photo

Friday, April 24, 2009

ई-सफाई इज मस्ट! 12 Jun 2008, 0444 hrs IST

कम्प्युटर आधी फास्ट चालायचा पण आता तो जाम म्हणजे जामच स्लो झालाय... असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत? देन नॉट टू वरी. प्रत्येक कम्प्युटर युजरला हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. त्यातून 'वे आऊट' काढण्यासाठीच आजच्या टेकट्रिक्स...

१. कम्प्युटरमध्ये नेहमी अनावश्यक 'टेम्पररी फाईल्स' तयार होत असतात. विशेषत: इण्टरनेटचा वापर होणाऱ्या कम्प्युटरमध्ये त्या जास्त प्रमाणात असतात. या फाईल्स कमी केल्या तर कॉम्प बराच फास्ट होऊ शकतो. त्यासाठी 'डिस्क क्लिनअप'चा ऑप्शन वापरून टेम्प फाईल्सना 'रिसायकल बिन' मध्ये टाकता येतं.

' डिस्क क्लिनअप' करण्यासाठी डेस्कटॉपवर डाव्या बाजूला खाली असणाऱ्या 'स्टार्ट' बटणावरून आपला प्रवास सुरू करायचा. स्टार्ट-प्रोग्राम-अॅक्सेसरीज-सिस्टिम टूल अशा वाटेने जाऊन 'डिस्क क्लिनअप'चा ऑप्शन क्लिक करायचा. या प्रोसेसनंतर कम्प्युटरने ड्राइव्ह निवडायला सांगितलं तर जो ड्राइव्ह क्लिन करायचाय तो निवडून ई-साफसफाई करून टाकायची. साधारणत: दर आठवड्यातून एकदा तरी अशी साफसफाई करत राहायची. नाहीतर उगाच गारबेज साठून राहिलं तर मशिन स्लो होणारच!

२. शक्यतो दिवसातून एकदा तरी कम्प्युटरची कचरापेटी म्हणजे 'रिसायकल बिन' साफ करावी. त्यासाठी 'रिसायकल बिन'वर राईटक्लिक करून ‘Empty Recycle Bin’ अशी कमाण्ड देता येते.

३. कम्प्युटर शिस्तप्रिय वगैरे वाटत असेल तर तो आपला भ्रम आहे. तो सगळ्या फाईल्स व्यवस्थित ड्राइव्हमध्ये सेव्ह आहेत असं दाखवत असला तरी प्रत्यक्षात मात्र तो इतका अव्यवस्थित आहे की हार्डडिस्कमध्ये आपल्या फाईल्स कशाही कोंबत असतो. दाखवताना त्यांची लेबल मात्र ड्राइव्हमध्ये दाखवतो. यामुळे कम्प्युटरच्या कामाचा वेग स्लो होत जातो.

हे टाळण्यासाठी पुन्हा एकदा स्टार्ट-प्रोग्राम्स-अॅक्सेसरीज-सिस्टिम टूलच्या वाटेने जायचं आणि 'डिस्क डिफ्रॅग्मेण्टर'चा प्रोग्राम सुरू करायचा. पण 'डिफ्रॅग्मेण्टेशन' म्हणजे फुरसतीचं काम आहे. कम्प्युटरमध्ये ड्राइव्ह आणि डेटा जेवढा जास्त तेवढा 'डिफ्रॅग्मेण्टेशन'ला जास्त वेळ लागतो. कदाचित दोन ते तीन तासही लागू शकतात. त्यामुळे रात्री झोपताना मशिन 'डिफ्रॅग्मेंटेशन'ला लावू शकतो. 'डिफ्रॅग्मेण्टर' सुरू केल्यानंतर ड्राइव्ह निवडायची कमाण्ड येते. जो ड्राइव्ह रिअरेंज करायचाय तो मेन्शन करायचा. 'डिफ्रॅग्मेण्टेशन'मुळे खूप जागा अॅवलेबल झाल्यामुळे मशिन फास्ट होण्यास मदत होते. साधारणत: महिन्यातून एकदा अशी मोठ्ठी साफसफाई करायची.

त्यात बिलकुल आळस चालणार नाही. कारण तुमचा कम्प्युटर फास्ट चालावा असं वाटत असेल तर ही ई-साफसफाई अगदी मस्टच!

No comments: