photo

Thursday, April 23, 2009

युनिव्हर्सिटी एक्स्प्रेस

परदेशी युनिव्हसिर्टींमधे अॅडमिशन घेणं ही मोठी टेन्शनची बाब ठरते ती कागदपत्रांची वेळेवर पूर्तता करण्याच्या अटीम
ुळे. अॅडमिशनसाठी आवश्यक ती कागदपत्र वेळेवर पोहोचण्यासाठी ती कुरिअरने पाठवली जातात. पण अनेकदा ती गहाळ होणं किंवा वेळेवर न पोहोचल्याने विद्यार्थ्यांचं भवितव्यच अंधारात सापडतं. किंवा ओरिजनल कागदपत्र हरवल्यामुळे होणारं नुकसानही मोठं असतं. विशेषत: मोठ्या रकमांचे ड्राफ्ट, सटिर्फिकेट्स, शिफारशींची पत्र असतात, त्याचं गहाळ होणं विद्यार्थ्यांना चिंतेत टाकणारं असतं. यावर उपाय म्हणून डीएचएल या आघाडीची कुरिअर कंपनीने एक योजना राबवण्याचं ठरवलं आहे. या योजनेचं नाव आहे डीएचएल युनिव्हसिर्टी एक्स्प्रेस. या उपक्रमांतर्गत ही कंपनी विद्यार्थ्यांचे अर्ज संबधित परदेशी युनिव्हसिर्टीजना वेळेवर आणि सुरक्षित पाठवणार आहे. त्यासाठी सुपर सेवर युनिव्हसिर्टी एक्स्प्रेस प्रीपेड कुपन्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ही कुपन्स दोन प्रकारची असतील. त्यांची किंमत ८२५० आणि ४३७५ आहे. ही कुपन्स ब्ल्यू डार्ट-डीएचएलच्या आउटलेटमधे वॅलिड ठरतील. याविषयी अधिक माहितीसाठी http://www.dhluniversityexpress.com/home.asp वेबसाइटला भेट देता येईल.

No comments: