photo

Friday, April 24, 2009

डिस्टन्स एज्युकेशनमुळे करीअरची पायाभरणी

तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करीअर करा, त्यासाठी आवश्यक असतात वेगवेगळे बेसिक स्किल. त्यासाठी छोटे कोर्स करून आपले व्यक्तिमत्व संपन्न करावे. त्यासाठी डिस्टन्स एज्युकेशनचा सशक्त पर्याय उपलब्ध आहे', असे प्रतिपादन फ्युचर एज्युकेशन लिमिटेड आणि 'मटा'तफेर् आयोजित 'तरुण मॅनेजर/उद्योजक' या विषयावरील सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी केले.

रवींद नाट्यमंदिरात झालेल्या या सेमिनारमध्ये टेम्पल युनिव्हसिर्टीचे प्रोफेसर आणि इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल मॅनेजमेण्ट स्टडीजचे एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. अरविंद पाठक, आयसीआयसीआय व्हेन्चरचे सीनिअर डायरेक्टर(एचआर) पराग परांजपे, एचडीएफसीचे जनरल मॅनेजर(एचआर) शरद गांगल, जीईसीच्या डायरेक्टर सुचित्रा सुवेर् आणि फ्युचर एज्युकेशन लिमिटेडचे चीफ मेन्टोर संजय साळुंखे उपस्थित होते.

शरद गांगल म्हणाले की, करीअरमध्ये अभिरूची, आकांक्षा आणि अविश्रांत परिश्रम महत्त्वाचे आहेत. पराग परांजपे यांनी इंग्रजी भाषा आणि इंग्रजी संभाषण, प्रेझेण्टेशन, मुलाखत आदी बेसिक स्किल कसे महत्त्वाचे आहे, हे सांगितले. आथिर्क मंदी आणि स्पर्धा आजची आव्हाने आहेत. यावेळी लकी ड्रॉने ५० विद्यार्थ्यांची फ्री अॅप्टिट्यूड टेस्टसाठी निवड झाली. संपर्क : ६७८५०४००.

No comments: