photo

Friday, April 24, 2009

पुस्तकांचा आयपॉड

आयपॉड म्हणजे संगीत ऐकण्याचं हॅण्डी अॅण्ड ट्रेण्डी गॅजेट. पण तुम्हाला जर आयपॉडवर पुस्तकं वाचता आली तर! नवल वाटतं ना... हो हे खरं आहे. वाचनाचा छंद असणाऱ्यांसाठी एक पर्वणी ठरणारं गॅजेट आता बाजारात आलं आहे. ऑॅनलाइन करण्यात आलेली पुस्तकं या डिवाइसच्या साह्याने वाचता येणार आहे. सध्या तरी इंग्रजीतील पुस्तकं वाचता येणार आहेत. पुढील काही दिवसांत यात जगभरातील इतर भाषांतील पुस्तकंही ऑॅनलाइन वाचता येणार आहे. मात्र अमेझॉन या कंपनीने पुस्तकांचा आयपॉड बाजारात आणलाय.

डाऊनलोड करा पुस्तकं :
सर्वाधिक पॉप्युलर असलेल्या किंडल या इलेक्ट्रॉनिक ई-बुक रिडरचं नवं वर्जन किंडल 2 अमेरिकेतील या कंपनीने बाजारात आणलं आहे. हा नवा आयपॉड अनेक पुस्तकं डाउनलोड करू शकत असल्याने हवं ते पुस्तक तुम्हांला हवं तेव्हा वाचता येऊ शकेल. तसंच अनेक वर्तमानपत्रांच्या वेबसाइटही तुम्ही या आयपॉडवर पाहू शकता.

वैशिष्टयं :
किंडलचा हा नवीन आयपॉड जुन्या वर्जनपेक्षा खूपच सडपातळ आणि वजनाने हलका आहे. याची बॅटरी लाइफही अधिक आहे. एकदा चार्ज झाल्यावर दोन आठवड्यांपर्यंत आपण पुस्तकंवाचू शकतो. याची मेमरी मागील वर्जनच्या सात पट अधिक आहे. यात सुमारे 1500 पुस्तकं स्टोर केली जाऊ शकतात. आगामी काळात आपल्या मायमराठीतील पुस्तकं यात डाउनलोड करता येणं शक्य होणार आहे. सध्या यात केवळ इंग्रजी पुस्तकं डाउनलोड करता येतात. अमेरिकेत हा आयपॉड जबरदस्त हिट झाला असून पहिल्या वर्जनचा सर्व स्टॉक संपला आहे. किंडलचे आतापर्यंत अडीच लाख आयपॉड विकले गेले आहे, अशी बातमीही कानावर आली आहे.

नव्या वैशिष्ट्याने वाद :
किंडल 2 मध्ये कम्प्युटर जनरेटेड वॉइसच्या मदतीने पुस्तकातील मजकूर वाचण्याची सुविधा आहे. मात्र, काही प्रकाशकांनी यावर आक्षेप घेतला आहे. अमेरिकेतील एका प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने या सिस्टममधून मोठमोठ्याने पुस्तक वाचण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यांच्याकडे पुस्तकांचा कोणताही ऑॅडिओ राइट नाही.

No comments: