photo

Friday, April 24, 2009

वी आर मास्टरमाइण्ड्स

बुद्धीला चालना देणाऱ्या फिल्डपैकी एक म्हणजे इंजिनीअरिंग. मग ते सिविल असो इलेक्ट्रॉनिक्स असो मेकॅनिकल असो किंवा कम्प्युटर इंजिनीअरिंग असो. दिवसाग
णिक नवीन बदल होणाऱ्या या फिल्डचं प्रतिबिंब इंजिनीअरिंग कॉलेजांमधे दिसून येतं. व्हीजेटीआय कॉलेजमधे नुकत्याच झालेल्या 'टेक्नोव्हेंजा' इवेण्टमधे मास्टरमाइण्ड्नी तयार केलेले अनेक नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्स दिसून आले. प्रदर्शनं आणि स्पधेर्मधून त्यांच्या दजेर्दार टेक्निकल माइण्डचा आलेला अनुभव अचंबित करणारा होता. अॅकॅडमिक पातळीवर अफाट संशोधनवृत्ती दाखवणारा हा विद्याथीर्वर्ग भविष्यात भारताला तांत्रिकदृष्ट्या अधिक सुदृढ करणार, यात शंका नाही. महत्त्वाचं म्हणजे, ही विद्याथीर्रूपी संपत्ती भारतात असल्याचा अभिमान आहे. 'टेक्नोव्हेंजा'मधे या विद्यार्थ्यांनी साकारलेले काही अनोखे प्रोजेक्ट्स.

.....



पायरो
अडगळीच्या जागी आगीचा भडका उडाल्यास, ती आग विझवण्यास अनेक आव्हानं येतात. हे लक्षात घेऊन रोबोच्या मदतीने आग कशा पद्धतीने विझवता येऊ शकते, हे पायरो या स्पधेर्मधून विद्यार्थ्यांनी सिद्ध केलं होतं. अडगळीच्या ठिकाणी मेणबत्त्या ठेवून कमीतकमी वेळात ही आग विझवण्याचा क्रायटेरिया होता. यामधे वेगवेगळ्या प्रकारचे रोबो विद्यार्थ्यांनी तयार केले होते.

ऑटोपोर्ट
मालवाहतुकीच्या जहाजामधून एकाच वेळी माल अनलोड आणि लोड करणं तसं वेळखाऊ काम. पण मनुष्यबळ न वापरता संपूर्णत: ऑटोमेटिक असणाऱ्या पोर्टच्या साहाय्याने हे काम अत्यंत कमी वेळात आणि अचूक पद्धतीने होऊ शकतं, हे मॅकेनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ऑटोपोर्टमधून दाखवलं होतं. मालाचं आयडेण्टिफिकेशन आणि डिस्ट्रिब्युशन करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी स्वतंत्र असं सॉफ्टवेअरही डेव्हलप केलं आहे. राज रांभियाबरोबर वीस जणांची दीड महिन्यांची मेहनत ऑटोपोर्टमधून दिसून आली.

..... .....

टेक्नो टेक्स्टाइल
टेक्स्टाइल म्हटलं, की फक्त कपडेच डोळ्यासमोर येतात. पण जिओ टॅक्स्टाइलच्या उपयोग फुटबॉल, क्रिकेट, टेनिस ग्राऊण्ड तयार करण्यासाठीही होऊ शकतो, हे टेक्स्टाइल टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी दाखवलं होतं. या गाऊण्डची मेण्टेनन्स कॉस्टही तुलनेने कमी असते. हीट रेझिस्टन्ससाठी ग्लास टेक्श्चर मटेरिअलचा उपयोगही विद्यार्थ्यांनी सांगितला.

.........

होरायझन्स
कम्प्युटर डिझायनिंगमधे दजेर्दार बदल होत असताना इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी माऊसऐवजी ग्लोव्जच्या साहाय्याने फंशनिंग करण्यात यश मिळवलंय. सामान्य बॅटरीच्या साहाय्याने सिसिल मेहताबरोबर सहा जणांच्या टीमने विशिष्ट सकिर्ट डिझाइन केलंय. स्क्रोलिंग, राइट क्लिक अशा कमाण्डसाठी फिंगर सेट केल्या आहेत.

.... ...... ......

काश्मीर रेल्वे प्लान
अनंतनाग ते कारगिल या ३२० किलोमीटरच्या काश्मिर रेल्वे प्लानची प्रतिकृतीही यंदाचं आकर्षण होतं.

... .... .... ....

ऑन टुवर मार्क्स गेट सेट गो
' टेक्नोव्हेंजा'मधे बीआरसी मॉडेल्स या कंपनीने दाखवलेलं बॅटरी आणि फ्युएलवर चालणाऱ्या रेसिंग कार्सचं डेमॉन्स्ट्रेशन विशेष आकर्षण ठरलं. यामधे त्यांनी चॉपरचीही अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिकंही दाखवली.

No comments: