photo

Friday, April 24, 2009

टॅलण्टला नाही कसंलंच बंधन!

टीवी चॅनलवरील रिअॅलिटी शो म्हटलं की फक्त नाचगाणं आणि मिमिक्री एवढ्याच टॅलण्टला प्लॅटफॉर्म दिला जातो. याशिवायही आणखी कला दाखवण्याचं टॅलण्ट अनेकां
मधे असतं. त्याला कोणत्याही मर्यादा नसतात आणि वयाचं बंधनही.

उत्साही आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची धमक असणाऱ्या तरुणाईमधे टॅलण्टची कमतरता नसते हे खरं, पण फक्त तरुणांमधेच टॅलण्ट असतं, हे म्हणणं चुकीचं ठरेल. वयाने मोठे असणाऱ्या कलाकारांमधेही प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळवण्याइतपत काही ना काही कला असते. मग ते हसवणं असो किंवा रडवणं. फक्त हे टॅलण्ट जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात हरवलेलं असतं, ते त्याला योग्य व्यासपीठ न मिळाल्यामुळेच. मात्र, आता desitara.com ही वेबसाइट याच अमर्यादित टॅलण्टची ओळख करून देणार आहे.

या वेबसाइटवर आपल्यातलं टॅलण्ट अपलोड करण्यासाठी वय, धर्म, सीमा, भाषा आणि कलेचं बंधन नाही. साइटवर लॉग इन करून कोणीही कलाकार व्हिडीओ अपलोड करू शकतो. या बेवसाइटवर सिंगिंग, डान्सिंग, अॅक्टिंग, अॅडव्हेंचर, गेम्स, मॅजिक, इन्स्ट्रुमेण्टल, कॉमेडी अॅक्ट अशा कॅटेगरी करण्यात आल्या आहेत. एखाद्या कलाकाराच्या कलेला रेटिंग देऊव प्रतिसाद देता येणार आहे. या माध्यमातून कलेला ग्लोबल ऑडिअन्स मिळेल. ही वेबसाइट फक्त करमणुकीसाठी नाही तर कलेला योग्य व्हॅल्यूही मिळणार आहे. शिवाय टॅलण्ट कॉम्पिटिशन सेक्शनमधेही एण्ट्री करता येईल.

एस लाड ग्रुपच्या कनेक्ट फिल्ममीडियाच्या वतीने ही वेबसाइट लाँच करण्यात आलीय. टॅलण्टला ब्रेक देण्यासाठी हाऊस मूव्ही प्रोडक्शन आणि अनेक अॅक्टिंग स्कूल्सशी फिल्ममीडियाने टायअपही केलं आहे. त्यामुळे इथे टॅलण्ट फक्त मनोरंजनापुरतंच मर्यादित राहणार नाही.

No comments: