photo

Friday, April 24, 2009

लॅपटॉप घेताय?

काय म्हणताय, लॅपटॉप घेण्याचा विचार करताय? मग जरा थांबा... उगीच घाई करू नका. लॅपटॉप घेताना फक्त किंमत कमी आहे या निष्कर्षावर खरेदी केली जाते. त्यामुळे नंतर पस्तावण्याखेरीज काहीच उरत नाही. तशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी ही चेकलिस्ट...

स्क्रीन क्वॉलिटी :
लॅपटॉपची स्क्रीन ही ग्लॉसी आणि मॅट अशा दोन प्रकारात उपलब्ध असते. मॅन्युफॅक्चरर हल्ली बऱ्याचदा ग्लॉसी प्रकारचे लॅपटॉप बनवतात. हे ग्लॉसी लॅपटॉप सिनेमा बघण्यासाठी ठीक आहेत. पण, रोजचं ऑफिसवर्क करण्यासाठी हे लॅपटॉप कुचकामी ठरतात. ग्लॉसी स्क्रीनमुळे डोळ्यावर अकारण ताण पडतो. त्यामुळे तुम्ही जर सिनेमा बघण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी लॅपटॉप घेत असाल, तरच ग्लॉसी स्क्रीन घ्या.

नेटवर्क कनेक्टिविटी :
बऱ्याच लॅपटॉपमध्ये इनबिल्ट वायरलेस नेटवर्क कनेक्टिविटी असते. पण फक्त एवढ्या आश्वासानावर भुलू नका. ही कनेक्टिविटी कोणत्या प्रकारची आहे ती समजून घ्या. अनेकदा यासाठी जुन्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. त्यामुळे इण्टरनेट आणि नेटवर्क कनेक्टिविटी स्लो होते. तसंच ही वायरलेस कनेक्टिविटी नंतर बदलता येत नाही. म्हणून लॅपटॉप घेण्यापूवीर्च ती अपग्रेडेबल आहे की नाही, याची काळजी घ्या. सध्या ८०२.११ एन ही वर्जन योग्य आहे, असं म्हणता येईल.

रफ अॅण्ड टफ होगा तो बेहतर है :
सध्या लॅपटॉपचा बाजार गरम आहे. अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसोबत अनेक लोकल ब्रॅण्डही या स्पधेर्त जोमाने उतरलेत. अनेकांनी आपल्या किमती खूप खाली आणल्या आहेत. पण या उतरलेल्या किमतीत लॅपटॉप घेताना आपण कुठे क्वालिटीशी तडजोड करत नाहीत ना, याची काळजी घ्या. लॅपटॉप ही गोष्ट अशी आहे, जी घेऊन आपल्याला प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यासोबत मिळणाऱ्या अॅक्ससरीज काय आहेत त्या पाहा. आपला लॅपटॉप फार नाजूक असून चालणार नाही हे लक्षात घ्या.

डोकं तापवू नका आणि लॅपटॉपही... :
लॅपटॉप मॅन्युफॅक्चरर हे आपल्या प्रोडक्टची जाहिरात करताना पॉवरफुल प्रोसेसर, फास्ट हार्ड डिस्क, हेवी बॅटरी अशी करतात. पण या साऱ्यामुळे लॅपटॉप तापतो हे आपल्याला सांगितलं जात नाही. त्यामुळे काही तासांच्या वापरानंतर लॅपटॉप गरम होण्याची शक्यता असते. आता बाजारात चांगल्या क्वालिटीचे असे लॅपटॉप मिळतात, की ज्यात उष्णतारोधक तंत्र वापरलेलं असतं. त्यामुळे लॅपटॉप घेण्यापूवीर् फक्त डीलर काय म्हणतो ते ऐकू नका, तो वापरणाऱ्या एकाचा तरी सल्ला घ्याच.

लॅपटॉपचा आवाज बंद करा :
आपण एवढ्या दमड्या मोजून लॅपटॉप घ्यायचा आणि वर त्या लॅपटॉपचाच आवाज ऐकायचा हे कोणाला आवडेल? पण कुलिंग फॅन आणि हार्ड ड्राइव्हच्या लोच्यामुळे अनेकदा लॅपटॉप आवाज करतो. कधीकधी ही भुणभुण एवढी इरिटेटिंग ठरते की त्यातून डोकेदुखीचा त्रास उद्भवतो. म्हणूनच लॅपटॉप घेतानाच या गोष्टीची काळजी घ्या. आपल्याला लॅपटॉप घ्यायचाय डोकेदुखी नको!

No comments: