photo

Friday, April 24, 2009

२१ व्या शतकातली बदलती शिक्षण पद्घती!

२१ व्या शतकाच्या सुरूवातीलाच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतीच्या नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. अभूतपूर्व गुंतवणूक या क्षेत्रात होऊ लागली. दूरदर्शन, टेलिफोन,
मोबाईल, संगणक, इंटरनेट यांच्या प्रवेशामुळे अतिप्रचंड वेग संशोधन प्रक्रियेत आला. कमी वेळात कमी श्रमात भरपूर काम करण्यास वाव या साधनांमुळे उपलब्ध झाला तसाच ज्ञान प्राप्तीचाही मार्ग सुकर पण विस्तारपूर्ण झाला.
........
या सर्व अत्याधुनिक साधन सुविधांचा परिणाम शैक्षणिक पद्घतीवरही पडला किंबहुना त्याचा पहिला प्रभाव शिक्षण पद्घतीवरच पडला असं म्हणणं योग्य राहील. ज्ञान विस्ताराने, सखोल, सहज प्राप्त होऊ लागलं. आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने नवीन संशोधनापरत्वे प्राप्त वरील साधन शिक्षण पद्घतीत आमूलाग्र बदल घडविण्यास कारणीभूत ठरली. या बदलत्या शैक्षणिक पद्घतीमुळे आता बालपणातच ज्ञानछंद जोपासावा लागेल सोबत सखोल विस्तारीत ज्ञान प्राप्तीचे ओझंही वाढलेेलं आहे. याचा प्रचंड ताण बालवयातच विद्यार्थ्यांवर पडतांना दिसत आहे. इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की, ज्ञानधारण करण्याची शक्ती मुलांमध्ये उपजत असते. ही त्यांची उपजत नैसगिर्क शक्ती कायम राखली पाहिजे. अपेक्षांच्या अधिक बंधनांनी तिला दाबू नये. अपेक्षांचा भला मोठा डोंगरही पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर लादू नये. कारण या २१ व्या शतकात प्रचंड वेगाने वाढलेली लोकसंख्या त्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात वाढलेली स्पर्धा यामुळेही शैक्षणिक पद्घतीत असाधारण असं परिवर्तन झालं आहे. सोबत शैक्षणिक क्षेत्रातील वाढतं व्यावसायिकीकरण हे ही ह्या बदलत्या शिक्षण पद्घतीला कारणीभूत ठरत आहे. आथिर्क दृष्टीने पहाता सामाजिक विषमता खूप वाढलेली आहे. व्यावसायिकीकरणामुळे शिक्षण घेणं इतकं महागडं झालं आहे की, गरीबांसाठी शिक्षण नाही का? हा प्रश्न आता डोकं वर काढतो आहे. यामुळे या क्षेत्रातील पावित्र्यसुद्घा धोक्यात आलेलं आहे. भविष्यात ही अतिशय गंभीर व दूरगामी परिणाम करणारी बाब ठरणार आहे. शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाचे हे तोटे असले तरी दुसऱ्या बाजुने या व्यावसायिकीकरणाचा फायदा असा की, सखोल, आधुनिक, उच्च ज्ञानप्राप्ती ही यामुळेच शक्य आहे. त्यासाठी जगात इतरत्र कोठेही फिरण्याची आवश्यकता नाही. ज्ञान प्राप्तीच्या बाबतीत स्वावलंबी होणं प्रत्येकाला शक्य होऊ लागलेलं आहे, पालकांचा वाढता सक्रिय सहभाग ही काही वैशिष्ट्ये आहेत. या बदलत्या शिक्षण पद्घतीत विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही आपल्या पाल्यांबाबत अधिक जागृकता दाखवावी लागत आहे.

आजची ही बदललेली शिक्षण पद्घती नैसगिर्क शिक्षणाला फारशी अनुनसली तरी बदलत्या सामाजिक परिस्थितीकूलनुसार घडणारी बाब आहे. मुलांच्या आतंरीक शक्तीच्या विकासाकडे दुर्लक्ष करुन, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून गुणवत्ता वाढविण्याचा चुकीचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी शिक्षकांचं कर्तव्य खूपच वाढलेलं आहे. २१ व्या शतकातील बदललेल्या या व्यावसायिक शिक्षण पद्घतीत शिक्षकसुद्घा व्यावसायिक असावा, ही सर्वांची अपेक्षा आहे. ती सार्थ ठरविण्यासाठी शिक्षकास सदैव जागृत राहून नवीन ज्ञान, नवीन संशोधन, समाजाचे बदलते विचार प्रवाह, मानसिकता या सर्वांचा सूक्ष्म अभ्यास करुन शिक्षणाला वेळोवेळी योग्य दिशा द्यावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना अधिक परीश्रमाची व त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीची गरज आहे. स* परिस्थितीत व्यवसायिक दृष्टीकोनातून बदलणारी शिक्षण पद्घती ही काळाची गरज असली तरी त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावीच लागणार आहे.

तज्ञांच्या मते तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचलं. परंतु प्राथमिक शिक्षणापर्यंत ते गेलं नाही. संकल्पना स्पष्ट करणारी व संकल्पनेवर भर देणारी शिक्षण पद्घती असावी. मुल्य शिक्षणातही येणाऱ्या काळात प्रचंड बदल होणार असून त्यानुसार शिक्षण पद्घतीत बदल करावा लागणार आहे.

मुलांच्या आधुनिक शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थेची निवड करतांना घ्यावयाची काळजी

* व्यवस्थापन मंडळ विद्याविभूषित तत्त्वचिंतक असावेत.

* उच्चतंत्र (हायटेक) प्रणालीद्वारे शिक्षण सुविधा असावी.

* शिक्षक वृंद- निवड प्रक्रिया, त्यांची शैक्षणिक पात्रता, पेमेंट स्ट्रक्चर, शिकवण्याची पध्दत, विद्याथीर् व शिक्षकांचं गुणोत्तर, संवाद कौशल्य

* विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया, प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमाण, पालकांकडून असलेल्या अपेक्षा.

* विद्याथीर् निवड प्रक्रियेतील पारदर्शकता महत्त्वाची, पालकांचे पूर्ण समाधान व्हावे.

* शाळेची आतापर्यंतची निकालाची उज्ज्वल परंपरा

* अंतर्गत उत्तर पत्रिका तपासणी व गुणदान पध्दत

* शाळेस शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेले पुरस्कार, सन्मान व क्रीडा स्पर्धांमधील शाळेचा सहभाग सातत्याने असतो का?

* विद्याथीर् हितासाठी शाळेच्या भविष्यातील योजना

* शिक्षणाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे छंद, आवडी-निवडी जोपासण्यास प्राधान्य आहे का? असल्यास कशा प्रकारे? क्रीडा मैदान, साहित्य उपलब्ध आहे का?

* इन्फ्रास्ट्रक्चर- शाळेची इमारत स्वमालकीची की भाड्याची? एकूण क्षेत्रफळ, वर्ग खोल्यांची संख्या, आसन व्यवस्था इ.

No comments: