photo

Friday, April 24, 2009

मॅनेजमेण्ट क्षेत्राचं 'फ्युचर'

'फ्युचर एज्युकेशन'बद्दल सांगा. गेल्या काही वर्षांमध्ये मॅनेजमेण्ट क्षेत्राचा झपाट्याने विकास होतोय. असं असलं तरी विद्याथीर् आणि व्यावसायिकानांही योग्य दिशा न मिळाल्याने किंवा चुकीच्या मार्गदर्शनामुळे या क्षेत्राची योग्य माहिती मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन 'फ्युचर एज्युकेशन'ची स्थापना केली. विद्यार्थ्यांना मॅनेजमेण्टची योग्य माहिती देऊन त्यांच्या करिअरला वेगळी दिशा देणं हा 'फ्युचर एज्युकेशन'चा मुख्य उद्देश आहे.

लवकरच 'फ्युचर एज्युकेशन'तफेर् लोणावळ्याला मॅनेजमेण्टचं शिक्षण देणारी निवासी संस्था स्थापन केली जाणार आहे. तिथले अभ्यासक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रम इण्डस्ट्रीतल्या तज्ज्ञांकडून तयार करण्यात येतील. सध्याची इण्डस्ट्रीची गरज, अपेक्षा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमांची रचना केली जाईल. या संस्थेत विद्यार्थ्यांच्या मॅनेजमेण्टच्या क्षमता वाढाव्यात आणि त्यांनी करिअरमध्ये प्रगती करावी म्हणून पूरक अभ्यासक्रमही तयार केले आहेत. 'डिस्टन्स लनिर्ंग प्रोग्रॅम' हा आमचा महत्त्वाचा अभ्यासक्रम असून भारतातल्या उत्तम दर्जाच्या बी-स्कूलमध्ये दिलं जाणारं शिक्षण इथे विद्यार्थ्यांना या प्रोग्रॅमच्या माध्यमातून घेता येईल.

मॅनेजमेण्ट क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्यांसाठी ही संस्था कशी उपयुक्त ठरेल?
आमचा भर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, अंगभूत कौशल्यं विकसित होऊन व्यापक विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी आम्ही विविध कोसेर्स आणि योजना राबवणार आहोत. आम्ही त्यांना भारतातल्या टॉप बी-स्कूलमध्ये वापरण्यात येत असलेले मॅनेजमेण्ट प्रोग्रॅम्स पुरवणार आहोत. तिथलं ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्यांची आवड आणि क्षमतेनुसार जॉब प्लेसमेण्ट देणार आहोत. त्यानंतरही वेळोवेळी त्यांना करिअरमधल्या अधिक चांगल्या संधीची माहिती देऊ. त्यामुळे त्यांचा करिअरचा प्रवास अधिक चांगला होईल.

* डिस्टन्स लनिर्ंग प्रोग्राम (डीएलपी)बद्दल सांगा. भारतात डिस्टन्स लनिर्ंग प्रोग्रॅम (डीएलपी) अजूनही इतका प्रसिद्ध नाही. भारतीय विद्यार्थ्यांना वर्गात शिकण्याची सवय असली तरी डीएलपी त्यांच्यासाठी सोयिस्कर आहे. त्यामुळे त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद लाभेल. हा प्रोग्रॅम विद्याथीर् नोकरी करताना किंवा इतर शिक्षण घेतानाही करू शकतात. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मॅनेजमेण्टचा कोर्स फायद्याचा ठरेल. कारण त्यांचं कॉलेज संपल्यावर त्यांच्या हातात पदवी आणि मॅनेजमेण्ट कोर्स असेल. त्यामुळे लगेचच ते नोकरी शोधू शकतील किंवा पुढे उच्च शिक्षणही घेऊ शकतील. शिवाय नोकरी करणारेही रुटिनमध्ये व्यत्यय न आणता हा कोर्स करू शकतात. हा कोर्स घरबसल्या किंवा सायबरकॅफेतून त्याच्या सोयीच्या वेळेनुसार करता येईल. घरबसल्या र्व्हच्युअल रूमच्या साहाय्याने वर्गातलं लेक्चर ऐकता येईल. कोर्स शिकवणारे शिक्षक इण्टस्ट्रीत प्रत्यक्ष काम केलेले असल्याने त्यांच्याकडून मिळणारी माहिती विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल. या कोर्सच्या परीक्षा ऑनलाइन होतील. तसंच विद्यार्थ्यांना पुस्तकं, सीडीज आणि इतर शैक्षणिक साहित्यही पुरणार आहोत.

* एमबीए आणि फ्युचर एज्युकेशनचे प्रोग्रॅम्स यामध्ये काय फरक आहे? आमचा 'पीजीडीबीए' कोर्स आणि एमबीए हे दोन्ही समान आहेत. त्यात काही फरक नाही.

* तुमच्या प्लेसमेण्ट सेलबद्दल माहिती सांगा. फ्युचर एज्युकेशन विद्यार्थ्यांना २४ तास प्लेसमेण्ट सेवा पुरवणार आहे. इण्टस्ट्रीतल्या नोकऱ्यांबद्दल संबंधित विद्यार्थ्याला वेळोवेळी माहिती पुरवली जाईल. 'अर्जण्ट एसएमएस'ची सेवा पुरवली जाईल. मुख्य म्हणजे विद्यार्थ्याने आमच्या कोर्सला प्रवेश घेतल्यावर लगेचच त्याला नोकरीच्या संधी सांगायला सुरुवात होईल. त्यामुळे त्याला शिकतानाच प्रॅक्टिकल अनुभवही घेता येईल.

आमचे सगळे कोसेर्स सरकारमान्य असल्याने इण्डस्ट्रीत त्यांना मागणी असेल. तसंच या कोसेर्समध्ये आमचा भर प्रॅक्टिकल ज्ञानावर असल्याने 'फ्युचर एज्युकेशन'मधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या क्षमता असतील असा विश्वास वाटतो.

No comments: