photo

Friday, April 24, 2009

विण्डोज Xp मधला लपाछपीचा खेळ

आपला कम्प्युटर हा हत्तीसारखा असतो... त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे... कारण या कम्प्युटरमध्ये अनेक प्रोग्राम्स दडलेले असतात. जे वापरण्यासाठी आपले नेहमीचे आयकॉन किंवा स्टार्ट बटन-प्रोग्राम असा रस्ता चालत नाही. त्यासाठी काही छुपे रस्ते असतात. या छुप्या रस्त्यांवरून जर आपण हा लपाछपीचा खेळ खेळला तर अनेक गोष्टी सापडू शकतात.

आज आपल्याकडे बहुसंख्य कम्प्युटरमध्ये विण्डोज xp ही ऑपरेटिंग सिस्टम वापरलेली असते. या ङ्गक्क मध्ये दडलेले अनेक प्रोग्राम्स शोधण्यासाठी आजच्या टेकट्रिक्स... यात आपण अशा काही कमाण्ड समजून घेऊ, ज्यामुळे आपण टेक्नोसॅवी कॉम्पयुझर म्हणून कॉलर टाइट करू शकू. यासाठी खाली दिलेल्या कमाण्ड वापरून तर बघा.

विण्डोजमधील स्टार्ट बटणावरील Run वर क्लिक करा. त्यानंतर येणाऱ्या विण्डोमध्ये खाली दिलेल्या प्रोग्रामच्या शॉर्टकट टाइप करून एण्टर मारल्यास तो प्रोग्राम सुरू होईल.

१.आपल्या की-बोर्डवर अनेक चिन्हं नसतात हे माहितेय... अशी अनेक निरनिराळी चिन्हं आणण्यासाठी Run विण्डोमध्ये charmap ही कमाण्ड देऊन तर बघा.

२.कम्प्युटरमधील अनावश्यक फाइली नष्ट करणारा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : cleanmgr

३.कॉपी केलेली गोष्ट पाहण्यासाठी तसंच साठवण्याचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : clipbrd

४.विशिष्ट प्रोग्राममधील प्रॉब्लेम शोधणारा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : drwtsn32

५.कम्प्युटरमधील साऊण्ड आणि व्हिडीओ कार्डबद्दलची माहिती पाहण्यासाठी : dxdiag

६.स्वत:चा नवीन अक्षर तयार करण्यासाठीचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी ( Private character editor ) :

eudcedit

७.आपणहून उघडणारा आणि इन्स्टॉल करणारा प्रोग्राम सुरू करण्यासाठी ( IExpress Wizard ) : iexpress

८.नेटवर्किंगमध्ये असलेल्या कम्प्युटरमधील फाइल्स ऑॅफलाइन असताना एकत्र करण्यासाठीचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी ( Microsoft Synchronization Manager ) : mobsync

९.विण्डोज मीडिया प्लेअरचं जुनं व्हर्जन सुरू करण्यासाठी ( Windows Media Player 5.1 ) : mplay32

१०. आपल्या कम्प्युटरमधील अंतर्गत व्यवस्थेची माहिती पाहण्यासाठीचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : packager

११. विण्डोजमधील सॉफ्टवेअरच्या अंतर्गत नोंदी पाहण्यासाठी : regedt32 किंवा regedit

१२. नेटवर्किंगमध्ये असलेल्या कम्प्युटरमध्ये देवाण-घेवाणीचा फोल्डर बनवण्यासाठी : shrpubw

१३. कम्प्युटरमधील डिजिटल सिग्नेचर पडताळण्याचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी ( File siganture verification tool ) : sigverif

१४. आवाज कमी-जास्त करण्याचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : sndvol32

१५. विण्डोजमधील सॉफ्टवेअर तसंच हार्डवेअरच्या ड्राइव्हर फाइली पडताळणारा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : verifier

No comments: