photo

Friday, April 24, 2009

ब्राऊझरच्या लढाईत गुगल जिंकणार? 4 Sep 2008, 1831 hrs IST

मायक्रोसॉफ्टच्या कम्प्युटर आणि इंटरनेट क्षेत्रातील साम्राज्याला टक्कर देण्यासाठी
गुगलने ' गुगल क्रोम ' नावाचे ओपन सोर्स ब्राऊझर सादर केले आहे. ४० भाषेत तयार केलेले ब्राऊझर एकाचवेळी १०० देशात लाँच करण्यात आले.

मायक्रोसॉफ्टकडे सध्या ब्राऊझर क्षेत्रातील ७० टक्के हिस्सा आहे आणि दुस-या क्रमांकावर फायरफॉक्सचे मोझिला आहे. त्यामुळे ' गुगल क्रोम ' च्या आगमनानंतर ब्राऊझर क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

डेन्मार्कच्या इंजिनिअरनी ' गुगल क्रोम ' अजून प्रायोगिक अवस्थेत आहे. इंटरनेट युजरकडून अनुभव जाणून घेऊन या ब्राऊझरमध्ये आणखी विकास करण्यात येणार आहे. मात्र , गुगलच्या ब्राऊझरची इंटरनेटच्या वर्तुळात लाँचिंग होताच लगेच चर्चा सुरू झाली आहे. अनेक ब्लॉगरनी गुगलच्या ब्राऊझरविषयी मतप्रदर्शन करायला सुरुवात केली आहे.

मायक्रोसॉफ्टने ९० च्या दशकात नेटस्केप या ब्राऊझरची मक्तेदारी मोडण्यासाठी काढून इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राऊझर सादर केले आणि अभूतपूर्व यश मिळवले होते. या मक्तेदारीला मोडून काढण्यात गुगल किती यशस्वी होईल हे येणारा काळ ठरवणार असला तरी गुगलने आपल्या सगळ्या सेवा ब्राऊझरमार्फत देऊन मायक्रोसॉफ्टला हादरा देण्याचा इरादा बोलून दाखवला आहे.

दरम्यान , मायक्रोसॉफ्टने ' गुगल क्रोम ' ला उत्तर देण्यासाठी आय ई - ८ लवकरच लाँच करणार असल्याची जाहिर केले आहे.

No comments: