photo

Friday, April 24, 2009

फास्ट प्रगतीसाठी...

आजकाल स्वत:चा कम्प्युटर असणं ही सर्वसामान्य बाब बनली आहे. शिवाय इंटरनेट वापराचं प्रमाणही वाढतंय. त्यामुळे येत्या काही वर्षांत ई-लनिर्ंगचा प्रसार झपाट्याने होईल. गेल्या तीन-चार वर्षांत गुरुकुल ऑनलाइन लनिर्ंग सोल्युशन्सने (गोल्स) आपलं कार्यक्षेत्र विस्तारलं आहे. 'गोल्स'चे फाऊंडर सीईओ शैलेश मेहता यांनी शहरी तसंच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये ई-लनिर्ंगचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ठरवलंय.

हे ध्येय पूर्ण करण्यासाठी ते आणि त्यांची टीम झपाटून काम करतेय. त्याचंच फलित म्हणजे आता ई-लनिर्ंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या मर्यादांवरचा तोडगा म्हणून ई-लनिर्ंगकडे पाहिलं जातंय. 'गुरुकुल'नेदेखील 'गोल्स' या नवीन ब्रॅण्डअंतर्गत आपलं कार्यक्षेत्र व्यापक बनवलं आहे.

शैलेश मेहता सांगतात, 'आजच्या फास्ट जीवनात ई-लनिर्ंग शिक्षणपद्धती खूपच सोयिस्कर आहे. कारण हे कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी घेता येतं. अमुक एक विषय अमुक एका कॉलेजातच शिकवला जातो. मग तो शिकायचा असेल तर तिथेच जा, अशी धावपळ करण्याची गरज नसते. ई-लनिर्ंगमुळे तो विषय घरबसल्या शिकण्याची सोय झाली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जगातल्या नामांकित विद्यापीठांचे कोर्सेस आपल्या शहरात शिकता येणं हे ग्लोबलायझेशनचंच एक रूप आहे. परदेेशात शिक्षण घेणं महागडं तर असतंच शिवाय ते शिक्षण पूर्ण होईपर्यंतचा खर्चही विद्यार्थ्यांना उचलावा लागतो. ई-लनिर्ंगमुळे या खर्चांना फाटा मिळाला आहे.

ई-लनिर्ंगमुळे ऑनलाइन डिग्री मिळवता येते किंवा एखाद्या विशिष्ट विषयाचा शॉर्टटर्म कोर्स करून आपलं कौशल्य वाढवता येतं. एखादी नवीन भाषाही शिकता येते.

मल्टिनॅशनला कंपन्यांकडे अनेक प्रकारच्या नोकरीच्या संधी आहेत. त्यांना अपेक्षित असलेलं क्वालिफिकेशन, विशेष गुणवत्ता, कौशल्य आपण आत्मसात केलं तर पगाराचा आकडाही मोठा बनू शकतो. जगामध्ये एखाद्या विषयाचे मोजके तज्ज्ञ असतील तर त्यांचं थेट व्याख्यान किंवा मार्गदर्शन ई-लनिर्ंगद्वारा डब्ल्यूबीटी वेब बेस्ड लनिर्ंग किंवा लाइव्ह र्व्हच्युअल क्लास मेथडने अनुभवता येतं. तसंच डिस्कशन मेथडच्या मदतीने शंकांचं समाधान तज्ज्ञांकडून होऊ शकतं.

भारतातल्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचवायचं असेल तर ई-लनिर्ंग अत्यंत उपयोगी माध्यम आहे. खेड्यातल्या मुलांना शहरात जाऊन शिकण्याची गरज नाही. ई-लनिर्ंगमध्ये विद्याथीर् केंदस्थानी असतो. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या सोयीने, कुवतीने आणि गतीने ते शिकता येतं. शिवाय रेकॉडेर्ड लेक्चर्स कितीही वेळा पुन्हा पुन्हा ऐकता/पाहता येतात. प्रत्येक सेशननंतर प्रश्ानेत्तरं सोडवता येतात. संपूर्ण विषयावर 'मास्टरी टेस्ट' क्वेश्चन बँकेचा पर्यायही उपलब्ध असतो. अनेक ऑनलाइन कोसेर्स मान्यताप्राप्त असल्याने ते केल्यावर नोकरीची संधी प्राप्त होते किंवा स्वतंत्र व्यवसाय करता येतो.

गोल्स अॅकेडमीचे कोसेर्स
१) रिटेल मॅनेजमेण्ट : इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेण्ट (आयआरएम)च्या सहकार्याने झपाट्याने वाढणाऱ्या रिटेल क्षेत्रातल्या नोकऱ्यांसाठी फायदा व्हावा म्हणून हा कोर्स तयार केला आहे. १०० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर नामांकित मॉल्स, मोठमोठ्या स्टोअर्समध्ये नोकरीची संधी मिळू शकते.

२) डिप्लोमा इन इव्हेण्ट मॅनेजमेण्ट : इव्हेण्ट मॅनेजमेण्टमध्ये करिअर करण्यासाठी काय शिकायचं हे या कोर्समध्ये सांगितलं आहे. एनआयईएमच्या सहयोगाने 'गोल्स'ने हा डिप्लोमा तयार केला आहे.

३) सीएफपी : फायनान्समध्येही नोकरीच्या अनेक संधी आहेत. एफपीएसबी या नामांकित एज्युकेशन प्रोव्हायडरबरोबर सहकार्य करून 'गोल्स'ने सटिर्फिकेट फायनान्शियल प्लॅन हा विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे. याखेरीज अॅम्फी म्युच्युअल फण्ड, डिप्लोमा इन फायनान्शियल प्लॅनिंग आणि सटिर्फिकेट कोसेर्स 'गोल्स अॅकेडमी'च्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

४) सॉफ्ट स्किल्स अॅण्ड कम्युनिकेशन : आज हॉटेल उद्योग, टूरिझम, हॉस्पिटॅलिटी, बँका, विमान कंपन्या, मॉल्स अशा अनेक सेवाक्षेत्रात उमेदवाराकडे सॉफ्ट स्किल्स आहेत का, संवाद साधण्याची पद्धत कशी आहे हे पाहिलं जातं. अनेक मराठी मुलं-मुली शिकलेल्या असतात, कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. पण सॉफ्ट स्किल्समध्ये ती कमी पडतात किंवा अनेकांना प्रभावी संवाद साधता येत नाही. अशांना शॉर्टटर्म कोर्स करून आपली पात्रता वाढवता येते.

५) ई-लनिर्ंग टेक्निकल रायटिंग : ई-लनिर्ंगचा पसारा वाढत असल्याने आता आणि नजिकच्या काळात खूप टेक्निकल रायटर्स लागणार आहेत.

६) कंपनी सेक्रेटरी : आयसीएसआयशी संलग्न असलेल्या या कोर्समुळे तुम्ही कंपनी सेक्रेटरी बनू शकता.

७) एमबीए अॅमिटी युनिव्हसिर्टी : एमबीए कोर्सचा अनेक क्षेत्रात वाव असल्याचं ओळखून अॅमिटी युनिव्हसिर्टीबरोबर टायअप करून 'गोल्स'ने एमबीए कोर्स विकसित केला आहे. या कोर्सला अॅमिटीने मान्यता दिली आहे.

८) बँकिंगव्हसिर्टी : विद्यार्थ्यांना तसंच सध्या बँकेत नोकरी करत असलेल्यांसाठी केवायसी-एलएएल, रिटेल बँकिंग, ट्रेड फायनान्स, लेटर ऑफ केडिट आणि बँक गॅरेण्टी असे स्पेशलाइज्ड कोर्स बनवले आहेत.

No comments: