photo

Friday, April 24, 2009

बामाच्या नावाने पसरवतात व्हायरस

इंटरनेटच्या माध्यमातून व्हायरस पसरवणा-यांनी आता ओबामांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अँटी व्हायरस तयार करणा-या कंपन्यांनी युजरना सावधगिरीचा सल्ला दिला आहे.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याविषयीची माहिती, फोटो, बातम्या वाचण्याकडे इंटरनेट युजरचा जास्त कल आहे. त्यामुळे ' ओबामांविषयीची दुर्मिळ माहिती वाचण्यासाठी क्लिक करा ' असे सांगणा-या वेबसाइट आणि ब्लॉगची गेल्या दोन-तीन दिवसात मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आहे. या वेबपेजेसची हेडिंग वाचून पटकन क्लिक केल्यावर लगेच एक व्हायरस इंटरनेट कनेक्शच्या माध्यमातून कम्प्युटरमध्ये प्रवेश करतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

मंगळवारी तर ' ओबामा यांचा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्यास नकार ', अशीही एक बातमी काही वेबसाइटवरुन प्रसारीत करण्यात आली. या बातमीवर क्लिक केल्यावरही काही कम्प्युटर युजरना व्हायरसचा त्रास सहन करावा लागला आहे. कम्प्युटरमध्ये प्रवेश करणारा व्हायरस वेगाने माहिती नष्ट करतो आहे. त्यामुळे ओबामांची माहिती वाचण्यासाठी क्लिक करताना सावध राहण्याचे आवाहन अँटी व्हायरस कंपन्यांचे तज्ज्ञ करत आहेत. युजरने इंटरनेटचा वापर करण्याआधी कम्प्युटरमध्ये चांगले अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करुन घ्यावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

No comments: