photo

Friday, April 24, 2009

टाइम मॅनेजमेण्ट

टाइम मॅनेजमेण्ट केल्याने केवळ काही गोष्टी साध्य होतात असं नाही, तर एकंदरच तुमचा जीवनविषयक दृष्टिकोन त्यामुळे बदलतो.


आपल्याकडे वेळ खूप कमी असतो आणि कामं मात्र खूप असतात. परीक्षा जवळ आलेली असते आणि खूप अभ्यास बाकी असतो. अशा वेळी टाइम मॅनेजमेण्ट करणं फायद्याचं ठरतं.

यादी करा : दिवसभरात नेमकी किती कामं करायची आहे. याची मनातल्या मनात उजळणी करा. त्यांची यादी तयार करा. अगदी क्षुल्लक कामाची नोंद करायला विसरू नका. एखाद्याला कामासाठी विशिष्ट वेळेला फोन करायचा असेल, तर त्याचीही नोंद डायरीत करा. या नोंदी कागदोपत्री केल्यास अधिक उत्तम. पण अनेकांना मोबाइलवर, आपल्या इ-मेल अकाउण्टवर किंवा वेबसाइट कॅलेण्डरमधे दिवसभराच्या कामाची यादी करता येईल. विशेष म्हणजे रिमाण्डर, अलार्ममुळे काम पूर्ण करण्याची आठवण ठेवता येईल.

प्राधान्यक्रम ठरवा : आपल्याला दिवसभरात नेमकं काय काय करायचं याचा प्राधान्यक्रम ठरवा. सगळ्यात महत्त्वाचं काम आधी करा. आधी जे काम कमी महत्त्वाचं आहे, ते शेवटी करा. खूप महत्त्वाच्या कामाचे डिटेल्स ठरवून ठेवा. म्हणजे जर एखादा प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल. तर त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा याची यादी करावी. क्लिष्ट कामं शेवटी आणि सोपी कामं आधी केल्याने काम लवकर पूर्ण होण्यास मदत होते.

वेळापत्रक ठरवा : कोणत्या कामासाठी किती वेळ द्यायचा याचा अंदाज घेऊन ती काम कोणत्या वेळी पूर्ण करायची हे ठरवून टाका. कोणत्या कामाला किती वेळ लागेल, याचा अंदाज घेऊन तशी नोंदही करून ठेवावी. वेळापत्रक तयार केल्यास कामं वेळेत संपवता येतं.

No comments: