photo

Friday, April 24, 2009

इंटरनेट एक्स्प्लोरर असुरक्षित, मायक्रोसॉफ्टची कबुली

जगभरात इंटरनेटसाठी सर्वाधिक वापरला जाणारा इंटरनेट एक्स्प्लोरर हा ब्राउझर सुरक्षित नसल्याची कबुली, खुद्द त्याची निर्मिती करण्या-या मायक्रोसॉफ्ट कंपनीने दिली आहे. हॅकरसाठी इंटरनेट एक्स्पोररमध्ये ‘ उद्योग ’ करायला पूर्ण वाव असून, ही त्रुटी दूर करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट जीवाचे रान करत आहे.

इंटरनेटच्या दुनियेत सध्या ब्राउझरवॉर सुरू आहे. मॉझिलाचे फायरफॉक्स, गुगलचा क्रोम, अॅपलचा सफारी, ऑपेरा आणि फ्लॉक या ब्राउझरच्या स्पर्धेत इंटरनेट एक्स्प्लोरर पिछाडीवर पडला आहे. या पार्श्वभूमीवर इंटरनेट एक्स्प्लोररमधील या त्रुटीमुळे मायक्रॉसॉफ्टला मोठा फटका बसला आहे.

इंटरनेट एक्स्प्लोररमधल्या या त्रुटीमुळे हॅकरना पासवर्ड तसेच खासगी माहिती हॅक करणे शक्य आहे. या त्रुटीमुळे जगभरातील २० लाख कॉम्प्युटर इन्फेक्टेड झाले असल्याची भीतीही व्यक्त होत आहे. याचा सर्वात मोठा फटका बॅंकिंगसारख्या संवेदनशील क्षेत्राला बसू शकतो असे सांगितले जात आहे.

यावर तातडीची उपाययोजना म्हणून मायक्रोसॉफ्टने एक विशेष सॉफ्टवेअर पॅच रिलिज केला आहे. या पॅचमुळे प्राथमिक उपाय होतील, पण लवकरच मायक्रोसॉफ्ट आपल्या एक्स्प्लोररमध्ये काही महत्त्वाचे बदल करेल, अशीही चिन्हे आहेत.

No comments: