photo

Friday, April 24, 2009

अॅनिमेशन शिकण्यासाठी स्कॉलरशिप

भारतात अॅनिमेशन क्षेत्रात आज सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल होत आहे. येत्या दोन-तीन वर्षात ती दुपटी-तिपटीने वाढणार आहे. परिणामी साधारणत: १० हजार अॅनिमेटर्सची गरज भासणार आहे. त्यामुळे आजच्या या स्पधेर्च्या काळात निर्धास्तपणे आणि हमखास करिअर घडवण्यासाठी अॅनिमेशन हे क्षेत्र फायदेशीर ठरू शकेल. कीतीर् अॅनिमेशन इन्स्टिट्यूट सेमिनार आणि करिअर मार्गदर्शन आदींच्या माध्यमातून विद्याथीर् आणि तरुणांमधे अॅनिमेशन क्षेत्र नेमकं काय आहे, यासाठी जागरुकता केली जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या क्षेत्रात करिअर करण्यासाठी जे प्रशिक्षण घ्यावं लागतं त्यासाठी साधारणत: ६० हजार ते दीड लाख एवढा खर्च येतो. त्यामुळे इच्छा, क्षमता असूनही बरेच विद्याथीर् या क्षेत्राकडे वळत नाहीत. म्हणूनच कीतीर् अॅनिमेशन इन्स्टिट्यूटने माफक शुल्कात अॅनिमेशन कोसेर्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कोसेर्स अंधेरी, बोरिवली, चेंबूर, दादर, घाटकोपर, सांताक्रुझ आणि ठाणे, वाशी आदी शाखांमधे चालवले जातात.

शिवाय या इन्स्टिट्यूटने एकूण ४०० विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देण्याची योजनाही आखली आहे. या स्कॉलशीप योजनेंतर्गत एक तासाची परीक्षा घेऊन त्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना अॅनिमेशन कोसेर्सवर परीक्षेतील गुणवत्तेनुसार २० ते ७५ टक्के स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती परीक्षा दहावीपासून ते कुठल्याही शाखेत पदवीधर देऊ शकतात. अधिक माहितीसाठी २६५५०४८०, ई-मेल - keertisupport@rediffmail.com या वेबसाइटवर संपर्क साधता येईल

No comments: