सर्वांच्या शुभेच्छा शुक्रवारी सचिनपर्यंत पोहोचण्याआधीच त्याचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी एक दिवस अगोदरच सचिनला आशीर्वाद दिलेत आणि हा ममतेचा हात त्याच्या पाठीवर ठेवताना ' तो पूवीर् होता तसाच आजही आहे ', असे सांगत आपल्या महान शिष्याचे कौतुकही केले .
' गेली दोन दशके मी त्याला पहातोय . तो पूवीर् होता तसाच आजही आहे . त्याच्यात बिलकुल बदल झालेला नाही . विशेष म्हणजे त्याच्या फलंदाजीतही हे जाणवत नाही . गोलंदाजांवर पूवीर् जसा तो हुकूमत गाजवायचा तसाच तो आजही गाजवताना दिसतो . त्याने गोलंदाजांना कधीच शिरजोर होऊ दिले नाही ', असे आचरेकर यांनी सांगितले .
ते पुढे म्हणाले , ' तो माझ्यासाठी पूवीर्चाच सचिन आहे . तो खूप बिझी असला तरी मला भेटण्यास कधीच विसरत नाही . भेटीत क्रिकेट आणि क्रिकेटचाच विषय असतो . क्रिकेट हा त्याचा एकमेव ध्यास असून तो यापुढेही असाच कायम राहावा '.
वयाच्या सोळाव्या वषीर् १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सचिन २०११ च्या र्वल्डकपपर्यंत खेळू शकतो , असा विश्वासही ७८ वषीर्य आचरेकर यांनी व्यक्त केला . ' तो आणखी दोन वषेर् आरामात खेळू शकतो . त्याचे एक स्वप्न अजूनही अधुरे आहे आणि ते म्हणजे र्वल्डकप विजेतेपद . सचिनच्या हाती र्वल्डकप आलेला मलाही बघायचाय '.
१५९ कसोटीत १२ , ७७३ धावा फटकावणाऱ्या सचिनने ४२५ वनडेत १६ , ६८४ धावांची रास उभारलीय . याशिवाय बरेच विक्रम त्याच्या नावावर जमा आहेत .
मादाम तुसाँ म्युझियममध्ये जगातील नामवंत व्यक्तींच्या पंक्तीत नुकताच सचिनचा पुतळा विराजमान झालाय . क्रिकेट जगतातच नव्हे तर साऱ्या क्रीडा विश्वात सचिनचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते . अशा या स्टार खेळाडूंच्या आयुष्यात तीन शिक्षकांना मानाचे स्थान आहे . हे तीन शिक्षक म्हणजे त्याचे वडील रमेश तेंडुलकर , बंधू अजित तेंडुलकर आणि गुरू रमाकांत आचरेकर !
' आपण आखून दिलेल्या रस्त्यावरून तो आजही चालतोय , हीच माझ्यासाठी मोठी गुरूदक्षिणा आहे . छोट्या वयात आत्मसात केलेल्या टीप्स तो आजही विसरलेला नाही , हे विशेष . जगातील सवोर्त्तम फलंदाज झाला त्याचवेळी मी धन्य झालो . एका गुरूला आणखी काय हवं असतं . क्रिकेटमध्ये त्याला जे काही मिळवयाचे होते ते त्याने मिळवलंय . र्वल्डकपचा अपवाद वगळता आता काहीच शिल्लक राहिलेले नाही '.
गेल्यावषीर् आयपीएलच्या पहिल्याच मोसमात मुंबईकडून खेळण्यापूवीर् सचिनला आपल्या गुरूचा आशीर्वाद मिळाला होता ... आता तब्येत ठीक नसतानाही ते सचिनचा खेळ न चुकता बघतात . दक्षिण आफ्रिकेतील त्याच्या खेळाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले .
समपिर्त भावनेने खेळणे , हे सचिनच्या खेळाचे वैशिष्ट्य ! असे सांगताना आचरेकर उदाहरण देतात , ' शिवाजी पार्कवर तो तासन्तास खेळायचा . एक फटका घोटवण्यासाठी एक अख्खा दिवस मैदानावर उभे राहण्याची त्याची तयारी असायची . यामुळेच आज तो इतरांपेक्षा सरस ठरला '.
आचरेकर शिवाजी पार्कवर सरावावेळी स्टम्पवर एक नाणे ठेवायचे . जो गोलंदाज सचिनला बाद करेल त्याला ते नाणे देण्यात येई . सचिन नाबाद राहिल्यास त्याच्या खिशात ते नाणे जायचे . सरांकडून अशी तब्बल १३ नाणी सचिनने मिळवली होती



No comments:
Post a Comment