिळाल्यावर त्यावर राइट क्लिक करा . बरेच ऑप्शन्स दिसतील . त्यातील ' सेंड टू ' ऑप्शन निवडा . त्यावर क्लिक केल्यास आणखी ऑप्शन्स दिसतील . त्यातील ' डेस्कटॉप ( क्रिएट शॉर्टकट )' वर क्लिक करा . मग फायरफॉक्स तुम्हाला डेस्कटॉपवरच दिसेल . थेट त्यावर क्लिक करून तुम्ही काम करू शकता . अर्थात हेच अन्य कोणत्याही फाइलबद्दल करता येते . तुम्ही एखाद्या वर्ड फाइलमध्ये काही काम करत असाल , तर त्याचा शॉर्टकट डेस्कटॉपवर करून ठेवायचा . म्हणजे फाइल उघडायला सोपी जाते .

No comments: