photo

Thursday, April 23, 2009

टेक इट इझीआयआयटी

इंजिनीअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचा घरच्याघरी अभ्यास करण्यासाठी आंेकार देवधर यांच्या मित्रमंडळींनी वेबसाइट विकसित केली आहे. इंजिनीअर होण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं ते आयआयटीमधून पदवी घ्यायचं. कारण आयआयटीमधून केवळ जागतिक दर्जाच्या इंजिनीअरिंगचं शिक्षण मिळतं असं नव्हे तर इतर अॅक्टिव्हिटीज्मुळे व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच कोर्सचं प्रॅक्टिकल नॉलेजही विद्यार्थ्यांना अद्ययावत बनवतं. आयआयटीमधे प्रवेश मिळवण्यासाठी दोन वर्षं प्रवेश परीक्षेचा अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास स्वत:च्या हिमतीवर करता येत नाही तर, त्याला दजेर्दार मार्गदर्शनाची गरज असते, असं मार्गदर्शन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि माफक फीमधे कसे देता येईल, असा विचार ओंकार देवधर आणि आयआयटीतील त्यांच्या मित्रांनी केला आणि त्यातूनच निर्माण झाली 'इझी आयआयटी' ही वेबसाईट. आयआयटी प्रवेश परीक्षेच्या संपूर्ण दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाची व्हीडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, शंका विचारण्याची सोय, प्रत्येक प्रकरणावर परीक्षा, प्रोफेसर्सकडून मार्गदर्शन असा सवोर्त्तम अभ्यासक्रम ओंकार देवधर आणि त्याच्या टीमने तयार केला. घरी राहून हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो आणि दिवसातल्या कोणत्याही वेळी विद्याथीर् अभ्यास करू शकतो, हे या अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे फायदे. म्हणजेच, घरी येऊन शिकवणारा प्रोफेसर 'इझी आयआयटी'ने तयार केला आहे. या संबंधात अधिक माहितीसाठी www.easyiit.com, संपर्क : ९८२१६००९९६.

No comments: