photo

Friday, April 24, 2009

पंचविशी भारती विद्यापीठाच्या बी-स्कूलची

भारती विद्यापीठाची स्थापना १९६४ मध्ये डॉ. पतंगराव कदम यांनी केली. तरुणांना शिक्षणाच्या चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यातया उद्देशाने १९८४ मध्ये 'भारती विद्यापीठ इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेण्ट स्टडीज अॅण्ड रिसर्च'ची स्थापना झाली. नवी मुंबईतल्या बेलापूरजवळ पारसिक डोंगराच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर ही संस्था वसली आहे.

कोसेर्स : एमएमएस (मास्टर इन मॅनेजमेण्ट स्टडीज)

पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी एमएमएस (मास्टर इन मॅनेजमेण्ट स्टडीज) आणि एमएफएम (मास्टर ऑफ फायनान्शियल मॅनेजमेण्ट) हे मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त कोसेर्स असून या कोसेर्सना 'ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन' (एआयसीटी)ची मान्यता आहे. भविष्यात औद्योगिक आणि कॉपोर्रेट क्षेत्राचा होणारा विकास लक्षात घेऊन यांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. तसंच यात सध्याच्या काळात लागणारी मॅनेजमेण्ट टूल्स आणि टेक्निक्सही शिकवली जातात.

'एमएमएस' कोर्समधली स्पेशलायझेशन्स : माकेर्टिंग, पसोर्नेल, फायनान्स, सिस्टिम्स आणि ऑपरेशन्स. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेण्ट (पीजीडीबीएम) हा संस्थेचा 'एआयसीटीई' मान्यताप्राप्त कोर्स आहे.

'पीजीडीबीएम'मधली स्पेशलायझेशन्स : माकेर्टिंग, फायनान्स, ऑपरेशन्स, एचआर आणि सिस्टिम्स. याशिवाय इन्शुरन्समध्येही स्पेशलायझेशन करता येतं.

सुपर स्पेशलायझेशन : फायनान्स, माकेर्टिंग आणि ह्युमन रिसोसेर्स. याचे अभ्यासक्रम तज्ज्ञांनी तयार केले आहेत. यात विद्यार्थ्यांना इण्डस्ट्रीमध्ये असलेल्या विशिष्ट गरजेनुसार ट्रेनिंग दिलं जातं.

सुपर स्पेशलायझेशन्स:

फायनान्स : कॉपोर्रेट फायनान्स, बँकिंग, कॅपिटल माकेर्ट.

ह्युमन रिसोसेर्स: टॅलेण्ट मॅनेजमेण्ट, नॉलेज मॅनेजमेण्ट, परफॉर्मन्स मॅनेजमेण्ट

माकेर्टिंग: इण्टरनॅशनल बिझनेस, रिटेल माकेर्टिंग, डायरेक्ट माकेर्टिंग, लॉजिस्टिक मॅनेजमेण्ट

एमसीए : संस्थेमध्ये मुंबई विद्यापीठाचा तीन वर्षांचा पूर्णवेळ एमसीए कोर्स आहे. तसंच भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे बीबीए आणि बीसीए या कोसेर्सची सुविधाही आहे.

शिक्षणपद्धती :

* बीव्हीआयएमएसआरमध्ये अनुभवाधिष्ठित ज्ञानावर जास्त भर दिला जातो. वर्गामध्ये शिकवण्यासोबतच कॉपोर्रेट क्षेत्राच्या गरजेनुसार लागणारं खास ट्रेनिंगही दिलं जातं. त्यात इण्डस्ट्रीत घडणारे बदल, माकेर्टमधले नवे ट्रेण्ड्स याबद्दलची माहिती असते.

* विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा म्हणून विविध विषयांवर प्रोजेक्टस करून घेतले जातात. प्रत्यक्ष अनुभवांवरून त्यांना बरंच शिकता येतं. तसंच केस स्टडीजही दिल्या जातात. त्यामुळे त्यांना समस्येचा मुळाशी जाऊन विचार करण्याची सवय लागते.

* विद्यार्थ्यांना इण्डस्ट्रीत काम कसं चालतं हे दाखवण्यासाठी प्रत्यक्ष स्थळी नेलं जातं. त्यासाठी विविध सेमिनार्सचं आयोजन केलं जातं.

* विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी इण्डस्ट्रीत काम करणाऱ्या व्यक्तींशी भेट करून दिली जाते.

ग्रंथायल : भारती विद्यापीठाच्या ग्रंथालयात विविध विषयांची पुस्तकं आणि संदर्भग्रंथ आहेत. इण्डस्ट्रीतल्या घडामोडी कळून त्यानुसार अपडेट राहता यावं यासाठी उत्तम नियतकालिकंही आहेत. शिवाय ई-लायब्ररीची सुविधाही आहेच.

कम्प्युटर लॅब्ज : मॅनेजमेण्टच्या क्षेत्रात कम्प्युटर साक्षर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून इथे विद्यार्थ्यांना मॅनेजमेण्ट क्षेत्राशी निगडित असलेली आयटी टूल्स आणि प्रोग्रॅम्स शिकवले जातात.

मनोरंजनाचा सुविधा : मॅनेजमेण्ट अभ्यासक्रमात पुस्तकी शिक्षणाला रंजक शिक्षणाची जोड देणं आवश्यक असतं. म्हणून भारती विद्यापीठाच्या मैदानात अनेक उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांसाठी खास स्पोर्ट्स सेंटरही उभारण्यात आलं आहे. तसंच इथे भव्य व्हिज्युअल रूम असून तिथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखवले जातात.

कॅफेटेरिया : विद्यार्थ्यांसाठी मोकळं, प्रसन्न वातावरण असलेलं प्रशस्त कॅफेटेरियाही बांधण्यात आलंय. कॉन्फरन्स रूम्स : विद्यार्थ्यांना प्रेझेण्टेशन देण्यासाठी वातानुकूलित कॉन्फरन्स रूम्स आहेत. शिवाय तिथे ऑडिओ-व्हिज्युअल प्रात्यक्षिकं दाखवण्याचीही सोय आहे.

क्लासरूम्स : विद्यार्थ्यांना सहजपणे शिक्षकांशी किंवा एकमेकांशी संवाद साधता यावा या दृष्टिकोनातून इथल्या वर्गांची रचना केली आहे. हे वर्ग वातानुकूलित आहेत.

हॉस्टेल : मंुबईबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सुविधा आहे.

संपर्क: २७५७२४३३/२७५६२५८२.

No comments: