photo

Friday, April 24, 2009

स्किलफुल सर्फिंगसाठी 15 May 2008, 0331 hrs IST

इण्टरनेट वापरणा-यांपैकी बहुसंख्य सर्फर इण्टरनेट एक्स्प्लोरर वापरतात. या सर्फिंगला अधिक स्किलफुल आणि तुम्हाला नेटमास्टर बनवणा-या या काही टेकट्रिक्स...
.................
१ इण्टरनेट एक्स्प्लोरर वापरताना बऱ्याचदा त्यावरील मेनूबार, टूलबार आपल्याला नकोसा होतो. फोटो, सिनेमा पाहताना हे बार अनेकदा अडचणीचे ठरतात. अशा वेळी इण्टरनेट एक्स्प्लोररमध्ये फुलस्क्रीन करून साइट पाहिल्यास सर्व मेनूबार लपवता येतात. यासाठी कीबोर्डवरील स्न११ बटन दाबल्यानंतर पाहत असलेली वेबसाइट संपूर्ण स्क्रीनभर दिसते. पुन्हा स्न११ बटन दाबल्यावर पूर्वीप्रमाणे सर्व मेनू दिसू शकतात.

२ जवळपास ९० टक्के वेबसाइट कमर्शिअल म्हणजे . com असतात. त्या चेक करण्यासाठी आपण सुरुवातीला www आणि शेवटी . com टाइप करतो. म्हणजे www.maharashtratimes.com वेबसाइट पाहण्यासाठी आपण संपूर्ण यूआरएल टाइप करतो. पण त्याऐवजी इण्टरनेट एक्स्पोररच्या अॅड्रेस बारमध्ये फक्त maharashtratimes टाइप करून कीबोर्डवरील Ctrl + Enter दाबल्यास तिथे आपोआप www.maharashtratimes.com येईल.

३ एखादी वेबसाइट चांगली आणि उपयुक्त वाटली तर ' Favorites 'मध्ये अॅड करून ठेवल्यास ती कधीही बघता येते. यासाठी आपण बऱ्याचदा मेनूबारमधील 'फेवरिट'मध्ये जाऊन ती अॅड करतो. या लाँगकटऐवजी कीबोर्डवरील Ctrl+D दाबून सोप्या पद्धतीने साइट अॅड करता येते. तसंच New Folder वर क्लिक केल्यास त्याला नाव देऊन OK केल्यास ती वेबसाइट त्या फोल्डरमध्ये स्टोअर केली जाते. अशा प्रकारे स्टोअर केलेली वेबसाइट पुन्हा पाहण्यासाठी ब्राऊझर वरील मेनूबारमधील ' Favorites 'ला क्लिक केल्यास सेव्ह केलेल्या सर्व वेबसाइट्सची यादी मिळते.

४ काही वेबसाइटवरील फॉण्टचा आकार फारच लहान असल्याने मजकूर वाचायला त्रास होतो. अशावेळी कीबोर्डवरील Ctrl दाबून ठेऊन माऊसवरील मधले 'स्क्रोल'चे बटण फिरवल्यास चालू वेबसाइटवरील मजकुराचा फॉण्ट लहान किंवा मोठा करता येतो.

५ एखादी वेबसाइट पाहिल्यानंतर दुसरी वेबसाइट पाहण्यासाठी आपण Address Bar वर क्लिक करून नवीन वेबसाइटचे नाव टाइप करतो. पण Address Bar वर क्लिक करण्याऐवजी कीबोर्डवरील F6 दाबल्यास कर्सर लगेच Address Bar वर जातो.

No comments: