photo

Friday, April 24, 2009

आता भारतीय भाषांमध्येही मोझिला23 Jun 2008, 2043 hrs IST

आता तुम्हाला गुजराती किंवा पंजाबीमधूनही इंटरनेट सर्फ करता येणार आहे. त
्यासाठी मोझिला फायरफॉक्सच्या या दोन भाषांमधले ब्राऊझर सज्ज झाले आहेत. या दोनच नाहीत नाही तर लवकरच मराठीसह अन्य भारतीय भाषांमध्येही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

कम्प्युटर आणि इंटरनेटच्या दुनियेत सध्या भारतीयांचा दबदबा वाढतो आहे. भारतीय इंटरनेट युजर्सच्या संख्येतही प्रंचड वाढ होत आहे. त्यामुळे या नव्या नेटक-यांची गरज लक्षात घेऊन जागतिक कंपन्या भारतीय भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे मोझिला फायरफॉक्स या ब्राऊझरचे दोन भारतीय भाषांमध्ये करण्यात आलेले लॉचिंग.

मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोरर आणि अॅपलच्या सफारी या दोन ब्राऊझर टक्कर देण्याच्या इर्षेनेच बाजारात दाखल झालेल्या ‘ ओपन सोर्स ’ मोझिला फायरफॉक्स ब्राऊझरने आधुनिक सुविधांसह फायरफॉक्स ३ ही आवृत्ती बाजारात आणली आहे. या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गुजराती आणि पंजाबी या दोन भारतीय भाषांसह जगात बोलल्या जाणा-या ४६ भाषांमध्ये ही आवृत्ती उपलब्ध करण्यात आली आहे.

मायक्रोसॉफ्टचे ‘ आय ई ’ हे ब्राऊझर हिंदी भाषेत उपलब्ध आहे. या ब्राऊझरवर देवनागरी लिपीत मराठी आणि हिंदी टायपिंगची सोय आहे. असे असताना मोयक्रोसॉफ्टशी स्पर्धा करणारे मोझिला हिंदीमध्ये उपलब्ध करण्यात आलेले नाही. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोझिलाचे प्रवक्ता क्रिस हॉफमन यांनी मोझिला ब्राऊझरच्या सेवांचे विविध देशांमध्ये बोलल्या जाणा-या भाषांमध्ये भाषांतर करण्याचे काम असंख्य स्वयंसेवक करत असल्याचे सांगितले. त्यांनी हिंदी आणि तामिळ भाषेतील मोझिला फायरफॉक्स ब्राऊझरची आवृत्ती लवकरच बाजारात येणार असल्याचे आश्वासन दिले.

दरम्यान , मोझिलाच्या ब्राऊझरची नवी आवृत्ती मंगळवारी लाँच होताच २४ तासांमध्ये सुमारे दीड कोटी युजरनी ही आवृत्ती डाऊनलोड करुन घेतली आहे. हे ब्राउझर http://www.mozilla.com/en-US/firefox/all.html या लिंकवर मोफत उपलब्ध आहेत.

No comments: