photo

Friday, April 24, 2009

र्टकट 7 Aug 2008, 0208 hrs IST

वळणावणाचे लाँगकट टाळून शॉर्टकटने जाणं आपल्या सर्वांनाच आवडतं. कम्प्युटरच्या दुनियेतही असे काही शॉर्टकट्स असतात, की जे आपला वेळ आणि कष्ट दोन्हीही वाचवू शकतात. अशाच काही ज्ञातअज्ञात शॉर्टकट्सची माहिती आजच्या टेकट्रिक्समध्ये...

Ctrl+c म्हणजे कॉपी, Ctrl+x म्हणजे कट, Ctrl+v म्हणजे पेस्ट किंवा Ctrl+z म्हणजे अण्डू असे काही शॉर्र्टकट्स आपल्यापैकी अनेकांना माहीतही असतील. पण जे आपल्याला माहितेय ते इतरांना असतीलच असे नाही. त्यामुळे 'ट्राय करके तो देखो'... शेवटी माऊसपेक्षा की-बोर्डवर ज्यांची बोटं धावतात तोच खरा टेकसेव्ही...

* समजा, तुमच्या कम्प्युटरवर एका वेळेला चार-पाच प्रोग्राम सुरू असतील आणि तुम्हाला डेस्कटॉपवर सेव केलेली एखादी फाइल उघडायची आहे. अशा वेळी आपण प्रत्येक प्रोग्राम मिनीमाइज करत बसतो. असा एकेक प्रत्येक प्रोग्राम मिनीमाइज करण्यापेक्षा सरळ 'विण्डोज लोगो असलेलं बटण आणि एम' एकत्र दाबायचे. सर्व प्रोग्राम मिनीमाइज होऊन आपण डेस्कटॉपवर येतो. तसंच 'विण्डोज लोगो असलेलं बटण आणि डी' दाबूनही थेट डेस्कटॉपवर येता येतं.

( की बोर्डवरील विण्डोज लोगो असलेल्या बटणाला यापुढे आपण फक्त विण्डोज बटण म्हणू या.)

* बऱ्याचदा आपल्याला अचानक विण्डोज एक्स्प्लोररमध्ये काही तरी शोधायचं असतं. अशा वेळी डेस्कटॉपवर येऊन एक्स्प्लोअर करण्याऐवजी 'विण्डोज बटण आणि ई' दाबल्यावर थेट विण्डोज एक्स्पोरर उघडतं.

* अनेकदा काम सुरू असताना आपल्याला एखादी फाइल शोधायची असते. अशा वेळी स्टार्टमधून सर्चमध्ये जाण्याऐवजी थेट 'विण्डोज बटण आणि एफ' दाबल्यास थेट सर्च विण्डो ओपन होते.

* काही वेळासाठी ब्रेक घेण्यासाठी आपण सुरू असेलेले प्रोग्राम तसंच ठेवून जातो. यामुळे कदाचित एखाद्याने त्यात ढवळाढवळ केल्यास आपल्या कामावर पाणी पडू शकते. यासाठी आपली स्क्रीन लॉक करून जाणं हिताचं ठरतं. यासाठी फक्त 'विण्डोज बटण आणि एल' दोन बटणं दाबण्याचा अवकाश आपली स्क्रीन लॉक होते. यात आपल्याला पासवर्डही सेट करता येतो. त्यामुळे आपलं काम इतरांना कळू न देण्यासाठीही याचा उपयोग होतो.

* अनेक कारणांसाठी आपल्याला विण्डोज हेल्पमधून काही प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. यासाठी 'विण्डोज बटण आणि एफ १' ही बटणं दाबल्यास थेट विण्डोज हेल्प आपल्यापुढे हजर!

* रन कमाण्डमध्ये जाऊन आपण अनेक प्रोग्राम रन करतो. त्यासाठी स्टार्ट-रन असा लाँगकट वापरण्यापेक्षा फक्त 'विण्डोज बटण आणि आर' दाबायचं... रनची विण्डो धावायला रेडी...

असे आणखी बरेच शॉर्टकट्स आहेत... त्यांची माहिती पुढल्या भागात.

No comments: