photo

Friday, April 24, 2009

JEE ची तयारी

आयआयटीची एन्ट्रन्स परीक्षा ( JEE ) आता जवळ आली आहे. या परीक्षेचा अभ्यास कसा करावा, याचं मार्गदर्शन 'मिशन आयआयटी' लेखमालेतून करणार
आहोत. इझीआयआयटी.कॉम या वेबसाइटचे तज्झ मार्गदर्शन करणार आहेत.

.....

बारावीच्या अभ्यासाला प्राथमिकता द्या. पण छ्वश्वश्व चा अभ्यास सोडून नका. एकूण अभ्यासाच्या वेळातील ७० टक्के वेळ बारावीला द्या आणि ३० टक्के वेळ छ्वश्वश्व ला द्या. म्हणजे आता दिवसाला दहा ते बारा तास अभ्यास करत असाल तर तीन ते चार तास छ्वश्वश्व ला द्या. म्हणजेच बारावीची परीक्षा होईपर्यंत साधारणपणे नव्व्द तास छ्वश्वश्व चा अभ्यास होईल. म्हणजे प्रत्येक विषयाचा तीस तास अभ्यास.

या वेळात फिजिक्समधे मेकॅनिक्स आणि इलेक्ट्रिसिटी, मॅथसमधे कॅलक्युलस आणि ट्रीग्नॉमेट्री आणि केमिस्ट्रीमधे फिजिकल केमिस्ट्री, सॉल्ट अनॅलिसिस आणि ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करा. या सगळ्या विषयात भर द्या, प्रॉब्लेम्स किंवा सम्स सोडवण्यावर. थेअरी ठेवा बाजूला. या काळात तुम्ही दिलेल्या सराव परीक्षामधील (रूश्ाष्द्म छ्वश्वश्व) मार्कांकडे लक्ष देऊ नका कारण तुम्ही बारावीच्या अभ्यासावर भर दिल्यामुळे तुमची गुणसंख्या कमी-जास्त होणारच आहे.

ऑरगॅनिक केमिस्ट्रीचं दडपण कमी करण्यासाठी मी तुम्हाला एक युक्ती सांगतो. ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करताना सर्वसाधारणपणे दिला जातो तो रिअॅक्शन्सवर. पण जर तुम्ही अभ्यासक्रम नीट बघितला तर लक्षात येईल की, रिएजण्टसचा अभ्यास पक्का असेल तर रिअॅक्शन्स लक्षात ठेवणं एकदम सोपं जातं. रिअजण्ट्सचा अभ्यास करण्याची सोपी पद्धत म्हणजे एक चार्ट तयार करा. या चार्टमधे त्यांच्या प्रॉपटीर्जचं नाव, त्याच्या रिअॅक्शनची नोंद करा

खाली दिलेला चार्ट सर्व रिएजण्टसाठी करू शकता. असे एकूण पंचवीस रिएजण्ट्स आहेत जे छ्वश्वश्व मधे प्रश्न स्वरूपात येऊ शकतात. जर तुम्ही सर्व रिएजण्टचा असा चार्ट बनवू शकलात आणि त्याचा सखोल अभ्यास केलात तर ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा सराव तुम्ही कमी वेळात कराल आणि तो जास्त फायदेशीर ठरेल. आणि असा चार्ट बनवायला लागतील फक्तदोन तास. मग लागा तयारीला. आणि एका गंमत सांगू. असा चार्ट तुम्हाला रेडिमेड मिळेल वेबसाइटवर. मग चला क्लिक करा www.easyiit.com वर.

No comments: