photo

Friday, April 24, 2009

मराठी वेबसाइट्सचे पाऊल पडते पुढे...

मराठी माती, मराठी माणूस, मराठी मित्र, मराठी अड्डा... 'डॉट कॉम'च्या दुनियेत अशा मराठी नावांनीही आपला दबदबा निर्माण केला आहे. गेल्या वर्षभरातच सुमारे ६५ हजार मराठी वेबसाइट्सनी इंटरनेटवर आपला संसार थाटला आहे. ऑर्कुट, फेसबूकच्या धतीर्वर आता मराठी कम्युनिटी साइट सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत.

तंत्रज्ञानाचा आधार घेत मराठीच्या विकासासाठी एक समान मराठी सॉफ्टवेअर असावे, ही मागणी गेली १० वषेर् सरकारदरबारी धूळ घात आहे. पण आता इंटरनेटच्या दुनियेत मराठी वेबसाइट्समधून मराठी लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मराठी विषयात एम.ए. करीत असलेल्या विशाल ननावरे आणि महेश बाणे या दोन विद्यार्थ्यांना इंटरनेटवरील मराठीचा घेतलेल्या आढाव्यात वर्षभरात ६५ हजार ३८८ वेबसाइट सुरू झाल्याचे निदर्शनास आले. 'कम्युनिटी साइट्सवर प्रचंड संख्येने मराठी ग्रुप्स आहेत. अनेक मराठी मुलांनी त्यांचे ब्लॉग सुरू करण्याचे प्रमाणही प्रचंड आहे. त्यातूनच इंटरनेटवर मराठी वेबसाइट्चे प्रमाण किती आहे? याचा शोध घेण्याची कल्पना सुचल्याचे विशालने सांगितले. केवळ उत्सुकतेपोटी केलेल्या या संशोधनात परदेशात स्थायिक असलेल्या मराठी मंडळींनी गेल्या वर्षभरात वेबसाइट्स सुरू केल्याची अथवा प्रसिद्ध वेबसाइटवर लिंक जोडल्याची २० हजाराहून अधिक उदाहरणे त्यांना मिळाली.

आयआयटीतून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला अविष्कार सदावतेर् हा तरुण आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने ऑर्कुटच्या धतीर्वर स्वतंत्रपणे मराठी कम्युनिटी साइट बनवण्याच्या विचारात आहे. वेबसाइट्च्या निमिर्तीत तरबेज असलेल्या विनय मराठे यांनीही अशा उपक्रमास आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. इंटरनेटवर मराठीचा दबदबा वाढतोय हे खरे आहे. पण सर्व क्षेत्रातील मराठीचा अमूल्य ठेवा जपणे, इंटरनेटद्वारे व्यवहारात मराठीचा प्रभावी वापर करणे यासाठी अजूनही आपले प्रयत्न इतर भाषांच्या तुलनेत तोकडे असल्याचे विनय मराठे यांनी सांगितले.

No comments: