photo

Friday, April 24, 2009

पूर्वतयारी प्रेझेण्टेशनची

प्रोजेक्टसाठीप्रेझेण्टेशन करणं आता आवश्यक झालंय. ते करताना ओव्हर कॉन्फिडन्स काहींची दांडी गुल करतो. तर काही जण र्नव्हस होतात. त्यांच्यासाठी...

पूर्वतयारी :
प्रेझेण्टेशन कोणासमोर करायचं आहे, हे लक्षात घ्या. केवळ आपल्या प्रोजेक्टपुरतं प्रेझेण्टेशन नसतं, तर प्रेझेण्टेशन रूम, बोर्ड, खडू, योग्य प्रकाश व्यवस्था, आसन व्यवस्था, मायक्रोफोन आणि इतर टेक्निकल पण महत्त्वाची व्यवस्था नीट आहे की नाही ते आधी चेक करून घ्यायला हवं.

विषयाची संपूर्ण ओळख :
प्रेझेण्टेशन नक्की कोणत्या विषयावर करायचं आहे, तो विषय नीट समजून घ्यायला हवा. कोणासमोर प्रेझेण्टेशन करणार तेही ध्यानात घ्या. आपले कपडे प्रेझेण्टेशनसाठी योग्य असतील, याची काळजी घ्या. प्रेझेण्टेशन करताना विषयाची ओळख, मुख्य भाग आणि थोडक्यात समारोप करा. समारोप करताना प्रेझेण्टेशनमधील सर्व मुद्दे यायला हवेत, हे लक्षात ठेवा.

नोट्स :
प्रेझेण्टेशनसाठी नोट्स काढा. पूर्ण डेटा समोर ठेवून तो चाळतचाळत मुद्दे समजावून सांगण्यापेक्षा या नोट्सचा आधार घेता येईल. घाईघाईत प्रेझेण्टेशन न करता आपले मुद्दे नीट समजावून सांगा. मधे थोडा वेळ थांबून आपले मुद्दे समोरच्यांना समजलेत की नाही, हेही लक्षात घ्या.

सराव : प्रेझेण्टेशन सादर करण्यापूवीर् नेहमीच सराव करणं योग्य. आरसा, मित्रमंडळी किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसमोर प्रेझेण्टेशन सादर करण्याचा सराव तुम्हाला प्रत्यक्ष प्रेझेण्टेशनच्या वेळेस आत्मविश्वास मिळवून देईल.

No comments: