photo

Friday, April 24, 2009

गुगल ठरणार 'ब्रँड ऑफ दि सेंच्युरी' ? 27 Aug 2008, 1737 hrs IST

इंटरनेटच्या दुनियेत सर्च करणं म्हणजेच गुगल करणं... एवढंच नाही तर आता रोजच्
या इंग्रजीतही शोधण्यासाठी ' आय अॅम गुगलिंग समथिंग ' असं बोललं जातं... गुगलच्या या बोलबाल्यापुढे आता जगभरातले मोठमोठे ब्रॅंडही झुकले आहेत. त्यामुळे गुगल आता ' ब्रँड ऑफ दि सेंच्युरी ' ठरण्याची शक्यता आहे.

एका गॅरेजमध्ये सुरू झालेल्या ही छोटीशी कंपनी आज ' ग्लोबल जायंट ' ठरली आहे. हीच गुगल आता आर्थिक मंदीची जरासुद्धा तमा न बाळगता , या शतकाचा ब्रँड होण्यासाठी एक-एक शिडी चढू लागलीय. इंग्लंडमधली टॉप ब्रॅंडच्या स्पर्धेत गुगलने ‘ कोको कोला ’ आणि ‘ मायक्रोसॉफ्ट ’ या तगड्या कंपन्यांना मागे टाकत अव्वल ठरली आहे.

गुगलने यावर्षी ब्रॅंडच्या स्तरावर ब्रिटनसारख्या देशात झालेल्या सुपरब्रॅंड मतदानात ' मर्सिडीज बेन्झ ' ला आधीच मागं ढकललेय. त्यामुळे या स्पर्धेत आता गुगलची ही घोडदौड आता रोखणं अवघड आहे.

No comments: