photo

Friday, April 24, 2009

वेबसाइटवर आलाय मुंबईचा प्लॅनर 3 Aug 2008, 2152 hrs IST

या शनिवार-रविवारी तुम्हाला ब-याच दिवसांनी जोडून सुट्टी मिळाली आहे... ब-याच दिवसांत गाण्याच्या मैफलीला गेलो नसल्याची हुरहूर आहे, तुमचा मित्रही आताच ऑनलाइन आहे... त्यामुळे तुम्हाला तात्काळ ऑफिसात बसल्याबसल्या या वीकेण्डला मुंबईत कुठे चांगली मैफल होतेय का याची माहिती हवी आहे...

तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून हॅम रेडिओ शिकण्याची इच्छा आहे, पण या कोर्सविषयी पेपरात छापून आलेलं संक्षिप्त वृत्त नेमकं कधी पाहिलं ते आठवत नाही... नुकतीच रद्दीही देऊन झाली आहे...

तुम्ही स्वत:च एखाद्या संस्थेतफेर् एखादा फिल्म फेस्टिव्हल आयोजित करता आहात... पण या विषयात रस असलेल्यांपर्यंत थेट कसं पोहोचता येईल, त्याला प्रतिसाद किती मिळेल, याबद्दल साशंक आहात...

या सर्वच सिच्युएशन्समध्ये तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल, अशी एक वेबसाइट आता तुमच्या मदतीला धावून आली आहे. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांत विविध प्रकारच्या मैफली, कार्यक्रम, चर्चासत्रं, सेमिनार, वर्कशॉप्स सुरू असतात. साहित्य, कला, नाट्य, संगीत, नृत्य, भ्रमंती, विज्ञान, करिअर, आरोग्य, क्रीडा अशा विविध विषयांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांची एका छत्राखाली माहिती देणारी 'इव्हेण्ट्स् ऑफ मुंबई' नावाची एक सर्वसमावेशक वेबसाइट डोंबिवलीच्या एका मराठी तरुणाने सुरू केली आहे. या वेबसाइटमुळे आपला फावला वेळ चांगल्या उत्साहवर्धक कार्यक्रमासाठी प्लॅन करणं तुम्हाला शक्य होणार आहे.

व्यवसायाने ऑडिटर असलेल्या श्रीरंग वैद्य या तरुणाने गेल्या सात-आठ महिन्यांत भरपूर परिश्रम घेऊन आपल्या स्वत:च्या पुंजीतूनच ही वेबसाइट साकारलीये. इंग्लंड, अमेरिका, मलेशिया आदी सर्वच देशांमध्ये अशा प्रकारे सर्वच्या सर्व इव्हेण्ट््सची माहिती देणारी वेबसाइट कार्यरत आहे. मुंबईत इतक्या मोठ्या संख्येने विविध विषयांवर चांगले उपक्रम होत असताना आणि या सर्व उपक्रमांमध्ये इंटरेस्ट घेणारा मोठा कलासक्त, सर्जनशील वर्ग इथे असताना मुंबईत अशी वेबसाइट का नाही, याचं श्रीरंगला कोडं पडलं. तो स्वत: ट्रेकिंगपासून साहित्य, कला आदींचा उपासक. या क्षेत्रातील कार्यक्रमांच्या आयोजनातही त्याचा पुढाकार. त्यामुळे अशा प्रकारची एकछत्री वेबसाइट आपणच सुरू का करू नये, असा विचार त्याच्या मनांत आला. अशा प्रकारच्या शंभरएक वेबसाइट््सचा अभ्यास त्याने केला. विविध पेपरांमध्ये छापून येणारी माहिती यापलीकडे एखादा प्लॅटफॉर्म हवा, असं त्याला वाटत होतं. पेपरांच्या 'थोडक्यात'च्या बातम्यांमधून सुमारे साडेतीन हजार ई मेल आयडी त्याने जमा केले. त्यातून आतापर्यंत अडीचशे संस्था-व्यक्तींनी त्यांची माहिती साइटवर अपलोड केलीये.

या साइटचं वैशिष्ट्यं म्हणजे कोणत्याही क्षेत्रातील सर्च देऊन आपल्याला त्या क्षेत्रात मुंबई आणि उपनगरांत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती, त्या संस्थांचा तपशील मिळू शकतो. पुढील आठवडाभराचे, महिनाभराचे कार्यक्रम सेगमेण्टनुसार पाहण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. कोणत्याही संस्था किंवा व्यक्तींना त्यांचे कार्यक्रम या साइटवर या साइटवर विनामूल्य टाकता येतात. कार्यक्रमांच्या स्वरूपाचं आणि विश्वासार्हतेचं मॉनिटरिंग मात्र वेबसाइट अॅडमिनिस्ट्रेटरतफेर् करण्यात येतं. ही साइट केवळ भविष्यातील इव्हेण्ट््सची असल्याने कार्यक्रम झाला की ती माहिती आपोआप डिलिट होते.

भविष्यात या सेवेवरून लोकांना त्यांच्या आवडीनुसार ई-मेल अॅलर्ट किंवा मोबाइल अॅलर्ट देण्याची सुविधा सुरू करण्याचाही श्रीरंगचा मानस आहे. वेबसाइटचा सदस्य झाल्यावर ईमेल किंवा ऑर्कुटवरील स्क्रॅपद्वारे कार्यक्रमांची विनामूल्य माहिती मिळू शकते. त्यासाठी सदस्यत्व फी घेतली जात नाही. सध्या तरी श्रीरंगने स्वत:च्या पुंजीतूनच हा उपद््व्याप मांडला आहे. संपर्क : ९२२६१९६०२

No comments: