photo

Friday, April 24, 2009

परदेशी भाषा शिकण्याचा ऑप्शन

विविध भाषा आत्मसात करणं सहज जमतं त्यांच्यासाठी फॉरेन लँग्वेज शिकणं, हा चांगला करिअर ऑप्शन आहे. ट्रान्स्लेटर, इण्टरप्रिटर, ट्रेनर अशा क्षेत्रांत त्यांना करिअर करता येतं.

....

मीनल कॉलेजमधे असताना जर्मन भाषा शिकत होती. तिने जर्मन भाषेच्या तीन लेवल्स (परीक्षा) पूर्ण केल्या. ती ज्या इन्स्टिट्यूटमधे जर्मन शिकत होती तिथेच तिला ट्रेनर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुढच्या तीन लेवल्स पूर्ण केल्या आणि पोस्ट ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं. थोड्याच दिवसांत मीनलला मल्टिनॅशनल कंपनीमधे इण्टरप्रिटर म्हणून काम करण्याची संधी आली.

फॉरेन लँग्वेजमधे करिअर करताना सहा लेवल्स पूर्ण कराव्या लागतात. पहिल्या तीन लेवल्सला बेसिक आणि पुढील तीन लेवल्सला अॅडव्हान्स म्हणतात. बेसिक लेवल पूर्ण झाल्यावर बेसिक लेवल ट्रेनर म्हणून काम करता येतं. पण या क्षेत्रामधे करिअर करायचं असेल तर अॅडव्हान्स लेवल पूर्ण करावी लागते. त्यानंतर ट्रेनर, ट्रान्स्लेटर आणि इण्टरप्रिटर असे तीन पर्याय उपलब्ध असतात.

ट्रेनर म्हणून इन्स्टिट्यूटमधे शिकवता येतं. कोचिंग क्लासेस सुरू करता येतात किंवा एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करता येतं. याशिवाय दुभाषा म्हणजेच इण्टरप्रिटर म्हणून तारांकित हॉटेल्स, मोठ्या ट्रॅवल कंपनी, मल्टिनॅशनल कंपनी अशा ठिकाणी काम करता येतं. ट्रान्स्लेटरनाही अशा संधी उपलब्ध असतात.

पूर्णवेळ काम करण्याबरोबरीने अर्धवेळ काम करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतात. मुलुंडला राहणारी कांचन काळे ट्रान्स्लेटर म्हणून घरून काम करते. या क्षेत्रात कामाच्या संधींविषयी कांचनने सांगितलं, 'कुठल्याही भाषेत अॅडव्हान्स लेवल पूर्ण केल्यानंतर गुगलवर ट्रान्स्लेटर एजन्सी किंवा ब्युरो टाइप हा सर्च देऊन आपल्या देशाचं आणि शहराचं नाव दिल्यावर अनेक पर्याय आपल्याला दिसतात.

बंगलोर, हैदराबाद, पुण्यामधल्या अनेक कंपन्यांमधे भाषांतराची कामं दिली जातात. सिमेन्स, मॅसटेक, बोश आणि आयबीएम या त्यापैकी काही अग्रणी कंपन्या आहेत. एजन्सी तफेर् या कंपन्यांशी ई-मेलवर संपर्क साधून काम मिळवता येतं. यामधे काही एजन्सी ट्रान्स्लेटरबरोबर कॉण्ट्रॅक्ट करतात. विद्याथीर्, गृहीणींसाठी हे करिअर उत्तम ठरेल. फक्त इंग्रजी आणि फॉरेन लँग्वेजवर प्रभुत्व असण्याची गरज आहे

No comments: