photo

Friday, April 24, 2009

'गुगल अर्थ'ला स्वदेशी उत्तर... 'भुवन'

गुगल अर्थ' वरून आपले घर, परिसर शोधण्याची मजा काही औरच... त्यातून मिळणारा आनंद विरळाच... आता तशीच संधी 'भुवन' या अस्सल भारतीय वेबसाइटच्या माध्यमातून मिळणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेमार्फत (इस्त्रो) ही वेबसाइट तयार करण्यात येत असून पुढील वषीर् मार्चमध्ये ती कार्यरत होईल. सार्वजनिक सेवा, अंतर्गत सुरक्षा, नगररचना आणि पायाभूत सोयीसुविधांचा विकास यांसाठी या वेबसाइटचा चांगला उपयोग होऊ शकणार आहे.

भुवन ही स्वदेशी वेबसाइट गुगल अर्थला भारताचे उत्तर तर असेलच शिवाय गुगल अर्थपेक्षाही यातील नकाशे अधिक सुस्पष्ट असतील असे इस्त्रोच्या जिओ इन्फॉमेर्टिक्स डेटा डिव्हिजनचे प्रमुख एस. के. पठाण यांनी सांगितले. मात्र ही वेबसाइट इंटरनेटवर लाँच करण्यासाठी केंद सरकारची परवानगी घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. आपत्ती व्यवस्थापन तसेच लष्करी कारवायांसाठी भुवन ही वेबसाइट अधिक मदतकारक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुगल अर्थवरील नकाशे तसेच आकृत्यांपेक्षा पाचपटीने भुवनवरील नकाशे तसेच आकृत्या सुस्पष्ट असतील. त्यामुळे आपद््ग्रस्त ठिकाण शोधण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही. सॅटेलाइटवरून नकाशांची छायाचित्रे घेतली जातील व ती वेबसाइटवर असतील अशी माहितीही पठाण यांनी दिली. पूरग्रस्त तसेच चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत मदतकार्य पोहोचवण्यासाठी या वेबसाइटचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकत असल्याचा दावाही त्यांनी केला. या वेबसाइटमुळे शत्रूच्या हाती महत्वाच्या ठिकाणांचे नकाशे लागण्याची भीती आहे मात्र त्यावरही उपाय असल्याचे पठाण म्हणाले. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या स्थळांचे नकाशे या वेबसाइटवर 'ब्लॉक' करून ठेवले जातील. तरीही ही वेबसाइट इंटरनेटवर लाँच करण्यासाठी केंद सरकारची परवानगी मागितली जाणार असल्याचे पठाण म्हणाले. लष्कराच्या दृष्टीने भुवन मात्र धोकादायक असल्याचे मत एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)

No comments: