photo

Friday, April 24, 2009

फुकटात मोबाइल, लॅपटॉप देणारी वेबसाइट

मोबाइल , लॅपटॉपसारख्या
वस्तू फुकटात मिळतील असं कोणी सांगितलं तर आश्चर्य वाटेल . पण ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे काम केले आहे वरुण जग्गेर नावाच्या मुंबईकर तरुणाने .

वरुणच्या freecycle.org या वेबसाइटचे सदस्य असलेल्यांनी हव्या असलेल्या अनेक वस्तू वेबसाइटमार्फत फुकट मिळवल्या आहेत . यामध्ये छोट्या - मोठ्या , स्वस्त तसेच महाग अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे . तब्बल ७५ देशांमध्ये पाहिल्या जाणा - या वरुणच्या वेबसाइटच्या माध्यमातून शेकडो जणांनी वस्तूंची मोफत देवाण - घेवाण केली आहे .

एकदा freecycle.org या वेबसाइटचे सदस्यत्व स्वीकारले की , आपल्या जवळच्या वेबसाइटच्या स्वयंसेवकाशी इ - मेल द्वारे संपर्क साधायचा . आपल्याला काय हवे आहे ते कळवायचे . काही वस्तू देण्याची तयारी असल्यास ती माहितीदेखील द्यायची . स्वयंसेवकाकडून येणारी ‘ देण्यासाठीच्या वस्तूंची यादी ’ तपासायची . त्यानंतर आपल्याला हवी असणारी वस्तू फुकटात देणा - याशी संपर्क साधून ती वस्तू त्याच्याकडून मिळवायची . कोणी आपण देऊ इच्छित असलेली वस्तू मिळवण्यासाठी संपर्क केल्यास त्यांना भेटायचे . इतकं सोप्प तंत्र आहे . फक्त हे करताना मोफत देण्यात येणारी अथवा स्वीकारण्यात येणारी वस्तू उत्तम स्थितीत असणे तसेच तिच्याशी संबंधीत कायदेशीर अधिकाराचे हस्तांतर करण्याची गरज असल्यास तसे करणे बंधनकारक आहे . या व्यवहारात फसवणूक करू नये , एवढीच वेबसाइटची माफक अपेक्षा आहे .

No comments: