photo

Friday, April 24, 2009

टेक टिप्स

* रन कमाण्डमधे जाऊन आपण अनेक प्रोग्राम रन करतो. त्यासाठी स्टार्ट-रन असा लाँगकट वापरण्यापेक्षा फक्त विण्डोज बटण आणि आर दाबायचं. रनची विण्डो धावाय
ला रेडी.

* जो डेटा आपल्यासाठी मस्ट आहे, त्याचा बॅकअप ठेवावा. त्यासाठी तो एकाच ठिकाणी न ठेवता हार्डडिस्क, सीडी, पेन ड्राइव अशा वेगवेगळ्या ठिकाणी सेव करता येतो.

* आपला महत्त्वाचा डेटा अर्थात, वर्ड, एक्सेल, प्रेझेण्टेशन, गाणी, गेम्स, सिनेमा यांच्या फाइल्सपैकी ज्या फाइल आवश्यक आहेत तेवढ्याच 'हार्डडिस्क'मधे ठेवा. बाकीच्या फाइल सरळ डिलिट करा. नको असलेले प्रोग्राम काढून टाका. यामुळे व्हायरसची शक्यता कमी होते.

* ज्या फाइल हव्या आहेत, पण कधीतरीच वापरणार, त्या सीडी, डीव्हीडी, पेन ड्राइव किंवा एक्स्टर्नल हार्डडिस्कमधे टाकून ठेवा.

* एका सीडीमधे ७०० एमबी आणि डीव्हीडीमध्ये ४.७ जीबीपर्यंत डेटा ठेवता येतो. पेन ड्राइवमधे तर ५१२ एमबीपासून ८ जीबीपर्यंत विविध ब्रॅण्डचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ४० जीबीपासून ३०० जीबीपर्यंतच्या एक्स्टर्नल हार्डडिस्क बाजारात उपलब्ध आहेत. त्यामधे प्रचंड डेटा सुरक्षित ठेवता येतो.

* गुगलच्या मदतीने तुम्ही एखाद्या र्सव्हरवर डेटा सुरक्षित ठेवू शकता, तोही अगदी मोफत! त्यासाठी 'गुगल डॉक्स' ही सेवा वापरता येईल. तुमचा जीमेल पासवर्ड वापरून जगाच्या पाठीवर कुठेही इण्टरनेटच्या मदतीने 'गुगल डॉक्स'मधे डेटा स्टोअर करता येतो. ज्यांना वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइण्ट प्रेझेण्टेशन हाताळता येतात त्यांना ही सेवा सहज वापरता येईल.

* गुगलप्रमाणेच अन्य काही साइट अशा आहेत, ज्या ऑॅनलाइन डेटा स्टोअरेजसाठी मदत करतात. आपल्या महत्त्वाच्या फाइल्स तुम्ही या साइट्सवर अपलोड करून ठेवू शकता.

* जो डेटा कम्युटरवर ठेवायचा आहे, त्याची व्यवस्थित विभागणी करा. त्यासाठी सी ड्राइवमधे पाटिर्शन करून किमान आणखी एक ड्राइव तयार करा. त्याला नाव द्या. 'सी'मधे प्रोग्राम आणि बाकीचा डेटा फाइल पाटिर्शन करून नव्याने तयार केलेल्या ड्राइवमधे टाका. त्यामुळे हार्ड डिस्क क्रॅश झाली अथवा काही कारणामुळे फॉरमॅट करावी लागली, तर फक्त नव्याने प्रोग्राम इन्स्टॉल करावे लागतील. तुमच्या डेटाचं नुकसान होणार नाही.

No comments: