photo

Friday, April 24, 2009

इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेण्ट: अत्यावश्यक क्षेत्र

सध्याचा काळ परफेक्शनचा असल्यामुळे बी-स्कूलचं महत्त्व वाढते आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात मॅनेजमेण्ट स्पेशलायझेशन येत आहे. रिअल इस्टेट आणि बांधकाम या क्षेत्रांतही स्पेशलायझेशन येण्यासाठी आकृती सिटी लिमिटेड ही रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसायातली नामांकित कंपनी पुढे आली. त्यांनी 'इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेण्ट'साठी आकृती सिटी गोल्ड इन्स्टिट्युट सुरू केली. इथे कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट, ट्रान्सपोटेर्शन मॅनेजमेण्ट आणि एनव्हायर्मंेण्ट असे विषय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आहेत. डीम्ड युनिव्हसिर्टीचा दर्जा मिळण्यासाठी विविध देशांतल्या विद्यापीठांबरोबर कोलॅब्रेशन करण्याचा संस्थेचा मानस आहे, जेणेकरून भारतीय विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी परदेशी जावं लागणार नाही.

रिअल इस्टेटसाठी बी-स्कूल सुरू करण्यामागे आकृती सिटी लिमिटेडचे प्रमुख हेमंत शहा आणि विमल शहा यांचं मोठं योगदान आहे. प्रो. वेद संस्थाप्रमुख म्हणून कार्यरत असून ते उच्चविद्याविभूषित आहेत. या तिघांच्या प्रयत्नांमुळेच 'आकृती सिटी गोल्ड'चं स्वप्न साकार होऊ शकलं.

रिअल इस्टेट मॅनेजमेण्ट अभ्यासक्रमाविषयी संस्थेचे डायरेक्टर के. एन. वेद यांनी अधिक माहिती दिली, 'भारतात सद्य परिस्थितीत इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेण्टची आवश्यकता आहे. रस्ते, पूल, धरणं, इण्डस्ट्री, कारखाने, राहण्यासाठी घरं, विमानतळं, बंदरं, एसईझेड आणि इतर कमशिर्अल प्रोजेक्ट्ससाठी प्रशिक्षित मॅनेजर्सची आवश्यकता आहे. ही गरज ओळखून आम्ही भारतात अशाप्रकराचा अभ्यासक्रम सुरू करण्याचं ठरवलं. रिअल इस्टेट मॅनेजमेण्टचा पूर्णवेळ आणि अर्धवेळ अभ्यासक्रम तयार केला आहे. आकिर्टेक्चरच्या आणि इंजिनिअरिंगच्या डिग्रीनंतर पूर्णवेळ मॅनेजमेण्टचा अभ्यासक्रम करता येतो. अन्य कुठल्याही शाखेत मास्टर्स झालेल्या विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. प्रवेश घेण्यासाठी आधीच्या परीक्षेत ५५ टक्के मार्क मिळाले असण्याची प्रमुख अट आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी पार्ट टाइम मॅनेजमेण्ट कोर्सही उपलब्ध आहेत.

रिअल इस्टेट मॅनेजमेण्ट अभ्यासक्रमाची आखणी करताना थिअरीबरोबरच प्रॅक्टिकल्स आणि फिल्डवर्कलाही तितकंच महत्त्व देण्यात आलं आहे. बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेलं जातं. संस्थेतल्या क्लासरूम्स, कम्प्युटर लॅब तसंच लायब्ररी अद्ययावत आहेत. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी आमंत्रित केलं जातं. ते विद्यार्थ्यांना या क्षेत्राला अपेक्षित असणाऱ्या गोष्टींची माहिती देतात. या तज्ज्ञांमध्ये प्रसिद्ध उद्योगपती आणि शिक्षणक्षेत्रातले दिग्गजही असतात.

परदेशातल्या विद्यापीठांप्रमाणे 'कमवा आणि शिका' हे तत्त्व आमच्या इन्स्टिट्युटमध्ये अवलंबलं आहे. पीजीडीएम कोर्ससाठी इंजिनिअरिंग किंवा इतर कोणत्याही विषयातली पदव्युत्तर परीक्षा पास झाले विद्याथीर् प्रवेश घेऊ शकतात. त्यांना दरमहा दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल. शिष्यवृत्तीच्या मोबदल्यात त्यांना योग्य काम दिलं जाईल. अभ्यास + शिक्षण + काम अशा पद्धतीने आम्ही मुलांना प्रशिक्षित करतो. त्यामुळे ते अधिक कार्यक्षम बनू शकतात. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर चांगल्या पगाराची नोकरी देण्याची हमी संस्था देते.'

प्रात्यक्षिकांसोबत मान्यवरांचं अनुभवकथन विद्यार्थ्यांना भविष्यातल्या चढ-उतारांशी सामना करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरतं. तसंच इथे आंत्रप्रिनर होण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास केला जातो. मंदी येण्याआधी सगळ्यात जास्त बूम असलेलं माकेर्ट रिअल इस्टेटचं होतं. भविष्यातही या क्षेत्राला पुन्हा सोनेरी दिवस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भविष्यातली गरज ओळखून बिझनेस आणि टेक्निकल अभ्यासक्रमावर आकृती इन्स्टिट्युट भर देते.'

या संस्थेत अद्ययावत कम्प्युटर सेण्टर आहे. शिक्षण आणि उद्योगक्षेत्राला लागणारी सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातून गोळा केली जाते. त्याचा फायदा संशोधनासाठी होतोच शिवाय विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होते.

जून महिन्यात संस्था पुढल्या दोन वर्षांचे पूर्णवेळ कोर्स सुरू करत आहेत.

१) रिअल इस्टेट डेव्हलपमेण्ट मॅनेजमेण्ट.
२) प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेण्ट.

तसंच एक वर्षाचे शॉर्ट टर्म कोसेर्सही संस्था सुरू करत आहे.
हे अभिनव कोसेर्स संस्थेच्या मुंबई आणि अहमदाबाद इथल्या केंदांमध्ये सुरू होत आहेत.
आकृती सिटी गोल्ड इन्स्टिट्युट ही सर्वार्थाने वेगळी संस्था असून ज्ञानपिपासू विद्यार्थ्यांनी एकदा तरी अशा संस्थेला भेट देऊन एक आगळावेगळा असा जीवनानुभव घ्यावा.

आकृती सिटी गोल्ड इन्स्टिट्युट, आकृती सेण्टर पॉइण्ट, पहिला मजला, एमआयडीसी सेण्ट्रल रोड, अंधेरी (पूर्व), मंुबई.
संपर्क: ६७१५२८०३

No comments: